पञ्चाक्षरीमाहात्म्यम्

पञ्चाक्षरीमाहात्म्यम्

श्रीवीरमाहेश्वराचारस्य प्रथमभागः ॥ अथाष्टमोऽध्यायः । श्रीशिवाय नमः । शैवे । वायवीयसंहितायाम् । विष्णुरुवाच । महर्षिवर सर्वज्ञ सर्वज्ञानमहोदधे । पञ्चाक्षरस्य माहात्म्यं श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ १॥ उपमन्युरुवाच । पञ्चाक्षरस्य माहात्म्यं वर्षकोटिशतैरपि । अशक्यं विस्तराद्वक्तुं तस्मात्सङ्क्षेपतः श्रुणु ॥ २॥ वेदे शिवागमे चायमुभयत्र षडक्षरः । मन्त्रः स्थितः सदा मुख्यो लोके पञ्चाक्षरः स्मृतः ॥ ३॥ सर्वमन्त्राधिकश्चायमोङ्काराद्यः षडक्षरः । सर्वेषां शिवभक्तानामशेषार्थप्रदायकः ॥ ४॥ तदल्पाक्षरमर्थाढ्यं वेदसारं विमुक्तिदम् । आज्ञासिद्धमसन्दिग्धं वाक्यमेतच्छिवात्मकम् ॥ ५॥ नानासिद्धियुतं दिव्यं लोकचित्तानुरञ्जकम् । सुनिश्चितार्थगम्भीरं वाक्यं तत्पारमेश्वरम् ॥ ६॥ मन्त्रं सुखमुखोच्चार्यमशेषार्थप्रसिद्धये । प्राहोन्नमः शिवायेति सर्वज्ञः सर्वदेहिनाम् ॥ ७॥ तद्बीजं सर्वविद्यानां मन्त्रमाद्यं षडक्षरम् । अतिसूक्ष्मं महार्थं च ज्ञेयं तद्वबीजवत् ॥ ८॥ देवो गुणत्रयातीतः सर्वज्ञः सर्वकृत्प्रभुः । ओमित्येकाक्षरे मन्त्रे स्थितः सर्वगतः शिवः ॥ ९॥ ईशानाद्यानि सूक्ष्माणि ब्रह्माण्येकाक्षराणि तु । मन्त्रे नमः शिवायेति संस्थितानि यथाक्रमम् ॥ १०॥ मन्त्रे षडक्षरे सूक्ष्मे पञ्चब्रह्मतनुः शिवः । वाच्यवाचकभावेन स्थितः साक्षात्स्वभावतः ॥ ११॥ वाच्यः शिवः प्रमेयत्वान्मन्त्रस्तद्वाचकःस्मृतः । वाच्यवाचकभावोऽयमनादिः संस्थितस्तयोः ॥ १२॥ यः सर्वज्ञः स सम्पूर्णः स्वभावविमलः शिवः । तस्याभिधानं मन्त्रोऽयमभिधेयश्च स स्मृतः ॥ १३॥ अभिधानाभिधेयत्वान्मन्त्रसिद्धः परः शिवः । एतावत्तु शिवज्ञानमेतावत्परमं पदम् ॥ १४॥ यदोन्नमः शिवायेति शिववाक्यं षडक्षरम् । विधिवाक्यमिदं शैवं नार्थवादं शिवात्मकम् ॥ १५॥ बहुत्वेऽपि हि मन्त्राणां सर्वज्ञेन शिवेन यत् । प्रणीतममलं मन्त्रं न तेन सदृशं क्वचित् ॥ १६॥ साङ्गानि वेदशास्त्राणि संस्थितानि षडक्षरे । न तेन सदृशस्तस्मान्मन्त्रोऽन्योऽस्ति परः क्वचित् ॥ १७॥ शिवज्ञानानि यावन्ति विद्यास्थानानि यानि च । षडक्षरस्य सूत्रस्य तानि भाष्यं समासतः ॥ १८॥ किं तस्य बहुभिर्मन्त्रैः शास्त्रैर्वा बहुविस्तरैः । यस्योन्नमः शिवायेति मन्त्रोऽयं हृदि संस्थितः ॥ १९॥ तेनाधीतं श्रुतं तेन कृतं सर्वमनुष्ठितम् । येनोन्नमः शिवायेति मन्त्राभ्यासः स्थिरीकृतः ॥ २०॥ नमस्कारादिसंयुक्तं शिवायेत्यक्षरत्रयम् । जिव्हाग्रे वर्तते यस्य सफलं तस्य जीवितम् ॥ २१॥ अन्त्यजो बाधमो वापि मूर्खो वा पण्डितोऽपि वा । पञ्चाक्षरजपे निष्ठो मुच्यते पापपञ्जरात् ॥ २२॥ इत्युक्तं परमेशेन देव्या पृष्टेन शूलिना । हिताय सर्वमर्त्यानां तिष्यजानां विशेषतः ॥ २३॥ देव्युवाच । कलौ कलुषिते काले दुर्जये दुरतिक्रमे । अपुण्यतमसाच्छन्ने लोके धर्मपराङ्मुखे ॥ २४॥ क्षीणे वर्णाश्रमाचारे सङ्करे समुपागते । सर्वाधिकारे सन्दिग्धे निश्चिते वा विपर्यये ॥ २५॥ तदोपदेशे विहते गुरुशिष्यक्रमे गते । केनोपायेन मुच्यन्ते भक्तास्तव महेश्वर ॥ २६॥ महेश्वर उवाच । आश्रित्य परमां विद्यां त्द्यां पञ्चाक्षरीं मम । भक्त्या च भावितात्मानो मुच्यन्ते कलिजा नराः ॥ २७॥ मनोवाक्कायजैर्दोषैर्वक्तुं स्मर्तुमगोचरैः । दूषितानां कृतघ्नानां निर्दयानां खलात्मनाम् ॥ २८॥ लुब्धानां वक्रमनसामपि मत्प्रवणात्मनाम् । मम पञ्चाक्षरी विद्या संसारभयतारिणी ॥ २९॥ मयैवमसकृद्देवि प्रतिज्ञातं धरातले । पतितोऽपि विमुच्येत मद्भक्तो विद्ययाऽनया ॥ ३०॥ देव्युवाच । कर्मायोग्यो भवेन्मर्त्यः पतितो यदि सर्वथा । कर्मायोग्येन यत्कर्म कृतं च नरकाय हि । ततः कथं विमुच्येत पतितो विद्ययाऽनया ॥ ३१॥ ईश्वर उवाच । तथ्यमेतत्त्वया प्रोक्तं तथापि श्रुणु सुन्दरि । रहस्यमिति मत्वैतद्गोपितं यन्मया पुरा ॥ ३२॥ अमन्त्रकं मां पतितः पूजयेद्यदि मोहितः । नारकी स्यान्न सन्देहो मम पञ्चाक्षरीं विना ॥ ३३॥ अव्भक्षावायुभक्षाश्च ये चान्ये व्रतकर्शिताः । तेषामेतैव्रतैर्नास्ति मम लोकसमागमः ॥ ३४॥ भक्त्या पञ्चाक्षरेणैव यो हि मां सकृदर्चयेत् । सोऽपि गच्छेन्मम स्थानं मन्त्रस्यास्यैव गौरवात् ॥ ३५॥ तस्मात्तपांसि यज्ञाश्च व्रतानि नियमास्तथा । पञ्चाक्षरार्चनस्यैते कोट्यंशेनापि नो समाः ॥ ३६॥ तस्मादनेन मन्त्रेण मनोवाक्कायभेदतः । यथाप्रज्ञं यथाश्रद्धं यथाकालं यथामति ॥ ३७॥ यथाशक्ति यथासम्पद्यथायोगं यथारति । यदा कदापि वा भक्त्या यत्र कुत्रापि वा कृताः । येन केनापि वा देवि प्रजां मुक्ति नयिष्यति ॥ ३८॥ अशुद्धो वा विशुद्धो वा सकृत्पञ्चाक्षरेण यः । पूजयेत्पतितो वापि मुच्यते नात्र संशयः ॥ ३९॥ किमत्र बहुनोक्तेन भक्ताः सर्वेऽधिकारिणः । मम पञ्चाक्षरीमन्त्रस्तस्माच्छ्रेष्ठतरो हि सः ॥ ४०॥ पञ्चाक्षरीप्रभावाञ्च लोका देवा महर्षयः । तिष्ठन्ति शाश्वता धर्मा वेदाः सर्वमिदं जगत् ॥ ४१॥ आदौ नमः प्रयोक्तव्यं शिवायेति ततः परम् । सैषा पञ्चाक्षरी विद्या सर्वश्रुतिशिरोगता ॥ ४२॥ शब्दजातस्य सर्वस्य बीजभूता समासतः । प्रथमं मन्मुखोद्गीर्णा सा ममैवास्ति वाचिका ॥ ४३॥ मम पञ्चमुखान्याहुः स्थानं तेषां वरानने । पूर्वादिषूर्ध्वपर्यन्तं नकारादि यथाक्रमम् ॥ ४४॥ मूलविद्या शिवं शैवं सूत्रं पञ्चाक्षरस्तथा । नामान्यस्य विजानीयाच्छैवं मे हृदयं मतम् ॥ ४५॥ रहस्यमन्यद्वक्ष्यामि गोपनीयमिदं प्रिये । न वाच्यं यस्य कस्यापि नास्तिकस्याथ वा पशोः ॥ ४६॥ सदाचारविहीनस्य पतितस्यान्त्यजस्य च । पञ्चाक्षरात्परं नास्ति परित्राणं कलौ युगे ॥ ४७॥ गच्छतस्तिष्ठतो वापि स्वेच्छया कर्म कुर्वतः । अशुचेर्वा शुचेर्वाऽपि मन्त्रोऽयं न च निष्फलः ॥ ४८॥ अन्त्यजस्यापि मूर्खस्य मूढस्य पतितस्य च । निर्मर्यादस्य नीचस्य मन्त्रोऽयं न च निष्फलः ॥ ४९॥ सर्वावस्थां गतस्यापि मयि भक्तिमतः प्रिये । सिध्यत्येष न सन्देहो नापरस्य तु कस्य चित् ॥ ५०॥ न लग्नतिथिनक्षत्रवारयोगादयः प्रिये । अस्यात्यन्तमवेक्ष्याः स्युनैष सुप्तः सदोदितः ॥ ५१॥ मन्त्रान्तरेषु सिद्धेषु मन्त्र एष न सिध्यति । अस्मिन् सिद्धे महामन्त्रे तेऽत्र सिद्धा भवन्त्युत ॥ ५२॥ यथा देवेष्वलब्धोऽस्मि लब्धेष्वपि महेश्वरि । मयि लब्धे तु ते लब्धा मन्त्रेष्वेष समो विधिः ॥ ५३॥ तथापि नैव क्षुद्रेषु फलेषु प्रतियोगिषु । सहसा विनियुञ्जीत यस्मादेष महाबलः ॥ ५४॥ तस्मान्मन्त्रान्तरं त्यक्त्वा साधयन्नधिकारतः । आश्रयेत्परमां विद्यां हृद्यां पञ्चाक्षरीं बुधः ॥ ५५॥ उपमन्युरुवाच । एवं साक्षान्महादेव्यै महादेवेन शूलिना । हिताय जगतामुक्तः पञ्चाक्षरविधिक्रमः ॥ ५६॥ य इदं कीर्तयेद्भक्त्या श्रुणुयाद्वा समाहितः । सर्वपापविनिर्मुक्तः स याति परमां गतिम् ॥ ५७॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे सदाचारनिरूपणे पञ्चाक्षरीमाहात्म्यकथनं नामाष्टमोऽध्यायः । अनुवादः श्री शिवास नमस्कार असो. वायवीयसंहितेन्त पुढील कथाभाग आहे तो असा (१) श्रीकृष्ण म्हणाले- हे ऋषिश्रेष्ठा उपमन्युमुने, तूं सर्वज्ञ आहेस, तूं शिवज्ञानाचा महासमुद्र आहेस. मला पंचक्षरीमंत्राचें माहात्म्य सविस्तर रीतीनें ऐकावयाची इच्छा आहे तर तें तूं मला सांग. असें कृष्णाचें बोलणें ऐकून (२) उपमन्यु ऋषि म्हणाले- पंचाक्षरी मंत्राचें माहात्म्य सविस्तर रीतीनें सांगू म्हटलें तर शंभर कोटि वर्षे देखील पुरणार नाहींत ह्यासाठी तें मी तुला संक्षिप्त रीतीनें सांगतो. (३) वेदांत आणि शिवागमांत दोन्ही ठिकाणी ह्या मंत्राला षडक्षरी मंत्र असें नांव पडलेलें आहे, लोकांत मात्र ह्याला पंचाक्षरी मंत्र असें म्हणतात. (४) हा मंत्र सर्व मंत्रांपेक्षां श्रेष्ठ आहे ह्या मंत्राच्या अगोदर ओंकार लावितात त्यामुळे ह्याला षडक्षर मंत्र असें नाव पडलें. हा षडक्षरी मंत्र सर्व शिवभक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करितो. (५) ह्या मंत्रांत अक्षरें अगदीं थोडीं आहेत. त्यांचा अर्थ मात्र महत्वाचा आहे. हा मंत्र सर्व वेदांचे सार (मुख्य तत्त्व) असून