विष्णुप्रोक्ता महालिङ्गस्तुतिः

विष्णुप्रोक्ता महालिङ्गस्तुतिः

श्रीवीरमाहेश्वराचारस्य प्रथमभागः । दशमोऽध्यायः । विष्णुरुवाच । अनादिमलसंसाररोगवैद्याय शम्भवे । नमः शिवाय शान्ताय ब्रह्मणे लिङ्गमूर्तये ॥ २८॥ प्रलयाम्बुधिसंस्थाय प्रलयोत्पत्तिहेतवे । नमः शिवाय शान्ताय ब्रह्मणे लिङ्गमूर्तये ॥ २९॥ ज्वालामालावृताङ्गाय ज्वलनस्तम्भरूपिणे । नमः शिवाय शान्ताय ब्रह्मणे लिङ्गमूर्तये ॥ ३०॥ आदिमध्यान्तशून्याय चांवरस्यापि हेतवे नमः शिवाय शान्ताय ब्रह्मणे लिङ्गमूर्तये ॥ ३१॥ लीलार्थ चावयोर्मध्ये स्थितायात्मस्वरूपिणे । नमः शिवाय शान्ताय ब्रह्मणे लिङ्गमूर्तये ॥ ३२॥ निष्कलाय विशुद्धाय नित्यानन्दस्य हेतवे । नमः शिवाय शान्ताय ब्रह्मणे लिङ्गमूर्तये ॥ ३३॥ ओङ्कारान्ताय सूक्ष्माय स्त्रीपुं सायात्मरूपिणे । नमः शिवाय शान्ताय ब्रह्मणे लिङ्गमूर्तये ॥ ३४॥ अनपायं च सन्मात्रं भूतिदं चार्णवस्थितम् । नमामि सत्यविज्ञानमनन्तब्रह्मरूपिणम् ॥ ३५॥ अनाद्यन्तं महादेवममेयं सदसन्मयम् । अद्वैतं परमानन्दं लिङ्गस्थं प्रणमाम्यहम् ॥ ३६॥ विश्वामरेश्वरैर्वन्द्यमावयोर्मध्यतः स्थितम् । प्रणमामि महादेवं शिवलिङ्गस्वरूपिणम् ॥ ३७॥ विश्वाधारं नवाधारमनाधारमगोचरम् । प्रमाणप्रत्ययातीतं लिङ्गस्थं प्रणमाम्यहम् ॥ ३८॥ अव्यक्तलक्षणं हंसं ज्वालामालासमाकुलम् । हेयोपादानरहितं लिङ्गस्थं प्रणमाम्यहम् ॥ ३९॥ अनन्तदृष्टिं वेदादिमानन्दं विद्रुमच्छविम् । अप्रतर्क्यं निराकारं लिङ्गस्थं प्रणमाम्यहम् ॥ ४०॥ व्यक्ताव्यक्तमनिर्देश्यं सर्वसिद्धिकृतां गतिम् । कल्पनारहितं देवं लिङ्गस्थं प्रणमाम्यहम् ॥ ४१॥ भूतालयं विधातारमाधारं परमेश्वरम् । स्वयंवेद्यमवेद्यं च लिङ्गस्थं प्रणमाम्यहम् ॥ ४२॥ विश्वावासं निरावासं सर्वकारणकारणम् । निष्कलं शिवलिङ्गस्थं नमामि नगसन्निभम् ॥ ४३॥ संसाररोगवैद्यं च सर्वसंसारकारणम् । भक्तिगम्यमहं वन्दे लिङ्गस्थं लिङ्गवर्जितम् ॥ ४४॥ उदारकीर्तिं सर्वज्ञं सदसद्व्यक्तिवर्जितम् । आनमे शिवलिङ्गस्थं रक्षार्थं चावयोः शिवम् ॥ ४५॥ ब्रह्माण्डाधिपतिं वन्दे शिवलिङ्गस्वरूपिणम् । लीलया ज्योतिरूपेण रक्षार्थं जगतां स्थितम् ॥ ४६॥ ओजस्विनं विकर्तारं कर्तारं प्रणवात्मकम् । नमामि लिङ्गिनं लिङ्गे संस्थितं पावकप्रभम् ॥ ४७॥ दुर्जयं चैव विज्ञेयममेयं शिवरूपिणम् । सप्तविंशतिकं वन्दे शिवलिङ्गस्वरूपिणम् ॥ ४८॥ वेदसारं शिवं देवं प्रलयांवुनिधौ स्थितम् । नमामि शाश्वतत्त्वेन स्थितं लिङ्गस्वरूपिणम् ॥ ४९॥ निवातदीपवत्स्वस्थं वन्दे लिङ्गस्वरूपिणम् । आत्मत्रयोपरिष्ठं तं तमःपारे प्रतिष्ठितम् ॥ ५०॥ आकाशरूपिणं वन्दे लिङ्गस्थं लिङ्गवर्जितम् । वेदान्तसारसञ्जीवं मोहदं चावयोः शिवम् ॥ ५१॥ ज्योतिषामुपरिष्ठन्तं लिङ्गस्थं प्रणमाम्यहम् । अचिन्त्यं दुर्वशं बुद्धं बुद्ध्यादिभिरगोचरम् । अन्तर्बहिः स्थितं व्याप्य वन्दे लिङ्गस्वरूपिणम् ॥ ५२॥ क्षन्तव्यो यो मयाऽऽख्यातो देवदेव जगद्गुरो । स्तुतिछलेन भगवन् प्रलापो मोहितेन तु ॥ ५३॥ अशक्तोऽपि स्तुतिं कर्तुं भवताऽहं नियोजितः । श्रद्धया शिव सर्वज्ञ प्रसीद परमेश्वर ॥ ५४॥ नन्दीश्वर उवाच । एवं तं देवदेवेशं स्तुत्वा नत्वा जगद्गुरुम् । वाग्भिर्वरदमीशानमतिष्ठद्धि जनार्दनः ॥ ५५॥ पितामहोऽपि भगवान् ऋग्यजुःसामसम्भवैः । मन्त्रैर्माहेश्वरैश्चैव स्तोतुं समुपचक्रमे ॥ ५६॥ पितामह उवाच । स्तोप्ये लिङ्गमिदं भक्त्या चाशक्तो यद्यशाश्वतम् । लिङ्गेऽस्मिन्मम सान्निध्यै प्रसीदतु महेश्वरः ॥ ५७॥ नमो रुद्राय विभवे ब्रह्मणे परमात्मने । प्रधानपुरुषेशाय सर्गस्थित्यन्तकारिणे ॥ ५८॥ षड्विंशकाय शान्ताय शान्त्यतीताय शम्भवे । सोमसूर्याग्निवाय्वंवुक्ष्माव्योमात्माष्टमूर्तये ॥ ५९॥ शर्वाय क्षितिनाथाय भवायापोधिपाय च । अग्नये रुद्ररूपाय चोग्राय पवनात्मने ॥ ६०॥ व्योम्ने च भीमरूपाय चेशानाय च भानवे । महादेवाय सोमाय पशूनां पतये नमः ॥ ६१॥ अहङ्काराय चेशाय मतये सर्ववेदिने । प्रधानायादिदेवाय विष्णवे योनिमूर्तये ॥ ६२॥ बीजाय ब्रह्मरूपाय वीजिनेऽपि शिवाय च । मूर्तये च ह्यमूर्ताय मूर्तामूर्ताय हेतवे ॥ ६३॥ बालार्ककोटिवर्णाय तत्पुरुषाय पूर्वतः । नीलाञ्जनाद्रिवर्णाय चाघोराय च दक्षिणे ॥ ६४॥ क्षीरार्णवसवर्णाय सद्योजाताय पश्चिमे । कुसुम्भपुष्पवर्णाय वामदेवाय चोत्तरे ॥ ६५॥ शुद्धस्फटिकवर्णाय चेशानायाग्रतः सदा । शिवायागोचरायैव चाध्येयायात्मनः सदा ॥ ६६॥ ध्येयाय पञ्चवक्त्राय कलावर्णात्ममूर्तये । शब्दतत्त्वाय शक्तेश्च कारणाय कपर्दिने ॥ ६७॥ महेश्वराय देवाय त्रिवक्त्रायाष्टबाहवे । ममाग्रमुखसंहर्त्रे कर्त्रे भर्त्रेऽक्षराय च ॥ ६८॥ षड्विंशकप्रकारेण व्याप्य सर्वें स्थिताय च । विद्येश्वराधिपतये चाष्टविद्येश्वराय च ॥ ६९॥ सर्वान्तरेषु प्रत्येकमष्टाविंशतिमूर्तये । लीलार्थं चावयोर्मध्ये रक्षार्थं चावयोस्तथा । प्रलयार्णवमध्येतु स्थिताय च नमोनमः ॥ ७०॥ लिङ्गिने शिखिने चैव नमस्ते लिङ्गमूर्तये । अलिङ्गाय च लिङ्गानां हेतवे लिङ्गयोनये ॥ ७१॥ वृत्तम् । निन्द्या ह्यनिन्द्या न च तेस्तुतिश्च यथा तथा तद्भगवानवेद्यः । तथापि भक्त्या कथितं क्षमस्व घृणानिधे तेऽद्य नमोऽस्तु रुद्र ॥ ७२॥ नन्दिकेश्वर उवाच । ततो ददृशतुस्तस्मिञ्च्छिवलिङ्गे सुरोत्तमौ । मृणालतन्तुसङ्काशं लिङ्गस्थं परमं शिवम् ॥ ७३॥ पुनर्ददृशतुस्तस्मादुद्भूतं भूतिधूसरम् । पञ्चवक्त्रं दशभुजं दशायुधधरं वरम् ॥ ७४॥ पञ्चमूर्धादिसंयुक्तं परात्परतरं शुभम् । लिङ्गस्थं लिङ्गिभिर्नित्यं लिङ्गे पूज्यं सदाशिवम् ॥ ७५॥ तथा विवदतोर्मध्ये ह्यवतीर्णं महेश्वरम् । त्र्यक्षं च तत्क्षणादेव तदा ददृशतुर्भवम् ॥ ७६॥ ईशानं पुरुषं चैवमघोरं वामदेवकम् । सद्योजातमजोपेन्द्रौ चतुर्दिक्षु तथोर्ध्वतः ॥ ७७॥ अनन्तेशं च सूक्ष्मं च श्रीकण्ठं च शिखण्डिनम् । शिवोत्तमं चैकनेत्रं त्रिमूर्तिं सुरसत्तमौ ॥ ७८॥ एकरूपं भवं रुद्रं शिवं पशुपतिं तथा । उग्नं भीमं महादेवमैशानं सुरसत्तमौ ॥ ७९॥ दृष्ट्वा विस्मयमापन्नौ सर्वदेवभवोद्भवम् । ऊचतुः सुरशार्दूलौ मुने सम्पूज्य शाश्वतम् ॥ ८०॥ दृष्टं लिङ्गे ह्यदृष्टं चं तत्क्षणादेव शाश्वतम् । शिवं सदाशिवं चैव सकलं च महेश्वरम् ॥ ८१॥ ब्रह्माणं च महादेवं सर्वविद्येश्वरं तथा । तवाद्य सकलं शान्तमेकं वात्र प्रदर्शय ॥ ८२॥ नन्दिकेश्वर उवाच । विज्ञापितं तयोः श्रुत्वा लिङ्गे तस्मिञ्च्छिवः स्वयम् । दर्शयामास यद्रूपं प्रशान्तं सकलं शुभम् ॥ ८३॥ बालार्ककोटिसदृशं जटामुकुटभूषितम् । त्र्यक्षं चतुर्भुजं शान्तं सर्वावयवशोभितम् ॥ ८४॥ सर्वदं सर्वगं शर्वं सर्वभूतानुकम्पिनम् । रुद्रं षड्विंशकं सौम्यं सोमसूर्याग्निलोचनम् ॥ ८५॥ भक्तानामप्रयत्नेन भुक्तिदं मुक्तिदं मुने । प्रसन्नवदनं देवं प्रलयोत्पत्तिवर्जितम् ॥ ८६॥ देवैर्दैत्यैस्तथा यक्षैर्गन्धर्वैः सिद्धचारणैः । आराध्यमानमनघं किञ्चित्प्रहसिताननम् ॥ ८७॥ मुकुटैः कुण्डलैर्हारैः केयूरैर्वलयैः शुभैः । छविरैश्चोपवीतैश्च तथा ह्युदरबन्धनैः ॥ ८८॥ अंशुकैर्नूपुरैश्चित्रैर्नानामणिविभूषितैः । भूषितं योगिभिः सिद्धैः संवृतं गणपुङ्गवैः ॥ ८९॥ एवं महेश्वरं दृष्ट्वा पितामहजनार्दनौ । आनन्दं जग्मतुर्देवौ पुनस्तुष्टुवतुर्द्विज ॥ ९०॥ ब्रह्मविष्णू ऊचतुः । नमः शिवाय रुद्राय भवाय परमेष्ठिने । देवाय देवदेवाय ज्योतिषां पतये नमः ॥ ९१॥ अनन्तासनसंस्थाय ह्यनन्तायान्तकारिणे । तथा हृत्कमलस्थाय पद्मासनरताय च ॥ ९२॥ पद्माभवक्त्रनेत्राय पद्मपादाय ते नमः । विमलाय विशालाय विश्वेशाय नमो नमः ॥ ९३॥ वामदेवाय भीमाय वामाङ्गाय नमोऽस्तु ते । अकाराय नमस्तुभ्यं तूकाराय नमो नमः ॥ ९४॥ मकारायार्धमात्राय मात्रातीताय ते नमः । उदात्तायानुदात्ताय सर्वोदात्ताय वै नमः ॥ ९५॥ मात्रातीताय माराङ्गमर्दनाय नमोऽस्तु ते । ब्रह्मणे ब्रह्मरूपाय ब्रह्मघ्नाय नमो नमः ॥ ९६॥ सप्तकोटिमहामन्त्रैर्मन्त्रितावयवाय ते । उपमन्त्रैरनेकैश्च मन्त्रिभिर्मन्त्रिताय ते ॥ ९७॥ अवर्णाद्यक्षराणां च कर्त्रे वर्णात्मने नमः । अवर्णायादिदेवाय वर्णानां प्रभवाय ते ॥ ९८॥ बोधार्थं चावयोर्मध्ये चोत्थिताय शिवाय ते । मोक्षार्थ जगतां चैव लिङ्गस्थाय नमो नमः ॥ ९९॥ अशक्तोऽहं स्तुतिं कर्तुं देवदेव जगद्गुरो । क्षम्यतां कथितं सर्व व्यामोहाद्विश्वतोमुख ॥ १००॥ नन्दिकेश्वर उवाच । जानुभ्यामवनिं गत्वा पुनर्नारायणः स्वयम् । प्रणिपत्य च विश्वेशं प्राह मन्दतरं वशी ॥ १०१॥ आवयोर्देवदेवेश विवादशमनाय च । उत्थितोऽसि महादेव प्रबोधार्थं च शङ्कर ॥ १०॥ त्वयि भक्तिं महादेव प्रसीद परमेश्वर । कल्पे कल्पे महादेव दर्शनं मम वाञ्छितम् । तव लिङ्गस्य चेशान युक्तं चेद्दातुमर्हसि ॥ १०३॥ नन्दिकेश्वर उवाच । एवमुक्त्वा जगन्नाथं प्रणिपत्य महेश्वरम् । कृताञ्जलिपुटो भूत्वा ह्यतिष्ठद्वामतः प्रभोः ॥ १०४॥ वामदेवोऽपि भगवान्वासुदेवमुवाच ह । यदीप्सितं हरे तेऽद्य तथास्त्विति घृणानिधिः ॥ १०५॥ जानुभ्यामवनिं गत्वा पुनर्विप्र पितामहः । नमस्कृत्य महादेवं प्राहः गम्भीरया गिरा ॥ १०६॥ ममापि देवदेवेश प्रसीद परमेश्वर । त्वयि भक्तिं महादेव भक्तानामार्तिनाशन ॥ १०७॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे विष्णुप्रोक्ता महालिङ्गस्तुतिः समाप्ता । (२८) विष्णु बोलला- अनादिकालापासून मलयुक्त अशा संसाररूप रोगाला वैद्य असा हे शंभो, तुला नमन असो, हे शिवा, शांता, ब्रह्मन्, लिंगमूर्ते, तुला नमन असो. (२९) प्रलयसमुद्रांत असणाऱ्या शंभो, प्रलयाला उत्पत्तीला कारण असा शंभो, शिवा, शांता, ब्रह्मन्, लिंगमूर्ते, तुला नमन असो. (३०) ज्वाळेच्या माळांनी युक्त असा हे ईशा, ज्वलनस्तंभरूपिन्, शिवा, शांता, ब्रह्मन्, लिंगमूर्ते, तुला नमन असो. (३१) आदि, मध्य, अंत यांनी रहित असा शंभो, अंबराच्या कारणा, शिवा, शांता, ब्रह्मन्, लिंगमूर्ते तुला नमन असो. (३२) लीलेकरितां आह्मां दोघांमध्ये राहिलेला हे शंभो, आत्मरूपा, शिवा, शांता, ब्रह्मन्, लिंगमूर्ते, तुला नमन असो. (३३) निष्कला, विशुद्धा, नित्यानंदाला कारणा, शिवा, शांता ब्रह्मन्, लिंगमूर्ते, तुला नमन असो. (३४) ओंकारांता, सूक्ष्मा, स्त्रीपुरुषरूपा, आत्मस्वरूपा, शिवा, शांता, ब्रह्मन्, लिंगमूर्ते, तुला नमन असो. (३५) अपायरहिता, सन्मात्रा, ऐश्वर्य देणाऱ्या, अर्णवस्थिता, सत्यरूपा, विज्ञानमया, अनंता, ब्रह्मस्वरूपा, तुला नमन असो. (३६) आद्यंतरहिता, महादेवा, सदसन्मया, अद्वैता, परमानंदा, लिंगस्था, तुला नमन करितों. (३७) सर्व देव ज्याला वंदन करतात, आह्मां दोघांच्या मध्यभागी जो आहे. अशा शिवलिंगस्वरूपी महादेवा तुला नमन करतो. (३८) जो जगाचा आधार आहे, नवाधार (नूतन आधार) जो आहे, आधाररहित जो आहे, जो अगोचर आहे, जो प्रमाणप्रत्ययाच्या (ज्ञानप्रमाणांच्या) पलीकडे असलेल्या लिंगांमध्यें राहिला आहे, अशा शिवाला मी नमन करितों (३९) जो अव्यक्त लक्षणाचा असून हंसरूप जो आहे, व ज्वालेच्या मालांनी जो युक्त आहे, व हेय उपादान यांनी रहित जो आहे, अशा लिंगस्थ शिवाला नमन करतों. (४०) जो अनंतदृष्टीचा असून वेदांचा आदि जो आहे, व आनंदस्वरूप असून पोंवळ्याप्रमाणें ज्याची कांति आहे, व जो अप्रतर्क्य असून निराकार आहे, अशा लिंगस्थ शिवाला नमन करतों. (४१) जो