देवकृत शिवस्तुतिः

देवकृत शिवस्तुतिः

देवा ऊचुः । ॐ नमः परमेशाय त्रिनेत्राय त्रिशूलिने । विरूपाय सुरूपाय पञ्चास्याय त्रिमूर्तये ॥ ८८॥ नीलकण्ठाय विश्वाय मण्डलेशाय ते नमः । विश्वनाथाय विश्वाय विश्वेशायात्मरूपिणे ॥ ८९॥ कालामखघ्नाय ह्यन्धकघ्नाय वै नमः । ईशोऽनीशस्त्वमेवेश अन्तोऽनन्तस्त्वमेव हि ॥ ९०॥ व्ययस्त्वमव्ययश्चैव जन्माजन्मा त्वमेव हि । नित्योऽनित्यस्त्वमेवेश धर्मोऽधर्मस्त्वमेव च ॥ ९१॥ गुरुस्त्वमगुरुर्देव बीजं वाऽबीजमेव च । कालस्त्वमेव लोकानामकालः परिगीयते ॥ ९२॥ बलस्त्वमबलश्चैव प्राणश्चाप्राण एव च । साक्षी त्वं कर्मणां देव तथाऽ साक्षी महेश्वर ॥ ९३॥ शास्ताऽशास्ता विरूपाक्ष ध्रुवमध्रुव एव च । संसारी त्वं हि जन्तूनामसंसारी त्वमेव च ॥ ९४॥ गोप्ता त्वं सर्वभूतानां नास्ति गोप्ता तवेश्वर । जीवस्त्वं जीवलोकस्य जीवस्तेऽन्यो न विद्यते ॥ ९५॥ देहिनां शङ्करस्त्वं हि न चान्यस्तव शङ्करः । अरुद्रस्त्वं महारुद्रो घोरस्त्वं घोरकर्मणाम् ॥ ९६॥ देवानां त्वं महादेवो महांस्त्वत्तो न विद्यते । कामस्त्वं भविता सर्वनिष्कामस्त्वं जगत्पते ॥ ९७॥ अजेयो जयिनां श्रेष्ठो जयरूपस्त्वमेव हि । पुराणपुरुषस्त्वं हि पुराणोऽन्यो न विद्यते ॥ ९८॥ व्यालंयज्ञोपवीताय सरोजान्ताय ते नमः । नमोऽस्तु नीलग्रीवाय शितिकण्ठाय मीढुषे ॥ ९९॥ नमः कपालहस्ताय पाशहस्ताय दण्डिने । नमो देवाधिदेवाय नारायणनुतायं च ॥ १००॥ ऊर्ध्वमार्ग? प्रणीताय नमस्ते ह्यूर्ध्वरेतसे । क्रोधिने वीतरागाय गजचर्मावगुण्ठिने ॥ १०१॥ नमो ब्रह्मशिरोघ्नाय नमस्ते रुक्मतेजसे । नमश्चन्द्राय धीराय? कमण्डलुनिषङ्गिणे ॥ १०२॥ नमः प्रचण्डदेवाय चण्डक्रोधाय ते नमः । वरेण्याय शरण्याय ब्रह्मण्यायांविकापते ॥ १०३॥ सर्वानुग्रहकर्ता ज्ञानदाय नमो नमः । नमः संसारघोराय ह्यणिमादिप्रदायिने ॥ १०४॥ ज्येष्ठसामादिसंस्थाय रथान्तररवाय च । शक्तित्रयविहीनाय शक्तित्रययुताय च ॥ १०५॥ शक्तित्रयात्मरूपाय शक्तित्रयधराय च । योगीशाय विनिघ्नाय विजयाय नमो नमः ॥ १०६॥ नमस्ते हरिकेशाय योगीशाय त्रिदण्डिने । हरीशायाप्रमेयाय कुण्डलीशाय चक्रिणे । नमो बिन्दुविसर्गाय नादायानन्दधारिणे ॥ १०७॥ नमो गायत्रिनाथाय गायत्रिहृदयाय ते । नमो गायत्रिगोप्ताय गायत्र्याय नमो नमः ॥ १०८॥ य इदं पठते स्तोत्रं गीर्वाणैः समुदीरितम् । यावज्जीवकृतैः पापैर्मुक्तो याति परां गतिम् ॥ १०९॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे देवकृत शिवस्तुतिः समाप्ता । (८८) देव म्हणतात- हे परमेश्वरा, तूं ओंकारस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो, तुला तीन नेत्र आहेत, तुझ्या हातांत त्रिशूल आहे, तूं विरूप असून रूपही आहेस, तुला पांच मुखे असून तूं त्रिमूर्ति आहेस, तुला नमस्कार असो. (८९) तुझा कंठ नीलवर्ण आहे, तूं विश्वस्वरूप आहेस, तूं मंडलेश्वर आहे, तू विश्वांचा अधिपति आहेस आणि विश्वस्वरूप आहेस, तूं विश्वाचा आत्मा आत्मस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो. (९०) तूं मार्कंडेय मुनीचा प्राण वांचविण्याच्या वेळीं यमास मारिलेंस, दक्षप्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केलास, तूं अंधकासुरास जिवें मारिलेंस तुला नमस्कार असो. हे ईश्वरा, तूं ईश असून अनीशही आहेस. तूं अंत आहेस आणि अनंतही तूंच आहेस. (९१) हे ईश्वरा, व्ययही तूंच असून अव्ययही तूंच आहेस. जन्म असणारा तूं असून जन्म नसणाराही तूंच आहेस, हे ईश्वरा, तूं नित्य असून अनित्यही आहेस, तूं धर्म आहेस आणि अधर्मही तूंच आहेस. (९२) परमेश्वरा, गुरु तूं असून लघुही तूंच आहेस, बीज तूं असून अबीजही तूंच आहेस. तूं लोकांचा संहारकर्ता असून रक्षकही मानला आहेस (तूं जगाचा रक्षणकर्ताही आहेस।) (९३) बलवान् तूं असून निर्बलही तूंच आहेस. प्राण तूं असून अप्राणही तूंच आहेस. महेश्वरा, तूं कर्माचा साक्षी असून साक्षीही नाहींस. (९४) हे विरूपाक्षा, तूं शास्ता असूनही शास्ता नाहींस. ध्रुवही तूंच आहेस आणि अध्रुव (अनित्य) ही तूंच आहेस. प्राणिमात्रांचा संसारी तूंच असून संसार नसणाराही तूंच आहेस. (९५) महेश्वरा, तूं सर्व प्राणिमात्रांचा रक्षक आहेस तुला दुसरा कोणी रक्षक नाहीं. तूंच सर्व जीवसमूहांचा जीव आहेस, तुजवांचून जीव दुसरा नाहीं. (९६) तूं सर्व जगांचे कल्याण करणारा आहेस, तुजखेरीज दुसरा कोणी कल्याण करणारा नाहीं. तूं रुद्र नसून (शांत असून) महारुद्रही आहेस. भयंकर कर्म करणारे जितके लोक आहेत त्या सर्वोपेक्षां तूं जास्त भयंकर कर्मे करणारा आहेस. (९७) हे महादेवा, तूं सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहेस तुझ्यापेक्षां श्रेष्ठ देव दुसरा नाहीं. तूंच काम (इच्छा करणारा) असून निष्कामही आहेस. तूं सर्व त्रैलोक्याचा अधिपति आहेस. (९८) तूं सर्वांस अजिंक्य आहेस, तुला जिंकण्याची कोणाची शक्ति नहीं, जगांत कोण विजयी लोक आहेत त्या सर्वांपेक्षां तूं श्रेष्ठ आहेस. तूं सर्वांहून प्राचीन काळचा आहेस, तुझ्या अगोदरपासून असणारा कोणी नाहीं (९९) तुझ्या गळ्यात सर्पाचें यज्ञोपवीत आहे, चोळ देशांतील पांड्यराजानें केलेल्या सरोवरांत उत्पन्न झालेल्या मत्स्यावताराचा नाश केलास. त्या तुला नमस्कार असो, तुला नीलग्रीव शितिकंठ, मीढुष, अशीं नांवें आहेत त्या तुला नमस्कार असो. (१००) तुझ्या हातांत कपाल आहे, तुझ्या