ह्या मंत्राने मोक्षप्राप्ति होते, हा मंत्र शिवाचे आज्ञेनें तयार झालेला असून ह्या मंत्रांत कोणताही संशय नाहीं. ह्या मंत्रांतील वाक्य शिवस्वरूपच आहे. (६) ह्या मंत्रांच्या साधनानें अनेक प्रकारच्या सिद्धि होतात, हा मंत्र अलौकिक सामर्थ्यवान् आहे, ह्या मंत्रानें कोणाच्याही मनाला त्रास होत नाहीं उलट हा मंत्र ऐकिल्यानें ऐकणाऱ्यांच्या मनाला आनंद होतो. ह्या मंत्राचा अर्थ निश्चित झालेला आहे तो कधीही बदलत नाहीं. हा मंत्र प्रत्यक्ष श्रीशिवाचेंच वाक्य असून प्रौढ आहे. (७) हा मंत्र सहज रीतीनें तोंडानें उच्चारतां येतो ह्यांत कोणतेही कठीण अक्षर नाहीं. ह्या मंत्राच्या साधनाने सर्व प्राण्यांचे सर्व प्रकारचे मनोरथ परिपूर्ण होतात. ह्या मंत्रास ``नमः शिवाय'' असें म्हणतात हा मंत्र प्रत्यक्ष सर्वज्ञ श्रीशिवानें सांगितला. (८) हा शिवषडक्षरी मंत्र सर्व विद्यांचं मूल असून सर्व मंत्रांत मुख्य आहे. हा मंत्र फार महत्वाचा असून ह्यांतील अर्थ फार प्रौढ आहे. हा मंत्र वडाचे बियासारखा आहे असें समजावें. (९) देव हा सत्त्व, रज आणि तमोगुण ह्या तिहीं गुणांहून वेगळा आहे. तो सर्व कांहीं जाणतो तो सर्व कांहीं करितो, तो सर्व ठिकाणीं व्यापलेला आहे, तो शिव ॐ अशा एकाक्षरी मंत्रांत राहतो तो मंत्र फार महत्वाचा आहे. (१०) ईशान वगैरे महत्वाचीं परब्रह्मस्वरूपें एका अक्षरांत (ओंकारांत) राहतात, ह्या ओंकारमंत्रापुढे नमः शिवाय अशीं अक्षरें क्रमाक्रमानें (ओळीनें) राहतात. (११) ॐ नमः शिवाय हा षडक्षरमंत्र फार महत्वाचा आहे, ह्या मंत्रांत पंचब्रह्मशरीर शिव राहतो, तो प्रत्यक्ष स्वरूपाने वाच्यवाचकभावानें त्या मंत्रांत राहतो. (१२) शिव हा वाच्य असून हा षडक्षरी (ॐ नमः शिवाय) मंत्र गणना करण्यावरून मानलेला आहे. ह्या शिवाचा आणि षडक्षरीमंत्राचा अनादिकालापासून वाच्यवाचकभाव संबंध मानला गेला आहे. (१३) जो सर्वज्ञ आहे तो परिपूर्ण आहे, त्या शिवाचा स्वभाव निष्पाप आहे. हा षडक्षरीमंत्र त्याचेच नांवाचा मंत्र आहे. ह्या मंत्रांत ज्याचें नांव आहे तोच शिव होय. (१४) नांव आणि ज्याचे नांव आहे तो परमेश्वर ह्या दोघांमुळे हा मंत्र सिद्ध झाला आहे. हा मंत्र प्रत्यक्ष परशिव आहे. हा मंत्रच शिवज्ञान आहे व हा मंत्रच श्रेष्ठस्थान आहे. (१५) जीं ॐ नमः शिवाय अशीं सहा अक्षरें ह्या षडक्षरी मंत्रांत आहेत हीं सहा अक्षरें प्रत्यक्ष श्रीशिवाचें वाक्य आहे, हें विधिवाक्य असून हें शिवधर्माचें मुख्य सार आहे. हा अर्थवाद (फुकट जाणारा नांवचा) मंत्र नव्हे हा प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे (१६) अनेक तऱ्हेचे मंत्र आहेत त्या