व्यक्त असून अव्यक्त आहे, जो अनिर्देश्य (सांगावयास अशक्य) आहे, सर्वसिद्धिकर्त्यांला जो गति आहे, जो कल्पनारहित असून जो सर्वांचा देव आहे अशा लिंगस्थ शिवाला नमन करतों. (४२) प्राणिमात्रांना जो स्थान असून ज्याला विधाता म्हणतात, जो सर्वांचा आधार असून ज्याला परमेश्वर म्हणतात, जो स्वयंवेद्य (आपलें स्वरूप आपणच जाणणारा) असून अवेद्य (न समजणारा) आहे. अशा लिंगस्थ शिवाला नमन करतों. (४३) जो जगाचा आवास असून स्वतः आवसरहित आहे. जो सर्व कारणाला कारण असून निष्कल आहे. जो पर्वताकार आहे, अशा लिंगस्थ शिवाला नमन करतों. (४४) जो संसाररोगाला वैद्य असून जो सर्व संसाराला कारण आहे. जो भक्तीला प्राप्त होत असून जो लिंगवर्जित आहे, अशा लिंगस्थ शिवाला नमन करतों. (४५) जो उत्कृष्ट कीर्तीचा असून सर्वज्ञ आहे, जो सदसद्व्यक्तीनें रहित आहे, अशा लिंगस्थ शिवाला आमच्या रक्षणाकरितां नमन करतो. (४६) सहज लीलेनें ज्योतीच्या रूपाने जगाच्या रक्षणाकरितां जो राहिला आहे, जो ब्रह्मांडाचा अधिपति आहे, अशा शिवलिंगस्वरूपी शिवाला नमन करतों. (४७) जो तेजस्वी असून विकर्ता आहे, जो कर्ता असून प्रणवस्वरूप आहे, जो अग्नीप्रमाणें तेजस्वी आहे, अशा लिंगस्थ लिंगयुक्त शिवाला नमन करतों. (४८) जो जिंकण्यास अशक्य असून समजण्यास शक्य आहे, जो अमेय असून शिवस्वरूप आहे, जो सत्तावीस स्वरूपांचा आहे, अशा शिवलिंग स्वरूपी शिवाला नमन करतों. (४९) जो वेदसार असून ज्याला शिव असें म्हणतात, जो प्रलयसमुद्रांत राहत असून जो देव आहे, शाश्वतपणें जो लिंगामध्यें राहिला आहे, अशा लिंगस्वरूपी शिवाला नमन करतों. (५०) जो आत्मत्रया पलीकडे असून अंधकाराच्या पलीकडे आहे, जो बिनवा-याच्या ठिकाणी असलेल्या दीपाप्रमाणें स्थिर आहे, अशा लिंगस्वरूपी शिवाला नमन करतों. (५१) जो आकाशस्वरूप आहे, जो लिंगस्थ असून लिंगरहित आहे, जो वेदांतसाराला संजीवन असून आम्हा दोघांना जो मोह देतो, अशा शिवाला नमन करतों. (५२) जो ज्योतिश्चक्रावर राहिला आहे, अशा लिंगस्थ शिवाला नमन करतों. जो अचिंत्य असून वश व्हावयास अशक्य आहे. जो ज्ञानस्वरूप बुद्धि वगैरे पदार्थाला अगोचर आहे. जो आंत बाहेर व्याप्त होऊन राहिला आहे, अशा लिंगस्वरूपी शिवाला नमन करतो. (५३) हे भगवन्, मी मोहित होऊन जो प्रलाप केला, हे देवाधिदेवा, जगद्गुरो, या स्तुतीच्या निमित्तानें त्या प्रलापाची क्षमा कर. (५४) मी तुझी स्तुति करावयास जरी अशक्त आहे, तथापि तुझ्या प्रेरणेनें ही स्तुति केली. हे सर्वज्ञा, शिवा, श्रद्धापूर्वक ही स्तुति केली आहे, तर हे परमेश्वरा, प्रसन्न हो. (५५) नंदिकेश्वर बोलला - याप्रमाणें देवाधिदेव जगद्गुरु शिवाची स्तुति वाणीनें करून त्या जगद्गुरूला नमन करून तो जनार्दन स्वस्थ बसला. (५६) ब्रह्मदेवानें