पार्वतीकृता शिवस्तुतिः

पार्वतीकृता शिवस्तुतिः

देव्युवाच । वृत्तम् । बालेति मत्वा भव भूतनाथ व्यामोहसे किं त्वमनिन्द्यवर्ण । स्वतन्त्रशक्तिर्यदि चक्षुषस्ते तथा दहेन्मामपि नाग्रसंस्थाम् ॥ ६४॥ यदि विश्वेश्वरी देवो ब्रह्मादीनां वरः शिवः । प्रतारणे प्रवृत्तश्चेत्को विचारयितुं क्षमः ॥ ६५॥ नाहं प्रतार्या भगवन् त्वामेव शरणं गता । गतिर्नान्यास्ति मे देव तस्मान्मां त्रातुमर्हसि ॥ ६६॥ त्वमेव चक्षुर्जगतां त्वमेव वचसां पतिः । त्वमेव धाता जगतो विधाता विश्वतोमुखः ॥ ६७॥ वृत्तम् । नमाम्यहं देवमजं पुराणमुपेन्द्रवेधामरराजजुष्टम् । शशाङ्कसूर्याग्निमयं त्रिलोचनं ध्यानाधिगम्यं जगतः प्रकाशम् ॥ ६८॥ त्वां वाङ्मयाधारमनन्तवीर्यं ज्ञानार्णवं चैव गुणार्णवं च । परापरं धामनिधिं सुसूक्ष्ममनादिमध्यान्तविहीनरूपम् ॥ ६९॥ हिरण्यगर्भं जगतः प्रसूतिं नमामि देवं हरिणाङ्कचिह्नम् । पिनाकपाशाङ्कुशशूलहस्तं कपर्दिनं मेघसहस्रघोषम् ॥ ७०॥ तमालकण्ठं स्फटिकावभासं नमामि शम्भुं भुवनैकसिंहम् । विभुं पुराणं पुरुषं महान्तं शुभावहं भास्करकोटिभासम् ॥ ७१॥ आर्यावृत्तम् । सुरभिं सुवर्तितरथं दशार्धवक्त्रं ससायकं ध्वजिनम् । नरसिंहदारणं त्वां नमामि तं शरभरूपधरम् ॥ ७२॥ उरगेन्द्रराजहारं चरणद्वयभूषणं हरं वरदम् । विबुधमुकुटार्चिताङ्घ्रि नमामि हरिचर्मवसनं त्वाम् ॥ ७३॥ यदक्षरं निर्गुणमप्रमेयं यं ज्योतिरेकं प्रवदन्ति सन्तः । दूरङ्गमं देवमनन्तमूर्तिं नमामि सूक्ष्मं परमं पवित्रम् ॥ ७४॥ नमामि रुद्रं प्रमथाधिनाथं धर्मासनस्थं प्रकृतिद्वयं च । तेजोनिधिं बालशशाङ्कमौलिं कालार्दनं वह्निरवीन्दुनेत्रम् ॥ ७५॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे पार्वतीकृता शिवस्तुतिः समाप्ता । (६४) पार्वती म्हणाली- हे शिवा, आपण सर्व भूतांचे अधिपति आहां, आपली आकृतिही सौम्य आहे, असें असून मी लहान मुलगी आहें म्हणून मला फसवितां कीं काय ? तुमची इच्छा नसतां त्याच्या दृष्टीपुढे येणारा पदार्थ त्यानें जाळून टाकावा अशी त्या डोळ्याची स्वतंत्र शक्ति असेल, तर त्याच डोळ्यापुढें हल्लीं मी देखील उभी आहें मग मी कां जळून जात नाहीं. (६५) तुम्ही सर्व त्रैलोक्याचे अधिपति आहां, तुझी ब्रह्मदेव वगैरे देवांस देखील वरदान देतां, आपणास शिव म्हणतात; आणि असे असून आपण स्वतः जर लोकांस फसवूं लागलां, तर ह्या गोष्टींचा विचार कोणी करावा ? (६६) हे परमेश्वरा, तुझी मला असें फसवूं नका, मी तुम्हांलाच शरण आले आहे. हे परमेश्वरा, तुमचे वांचून माझें कोणी रक्षण करणारा नाहीं, ह्यासाठीं तुझी माझें रक्षण करा. (६७) तूंच सर्व त्रैलोक्याचा नेत्र आहेस, तूंच सर्व लोकांचा बृहस्पति आहेस, तूंच सर्व सृष्टि उत्पन्न करणारा आहेस, चोहोंकडे तोंडे असणारा तूंच ब्रह्मदेव आहेस. (६८) मी तुला नमस्कार करित्यें, हे देवा तुला जन्म नाहीं, तूं अनादिकालापासून आहेस. विष्णु, ब्रह्मदेव व इतर तेहतीस कोटि देव तुम्हांस नमन करितात. सूर्य, चंद्र आणि अग्नि हे तीन तुमचे नेत्र आहेत, समाधीच्या साधनानें