सिद्धान्तरत्नाकरं सार्थम्

सिद्धान्तरत्नाकरं सार्थम्

(वृत्त शार्दूलविक्रीडित) मोक्षानन्दनिधीं सुशान्तिनिलयं भ्रान्तिच्छिदं ज्ञानदं संसारार्णवतारकं मुनिनुत वेदान्तवेद्यं विभुम् । भूमाख्येयमनन्तवीर्यमतुलं मोक्षेच्छूनां जीवनं वन्दे सद्गुरुश्रीधरं भवहरं सिद्धान्तरत्नाकरम् ॥ १॥ अनन्तानन्त मोक्षानन्दाचे सारसर्वस्व निधीस्वरूप, आत्मस्वरूपाच्या परिज्ञानाने प्राप्त होणाऱ्या निरवधि शान्तीचे मूलस्रोत, आत्मस्वरूपाला पूर्णपणे आच्छादणारे साऱ्या दुःखाचे कारण असणारे भ्रान्तिरूपी आच्छादन नष्ट करणारा, सर्व प्राणीमात्र ज्याच्या निजानन्दाचे परिशोधन करण्यात निमग्न आहेत तो निरवधि आनन्दच तुमचे आमचे निजस्वरूप आहे असे ज्ञान देणारा दयाळू, भवसागर पार करून जाण्यास जो एक विशाल सेतू आहे, आत्मविचारावर ऋषिमुनिङ्कडून जो सदैव आत्मैक्य भावाने सम्बोधिला जातो, वेदाञ्चे पूर्णस्वरूप दर्शविणारा म्हणजेच वेदाञ्चा शेवटचा निर्णय दाखविणारा, जो सर्व उपनिषदे जाणतो, दशदिशा व्यापून जो उरला आहे, ``भूमा'' या सार्थ नावाने नेहमी शोभणारा, अनन्त अतुल सामर्थ्याचे साक्षात मूर्तस्वरूप, जो अनुपमेय आहे, जो मोक्षेच्छूञ्चे जीवनच आहे, विषयवासना व देहाभिमान यामुळे उद्भवणाऱ्या जन्ममरणरूपी श‍ृङ्खला नष्ट करणारा, सर्व वेदान्त, सिद्धान्तस्वरूपी रत्नाञ्चा जो महासागर आहे, अशा श्रीसद्गुरु श्रीधरस्वामी महाराजाञ्च्या पदकमलावर माझा अनन्य एकोभावाने नमस्कार आहे. धर्मोद्धारधुरीणमद्भुतमहो धर्मध्वजध्येयिनं ध्यानेनोधृतशुद्धबुद्धिमभयन्धर्मिष्ठगेयङ्गुरुम् । वेदान्ताम्बुधिमंयनोद्भवसुधावाङ्माधुरीधारिणं वन्दे सद्गुरु श्रीधरं भवहरं सिद्धान्तरत्नाकरम् ॥ २॥ पूर्वी कधीही न झालेला धर्मोद्धारधुरीण, धर्मध्वज उभारण्याचे उत्कट ध्येय धारण करणारा, निष्कलङ्क अशा आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने विशाल झालेल्या शुद्ध बुद्धीने जो शोभत आहे, जो सर्वांना अभयरूप आहे, ज्याची किर्ती धार्मिकजनाङ्कडून गायिली जाते, वेदान्तरूपी समुद्राचे मन्थन करून त्यातून बाहेर पडणाऱ्या अमृततुल्य मधुरवाणीने शोभायमान असणारा, अखिल वेदान्तरूपी रत्नाञ्चा महासागर, संसार-तारकरूपी श्रीसद्गुरु श्री श्रीधरस्वामी महाराजाञ्च्या परमपवित्र चरणकमलावर अनन्य भक्तिभावाने मी नमस्कार करतो. अज्ञानान्धतमोविदारणपटुश्रेष्ठप्रभाभास्करं सद्बोधामृतवर्षिणं सुखधनं कामेभपञ्चाननम् । मायारण्यविनाशनोद्यतमहाप्रज्वालिदावानलं वन्दे सद्गुरुश्रीधरं भवहरं सिद्धान्तरत्नाकरम् ॥ ३॥ अज्ञानरूपी गर्द अन्धःकाराच्या आवरणाचा नाश करणारा अत्यन्त निपुण, अत्यन्तिक प्रकाशाने प्रकाशणारा चित्सूर्य, श्रवणेन्द्रियांना वेदसम्मत सद्बोधामृताने सन्तोषित करणारा, मानसिक शान्ति प्रदान करणारा, सुखाचा वर्षाव करणारा, कामरूपी उन्मत्त हत्तीला सिंहाप्रमाणे भीतिदायक भासणारा मायारूपी निबिड अरण्याचा सम्पूर्ण नाश करणाऱ्या अत्यन्त प्रज्वलित दावानलासारखा वाटणारा, अखिल वेदान्त-सिद्धान्तरूपी रत्नाञ्चा महासागर, संसार तारकरूपी अशा श्रीसद्गुरु श्रीधरस्वामी महाराजाञ्च्या परमपावन चरणपद्मावर अनन्य भावाने नतमस्तक होऊन नमस्कार करतो. सद्भक्तान्तरमोहसर्पङ्गरुडं त्रैतापचन्द्रोदयं संसाराम्बुधिकुम्भजं शुभतमं भक्तेष्टकल्पद्रुमम् । प्रारब्धोद्यत मोक्षविघ्नघनभिद्वायुं प्रचण्डं परं वन्दे सद्गुरुश्रीधरं भवहरं सिद्धान्तरत्नाकरम् ॥ ४॥ सद्भक्ताञ्च्या हृदयात लपून बसलेल्या मोहरूपी सर्पाचा नाश करणारा जो गरुडस्वरूपी आहे, अधिदैविक, अधिभौतिक व अध्यात्मिक ह्या त्रितापाञ्चे शमन करणारा जो शान्तिरूपी जणू चन्द्रोदयच आहे, संसाररूपी समुद्रास कोरडे करणारा जो जणू अगस्तीच आहे, भक्ताञ्च्या मनोकामना पूर्ण करणारा जो जणू अतिशय मङ्गलस्वरूपी कल्पवृक्षच आहे; प्रारब्धामुळे मोक्षमार्गात उद्भवणाऱ्या विघ्नरूपी मेघांना नाहीसे करणारा जो प्रचंड वायुरूपी आहे, अशा श्रेष्ठ, अखिल वेदान्त, सिद्धान्तरूपी रत्नाञ्चा महासागर असणाऱ्या संसारातून सोडवणाऱ्या श्रीसद्गुरु श्री श्रीधरस्वामी महाराजाञ्च्या चरणकमलावर मस्तक ठेवन अनन्य एकभावाने मी नमस्कर करतो. स्वाज्ञानास्थित विश्वमेवमखिलं जीवेशबन्धादिकं मत्वा दुःखमतीवसंसृतिभयास्सोद्वासुखिन्नंयतः । विश्वस्योद्धरणार्थमेव हि मुदा तद्ब्रह्मरूपादिमत् वन्दे सद्गुरुश्रीधरं भवहरं सिद्धान्तरत्नाकरम् ॥ ५॥ आपल्याच अज्ञानामुळे विश्वामध्ये जीवेशबन्धादिकाञ्ची भावना धरून जन्ममरणरूपी संसारात अतिशय दुःखाञ्चा अनुभव घेऊन संसारातील विभिन्न वैचित्र्य पाहून पश्चात्तापाने दग्ध झाल्यावर जगाच्या उद्धारासाठी जे ब्रह्म अत्यन्त त्वरेने, अत्यन्तिक आतुरतेने नामरूपाने विशोभित होऊन येथे आविर्भूत झाले आहे, अशा अखिल वेदान्त-सिद्धान्तरूपी रत्नाञ्चा महोदधि, संसारतारक श्रीसद्गुरु श्री श्रीधरस्वामी महाराजाञ्च्या चरणकमलावर नतमस्तक होऊन अनन्यभावाने मी नमस्कार करतो. ज्ञानवैराग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं सुविद्यताम् । अस्य स्तोत्रस्य पाठेन सद्भीष्ठमवाप्नुयात् ॥ ६॥ या स्तोत्राच्या पठनाने ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, भक्ति, मुक्ति, विद्या व सर्व मनोवाञ्च्छित मनोरथे सहजरीत्या परिपूर्ण होतात. इति श्रीधरस्वामीविरचितं सिद्धान्तरत्नाकरं सार्थं सम्पूर्णम् । Proofread by Paresh Panditrao
% Text title            : Siddhantaratnakaram Sartham
% File name             : siddhAntaratnAkaraMsArtham.itx
% itxtitle              : siddhAntaratnAkaraM sArtham (shrIdharasvAmIvirachitam)
% engtitle              : siddhAntaratnAkaraM sArtham
% Category              : deities_misc, gurudev, shrIdharasvAmI
% Location              : doc_deities_misc
% Sublocation           : deities_misc
% SubDeity              : gurudev
% Author                : Shridharasvami
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Paresh Panditrao
% Description/comments  : shrIdharasvAmI stotrANi.  shrIdharasandeshaH
% Indexextra            : (Marathi, Collection 1, 2, Selected)
% Latest update         : January 14, 2023
% Send corrections to   : Sanskrit@cheerful.com
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org