देखील ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वणवेद यांतील माहेश्वर मंत्रांनी स्तोत्र करावयास आरंभ केला. (५७) ब्रह्मदेव बोलला - भक्तिपूर्वक या शिवलिंगाची स्तुति करतों. माझ्या जवळ असलेल्या या लिंगामध्यें महेश्वर प्रसन्न होवो. (५८) हे रुद्रा, विभो, ब्रह्मन्, परमात्मन्, प्रधानपुरुषाच्या अधीशा, सृष्टि, स्थिति लय, यांचा कर्ता असा हे शिवा तुला नमन असो. (५९) सवीस स्वरूपाचा हे शिवा, शांता, शांत्यतीता शंभो, सोम सूर्य, अग्नि, वायु उदक, पृथ्वी, आकाश अशा आठमूर्तीच्या शिवा, तुला नमन असो. (६०) शर्वा, पृथ्वीपते, भवा, उदकनाथा, अग्ने, रुद्ररूपा, वायुतत्त्वस्वरूप उग्रा, तुला नमन असो. (६१) आकाशतत्त्वस्वरूप भीमरूपा, ईशाना, भानो, महादेवा, सोमा, पशुपते, तुला नमन असो. (६२) अहंकारा, ईशा, बुद्धिरूपा, सर्वज्ञा, प्रधाना, आदिदेवा, विष्णो, योनिमूर्ते तुला नमन असो, (६३) बीजा, ब्रह्मरूपा, बीजिन् शिवा, मूर्ते, अमूर्ता, मूर्तामूर्ता, हेतो, तुला नमन असो. (६४) कोट्यावधि सूर्याप्रमाणें तेज असलेल्या शिवा, तत्पुरुषा, तुला पूर्वेकडे नमन करतों. नीलांजन पर्वताप्रमाणें काळ्या वर्णाच्या शिवा, अघोरा; दक्षिणेला नमन करतों. (६५) क्षीरसमुद्राप्रमाणें वर्ण असलेल्या देवा, सद्योजाता; पश्चिमेला नमन करतों. कुसुंभपुष्पाप्रमाणें कांति असलेल्या वामदेवा उत्तरेला तुला नमन करतों. (६६) शुद्ध स्फटिकाप्रमाणें कांति असलेल्या ईशाना, अग्रभागी तुला नमन करतों. आत्म्याला अगोचर असून ध्यान करावयास अशक्य जो आहे, अशा शिवाला सर्वदा नमन करतों. (६७) ध्यान करावयास योग्य असा पंचवत्क्रा, कलावर्णस्वरूपा, शब्दतत्त्वा, शक्तीच्या कारणा, कपर्दिन् तुला नमन असो. (६८) महेश्वरा, देवा, त्रिवत्क्रा, अष्टबाहो, माझे अग्रमुख संहार करणाऱ्या देवा, कर्ता, भर्ता, अक्षरा, तुला नमन असो. (६।९) सव्वीसप्रकारांनी सर्व जग व्यापून राहिलेल्या देवा, विद्येश्वराधिपते, अष्टविद्येश्वरा, तुला नमन असो. (७०) सर्व अंतरामध्यें प्रत्येक अठ्ठावीस मूर्तींचा हे शिवा, आमच्या दोघांमध्यें आमच्या रक्षणाकरितां प्रकट झालेल्या देवा, तुला नमन असो, प्रलय समुद्रामध्यें राहिलेल्या देवा, तुला वरचेवर नमन करतो. (७१) लिंगयुक्त, शिखायुक्ता, लिंगमूर्ते, तुला नमन असो. अलिंगा, लिंगकारणा, लिंगयोने, तुला, नमन असो. (७२) हे शिवा, ही केलेली. स्तुति निंद्य असो, किंवा अनिंद्य असो, तथापि भक्तीनें ही स्तुति केली आहे. तूं अवेद्य आहेस. हे कृपानिधे, तूं क्षमा कर तुला नमन असो. (७३) नंदिकेश्वर बोलले - याप्रमाणें स्तुति केल्यानंतर त्या शिवलिंगामध्यें कमलतंतूप्रमाणे भासणारा लिंगस्थ त्या श्रेष्ठ शिवाला त्या दोघांनी पाहिलें. (७४) पुनः त्यापासून