सत्यलक्षणम्
श्रीगणेशाय नमः ।
अथ कालिकाखण्डे सत्यलक्षणं एवं सत्यमाहात्म्यम् ।
सत्येन लोकं जयति सत्यं तत्परमं पदम् ।
यथाभूतार्थवादं तु सत्यमाहुर्मनीषिणः ॥ १॥
शिवधर्मे ।
स्वानुभूतं स्वदृष्टं च यो दृष्टार्थं न गूहति ।
यथाभूतार्थकथनमित्येतत्सत्यलक्षणम् ॥ २॥
सत्यं सत्यं पुनः सत्यमेतद्वा सत्यलक्षणम् ।
परपीडाविनिर्मुक्तं यो दद्याद्वचनं सदा ॥ ३॥
अश्वमेधशतं पूर्णं सत्यं तत्साम्यमादृतम् ।
सत्ये प्रतिष्ठितं ज्ञानं धर्मः सत्ये प्रतिष्ठितः ॥ ४॥
सत्ये प्रतिष्ठितं शौचं शीलं सत्ये प्रतिष्ठितम् ।
सत्ये प्रतिष्ठितो मोक्षो मोक्षे सत्यं प्रतिष्ठितम् ॥ ५॥
कामान्मोहाद्भयाल्लोभात्सत्यं नातिक्रमेद्विजः ॥
सत्यातिक्रमणाद्विप्रो ब्राह्मण्यान्मुच्यते यथा ॥ ६॥
असत्यं न वदेत्किञ्चिन्न सत्यं च परित्यजेत् ।
यत्सत्यं ब्रह्म चेत्याहुरसत्यं ब्रह्मदूषणम् ।
अनृतं परुषं ग्राम्यं पैशून्यं पापहेतुकम् ॥ ७॥
इति शिवरत्नाकरे सप्तदशोऽध्यायान्तर्गतं सत्यलक्षणं सम्पूर्णम् ।
सत्यलक्षण आनि माहात्म्य मराठी भावार्थ
कालिकाखंडांत सांगतात की,
(१) सत्याने सत्यलोक प्राप्ति होते; सत्यलोक परमपद होय; शहाणे लोक सत्यास भूतार्थवाद असें मानितात. शिवधर्मात सांगितले आहे की,
(२) आपण अनुभविलेला व आपण पाहिलेला असा अर्थ न लपवून यथातथ्य निवेदन करणे हे सत्याचे लक्षण होय.
(३) सत्य,सत्य व पुनः सत्य हेच सत्याचे लक्षण होय. परपीडा न होण्यासारखें जो भाषण करितो
(४) त्याने शंभर अश्वमेध केल्यासारखे होते. सत्याच्या ठिकाणी ज्ञान आहे; सत्याचे ठायीं धर्म आहे.
(५) सत्याच्या ठिकाणी शौच आहे, सत्याच्या ठिकाणी शील आहे. सत्याच्या ठिकाणी मोक्ष व मोक्षाच्या ठिकाणी सत्य वास करितें.
(६) कामाने, मोहानें, भयाने किंवा लोभाने ब्राह्मणाने सत्याचे अतिक्रमण करू नये. कारण सत्यातिक्रमणाने विप्र ब्राह्मण्यापासून भ्रष्ट होतो.
(७) कधीही असत्य बोलू नये किंवा सत्य सांडूं नये. सत्य म्हणजे ब्रह्म असत्य तें ब्रह्मदूषण होय. खोटें भाषण, कठोर भाषण, ग्राम्य भाषण, व चाहाडी करणे, ही सर्व पापहेतुभूत आहेत.
याप्रमाणे श्रीशैवरत्नाकरग्रंथांतील सतराव्या अध्यायातील सत्यलक्षणकथन पूर्ण झाले.
Encoded and proofread by Manish Gavkar