स्वामीवरदानन्दाय शुभेच्छा

स्वामीवरदानन्दाय शुभेच्छा

धर्मावाक्-तनु-मानसैर्हि सकला ये ब्रह्मचर्याश्रमे- ऽनुष्ठेयाः विहिताश्च ये परतरे गार्हस्थ्य संज्ञाश्रमे । वानप्रस्थ कृतांश्च धर्मनियमान् सर्वान् अनुष्ठाय तान् सोऽयं प्रव्रजितुं प्रयाति गृहतः सर्वैरनुज्ञायताम् ॥ १॥ ``यो नैवापि जगाम काननभुवं दध्रे न यो वल्कलं नो वा कन्दफलैरवर्तयत यः, कस्तस्य वन्याश्रमः ?'' । मा, मैवं, समता सदैव विजने गेहे च यस्याभवत् यं प्रव्रजितुं प्रयाति गृहतः सर्वैरनुज्ञायताम् ॥ २॥ माता भोजयते शिशून् कवलकान्, यो ज्ञानविज्ञानयो- र्ग्रासांस्तद्वदभोजयत् प्रतिदिनं अस्मान् शिवाकाङ्क्षया । अज्ञानावरणस्य दूरकरणे योऽभूत् सदासोधमः सोऽयं प्रव्रजितुं प्रयाति गृहतः सर्वैरनुज्ञायताम् ॥ ३॥ प्रव्रज्यामभिलव्य गच्छसि गुरो ! अस्त्विष्ट सिद्धिस्तव पन्थानश्च शिवाभवन्तु भवतो, मा चिन्तयास्मान् वृथा । सर्व त्वद्वचनामृतं श्रुतिपुटैः पीतं हृदिस्थं च तत् स्मारं स्मारमथ प्रतिक्षण कृतिं कुर्याम तां योचिता ॥ ४॥ डाॅ पळसुले पू. अप्पांना नूतन आश्रमात प्रवेश करताना संस्कृत काव्यातून शुभेच्छा देण्यासाठी आले. ते काव्य - भावार्थ - ब्रह्मचर्यादी चारी आश्रमांतील कायिक, वाचिक व मानसिक धर्मनियमांचे ज्यांनी यथावत् पालन केले आहे असे हे ( पू. अप्पा ) संन्यास घेण्यासाठी घर सोडून जात आहेत. त्यांना सर्वांनी आनन्दाने निरोप द्यावा. ॥ १॥ ``जो कधी रानात गेला नाही, ज्याने वल्कले धारण केली नाहीत, कन्दमुळांवर निर्वाह केला नाही, त्याने कसले वानप्रस्थाश्रमाचे पालन केले ?'' असे म्हणू नका. गृह व वन या दोन्हीविषयी ज्यांची चित्तवृत्ती समान होती असे हे (अप्पा) संन्यास घेण्यासाठी घर सोडून जात आहेत. त्यांना सर्वांनी (आनन्दाने) निरोप द्यावा. ॥ २॥ आई लेकराला घास भरवते त्याप्रमाणे ज्यांनी आपणास प्रतिदिनी ज्ञानविज्ञान भरविले आणि तुमचे-आमचे अज्ञान दूर करण्याचा नित्य प्रयास केला ते हे (अप्पा) संन्यास घेण्यासाठी घर सोडून जात आहेत. त्यांना सर्वांनी (आनन्दाने) निरोप द्यावा. ॥ ३॥ हे गुरुमहाराज ! संन्यासाच्या उत्कट इच्छेने तुम्ही जात आहात. तुमचा हेतू सिद्धीस जावो. आमची काळजी करू नका. (आमच्या) कर्णपुटांनी भरभरून प्राशन केलेले तुमचे वचनामृत आम्ही हृदयात साठवून ठेवले आहे. त्याचे क्षणोक्षणी स्मरण करून आम्ही योग्य असेच वागू. ``शिवास्ते पन्थानः सन्तु । '' ॥ ४॥ This is well wishing composition Dr. Palsule for the occasion of his friend Prof. A. D. Athavale (appA) who decided to take up Sannyas to become Swami Varadananda Bharati. From Biography of Varadananda Bharati tejAche chAndaNe, page 534
% Text title            : Varadananda Shubhechcha by DR Palasule
% File name             : varadAnandashubhechChApaLasule.itx
% itxtitle              : varadAnanda shubhechChA (paLasule virachitam)
% engtitle              : varadAnanda shubhechChA by paLasule
% Category              : deities_misc, gurudev, varadAnanda
% Location              : doc_deities_misc
% Sublocation           : deities_misc
% SubDeity              : gurudev
% Author                : Dr. Palsule
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Description/comments  : tejAche chAndaNe, page 534
% Indexextra            : (tejAche chAndaNe)
% Latest update         : May 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org