प्रकट झालेला भस्माप्रमाणें धूसर वर्णाचा, पांचतोंडचा, दहा हातांचा, दहा आयुधें धारण केलेला अशा श्रेष्ठ शिवाला त्यांनी पाहिलें (७५) पांच मस्तकांनी युक्त, श्रेष्ठाहून श्रेष्ठ, शुभकर, लिंगस्थ, लिंगधारण करणारे ज्याची पूजा नेहमीं करतात, अशा सदाशिवाला त्यांनी पाहिलें (७६) तशा तऱ्हेनें विवाद करणाऱ्या त्या दोघांमध्यें अवतरलेला, तीन डोळ्यांचा अशा महेश्वर भवाला त्याक्षणींच त्या दोघांनी पाहिले. (७७) ईशान, पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात अशीं तोंडे चारी दिशेला चार व वरच्या भागीं एक अशी पांच तोंडे होती अशा त्या देवाला ब्रह्माविष्णूंनी पाहिलें. (७८) अनंतेश, सूक्ष्म, श्रीकंठ, शिखंडी, शिवोत्तम, एकनेत्र, त्रिमूर्ति, अशा देवाला त्या सुरश्रेष्ठांनी पाहिलें. (७९) एकरूप, भव, रुद्र, शिव, पशुपति, उग्र, भीम, महादेव, ऐशान अशा देवाला सुरश्रेष्ठांनी पाहिलें. (८०) सर्व देवांच्या उत्पत्तीला कारण अशा देवाला पाहून मोठ्या आश्चर्यांत पडलेल्या देवश्रेष्ठांनी त्याची पूजा करून म्हटलें कीं, (८१) हे देवा, या शिवलिंगामध्यें शाश्वत अशा तुला पाहिलें तरी तत्क्षणीं न पाहिल्यासारखेंच झालें. कारण शिव, सदाशिव, सकल, महेश्वर (८२) ब्रह्मा, महादेव, सर्व विद्याधिपति अशीं अनेक रूपें पाहिलीं तर हे देवा, कलासहित तुझें एकच शांत- रूप दाखीव. (८३) नंदिकेश्वर बोलले- त्या दोघांनीं विज्ञापना केलेली ऐकून त्या लिंगामध्यें साक्षात शिवानें कलासहित, शुभकर, शांत असें रूप दाखविलें. (८४) तें रूप कोट्यावधि बालसूर्याप्रमाणें असून जटामुकुटांनीं भूषित होतें. त्याला तीन डोळे असून, चार हात होते. तो शिव शांत असून सर्व अवयवांनीं सुशोभित होता. (८५) सर्व देणारा असून सर्वत्र व्याप्त होता, त्याला सर्व म्हणत असून तो सर्व प्राण्यांवर दया करणारा होता. त्याला रुद्र असें म्हणत असून तो सव्वीस रूपांचा होता. तो सौम्य असून सोम, सूर्य, अग्नि याप्रमाणें तीन डोळ्यांचा होता. (८६) हे मुने, भक्त लोकांना प्रयत्न न करितां भोग मोक्ष देणारा होता. तो प्रसन्न मुखाचा असून प्रलयोत्पत्तीनें रहित होता. (८७) देव, दैत्य, यक्ष, गंधर्व, सिद्ध चारण हे निरंतर त्याची आराधना करतात, असा तो शिव किंचित हसऱ्या तोंडाचा होता. (८८) मुकुट, कुंडल, हार, केयूर, वलय, शुभकर कांतिमय उपवीत, उदरबंधन, (८९) अंशुक, चित्रविचित्र अनेक मण्यांनीं व नूपरांनीं भूषित झालेला होता. सिद्ध, योगीश्वर, गणश्रेष्ठ यांनी युक्त होता. (९०) अशा महेश्वराला ब्रह्माविष्णूंनी पाहून ते दोघे संतुष्ट झाले. हे मुने, त्या दोघांनी पुनः त्याची स्तुति केली. (९१) ब्रह्माविष्णु बोलले - हे शिवा, रुद्रा, भवा, परमेष्ठिन्, देवा, देवाधिदेवा, ज्योतिष्पते, तुला नमन