मृत्युविजयस्तोत्रम्

मृत्युविजयस्तोत्रम्

मार्कण्डेय उवाच । रुद्रं पशुपतिं स्थाणुं नीलकण्ठमुमापतिम् । नमामि शिरसा देवं कि नो मृत्युः करिष्यति ॥ ६८॥ अनन्तमव्ययं शान्तमक्षमालाधरं हरम् । नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ॥ ६९॥ कालकण्ठं कलामूर्तिं कालाग्निं कालनाशनम् । नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ॥ ७०॥ नीलकण्ठं विरूपाक्षं निर्मलं निरुपप्लवम् । नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ॥ ७१॥ देवदेवं जगन्नाथं देवेशं वृषभध्वजम् । नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ॥ ७२॥ देवदेवं महादेवं लोकनाथं जगद्गुरुम् । नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ॥ ७३॥ आनन्दं परमं नित्यं कैवल्यपदका रणम् । नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति ॥ ७४॥ स्वर्गापवर्गदातारं सृष्टिस्थित्यन्तकारणम् । नमामि शिरसा देवं कि नो मृत्युः करिष्यति ॥ ७५॥ इत्युदीरितमाकर्ण्य स्तोत्रं स्तुतिकरप्रियः । संस्पृश्य पाणिना भक्तमनुगृह्याब्रवीदिदम् ॥ ७६॥ मार्कण्डेयकृतं स्तोत्रं यः पठेच्छिवसन्निधौ । तस्य मृत्युभयं नास्ति सत्यमेतदिति प्रभुः ॥ ७७॥ देवदुन्दुभयो नेदुः पुष्पवृष्टिः पपात च । संहृष्टाः प्राणिनोऽस्माकं नास्ति मृत्युभयं त्विति ॥ ७८॥ आगताः पद्मयोन्याद्या देवाः सर्षिगणास्तदा । दृष्ट्वा कालं हतं सर्वे तुष्टवुः परमेश्वरम् ॥ ७९॥ देवा ऊचुः । ॐ नमो नीलकण्ठाय सदा भक्तप्रियाय ते । तत्कालोचितरूपाय कालकालाय ते नमः ॥ ८०॥ नमस्ते पाशहस्ताय त्रिशूलवरधारिणे । नमः परशुहस्ताय मृत्योरपि च मृत्यवे ॥ ८१॥ नमस्ते कालरु द्राय सर्वसंहरणाय ते । नमः स्वतन्त्रचेष्टाय सर्वस्मादधिकाय ते ॥ ८२॥ नमः कालविनोदाय भक्तिप्राप्याय ते नमः । नमः स्तुत्याय नित्याय भक्तानामार्तिहारिणे ॥ ८३॥ नमः प्रणतपादाय हरिब्रह्मादिभिः सदा । सर्वस्तुत्य स्वरूपाय स्वयमस्तोत्रकारिणे ॥ ८४॥ नमो विज्ञानगम्याय भक्तिगम्याय ते नमः । नमः स्रष्ट्रेऽखिलस्यास्य पालयित्रे नमो नमः ॥ ८५॥ नमः सर्वस्य संहर्त्रे परात्परतराय ते । अगतिं ते न जानीमो गतिं नैव प्रभो वयम् ॥ ८६॥ त्वन्मायामूढचित्तानामस्माकं रक्षणं कुरु । ततः प्रीतो महादेवः कोपमुत्सृज्य दूरतः ॥ ८७॥ ब्रह्मादीनब्रवीद्देवान् भीतान्गम्भीरया गिरा । प्रजापते त्वं विष्णुर्वा शक्रो वाऽन्ये सुरादयः ॥ ८८॥ अज्ञानादथवा ज्ञानान्मद्भक्तेषु महात्मसु । कुर्युश्चेदपराधं ते दण्ड्या वध्याश्च नित्यशः ॥ ८९॥ मद्भक्तं द्वेष्टि यो मोहादपराध्यति वाऽधमः । न सहे तं दुरात्मानं सहे मय्यपराधिनम् ॥ ९०॥ मद्भक्तरक्षणायैव मम सर्वं हि चेष्टितम् । इति जानीत मद्भक्तान्प्राणेभ्योऽपि गरीयसः ॥ ९१॥ इति श्रुत्वा वचः शम्भोर्ब्रह्माद्याः प्रणतिं गताः । तथा स्त्विति ब्रुवन्तोऽन्यत्प्रार्थयामासुरीश्वरम् ॥ ९२॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे मृत्युविजयस्तोत्रं सम्पूर्णम् । हाहाःकार करूं लागला; आणि पर्वत जसा ढासळून पडावा, त्या प्रमाणे तो काल खालीं पडला. (६५?) तेव्हां त्याचे केस सगळे अस्ताव्यस्त पडले होते, व तोंड वासलें होतें; गतजीवित होऊन पडला होता. बुद्धिमान मुनीनें कालाला पाहून अत्याश्चर्यकर श्रेष्ठ शिवाला (६८) मार्केडेय बोलले - रुद्रा, पशुपते, स्थाणो, नीलकंठा, पार्वतीपते, देवा तुला नमस्कार करतों, मग मला मृत्यु काय करणार आहे ? (६९) अनंत अव्यय शांत, जपमाला धारण करणारा अशा हराला शिरसा नमस्कार करतों. मला मृत्यु काय करणार