हातांत पाश आहे, तुझ्या हातांत दंड आहे. देवांचा मुख्य देव आहेस तुझी श्रीविष्णु स्तुति करितो त्या तुला नमस्कार असो. (१०१) तूं मोक्षमार्गाचा दर्शक आहेस, तुला ऊर्ध्वरेता असे म्हणतात. तूं मोठा रागीट आहेस, तूं वैराग्यवान् असून तूं आपल्या अंगावर हत्तीचे कातडें पांघरण्यास घेतलें आहेस. (१०२) तूं ब्रह्मदेवाचें मस्तक कापिलेंस, अंगकांति सोन्यासारखी आहे, तूं चंद्रासारखा तेजस्वी असून तूं धैर्यवान् आहेस, तुझ्या हातांत कमंडलु आहे त्या तुला नमस्कार असो. (१०३) तूं सर्व देवांपेक्ष दयावान्?? आहेस, तुझा रागही मोठा कठीण आहे (तूं फार रागीट आहेस) तुला नमस्कार असो, तूं सर्व देवांपेक्षां श्रेष्ठ आहेस, तूं शरणागतांचे रक्षण करणारा आहेस. तूं ब्रह्मण्य (ब्रह्मस्वरूप) असून पार्वतीचा पति आहेस. (१०४) तं देवांवर कृपा करणारा आहेस, तूं ज्ञान देणारा आहेस. तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. तूं संसाराचा ताप दूर करणारा आहेस, अणिमा ?? अष्टमहासिद्धि प्राप्त करून देणारा आहेस, तुला नमस्कार असो. (१०५) सामगायनांत वास्तव्य करणाऱ्या शंकरा तुला नमस्कार असो. तुला रथांत?? असे म्हणतात, तुझ्या अंगी तीन प्रकारच्या शक्ति नाहींत तरी तीन प्रकारच्या शक्तिरूप तूं आहेस त्या तुला नमस्कार असो. (१०६) तूं तीन शक्तीचें मूळस्वरूप आहेस. तुझ्या अंगी तीन प्रकारच्या शक्ति आहेत. तूं योगी लोकांचा अधिपति आहेस, तूं नम्र स्वभावाचा असून विजय मिळविणारा आहेस, त्या तुला नमस्कार असो. त्या तुला नमस्कार असो. (१०७) तुला हरिकेश म्हणतात, तूं योगी लोकांचा ईश्वर आहेस, तुला नमस्कार असो. तू त्रिदंडी आहेस, तूं विष्णूचा अधिपति आहेस, तुझ्या योग्यतेचा मनुष्य ह्या जगांत कोणी नाहीं, तूं सर्पांचा अधिपति आहेस, तुझ्या हातांत चक्र आहे. तूं बिंदूचा विसर्ग केलास, तूं नादस्वरूप आहेस, तूं आनंदी आहेस. (१०८) तूं गायत्रीचा मुख्य देव आहेस, तूं गायत्रीमंत्राचें हृदय आहेस, तूं गायत्रीचा रक्षक असून तूं गायत्रीस्वरूप आहेस. त्या तुला नमस्कार असो, नमस्कार असो. (१०९) जो कोणी मनुष्य हें देवांनीं केलेलें शिवाचें स्तोत्र पठन करीलं; त्यानें ह्या जन्मांत जितकीं कांहीं पापें केलीं असतील त्या सर्व पापांचा नाश होऊन तो उत्तम गतीला जाईल. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Devakrita Shiva Stuti
% File name             : devakRRitashivastutiH.itx
% itxtitle              : shivastutiH devakRitA (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : devakRitashivastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org