असो. (९२) अनंतासनावर बसलेल्या देवा, अनंतरूपा, अंतकारिन्, हृदयकमलांत असणाऱ्या देवा पद्मासनावर बसलेल्या देवा, तुला नमन असो. (९३) कमला प्रमाणें मुख असलेला व नेत्र असलेला, कमलाप्रमाणें पाय असलेला अशा तुला नमन असो. विमला, विशाला, विश्वेशा तुला वरचेवर नमस्कार करतो. (९४) वामदेवा, भीमा, वामांगा, तुला नमन असो. अकारा, तुला नमन असो. उकारा, तुला नमन असो. (९५) मकारा, अर्धमात्रा, मात्रातीता, उदात्ता, अनुदात्ता, सर्वोदात्ता, तुला नमन असो. (९६) मात्रातीता, मन्मथमर्दना तुला नमन असो. हे ब्रह्मन् ब्रह्मरूपा, ब्रह्मघ्ना तुला नमन असो. (९७) सात कोट महामंत्रांनी अभिमंत्रित झालेल्या शरीराच्या देवा, अनेक उपमंत्रांनी मांत्रिक लोकांकडून अभिमंत्रित झालेल्या देवा, तुला नमन असो. (९८) अवर्णादि अक्षरांचा कर्ता तूं असून अक्षरस्वरूप आहेस. अशा हे अवर्णा, आदिदेवा, वर्णोत्पत्तिकारका, देवा, तुला नमन असो. (९९) उपदेश करण्याकरितां आमच्या दोघांमध्यें उद्भूत झालेल्या देवा, शिवा, जगाच्या मोक्षाकरितां लिंगांत राहिलेल्या देवा, तुला नमन असो. (१००) हे देवाधिदेवा, जगद्गुरो, तुझी स्तुति करावयास मी असमर्थ आहे हे विश्वतोमुखा, मोहानें जें कांहीं तोंडांतून निघालें असेल. तें सर्व क्षमा कर. (१०१) नंदिकेश्वर बोलले - जमिनीवर गुडघे टेकून नमस्कार करून श्रीविवेश्वराला मंद मंद (हळू हळू) नारायण बोलला. (१०२) हे देवाधिदेवा, आमच्या दोघांच्या विवादाच्या उपशमाकरितां व हे महादेवा, शंकरा, आम्हाला उपदेश करण्याकरितां प्रकट झालास. (१०३) हे महादेवा, तुझ्या ठिकाणीभक्ति असो. परमेश्वरा, तूं प्रसन्न हो. हे महादेवा, प्रत्येक कल्पांत तुझें दर्शन होवो. माझे मनोरथ पूर्ण कर. हे ईशाना, तुझ्या शिवलिंगाचें दर्शन देणें हें योग्य वाटत असेल तर दर्शन दे. (१०४) नंदिकेश्वर बोलले - याप्रमाणे जगन्नायक शिवाला बोलून महेश्वराला नमन करून श्रीप्रभूच्या डाव्या भांगी तो विष्णु राहिला. (१०५) नंतर भगवान वामदेव देखील वासुदेवाला बोलला. हे हरे, तुझ्या मनांत जे असेल, ते आज पूर्ण होईल, असें कृपानिधि शिवानें म्हटलें. (१०६) हे मुने पुनः जमिनीवर गुडघे टेकून नमस्कार करून गंभीर वाणीने ब्रह्मदेव म्हणाला. (१०७) हे परमेश्वरा मला, देखील तूं प्रसन्न हो. भक्तांची पीडा हरण करणाऱ्या महादेवा, तुझ्या ठिकाणी भक्ति दे. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Mahalinga Stuti Vishnuprokta
% File name             : viShNuproktAmahalingastutiH.itx
% itxtitle              : mahAliNgastutiH viShNuproktA (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : viShNuproktAmahAlingastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org