तुझें यथार्थ स्वरूप समजतें, तूं त्रैलोक्याचें यथार्थज्ञान करून देतोस. (६९) तूंच सरस्वतीस (वाचेस) आश्रयभूत आहेस, तूं मोठा पराक्रमी आहेस, तुझ्या पराक्रमाचा अंत लागत नाहीं, तूं ज्ञानाचा आणि सद्गुणांचा समुद्र आहेस, तूं श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस, तूं तेजोनिधि (तेजःपुंज) आहेस, तूं फारच गुप्त आहेस. (तुझें यथार्थ ज्ञान कोणास होत नाहीं।) तुला जन्म नाहीं, तुला तरुणपणा नाहीं, तुला मरण नाहीं, तुला रूप देखील नाहीं, तूं निराकार आहेस, तुला नमस्कार असो. (७०) तूंच ब्रह्मदेव आहेस, तुझ्यापासून त्रैलोक्य उत्पन्न झालें, तुझ्या मस्तकावर चंद्र आहे, तुला मी नमस्कार करित्यें. तुझ्या हातांत अजगव धनुष्य, पाश, अंकुश, शूल इत्यादिक आयुधे आहेत, तुझ्या डोकीवर जटाजूट असून हजार मेघगर्जनेसारखा तुझा गंभीर शब्द आहे, मी तुला नमस्कार करित्यें. (७१) तुझा कंठ नीलवर्ण आहे, स्फटिकमण्यासारखी तुझी अंगकांति आहे, तुला शंभु म्हणतात, तूं त्रैलोक्यांत सिंहासारखा पराक्रमी आहेस. तूं समर्थ आहेस, तूं अनादिकालापासून आहेस, तुला पुरुष म्हणतात, तूं फार श्रेष्ठ आहेस, तूं कल्याणकरणारा आहेस, कोट्यावधि सूर्यांसारखा तेजस्वी आहेस, तुला नमस्कार असो. (७२) तुझें शरीर सुगंधि आहे, तुझा रथ सर्व त्रिभुवनांत निष्प्रतिबंध रीतीनें फिरतो, तुला पांच मुखे आहेत, तुझ्या हातांत धनुष्य बाण असून तुझ्या ध्वजावर वृषभ आहे, तूं नृसिंहाचें पोट फाडलेंस, तूं शरभाचें रूप घेतलेंस, त्या तुला माझा नमस्कार असो. (७३) तूं मोठमोठ्या नागांच्या आपल्या गळ्यांत माळा करून घातल्या आहेस, त्या सर्पोंचेच तुझ्या पायांत अलंकार आहेत, तुला हर म्हणतात, तूं वर देणारा आहेस असें म्हणतात, देवांचा समुदाय तुला नमस्कार करतांना तुझ्या दोन्ही पायांवर आपलीं डोकीं ठेवितो तेव्हां त्यांवरील मुकुटांमुळे ते पाय फारच सुशोभित दिसतात. तूं सिंहाचें कातडें नेसतोस, त्या तुला नमस्कार असो. (७४) तूं अविनाशी आहेस, तूं सत्त्वरजस्तमोगुणांहून भिन्न आहेस, ज्याला विद्वान लोक एक ज्योति (तेज) असें मानतात तेंच तेज तूं आहेस, तुझी कीर्ति दूरवर पसरलेली आहे, हे देवा, तुझीं अनेक शरीरें आहेत, तूं सूक्ष्म आहेस, आणि फारच पवित्र आहेस, त्या तुला माझा नमस्कार असो. (७५) हे रुद्रा, तूं प्रमथगणांचा अधिपति आहेस, तूं धर्मासनावर बसलेला आहेस, प्रकृति आणि पुरुष हे दोन्ही तूंच आहेस, तूं फारच तेजस्वी आहेस, शुक्लपक्षांतील द्वितीयेचा चंद्र तुझ्या मस्तकावर शोभतो तूं यमाला देखील शिक्षा केलीस, सूर्य, चंद्र आणि अग्नि हे तीन तुझे नेत्र आहेत, अशा तुला मी नमस्कार करित्यें. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Shiva Stuti Parvatikrita
% File name             : pArvatIkRRitAshivastutiH.itx
% itxtitle              : shivastutiH pArvatIkRitA (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : pArvatIkRitAshivastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org