सर्वांत हा मंत्र प्रत्यक्ष श्रीशिवांनी सांगितला असल्यामुळे हा मंत्र निर्दोष आहे असा मंत्र दुसरा कोणताही नाही (१७) ह्या षडक्षरी मंत्रांत वेद आणि शास्त्रें हीं आंग आणि उपांगांसह राहतात, ह्यामुळे ह्या शिवपंचाक्षरी मंत्रासारखा महत्वाचा मंत्र दुसरा कोठेही नाहीं. (१८) जितकीं शिवज्ञाने आहेत, जितकीं विद्यास्थाने आहेत तितकीं सर्व ह्या षडक्षरी मंत्राची भाष्यें आहेत ह्या सर्वांचें मूळ शिवपंचाक्षरी मंत्रच आहे. (१९) ज्या मनुष्याच्या मनांत हा शिवपंचाक्षरी मंत्र चांगल्या तऱ्हेनें ठसला आहे त्या मनुष्याला अनेक प्रकारचे दुसरे मंत्र कशाला? आणि अतिशय विस्तार असलेलीं दुसरीं शास्त्रे तरी कशाला पाहिजेत ? पंचाक्षरी मंत्र त्यानें पाठ केला म्हणजे त्याने सर्व कांहीं केल्यासारखें आहे. (२०) ज्या मनुष्यानें शिवपंचाक्षरी मंत्राचा चांगला अभ्यास केला त्यानें सर्व शास्त्र तोंडपाठ केल्यासारखें आहे व त्यानें जितकीं कांहीं अवश्य कर्मै करायास पाहिजेत तितकीं सर्व केल्यासारखी आहेत. (२१) नमस्कार अशा अर्थाची नमः हीं दोन अक्षरें आणि त्या दोन अक्षरांपुढें शिवाय अशीं तीन अक्षरें मिळून नमः शिवाय हीं मंत्राक्षरें ज्याच्या जिभेच्या शेंड्यावर नेहमीं राहतात (जो मनुष्य नेहमी शिवपंचाक्षरी मंत्राचा पाठ करितो) त्याचें जीवित धन्य आहे. (२२) मनुष्यप्राणी चांडाल असो किंवा दुसऱ्या नीच कुलांत जन्मलेला असो अडाणी असो किंवा शहाणा असो तो जर विश्वासानें शिवपंचाक्षरी मंत्राचा पाठ करणारा असला तर तो पातकरूप बंधनांतून मुक्त होतो. (२३) असें पार्वतीनें विचारल्यावरून कलियुगांत जन्मलेल्या सर्व प्राण्यांच्या हिताकरितां प्रत्यक्ष श्रीशिवांनी सांगितलें आहे. (२४) पार्वती म्हणाली परमेश्वरा, कलियुग हें पातकांचे घर आहे तेथील दिवस कोणासही चुकवितां येत नाहींत ते भोगावेंच लागतात, लोकांत जिकडे तिकडे अज्ञानपणारूप आंधार पडलेला असतो, त्यामुळे सर्व लोक धर्मकृत्याविषयीं हेळसांड करितात, कोणीही धर्माचरण करीत नाहींत. (२५) कलियुगांतील लोक अशक्त असून वर्णधर्म आणि आश्रमधर्म यथाविधीनें पाळीत नाहींत. त्यामुळे संकर होऊन सर्व प्रकारचे अधिकार (व्यवस्था) मोडून जातात. जे निश्चितज्ञान आहे त्याविषयी संशय येऊं लागून त्या विरुद्ध वर्तन होऊं लागतें. (२६) त्यावेळी उपदेश बरोबर होत नाहींत त्यामुळे गुरूची रीति आणि शिष्याची रीति मर्यादा बरोबर राहत नाहीं अशा दुर्धर कालाच्या कलियुगांत महेश्वरा, तुझें भक्त कोणत्या उपायानें मुक्त होतील, हे मला सांग ? असा पार्वतीचा प्रश्न ऐकून (२७) शिव म्हणाले- देवि पार्वती, त्यावेळी जन्मास येणारे माझे भक्त लोक