त्रिपुरदहनानन्तरं ब्रह्मकृतशिवस्तुतिः

त्रिपुरदहनानन्तरं ब्रह्मकृतशिवस्तुतिः

ब्रह्मोवाच । प्रसीद देवदेवेश प्रसीद परमेश्वर । प्रसीद जगतां नाथ प्रसीदानन्दनिर्भर ॥ ९९॥ आत्मतत्त्वोपरिष्ठाय विद्यातत्त्वाय ते नमः । शिवाय शिवतत्त्वाय चाघोराय नमो नमः ॥ १००॥ अनिर्देश्याय नित्याय विद्युद्वलयरूपिणे । अग्निवर्णाय देवाय चाम्बिकार्धशरीरिणे ॥ १०१॥ श्यामरक्ताय रक्तानां मुक्तिदायामराय च । ज्येष्ठाय रुद्ररूपाय कामाय वरदाय च ॥ १०२॥ गगनेशाय देवाय स्वर्गेशाय नमो नमः । मर्त्येशाय च पातालनरकेशाय वै नमः ॥ १०३॥ सहस्रशिरसे तुभ्यं सहस्राक्षाय ते नमः । सहस्रपादयुक्ताय शर्वाय परमेष्ठिने ॥ १०४॥ सदाशिवाय शान्ताय महेशाय पिनाकिने । सर्वज्ञाय वरेण्याय सद्योजाता ते नमः ॥ १०५॥ अघोराय नमस्तुभ्यं वामदेवाय वै नमः । तत्पुरुषाय नमस्तुभ्यमीशानाय नमो नमः । अनन्तेशाय सूक्ष्माय ह्युत्तमाय नमोऽस्तुते ॥ १०६॥ नमस्त्रिमूर्तये तुभ्यं श्रीकण्ठाय शिखण्डिने । अनन्तासनसंस्थाय चानन्तायान्तकारिणे ॥ १०७॥ विमलाय विशालाय विमलाङ्गाय ते नमः । विमलासनसंस्थाय विमलार्थार्थरूपिणे ॥ १०८॥ योगपीठान्तरस्थाय योगिने योगदायिने । योगिनां हृदि संस्थाय सदानीवारशूकवत् ॥ १०९॥ प्रत्याहाराय ते नित्यं प्रत्याहाररताय ते । प्रत्याहाररतानां तु प्रतिष्ठासंस्थिताय च ॥ ११०॥ धारणाय नमस्तुभ्यं धारणाभिरताय ते । धारणाभ्यासयुक्तानां पुरस्तात्संस्थिताय च ॥ १११॥ ध्यानाय ध्यानगम्याय ध्यानाध्यानाय ते नमः । ध्येयाय ध्येयगम्याय ध्येयाध्येयाय ते नमः । ध्येयानामपि ध्येयाय नमो ध्येयतमाय ते ॥ ११२॥ समाधानाधिगम्याय समाधानाय ते नमः । समाधानरतानां तु निर्विकल्पार्थरूपिणे ॥ ११३॥ वृत्तम् । दग्धोद्धृतं सर्वमिदं त्वयाद्य जगत्त्रयं रुद्र पुरत्रयं हि । कस्तोतुमिच्छेत्कथमीदृशं त्वां स्तोष्येहि तुष्टाय शिवाय तुभ्यम् ॥ ११४॥ भक्त्याथ तुष्टयाद्भुतदर्शनाच्च मत्ताः प्रमत्ता अपि देवदेव । एते सुराः सिद्धगणाश्च सर्वे गृण्हन्ति देव प्रणिपत्य तुभ्यम् ॥ ११५॥ निरीक्षणादेव विभो प्रदग्धं पुरत्रयं दग्धजगत्त्रयं च । लीलालसेनाम्बकवीक्षणेन दग्धं किलेषुश्च तदा प्रमुक्तः ॥ ११६॥ कृतो रथश्चेषुवरश्च शुभ्रं शरासनं ते त्रिपुरक्षयाय । अनेकयत्नैश्च महच्च तुभ्यं फलं न दृष्टं सुरसिद्धसङ्घैः ॥ ११७॥ रथो रथी देवचरो हरिश्च रुद्रः स्वयं शक्रपितामहौ च । त्वमेव सर्वं भगवन्कथं नु तोष्ये ह्यतोष्यं प्रणतोऽस्मि मूर्ध्ना ॥ ११८॥ अनन्तपादस्त्वमनन्तबाहुरनन्तमूर्धान्तकरः शिवश्च । अनन्तमूर्तिः कथमीदृशं त्वां तोष्ये ह्यतोष्यं प्रणतोऽस्मि मूर्ध्ना ॥ ११९॥ त्वमष्टमूर्तिस्त्वमनेकमूर्तिस्त्वमिष्टदः सर्वसुरासुराणाम् । अनिष्टदश्चेष्टविमर्दनश्च स्तोष्ये ह्यतोष्यं कथमीदृशं त्वाम् ॥ १२०॥ नमो नमः सर्वविदे शिवाय रुद्राय शर्वाय शिवाय तुभ्यम् । स्थूलाय सूक्ष्माय सुसूक्ष्मसूक्ष्मात् सूक्ष्माय सूक्ष्मार्थविदे विधात्रे ॥ १२१॥ स्रष्ट्रे नमः सर्वसुरासुराणां हर्त्रे च भर्त्रे जगतां विधात्रे । नेत्रे सुराणामसुरेश्वराणां धात्रे प्रशास्त्रे मम सर्वशास्त्रे ॥ १२२॥ वेदान्तवेद्याय सुनिर्मलाय वेदार्थविद्भिः सततं स्तुताय । वेदात्मरूपाय भवाय तुभ्यमन्ताय मध्याय सुमध्यमाय ॥ १२३॥ आद्यन्तशून्याय च संस्थिताय तथात्वशून्याय च लिङ्गिनेच । अलिङ्गिने लिङ्गमयाय तुभ्यं लिङ्गाय वेदादिमयाय साक्षात् ॥ १२४॥ रुद्राय मूर्ध्नो विनिकृन्तनाय ममादिदेवस्य च यज्ञमूर्तेः । विदोत्तमाङ्गं मम कृत्तमीश दृष्टं च भूमौ करजाग्रकोट्या ॥ १२५॥ अहो विचित्रं तव देवदेव विचेष्टितं विश्वसुरासुरेश । देहीव देवैः सह देवकार्यं करिष्यसे निर्गुणतत्त्वरूप ॥ १२६॥ एकं स्थूलं सूक्ष्ममेकं सुसूक्ष्मं मूर्तामूर्तें मूर्तमेकं ह्यमूर्तम् । एकं दृश्यं वाङ्मयं चैकमीश ध्येयं चैक तत्त्वमत्राद्भुतं ते ॥ १२७॥ स्वप्ने दृष्टं यत्पदार्थे ह्यलक्ष्यं नूनं शम्भो भाति मन्ये तवापि । मूर्तिर्नोचेदेवमीशान देवैर्लक्ष्यं यत्नैरप्यलक्ष्यं कथं नु ॥ १२८॥ देवाः क्व देवेश तव प्रभावो वयं क्व भक्तिः क्व तव स्तुतिश्च । तथापि भक्त्या विलपन्तमीश पितामहं मां भगवन्क्षमस्व ॥ १२९॥ सूत उवाच । य इदं श‍ृणुयाद्विजोत्तमा भुवि देवं प्रणिपत्य वा पठेच्च । स च मुञ्चति पापबन्धनं भवभक्त्या पुरशासितुस्स्तवम् ॥ १३०॥ श्रुत्वा च भक्त्या चतुराननेन कृतं भवः शैलसुतां निरीक्ष्य । पितामहं प्राह महानुभावो महाभुजो मन्दरश‍ृङ्गवासी ॥ १३१॥ भगवानुवाच । स्तवेनानेन तुष्टोऽस्मि तव भक्त्या च पद्मज । वरान् वरय भद्रं ते देवानां च यथेप्सितान् ॥ १३२॥ ततः प्रणम्य देवेशं भगवान्पद्मसम्भवः । कृताञ्जलिपुटो भूत्वा प्राहेदं प्रीतमानसः ॥ १३३॥ ब्रह्मोवाच । भगवन् देवदेवेश त्रिपुरान्तक शङ्कर । त्वयि भक्ति परां मेऽद्य प्रसीद परमेश्वर ॥ १३४॥ देवानां चैव सर्वेषां त्वयि सर्वामरेश्वर । प्रसीद् भक्ति देवेश सारथ्यं चैव सर्वदा ॥ १३५॥ जनार्दनोऽपि भगवान् नमस्कृत्य महेश्वरम् । कृताञ्जलिपुटो भूत्वा प्राह साम्बं त्रियम्बकम् ॥ १३६॥ वाहनत्वं तवेशान प्रसीद जगतां प्रभो । त्वयि भक्ति च देवेश देवदेव नमोऽस्तु ते ॥ १३७॥ सामर्थ्यं च सदा मह्यं भवन्तं वोढुमीश्वरम् । सर्वज्ञं वरदं शर्वं सर्वलोकमयं प्रभुम् ॥ १३८॥ तयोः श्रुत्वा महादेवो विज्ञप्तिं परमेश्वरः । सारथ्ये वाहनत्वे च कल्पयामास तौ भवः ॥ १३९॥ वृत्तम् । दत्वा तस्मै ब्रह्मणे विष्णवे च दग्ध्वा दैत्यान देवदेवो महात्मा । सार्द्धं देव्या नन्दिना भूतसङ्घैरन्तर्धानं कारयामा शर्वः ॥ १४०॥ ततस्तदा महेश्वरे गते रणाद्गणैस्तथा सुरेश्वराश्च विस्मिता भवं प्रणम्य शङ्करम् । ययुश्च दुःखवर्जितास्स्ववाहनैर्दिवं तदा सुरेश्वरा मुनीश्वरा गणेश्वराश्च भास्कराः ॥ १४१॥ पापैश्च मुच्यते जन्तुः श्रुत्वाऽध्यायमिमं शुभम् । शत्रवो नाशमायान्ति सङ्ग्रामे विजयी भवेत् ॥ १४२॥ सर्वरोगैर्न बाध्येत चापदो न स्पृशन्ति तम् । धनमायुर्यशो विद्यां प्रभावमतुलं लभेत् ॥ १४३॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे शिवाधिक्यकथने त्रिपुरदहनं नामत्रयोविंशोऽध्यायः ॥ (९९) ब्रह्मदेव म्हणाला देवाधिदेवा तूं आह्मांवर प्रसन्न हो, परमेश्वरा, तूं आमच्यावर कृपा कर. तूं त्रैलोक्याचा अधिपति आहेस, तूं आमच्यावर कृपा कर. तूं नेहमी आनंदात निमग्न असतोस, तूं आह्मांवर कृपा कर. (१००) तूं आत्मतत्त्वाच्यावर राहतोस (तूं आत्मज्ञानी आहेस), तूं विद्यातत्त्व आहेस तुला नमस्कार असो. तुला शिव म्हणतात, तूं शिवतत्त्वस्वरूप आहेस, तुला अघोर म्हणतात. तुला नमस्कार असो नमस्कार असो. (१०१) तूं अमुक तऱ्हेचा आहे असें सांगतां येत नाहीं, तूं नित्य आहेस, तूं विजेसारखा तेजस्वी आहेस, तूं अग्नीसारखा सतेज आहेस, तुला परमेश्वर म्हणतात, तुझ्या अर्धांगाला पार्वती आहे. (१०२) तुला नीललोहित असें म्हणतात, जे लोक तुझी एकनिष्ठपणानें सेवा करितात त्यांस तूं मोक्ष देतोस, तुला मरण नाहीं, तूं सर्वांहून थोर आहेस. तूं रुद्रस्वरूप आहेस, तुला काम म्हणतात, तूं वर देणारा आहेस. (१०३) तूं आकाशाचा अधिपति आहेस, तुला देव म्हणतात, तूं स्वर्गाचा अधिपति आहेस, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. तूं मृत्युलोकाचा अधिपति आहेस, पाताल लोकाचा आणि नरकाचा अधिपति आहेस, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. (१०४) तुला एक हजार मस्तकें आहेत, तुला नमस्कार असो. तुला एक हजार डोळे आहेत, तुला नमस्कार असो, तुला एक हजार पाय आहेत, तुला शर्व म्हणतात, तुला परमेष्ठी म्हणतात, तुला नमस्कार असो. (१०५) तुला सदाशिव म्हणतात, तुझा स्वभाव शांत आहे, तूं महेश्वर आहेस, तुझ्या हातांत अजगव नांवाचें धनुष्य आहे, तूं सर्वज्ञ आहेस, तूं सर्वांहून श्रेष्ठ आहेस, तुला सद्योजात असें म्हणतात, तुला नमस्कार असो. (१०६) तुला अघोर म्हणतात तुला नमस्कार असो, तुला वामदेव म्हणतात, तुला नमस्कार असो, तुला तत्पुरुष म्हणतात, तुला नमस्कार असो, तुला ईशान म्हणतात, तुला नमस्कार असो, तूं शेषसर्पाचा अधिपति आहेस, तूं सूक्ष्म आहेस, तूं सर्वांहून उत्तम आहेस, तुला नमस्कार असो. (१०७) तूं त्रिमूर्ति आहेस तुला नमस्कार असो, तुला श्रीकंठ आणि शिखंडी असें म्हणतात, तूं सर्पांचें आसन करून त्यावर बसतोस, तुझा