तुळशीमाहात्म्यं मराठी
श्रीगणेशाय नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।
अथ तुळसीमाहात्म्यप्रारंभः ।
१. प्रथमोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
श्रीगणेशासीं नमन । ज्याचे ठाईं नाहीं भिन्नपण ।
जो दुमदुमीत परिपूर्ण । सर्वां ठाई ॥ १॥
नमस्कार ऐसिया गणेशा । ज्याच्या कृपेनें अंधकार पावे नाशा ।
स्मरणमात्रें ज्ञानप्रकाशा । पावे देखा ॥ २॥
प्रसंगी त्यासीं प्रार्थुनी । वक्ता विनवी जोडून पाणी ।
तुळसीमाहात्म्य वदवीं वदनीं । श्रीगणेशा तूं ॥ ३॥
आतां नमू ते शारदा । जीपासुनी पाविजे कवित्वपदा ।
क्षणमात्रे गर्भाधा । ज्ञानदृष्टी देत जे ॥ ४॥
वक्ता म्हणे माझी विज्ञापना ऐसी । वदावें तुळसीमाहात्म्यासीं ।
तरी कृपा करून दीनासीं । सिद्धीतें पाववीं ॥ ५॥
आतां नमन श्रीगुरु ज्ञानदेवा । माझा संसार सुफळ करावा ।
जेणें पावेन परतीर ठेवा । ऐसें करीं स्वामिया ॥ ६॥
हा भवसिंधु तरावयासीं । भगवत्कथा वदवीं अहर्निशी ।
हेच मति द्यावी मज दीनासीं । कृपाळुवा ॥ ७॥
माझिये मनींची कल्पना ऐसी । कीं वदावें तुळसीमाहात्म्यासीं ।
हेचि विज्ञत्पी चरणासीं । देवाधिदेवा ॥ ८॥
श्रवण करितां श्रोते तृप्त होती । समाधान पाविजे संत महंतीं ।
ऐसें करीं कृपामूर्ती । देवराया ॥ ९॥
भातां श्रोतयांसीं हेच विनवणी । उदासता न धरावी मनीं ।
तुळसीमाहात्म्य ऐकतां श्रवणीं । महापातकें जातील ॥ १०॥
हा भवसिंधु तरावयासीं । श्रवण करावें तुळसीमाहात्म्यासीं ।
पवित्र होय महादोषी । श्रवणमात्रें ॥ ११॥
तुम्ही तरी जाणते श्रोते सज्जन । तुम्हां प्रार्थू शके कोण ।
परी प्रसंगोचित आपण । तुम्हासी विनंति करीतसें ॥ १२॥
आतां मज द्यावे कृपादान । कथा ऐकावी सावधान ।
तुळसीमाहात्म्य करा श्रवण । महादोष जातील ॥ १३॥
स्कंदपुराणींची कथा । सावधान परिसावी आतां ।
दुश्चित्त न व्हावें श्रोता । म्हणोनी वक्ता विनवीतसे ॥ १४॥
नैमिषारण्यीं अठ्यायशी सहस्र । बैसले असती ऋषीश्वर ।
त्यांसी सूत सांगे सविस्तर । तुळसीमाहात्म्य हें ॥ १५॥
कोणे एके दिवशीं । इंद्र बैसला सभेसी ।
देवगुरु तयापासीं । बैसलासे ॥ १६॥
इंद्र म्हणे गुरु अवधारीं । बहुत पाप झालें पृथ्वीवरी ।
तरी लोकांसी तरणोपाय करीं । स्वामिराजा ॥ १७॥
ऐसी सांगावी कथा । जेणें तरणोपाय होय समस्तां ।
हरे भवरोगव्यथा । प्राणियांची ॥ १८॥
म्हणोनी बहुतप्रकारें । गुरूसी स्तविलें आदरें ।
मग सांगताझाला त्वरें । बृहस्पती इंद्रासीं ॥ १९॥
म्हणे ऐक गा वज्रधरा । जुनाटकथा श्रवण करा ।
श्रवणें पाविजे परत्रा । सर्वलोकीं ॥ २०॥
श्रीतुळसीचें महिमान । मज तों न वदवे जाण ।
ब्रह्मा कांहीं वढेल आपण । ऐसें कळों येतसे ॥ २१॥
