ब्रह्माविष्णुकृत शिवस्तुतिः

ब्रह्माविष्णुकृत शिवस्तुतिः

ब्रह्मोवाच । नमस्ते सर्वलोकानामादिकर्त्रे महात्मने । पुरुषाय पुराणाय परञ्ज्योतिःस्वरूपिणे ॥ ५४॥ चक्रभ्रमणकर्ता त्वं सदा शम्भो नमोऽस्तु ते । प्रेरकः सर्वजगतामन्तर्यामी हृदि स्थितः ॥ ५५॥ त्वन्मायाऽपहतप्रज्ञो न जाने त्वां महेश्वर । मम कर्ता त्वमेवेश कर्ता विष्णोस्त्वमेव च ॥ ५६॥ वाचामगम्यतां यातो विश्वरूपोऽसि सर्वगः । अतः स्तोतुं न शक्नोमि योऽसि सोऽसि नमोऽस्तु ते ॥ ५७॥ एवं स्तुत्वा ब्रह्मयोनिस्तूष्णीमास द्विजोत्तमाः । ततः शिवं प्रभुर्विष्णुः स्तोतुं समुपचक्रमे ॥ ५८॥ विष्णुरुवाच । सर्गस्थितिविनाशानां कर्ता त्वं सर्वदा शिव । त्वन्मायामोहितो देव न जाने त्वां महेश्वर ॥ ५९॥ पशवो हि वयं सर्वे सदेवासुरमानवाः । पतिस्त्वमेव सर्वेषां पशूनां परमेश्वर ॥ ६०॥ हतानि विष्णुवृन्दानि गीर्वाणब्रह्मकोटयः । त्वयैकेन सदा शम्भो पाहि मां भक्तवत्सलम् ॥ ६१॥ असमर्थौ यथा द्रष्टुमुलूको रविमण्डलम् । तथैव त्वामहं द्रष्टुमसमर्थो महेश्वर ॥ ६२॥ विकारषट्करहितनित्योदितवृहद्वपुः । चित्तवर्जितचिद्रूप योऽसि सोऽसि नमोऽस्तु ते ॥ ६३॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे ब्रह्माविष्णुकृत शिवस्तुतिः समाप्ता । आधीं ब्रह्मदेवानें स्तोत्र करावयास आरम्भ केला. (५४) सर्व लोकाचा आदिकर्ता, महात्मा, पुरुषा, पुराणा, परंज्योतिःस्वरूपा, तुला नमन असो. (५५) चकभ्रमण करणाऱ्या हे शंभो तुला नमन असो. तूं सर्व जगाचा प्रेरक असून सर्वांतर्यामी असून प्रत्येकाच्या हृदयामध्यें राहिला आहेस. (५६) तुझ्या मायेच्या योगानें माझी बुद्धि नष्ट झाल्यामुळें तुला मी जाणत नाहीं. हे ईशा, माझा कर्ता तूच असून विष्णूचा कर्ताही तूंच आहेस. (५७) तूं वाणीला अगम्य (न समजणारा) असून विश्वरूप असून सर्वव्यापी आहेस. याकरितां स्तोत्र करावयास मी समर्थ नाहीं. जो तूं आहेस, त्या तुला नमस्कार असो. (५८) ब्राह्मणश्रेष्ठहो, ब्रह्मदेव याप्रमाणे स्तुति करून स्वस्थ बसला. नंतर विष्णूनें श्रीशिवाची स्तुति केली. (५९) विष्णु बोलला हे शिवा, सृष्टि, स्थिति, लय यांचा कर्ता तूं आहेस. तुझ्या मायेनें मोहित होऊन मी कांहीं एक जाणत नाहीं. (६०) देव, असुर, मानव हे सर्व आम्ही पशु आहोत. हे परमेश्वरा, सर्व पशूंचा पति तूं एकटाच आहेस. (६१) हजारो विष्णु, हजारो देव, हजारो ब्रह्मदेव तूं मारिले असतील, तर हे भक्तवत्सला शंभो, माझें रक्षण कर. (६२) घुबड जसा सूर्याला पाहूं शकत नाहीं तसेच हे महेश्वरा, तुला मी पाहावयास समर्थ होत नाहीं. (६३) षड्डिकार रहित असून तूं नित्य आहेस निरंतर तुझें शरीर मोठें असतें. मनरहित असून आनंदस्वरूप आहेस. असा जो तूं असशील, त्या तुला नमन असो. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Brahmavishnukrita Shiva Stutih
% File name             : brahmAviShNukRRitashivastutiH.itx
% itxtitle              : shivastutiH brahmAviShNukRitA (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : brahmAviShNukRitashivastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org