अंत लागत नाहीं. तूं जगाचा संहार करितोस. (१०८) तूं विमल (निष्पाप) असून विशाल आहेस, तुझें अंग स्वच्छ आहे, तुला नमस्कार असो तूं स्वच्छ आसनावर बसतोस. तूं विमलार्थ व अर्थस्वरूप आहेस. (१०९) तूं योगपीठावर बसतोस. तूं योगसाधन करणारा आहेस, तूं योगाचें ज्ञान करून देतोस, कणसांत जसें धान्य रहावें तसा तूं योगीलोकांच्या हृदयकमळांत राहतोस. (११०) तूं प्रत्याहारस्वरूप आहेस, तुला नेहमीं प्रत्याहाराची अभिरुचि आहे. तूं प्रत्याहाराची आवड करणाऱ्यांची प्रतिष्ठा ठेवणारा आहेस. (१११) तूं धारणास्वरूप आहेस, तुला नमस्कार असो. तूं धारणेची आवड करितोस, तुला नमस्कार असो तूं धारणेचा अभ्यास करणाऱ्यांच्या अग्रभागीं (पुढे) बसतोस, तुला नमस्कार असो. (११२) तूं ध्यानस्वरूप आहेस, तूं ध्यानाच्या द्वारानें यथार्थ रीतीनें जाणतां येण्यासारखा आहेस. तूं ध्यानस्वरूप असून अध्यानस्वरूपही आहेस, तुला नमस्कार असो. तूं ध्यान करण्यासारखा आहेस. तुझें वास्तविक स्वरूप ध्यानाच्या द्वारानें समजतें. तूं ध्यानकरितां येण्यासारखा आहेस व ध्यान करितां येण्यासारखा नाहींस. तुला नमस्कार असो. ध्यान करण्यासारखे जे कोणी आहेत ते देखील तुझें ध्यान करितात, अतिशय उत्तम अशी ध्यान करण्यासारखी वस्तु म्हटली तर तूंच आहेस. तुला नमस्कार असो. (११३) तूं समाधानाच्या द्वारानें यथार्थरीतीनें जाणला जातोस, तूं समाधानस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो. तूं नेहमी समाधानांत निमग्न असतोस, तूं निर्विकल्प आहेस. (११४) परमेश्वरा, ह्या त्रिपुरांच्या त्रासामुळें हें सर्व त्रैलोक्य अगदीं जळाल्यासारखें झालें (गांजून गेलें) होतें, त्या त्रिपुरांचा नाश करून तूं त्रैलोक्यास संकटांतून वर काढिलेंस अशा रीतीचीं अलौकिक कृत्ये करणाऱ्या तुझें यथार्थ वर्णन कोणास करितां येईल! तरीपण प्रसन्न आणि शांतस्वरूप अशा तुझें मी यथामतीनें स्तवन करितों. (११५) हे परमेश्वरा, तुजवरील भक्तीमुळें, तूं दिलेल्या सुखामुळें आणि तुझें दर्शन होणें अतिशय प्रयासाचें काम असतां तें सहज रीतीनें झाल्यामुळे, हे सर्व देव कसे आनंद समुद्रांत बुडून जाऊन कसे आनंदी दिसत आहेत पहा. हे सर्व देव आणि सिद्ध लोक तुला नमस्कार करून तुझी स्तुति करीत आहेत. (११६) परमेश्वरा, तुझें काय अलौकिक सामर्थ्य सांगावें पहा ! सर्व जगाला ज्याने अगदी त्रासवून सोडलें होतें, ते'' दैत्यांचे त्रिपुर तूं सहज रीतीनें त्याकडे आपली दृष्टि फेंकून आपल्या तिसऱ्या डोळ्यांतील अग्नीनें जाळून टाकिलेंस. आणि त्रिपुरांचा नाश झाल्यावर उगीच निमित्ताला मात्र बाण सोडलास, बाण टाकण्यापूर्वीच त्रिपुर जळून गेलीं होतीं. (११७) ह्या सर्व देवांनी मिळून मोठ्या प्रयासानें