भक्तिभावानें मनापासून अतिशय महत्वाची आणि कानास गोड लागणारी शिवपंचाक्षरी विद्या हिचा आश्रय करून उद्धरून जातील. (२८) मनुष्यांच्या हातून काया वाचा आणि मनानें कितीही पातकें होवोत तीं पापे तोंडाने सांगवत नसली व मनांत आठवण करवत नसली तर कांहीं चिंता नाहीं, तीं पातकें ज्यांनी केलीं ते लोक, केलेले उपकार मनांत न आणणारे लोक, निर्दय लोक आणि दुष्ट स्वभावाचे लोक (२९) लोभी लोक आणि अतिशय कपटी मनाचे लोक जरी असले तरी ते जर मजवर दृढविश्वास ठेवून माझ्या पंचाक्षरी मंत्राचा जप करतील तर पंचाक्षरी विद्येच्या सामर्थ्यानें ते संसार भयापासून मुक्त होतील. (३०) पार्वति, मी पृथ्वी लोकावर सर्व लोकांत वारंवार असें खालीनें सांगितलें आहे की, एखादा मनुष्य पतित (नीच कुलांत जन्मलेला) जरी असला तरी माझा भक्त असून माझ्या पंचाक्षरी मंत्राचा जप करील तर मुक्त होतो. असें महादेवाचे बोलणें ऐकून (३१) पार्वति म्हणाली- मनुष्य जर पतित असेल तर त्यास कोणतेंही कर्म करण्याचा अधिकार नाहीं. आणि अधिकार नसून तो तें कर्म करील तर त्या कर्माचें फळ त्यास न मिळतां तो उलट नरकास जातो असें असतां आपण तर ह्या पंचाक्षरी मंत्राच्या जपानें मनुष्य पतित असला तरी तो उद्धरून जातो म्हणतां हें कसे? असें पार्वतीचें म्हणणे ऐकून (३२) शिव म्हणाले- पार्वति, तूं म्हणतेस ती गोष्ट खरी आहे, तरीपण त्याचें कारण आहे तें मी तुला सांगतो ऐक. हे फार महत्वाचें आहे असे समजून मीं इतके दिवस गुप्त ठेविलें होतें. (३३) जर कोणी पतित मनुष्य माझ्या पंचाक्षरी मंत्रावाचून माझी मंत्रपूर्वक पूजा करील तर तो नरकास जातो ह्यांत संशय नाहीं. (३४) जे कोणी नुसतें पाणी पिऊनच तपश्चर्या करितात, जे कोणी वायु भक्षण करून तपश्चर्या करितात आणखी दुसरे असेच कोणी व्रतें करून आपापलीं शरीरें झिजवितात, त्यांस त्यांनी केलेल्या ह्या व्रतांनी माझ्या कैलासलोकाची प्राप्ति होत नाहीं. (३५) जो मनुष्य भक्तिभावानें पंचाक्षरी मंत्रानें माझें एकवेळ पूजन करितो तो देखील माझ्या ह्या पंचाक्षरी मंत्राच्या साधनानें कैलास लोकास येतो इतकी ह्या पंचाक्षरी मंत्राची योग्यता आहे. (३६) म्हणूनच दुसऱ्या अनेक प्रकारच्या तपश्चर्या, यज्ञ, व्रतें, तसेंच निमय हे सर्व ह्या पंचाक्षरी मंत्राच्या कोटि हिश्याची देखील बरोबरी करूं शकत नाहींत. ह्या वर सांगितलेल्या सर्व क्रियापेक्षां पंचाक्षरी मंत्र कोटपटीनें श्रेष्ठ आहे. (३७) ह्यासाठी ह्या पंचाक्षरी मंत्रानें काया वाचा मनाने आपल्या बुद्धीप्रमाणें, आपल्या श्रद्धेप्रमाणें, कालमानाप्रमाणें, आपल्या समजुतीप्रमाणें, (३८) आपल्या शक्तीप्रमाणें, आपल्या