श्रीवीरमाहेश्वराचारमङ्गलाचरणम्

श्रीवीरमाहेश्वराचारमङ्गलाचरणम्

॥ श्रीगणेशाय नमः ॥ प्रथमभागः ॥ अध्याय १ श्रीशिवाय नमः । श्रीगुरुदक्षिणामूर्तये नमः । यस्संसारान्महाघोरान्मोचयत्यखिलान् जनान् । कृपाकटाक्षपातेन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १॥ आनताखिलसद्भक्तकामितार्थप्रदायिने । नमो मूळ्वायसोमेशगुरवे करुणाब्धये ॥ २॥ नमः कपिलसंसिद्धमल्लिकार्जुनमूर्तये । अद्वितीयाय नित्याय शिवाय शिवदायिने ॥ ३॥ शिवभक्त्यमृतास्वादचेतसे शिवजन्मने । नमः श्रीनन्दिनाथाय शङ्करापरमूर्तये ॥ ४॥ सर्वें शक्त्यंशमुत्सृज्य शिवमेकमशिश्रयत् । यस्तस्मै भृङ्गिनाथाय नमः कल्याणरूपिणे ॥ ५॥ दक्षयज्ञशिरोहर्त्रे सुरदर्पापहारिणे । वीरभद्राय रौद्राय नमो विक्रमशालिने ॥ ६॥ जगत्संहरणोद्युक्तनृसिंहाजिनहारिणे । नमः श्रीशरभेशाय पदाष्टकविभासिने ॥ ७॥ एवमादीन्महाशूरानसङ्ख्यातान्महागणान् । नमामि शिवसद्भक्तिसागरे मग्नमानसान् ॥ ८॥ नमो बसवराजाय वृषेन्द्रापरमूर्तये । चरार्चनैकनिष्ठाय शिवाचारप्रवर्तिने ॥ ९॥ शिवतत्त्वामृतास्वादचेतसे योगिने नमः । श्रीचन्नबसवेशाय षट्स्थलब्रह्मवादिने ॥ १०॥ बसवेशादिसर्वेषां गणानां ज्ञानदायिने । योगीन्द्राय नमस्तस्मै प्रभवे शिवमूर्तये ॥ ११॥ शिवयोगामृताम्भोधिमग्नमानसवृत्तये । वन्दे श्रीसिद्धरामाय भक्तिसम्पत्प्रमोदिने ॥ १२॥ नमः श्रीपण्डिताराध्यगुरवे सर्ववेदिने । महेशचरणाम्भोजपरिनिष्ठितचेतसे ॥ १३॥ पुरा व्याहृतवान्यस्तु श्रीशिवज्ञानदीपिकाम् । मल्लयार्यगुरुं नौमि मल्लिकार्जुनवल्लभम् ॥ १४॥ वेदशास्त्रपुराणेषु सारमुद्ध्दत्य शाङ्करम् । सारोद्धारः कृतो येन लक्ष्मीदेवगुरुं भजे ॥ १५॥ सानन्दचरितं नाम ग्रन्थं चक्रेऽति यत्नतः । यस्तस्मै पद्मराजाय नमो दुर्वाददाहिने ॥ १६॥ यः सर्ववादान्निर्जित्य वीरमाहेश्वरोचितम् । श्रीमद्वसवराजीयनामग्रन्थमचीकरत् । पालकुरिकेसोमनाथाय नमस्तस्मै सुशीलिने ॥ १७॥ शैवरत्नाकरं नाम ग्रन्थं यः कृतवान्पुरा । जगद्धितार्थ कृपया ज्योतिर्नाथं नमामि तम् ॥ १८॥ व्याकरोद्यः शिवज्ञानसमुच्चयमकल्मषम् । जगदाराध्य नागेशगुरुं तं सततं भजे ॥ १९॥ यः पुरातनचारित्रं कृतवान्देशभाषया । पम्पाहरीश्वरं नौमि सम्पादितशिवास्पदम् ॥ २०॥ शैवशास्त्रार्थतत्त्वज्ञानेतानन्यान्पुरातनान् । त्रिषष्टिगणमुख्यांस्तान्नौमि लिङ्गाङ्ग सङ्गिनः ॥ २१॥ पुरा येऽपूजयंश्छम्भुं पुरारातिं पुरातनाः । इदानीं शिवलिङ्गं तु पूजयन्तीह ये नराः ॥ २२॥ पूज्ययिष्यन्ति ये भक्त्या श्रीविश्वेशमतन्द्रिताः । एतान्माहेश्वरान्सर्वान्नत्वा तत्तत्प्रसादतः ॥ २३॥ तत्सङ्गृहीतान्ग्रन्थांश्च श्रुतिस्मृतिशिवागमान् । इतिहासपुराणादीन्नालोक्यातिप्रयत्नतः ॥ २४॥ तत्र सारतरान् श्लोकान् वीरमाहेश्वरोचितान् । आदाय तान्नीलकण्ठनागनाथार्यधीमता । श्रीमन्मुळ्वायसोमेशपादाब्जाहितचेतसा ॥ २५। हिताय शिवभक्तानां सदाचारानुवर्तिनाम् । वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहः क्रियते महान् ॥ २६॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे मङ्गलाचरणं सम्पूर्णम् । अनुवादः श्रीशिवास नमस्कार असो. श्रीगुरुदक्षिणामूर्तीस नमस्कार असो, (१) जो श्रीगुरु आपल्या कृपादृष्टीनें अतिशय भयंकर अशा संसारसमुद्रांतून सर्व प्राणिमात्रांची मुक्तता करितो त्यास नमस्कार असो. (२) नमस्कार करणाऱ्या सर्व चांगल्या चांगल्या भक्तांचे इच्छिलेले मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या व दयेचा मूर्तिमंत समुद्र अशा मुळ्वसोमेश्वर गुरूला नमस्कार असो. (३) कपिलसंसिद्ध मल्लिकार्जुन गुरूस नमस्कार असो, त्याच्या सारखा जगांत दुसरा पुरुषच नाहीं तो नित्य असून त्याला शिव म्हणतात तो कल्याण करणारा आहे. (४) ज्याचें मन शिवभक्तिरूप अमृताची रुचि घेण्यांत गढून गेलें आहे, ज्याचा अवतार सर्व जगाचें कल्याण करण्याकरितांच आहे, जो प्रत्यक्ष श्रीशंकराचा दुसरा अवतारच आहे त्या नंदिकेश्वराला नमस्कार असो. (५) सर्व प्रकारचे शक्तीचे अंश (इतर देवता) सोडून ज्याने फक्त श्रीशिवाचाच आश्रय केला, जो कल्याणस्वरूप आहे त्या भृंगिनाथास नमस्कार असो. (६) ज्यानें दक्षप्रजापतीच्या यज्ञांत दक्षप्रजापतीचें मस्तक तोडून सर्व देवांचा अभिमान नाहींसा केला, ज्याचें स्वरूप फार उग्र असून जो पराक्रमामुळें अतिशय शोभतो त्या वीरभद्रास नमस्कार असो. (७) सर्व जगाचा संहार करण्यास तयार झालेल्या नृसिंहास जिवे मारून त्याचें कातडे आपल्या अंगावर पांघरणाऱ्या व आठ पाय असल्यामुळे विचित्र प्रकारचें दिसणाऱ्या शरभेश्वर वीरभद्रास नमस्कार असो. (८) अशा तऱ्हेचेच आणखी मोठमोठे पराक्रमी असंख्यात शिवगण आहेत शिवभक्तिरूप महासमुद्रांत ज्यांचे मन बुडून गेले आहे त्या सर्व शिवभक्तांस नमस्कार असो. (९) जो प्रत्यक्ष श्रीनंदिकेश्वराची दुसरी मूर्तिच आहे, जो जंगमपूजन करण्यांत नेहमी गुंतलेला असे, व ज्यानें शिवधर्माचा जीर्णोद्धार केला त्या बसवराजाला नमस्कार असो. (१०) ज्याचें मन शिवतत्त्वरूप अमृताचा अनुभव घेण्यांत गढून गेलें आहे, जो पहिल्या प्रतीचा योगी होता, व षट्स्थलांचा जो ब्रह्मवादी होता, त्या चन्नबसवेशाला नमस्कार असो. (११) बसवादिक सर्व गणेश्वरांला ज्यानें यथार्थरीतीनें शिवज्ञान शिकविलें, त्या योगीश्वर शिवस्वरूप अल्लमप्रभूस नमस्कार असो. (१२) ज्यांच्या मनोवृत्ति शिवयोगरूप अमृताच्या समुद्रांत बुडून गेल्या आहेत, ज्याच्या जवळ शिवभक्तिरूप अपरंपार संपत्ति असल्यामुळे जो नेहमी आनंदात असतो त्या सिद्धरामाला नमस्कार असो. (१३) ज्याला सर्व प्रकारची ज्ञानें (शास्त्रे) अवगत आहेत, महेश्वराच्या चरणकमलावर ज्याचें मन गढून गेलेले आहे त्या पंडिताराध्य गुरूला नमस्कार असो ॥ (१४) पूर्वी ज्याने शिवज्ञानप्रदीपिंका नांवाचा ग्रंथ नवीन रचिला, जो मल्लिकार्जुनाच्या अतिशय प्रीतींतला असे त्या मल्लयार्य गुरूला मी नमस्कार करितों. (१५) ज्यानें वेदांतील शास्त्रांतील आणि पुराणांतील शंकरासंबंधाचें सार काढून सारोद्धार नांवाचा ग्रंथ केला त्या लक्ष्मीदेवगुरूस मी भजतों. (१६) ज्याने मोठ्या प्रयासानें सानंदचरित नांवाचा ग्रंथ केला, कोणी भलता सलता वाद करणारा त्याचेकडे आल्यास तो नुसता त्यास भाजून काढी (त्याचा तेव्हांच पराजय करीत असे) त्या पद्मराजाला नमस्कार असो. (१७) ज्यानें सर्व प्रकारचे वादविवाद जिंकून वीरमाहेश्वर लोकांचे उपयोगीं पडण्यासारखा श्रीबसवराजीय नांवाचा ग्रंथ रचून तयार केला त्या सुस्वभावाच्या पालकुरिकी सोमनाथास नमस्कार असो. (१८) ज्यानें पूर्वी सर्व लोकांचे कल्याण व्हावे ह्या उद्देशानें शैवरत्नाकर नांवाचा ग्रंथ केला त्या ज्योतिर्नाथाला नमस्कार असो. (१९) ज्याने शिवज्ञानसमुच्चय नांवाचा निर्दोष ग्रंथ केला, त्या जगदाराध्य नांवाच्या गुरूस मी नेहमीं भजतों. (२०) ज्यानें पुरातनचारित्र नांवाचा ग्रंथ देशभाषेत केला (कानडी भाषेत केला) व पुण्यामुळे ज्यान कैलासपदाची प्राप्ति करून घेतली त्या पंपेश्वराला मी नमस्कार करितों. (२१) ज्यांस शैव शास्त्रांतील अर्थाचें तत्त्वज्ञान (यथार्थज्ञान) झालें होतें, असे दुसरे जुने जुने जे त्रेसष्ट मुख्य मुख्य गणेश्वर आहेत व ज्यांस लिंगांगसंगाचे सुख झाले त्यांस मी नमस्कार करितों. (२२) जे जे वृद्ध मनुष्य पूर्वी त्रिपुरांचा नाश करणाऱ्या श्रीशिवाची पूजा करीत होते व हल्लींही ह्या लोकीं जे लोक शिवलिंगाची पूजा करितात. (२३) व जे कोणी लोक आळस न करितां विश्वेश्वर श्रीशिवाची भक्ति करतील त्या ह्या सर्व माहेश्वरांस नमस्कार करून त्यांच्या कृपेनें. (२४) त्यांनी संग्रह केलेल्या ग्रंथांस, वेद, शास्त्र, शिवागम, इतिहास, पुराण वगैरे ग्रंथांस पाहून मोठ्या प्रयासानें (२५) त्यांतील वीरमाहेश्वर लोकांस उपयोगीं पडतील असे चांगले चांगले तितके श्लोक घेऊन मुळ्वाय ग्रामांतील सोमेश्वराच्या चरणकमलांची भक्ति करणाऱ्या नीलकंठनागनाथ नांवाच्या बुद्धिमानाने (२६) सदाचारानें वागणाऱ्या शिवभक्तांच्या कल्याणाकरितां वीरमाहेश्वराचारसंग्रह नांवाचा हा मोठा ग्रंथ केला. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Shri Viramaheshvaracharamangalacharanam
% File name             : vIramAheshvarAchAramangalAcharaNam.itx
% itxtitle              : maNgalAcharaNam (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : vIramAheshvarAchAramangalAcharaNam
% Category              : shiva, vIrashaiva, mangala
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org