त्रिपुरांचा नाश होण्यासाठी रथ तयार केला, उत्तम बाण तयार केला, व पांढरें शुभ्र धनुष्य तयार केलें. परंतु ह्यांपैकीं तुला एकाही वस्तूची जरूर लागली नाहीं. (११८) परमेश्वरा, रथही तूंच, रथांत बसणाराही तूंच, महादेवही तूंच, श्रीविष्णुही तूंच, रुद्रही स्वतः तूंच आहेस, इंद्रही तूंच असून ब्रह्मदेवही तूंच आहेस. परमेश्वरा, सर्व कांहीं तूंच आहेस. तुझें स्तोत्र करितां येणेंच शक्य नाहीं, अशा तुझें मी स्तोत्र तरी कसें करूं ? मी तुला जमिनीवर मस्तक ठेवून नमस्कार करितों. (११९) तुला अनेक पाय आहेत, तुला अनेक हात आहेत, तुला अनेक मस्तकें आहेत, आणि अनेक हात आहेत. तुला शिव म्हणतात. तुझीं अनेक स्वरूपें आहेत. तुझी स्तुति करितां येणेंच मला शक्य नाहीं. अशा तुझी मी स्तुति तरी कशी करूं ? मी जमिनीला मस्तक लावून तुला नमस्कार करितों. (१२०) तूं अष्टमूर्ति आहेस, तुझीं अनेक स्वरूप आहेत. तूं सर्व देवदैत्यांचे मनोरथ पूर्ण करितोस. तूं दुःख देणारा आहेस, व सुखाचा नाश करणारा आहेस. अशा तुझें मला स्तोत्र कसें करितां येईल ? (१२१) तूं सर्वज्ञ आहेस तुला नमस्कार असो, तुला शिव, रुद्र, शर्व अशी अनेक नावे आहेत त्या तुला (शिवाला) नमस्कार असो. तूं स्थूल आहेस, तूं सूक्ष्म आहेस, तूं अतिशय सूक्ष्म वस्तूंहूनही सूक्ष्म आहेस. तुला सूक्ष्मार्थाचें ज्ञान आहे. तूं ब्रह्मदेव आहेस तुला नमस्कार असो. (१२२) परमेश्वरा, तूं देवांस आणि दैत्यांस उत्पन्न केलेस. तूं सर्व जगाचा संहार करितोस व सर्व जगाचें रक्षण करितोस. तूं विधाता आहेस. तूं देवांचा आणि दैत्यांचा अधिपति (नियंता) आहेस. सर्व देवदैत्य तुझ्या आज्ञेत चालतात. तूं उत्पन्नकर्ता आहेस, तूंच शासन करणारा आहेस फार काय परंतु माझा (ब्रह्मदेवाचा) देखील तूंच शास्ता (आज्ञेत वागविणारा) आहेस. (१२३) तूं वेदांतशास्त्राच्या द्वारानें जाणण्यासारखा आहेस. तूं अतिशय निष्पाप स्वभावाचा आहेस. वेदार्थ जाणणारे लोक तुझी नेहमीं स्तुति करितात, तूं वेदस्वरूप आहेस. तुला भव म्हणतात; अंत आणि मध्यही तूंच आहेस, तुझी कंबर फार चांगली आहे, त्या तुला नमस्कार असो. (१२४) तुला जन्म नाहीं व मरण नाहीं तूं उत्तम प्रकारानें जगांत राहिला आहेस. तसाच तूं अशून्य (साकार) असून लिंगी आहेस व अलिंगी आहेस, तूं लिंगस्वरूप आहेस, तूं लिंगच आहेस, तूं प्रत्यक्ष वेदस्वरूप आहेस. तुला नमस्कार असो. (१२५) परमेश्वरा, मी जरी सर्व देवांचा मूळपुरुष आहे, यज्ञस्वरूप आहें व सर्वज्ञ आहें. तरी तूं माझें मस्तक आपल्या नखांनीं तोडलेंस, त्यामुळें तें जमिनीवर पडलेलें मी पाहिलें. त्या माझें मस्तक तोडणाऱ्या रुद्रस्वरूप अशा तुला नमस्कार असो. (१२६) हे त्रैलोक्यपते तुं देवांचा व दैत्यांचा