ऐपतीप्रमाणे जसें साधेल त्या रीतीनें, आपल्या आवडीप्रमाणे जेव्हां केव्हां (जेव्हां सवड साधेल तेव्हां) भक्तिभावानें जेथें कोठें सवड सांपडेल तेथे कोणत्याही जातीच्या मनुष्यानें माझी पूजा केली तर ती पूजा त्यास मोक्षप्राप्ति करून देते. (३९) जो कोणी मनुष्य शुचिर्भूत असो किंवा शुचिर्भूत नसो, तो एक वेळ माझी पंचाक्षरी मंत्रानें पूजा करील तर तो पतित असला तरी मुक्त होतो ह्यांत संशय नाहीं. (४०) ह्याविषयीं फार सांगण्यांत् काय अर्थ आहे? जे लोक माझे भक्त आहेत ते सर्व प्रकारचीं कर्मे करण्याला अधिकारी आहेत आणि माझा पंचाक्षरी मंत्र जगांत जितके मंत्र आहेत त्या सर्व मंत्रांपेक्षां श्रेष्ठ आहे. (४१) हे सर्व लोक, हे सर्व देव, हे सर्व महर्षि, हे सर्व वेद, आणि हे सर्व जग पंचाक्षरी मंत्राच्या आधाराने चिरकाळपर्यंत राहतात. (४२) ह्या पंचाक्षरी मंत्राच्या अगोदर ``नमः'' अशी अक्षरें घालून त्याचे पुढे ``शिवाय'' अशीं तीन अक्षरें घालावीं, हीच पंचाक्षरी विद्या होय, ही पंचाक्षरी विद्या सर्व वेदांचया अग्रभागीं (मुख्य ठिकाणीं) राहते (पंचाश्चरी मंत्र) सर्व वेदांत श्रेष्ठ आहे. (४३) ह्या त्रैलोक्यांत जितके कांहीं शब्दसमूह आहेत त्या सर्वांची ही पंचाक्षरी विद्या मूल आहे, ही संक्षिप्त रीतीची असून ही आधीं माझ्या तोंडांतूनच निघाली आणि ती माझ्या नांवाचाच लोकांस बोध करिते. (४४) माझीं पांच तोंडे हींच त्या प्रत्येक अक्षराचें क्रमाक्रमानें मूलस्थान आहे. हे कमलवदने पार्वति माझ्या पूर्वेकडील मुखापासून माझ्या मस्तकावरील पांचवे मुखापर्यंत ``नमः शिवाय'' ह्या प्रत्येक अक्षराचें क्रमानें स्थान आहे. (४५) शिव ही मूलविद्या असून शैव हें सूत्र आहे आणि पंचाक्षर मंत्र हा त्या शिवाचीं नांवें आहेत असें मानावें, व शैव हें माझें हृदय आहे. (४६) माझे प्रियपार्वति, मी आणखी तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो, ही तूं फार गुप्त ठेव. ही उगीच भलत्या सलत्या नास्तिक मनुष्यास तूं सांगू नकोस, कोणी अज्ञान मनुष्य असेल त्यास सांगू नकोस, (४७) जो कोणी दुराचारी असेल, जो कोणी पतित आहे, जो कोणी नीच जातीत जन्मला असेल त्यास हा मंत्र तूं सांगू नकोस. ह्या कलियुगांत पंचाक्षरमंत्रापेक्षा जास्त रक्षण करणारा मंत्रच नाहीं. पंचाक्षरी मंत्रच सर्वांत श्रेष्ठ आहे. (४८) चालत असो, उभा असो, मनाला वाटेल तें कर्म करीत असो, अशुचि असो, शुचि असो, त्यानें जर या शिवमंत्राचा जप केला तर त्याला हा मंत्रा कधीही निष्फल होत नाहीं. (४९) कोणी महार मांग असेल, कोणी मूर्ख असेल कोणी अडाणी असेल कोणी पतित असेल कोणी पतित असेल, कोणी मर्यादा