आहे? (७०) कालकंठ, कलामूर्ति, कालाग्नि, कालनाशन, अशा देवाला मी नमस्कार करतों मग मला मृत्यु काय करतो. (७१) नीलकंठ, विरूपाक्ष, निर्मल, निरुपद्रवी, अशा देवाला नमस्कार करतो मग मला मृत्यु काय करणार आहे? (७२) वामदेव, जगन्नाथ, देवाधिपति, वृषभध्वज अशा देवाला मी नमस्कार करितों मला मृत्यु काय करणार आहे? (७३) देवाधिदेव, महादेव, लोकनायक, जगद्गुरु, अशा देवाला नमस्कार करितों, मग मला मृत्यु काय करणार? (७४) आनंद, परम, नित्य, कैवल्यपदाला कारण अशा देवाला नमस्कार करतों मग मृत्यु मला काय करणार आहे? (७५) स्वर्ग व अपवर्ग देणारा, सृष्टि, स्थिति, लय यांला कारण अशा देवाला नमस्कार करतों, मग मला मृत्यु काय करणार आहे ? (७६) या प्रमाणे केलेले स्तोत्र स्तुतिप्रिय शिवानें ऐकून हातानें भक्ताला स्पर्श करून अनुग्रह करून हें बोलला (७७) मार्केडेयानें केलेलें स्तोत्र जो ऐकतो, व जो पठन करितो, त्याला मृत्यूची भीति मुळींच नाहीं; असें खरें खरें श्रीशिव सांगतात. (७८) इतक्यांत देव दुंदुभि वाजवूं लागले, पुष्पवृष्टि पडावयास लागली. आह्मांस मृत्यूची भीति नाहीं, असें संतोषानें लोक म्हणावयास लागले आहेत. (७९) त्या वेळेस तेथें ब्रह्मदेव वगैरे देव ऋषिगणासह नष्ट झालेल्या कालाला पाहून परमेश्वराची स्तुति करूं लागले. (८०) देव बोलले - हे नीलकंठा, भक्तप्रिया, तुला नमस्कार असो. त्याचे वेळेस तात्काळ योग्यरूप घेणाऱ्या देवा, कालकाला, तुला नमस्कार असो. (८१) पाशहस्ता, त्रिशूलधारिन्, परशुहस्ता, मृत्यूच्या मृत्यो, तुला नमस्कार असो. (८२) हे कालरुद्रा, सर्वसंहरणा, स्वतंत्रचेष्टा, सर्वाधिका, तुला नमस्कार असो. (८३) कालविनोदा, भक्तिप्रिय, तुला नमन असो. स्तुत्या, नित्या, भक्त पीडानिवारका, देवा, तुला नमन असो. (८४) हरिहर ब्रह्मादिकांनीं प्रणतपादा, (नमन करून घेणाऱ्या) स्तोत्र करावयास योग्य स्वरूपाच्या देवा, स्वतः कोणाचे स्तोत्र न करणाऱ्या देवा, तुला नमन असो. (८५) विज्ञानाने मिळणाऱ्या देवा भक्तिगम्या, तुला नमन असो. अखिल जगाची सृष्टि करणा-या देवा, सर्वांचे पालन करणाऱ्या देवा, तुला नमन असो. (८६) सर्व जगाचा संहार करणाऱ्या देवा, परात्परा, गतिरहित तुला आह्मी जाणीत नाहीं. (८७) तुझ्या मायेनें मूढ झालेल्या चित्ताच्या देवा, आमचें रक्षण कर. त्यानंतर कोप दूर सोडून महादेव संतुष्ट झाला. (८८) भीत झालेल्या ब्रह्मादिदेवांना गंभीर वाणीनें श्रीशिव म्हणाले. हे प्रजापते, हे विष्णो, इंद्रा, इतर देवांनो, (८९) अज्ञानानें होवो, किंवा सज्ञानानें होवो, माहात्मे माझ्या भक्ताविषयीं कोणीं अपराध जर केला; ते निरंतर माझ्या दंडाला व वधाला पात्र आहेत. (९०) मोहामुळे माझ्या भक्ता बरोबर जो द्वेष करतो, व माझ्या भक्तांचा अपराधी जो होतो, त्या दुरात्म्याला कधीं मी सहन करीत नाहीं. तो स्वतः माझा अपराधी आहे. (९१) माझ्या भक्तांच्या रक्षणाकरितां माझ्या या सर्व चेष्टा आहेत; माझ्या भक्तांना प्राणांही पेक्षां श्रेष्ठ आहेत; असें समजा. (९२) या प्रमाणे श्रीशिवाचें वचन ऐकून ब्रह्मादिदेवांनीं शिवाला नमस्कार केला. मग तथास्तु असें म्हणून ईश्वराची प्रार्थना करूं लागले. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Mrityuvijaya Stotram
% File name             : mRRityuvijayastotram.itx
% itxtitle              : mRityuvijayastotram (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : mRityuvijayastotram
% Category              : shiva, vIrashaiva
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org