अधिपति आहेस, हे देवाधिदेवा तुझें चरित्र खरोखर अलौकिक आहे, तूं देहधारी मनुष्याप्रमाणे सर्व देवांच्या बरोबर प्रकटरूपानें येऊन त्यांचे काम करितोस तरी वास्तविक पाहतां निराकाररूप आहेस. (१२७) तू एक स्थूल आहेस (तुझ्यापेक्षां ज्यास्त स्थूल कोणी नाहीं), तूंच एक सूक्ष्म आहेस (तुझ्यापेक्षां ज्यास्त सूक्ष्म कोणी नाहीं), तूं फारच सूक्ष्म आहेस. तूं साकार असून निराकार आहेस, तूं एकटाच साकार आहेस, तूं एकटाच निराकार आहे. तूंच एक पाहण्यासारखा (दिसणारा) आहेस, परमेश्वरा तूंच शब्दस्वरूप आहे, तुझेंच एक तत्त्व ध्यान करण्यासारखे आहे, ही मोठी चमत्कारिक गोष्ट आहे. (१२८) परमेश्वरा, श्रीशिवा, न दिसणाराही पदार्थ जसा एखादेवेळीं स्वप्नांत स्पष्ट दिसतो, तसेंच शंकरा, तुझें खरोखर कधींही दृष्टीस न पडणारें स्वरूप दृष्टीस पडलें असें वाटतें. कांतर, परमेश्वरा तुला जरी आकारच नाहीं तरी मोठ्या प्रयत्नाने का होईना परंतु तुझें स्वरूप देवांच्या दृष्टीस पडावयास योग्य आहे असें असतां ते तुझें रूप अलक्ष्य (न दिसावयास योग्य) कसें होईल ? (१२९) हे देवाधिदेवा, शंकरा सर्व देव कोणीकडे ? तुझा पराक्रम कोणीकडे ? आम्ही कोणीकडे ? भक्ति कोणीकडे ? आणि तुझी स्तुति कोणीकडे ? तरीपण परमेश्वरा तूं सर्वगुण संपन्न आहेस, हा मी ब्रह्मदेव भक्तीमुळे कांहींतरी बडबड करीत आहें असें समजून माझ्या अपराधांची मला क्षमा कर. (१३०) सूत म्हणतात- ऋषीश्वरहो, जो कोणी मनुष्य हें ब्रह्मदेवानें केलेलें शंकराचें स्तवन श्रवण करील किंवा शिवास नमस्कार करून स्वतः वाचीलं त्याचें पाशबंधन शंकराच्या कृपेमुळें तुटून जाऊन, तो मुक्त होईल. (१३१) ब्रह्मदेवानें भक्तिभावानें अशी केलेली स्तुति ऐकून पार्वतीच्या तोंडाकडे पाहून ते अलौकिक सामर्थ्यवान् व मंदारपर्वताच्या शिखरावर राहणारे श्रीशंकर ब्रह्मदेवास म्हणूं लागले. (१३२) शिव म्हणाले- ब्रह्मदेवा, तूं जी माझी स्तुति केलीस त्यामुळे मी तुजवर प्रसन्न आहे. तुला स्वतःला किंवा इतर देवांस मजपासून काय वर पाहिजे असेल तो मागून घे. मी वर देण्यास तयार आहे. (१३३) असें शिवाचे अभंयवचन ऐकून ब्रह्मदेवास मोठा संतोष झाला. नंतर तो आपले दोन्ही हात जोडून शिवास म्हणाला. (१३४) ब्रह्मदेव म्हणाला- देवाधिदेवा, तूं सर्वगुणसंपन्न आहेस. तूं त्रिपुरांचा नाश केलास, तूं लोकांचें कल्याण करणारा आहेस. परमेश्वरा, तूं मजवर कृपा कर आणि तुझी भक्ति माझ्या हातून उत्तरोत्तर जास्त व्हावी हा वर दे. (१३५) ह्या सर्व देवांच्याही मनांत तुझ्याविषयीं भक्ति राहू दे. हा वर त्यांस दे. आणि मला असा वर दे कीं, तुझा रथ हांकण्याचे काम मी करावें. (१३६) ब्रह्मदेवानें असा वर मागितल्यावर श्रीविष्णूही नमस्कार करून