सोडून वागत असेल, व कोणी नीच स्वभावाचा मनुष्य असेल त्यानें जरी पंचाक्षरी मंत्राचा जप केला तरी तो व्यर्थ जात नाहीं. (५०) माझे प्रियपार्वति, माझी भक्ति करणारा मनुष्य कोणत्याही स्थितींत असो, त्यानें पंचाक्षरी मंत्राचा जप केला तर तो सफळ होतो, दुसऱ्या कोणीं जप केला तर त्याचा पंचाक्षरी मंत्र सफळ होत नाहीं. (५१) हा मंत्र जपणें झालें तर लग्न, तिथि, नक्षत्र, वार आणि योग वगैरे फारसें अनुकूल प्रतिकूल आहेत किंवा नाहीत हे पहावयास नको, हा मंत्र नेहमीं जागरूक आहे हा कोणत्याहीवेळीं जपला तरी चिंता नाहीं. (५२) दुसरे मंत्र आपणास अनुकूल झाले म्हणजे हा पंचाक्षरी मंत्र अनुकूल होतो असें नाहीं. आणि हा शिवपंचाक्षरी महामंत्र एकवेळ अनुकूल झाला म्हणजे सर्व इतर मंत्र् अनुकूल झाल्यासारखेच आहेत. (५३) हे महेश्वरी जसे सर्व देव प्रसन्न झाले म्हणजे मी प्रसन्न झालों असें होत नाहीं आणि मी प्रसन्न झालों म्हणजे सर्व देव प्रसन्न झाल्यासारखे आहेत, तसाच पंचाक्षरीमंत्र साध्य झाला म्हणजे सर्व मंत्र साध्य झाल्यासारखे आहेत, सारांश, माझी आणि पंचाक्षरी मंत्राची योग्यता सारखी आहे. (५४) म्हणूनच हा मंत्र जपून त्याचे मोबदला क्षुल्लक एखादा उपयोग (फळ) करून घ्यावयाचें मनांत आणूं नये. ह्या मंत्राच्या अनुरूप असें फळ मिळण्याची इच्छा करावी कां तर ह्या मंत्राचें सामर्थ्य अलौकिक आहे. (५५) ह्यासाठीं ज्ञानी मनुष्यानें दुसरे मंत्र जपणें वगैरे सर्व सोडून देऊन आपल्या अधिकारानुरूप श्रेष्ठ आणि मनोहर अशा पंचाक्षरीविद्येचा आश्रय करावा. (५६) उपमन्यु म्हणाले- श्रीकृष्णा, हें पंचाक्षरी मंत्राचें माहात्म्य सर्व लोकांचे हित व्हावयासाठीं शूल हातांत असणाऱ्या श्रीशिवांनी स्वतः महादेवी पार्वतीस सांगितलें. (५७) जो कोणी मनुष्य भक्तिभावानें हें पंचाक्षरी मंत्राचे माहात्म्य दुसऱ्यास सांगेल किंवा दुसऱ्या पासून आपण ऐकेल तो सर्व पापापासून मुक्त होऊन उत्तम गतीस जाईल. ह्याप्रमाणें श्रीनीलकण्ठनागनाथ नांवाच्या मोठ्या विद्वानानें केलेल्या वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहांतील सदाचारनिरूपणापैकीं पञ्चाक्षरीमन्त्राचें माहात्म्यकथन नांवाचा आठवा अध्याय सम्पला. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Panchaksharimahatmyam
% File name             : panchAkSharImAhAtmyam.itx
% itxtitle              : panchAkSharImAhAtmyam (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : panchAkSharImAhAtmyam
% Category              : shiva, vIrashaiva
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org