व दोन्ही हात जोडून तीन नेत्र असणाऱ्या महेश्वर शिवपार्वतीस म्हणाला. (१३७) परमेश्वरा, मी तुझें वाहन व्हावे हा मला वर दे. तूं त्रैलोक्यांचा अधिपति आहेस, तूं मजवर कृपा कर. देवाधिदेवा, तुझी भक्ति मला असावी, तूं सर्व देवांचा ईश्वर आहेस, तुला नमस्कार असो. (१३८) तुला आपल्या खांद्यावर मी नेहमीं वागवीत जाईन तू परमेश्वर आहेस, तूं सर्वज्ञ आहेस, तूं वर देणारा आहेस, तूं त्रैलोक्यस्वरूप आहेस, तूं समर्थ आहेस तुला खांद्यावर वागविण्याचे सामर्थ्य माझ्या अंगांत असो, (१३९) परमेश्वर महादेवांनीं त्या दोघा ब्रह्मदेव व श्रीविष्णूचें बोलणें ऐकून मान्य केलें व त्यांच्या म्हणण्याप्रमाणेंच ब्रह्मदेवास सारथ्य करण्याचें व विष्णूस आपल्या खांद्यावर आपणास घेऊन वागविण्याचें काम शिवांनीं दिलें. (१४०) असो ह्याप्रमाणें अलौकिक सामर्थ्य असणाऱ्या श्रीशिवांनीं ब्रह्मदेवास व विष्णूस त्यांच्या मागण्याप्रमाणें इच्छित वर दिला. दैत्यांचा नाश करून सर्व देवांस सुखी केलें. आणि मग पार्वती नंदिकेश्वर व इतर प्रमथगण ह्या सर्वांसहित देवांसमक्ष श्रीशंकर तेथल्या तेथेच गुप्त झाले. (१४१) मग रणांगणांतून महेश्वर आपल्या सर्व परिवारासहित गुप्त झाल्यावर सर्व देवांस मोठें आश्चर्य वाटलें, त्यांनीं श्रीशंकरास नमस्कार केला व मग आपापल्या वाहनांवर बसून मनांतील सर्व काळजी दूर झाल्यामुळे मोठया आनंदानें ते सर्व मुख्य मुख्य देव, मोठमोठे ऋषीश्वर, गणेश्वर आणि बारा सूर्य आकाशमार्गानें आपापल्या स्थानास गेले. (१४२) जो कोणी मनुष्य हा कल्याणकारक अध्याय ऐकेल, त्याची सर्व पापें नाहींशीं होतील, त्याच्या शत्रूंचा नाश होईल, व युद्धांत त्यास जय मिळेल. (१४३) त्यांला कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाहीं. त्यावर कोणतीही संकटें येणार नाहींत. त्याला द्रव्य पुष्कळ मिळेल. त्याचें आयुष्य जास्त वाढेल. त्याची कीर्ति दिगंतरास जाईल. तो मोठा विद्वान् होईल. व त्याला अलौकिक सामर्थ्य येईल. ह्याप्रमाणें श्रीनीलकण्ठनागनाथ नांवाच्या मोठ्या विद्वानानें केलेल्या वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहांतील शिवाधिक्यकथनापैकीं त्रिपुरदहन नांवाचा तेविसावा अध्याय सम्पला, Proofread by Manish Gavkar
% Text title            : Tripuradahananantaram Brahmakrita Shiva Stuti
% File name             : tripuradahanAnantaraMbrahmakRRitashivastutiH.itx
% itxtitle              : shivastutiH brahmakRitA tripuradahanAnantaraM (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : tripuradahanAnantaraMbrahmakRitashivastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org