मज तंव वदावया थोडी मती । किंचित सांगतों तुजप्रती ।
ऐसें इंद्रासीं बृहस्पती । बोलता झाला ॥ २२॥
आतां ऐक सावधान । सांगतों तुळसीचें महिमान ।
श्रवण करितां दोष दारुण । क्षणमात्रें दग्ध होती ॥ २३॥
प्रह्लाद इंद्रापासीं । बैसलासे त्या समयासीं ।
तेणेंही बृहस्पतीसीं । विनवणी केली ॥ २४॥
प्रह्लाद म्हणे देवगुरु । आम्हासीं तुमचा आधारू ।
तू बुद्धिवंत कृपासागरु । स्वामिनाथा ॥ २५॥
तरी कृपा करा आम्हावरी । तुळसीमाहात्म्य सांगा झडकरी ।
श्रवण करितां ये संसारीं । तरोनियां जाइजे ॥ २६॥
इंद्र प्रह्लाद त्या समयासीं । विनविते झाले बृहस्पतीसी ।
गुरु सांगता झाला तयांसीं । तें आईका जी ॥ २७॥
गुरु म्हणे इंद्रासीं । तुवां अनुष्ठान केलें तुळसीपासीं ।
म्हणोनी वधिलें राक्षसांसीं । सत्य जाणपां ॥ २८॥
दैत्य मारून पावलासी जय । ऐसें अनुष्ठानाचें महिमान आहे ।
आणीक सांगतों तें हें । ऐक चित्त देऊनी ॥ २९॥
प्रह्लादे तुळसीचें अनुष्ठान । यथासांग केलें आपण ।
म्हणोनी पावला संपूर्ण । राज्य दैत्यांचें ॥ ३०॥
मंगळे केलें तुळसीचें अनुष्ठान । म्हणोनी पावला भूमीचें अधिष्ठान ।
भूमिपुत्र म्हणती संपूर्ण । लोकत्रयीं ॥ ३१॥
तुळसीकाष्टाचे गंध श्रीपती । भावें करूनि भाळीं लाविती ।
त्याचे ठाई परम प्रीती । भगवंताची ॥ ३२॥
कंठी तुळसीमाळा घाली । यज्ञसूत्री असे बांधिली ।
कर्णी शिरीं असे धरिली । माळा देखा ॥ ३३॥
ऐशा माळा घालूनि ठाई ठाई । नित्य जप करितां पाहीं ।
अनंतफळ भोगी तोही । अश्वमेधांचें ॥ ३४॥
आणीक तो पावे परंधाम । पुन्हा त्यासीं नाहीं जन्म ।
तुटे त्याचा भवभ्रम । संसारींचा ॥ ३५॥
पत्र पुष्प फळ तोय । जेणें तुळसीची पूजा करिताहे ।
तो परम पावन होय । लक्ष्मीवंत ॥ ३६॥
द्वारीं तुळसीचें झाड असे । त्यासी पत्र पुष्प कांहींच नसे ।
तरी पूजावें उल्हासें । संशय मानसीं न धरावा ॥ ३७॥
प्राणी जालिया गतप्राण । तुळसीकाष्ठे जरी होय दहन ।
तरी तो निःपाप आपण । सर्वपाप दहन झाले ॥ ३८॥
प्रेतासीं घालोनि तुळसीमाळा । कीर्तन करीत नेला दहनस्थळा ।
त्याच्या पातकाचा मेळा । पळे देखा ॥ ३९॥
हस्ती देखोनि सिंहासीं । पलायन करी दूरदेशीं ।
तैसा प्राणियाच्या पातकासीं । पळ सुटताहे ॥ ४०॥
संपूर्ण दहन करावयासीं । इतुकी काठे मिळतील कैसीं ।
ऐसी आशंका धराल मानसीं । तरी तेंही ऐकावें ॥ ४१॥
एक तुळसीकाष्ठ घाली । तेणें अवधींच तुळसीकाष्ठें झालीं ।
ऐसें कल्पोनि तये वेळीं । एकतरी काष्ठ घालिजे ॥ ४२॥
त्या दहनांतून अग्नी घेऊन जाय । आणि होम करिता होय ।
तरी एका होमें आठांचें पाहे । श्रेय येईल ॥ ४३॥
तुळसीकाष्ठाचे चूर्ण । अग्नीवरी घाली आपण ।
धूप म्हणोनीयां जाण । श्रीहरीसी समर्पी ॥ ४४॥
त्यासी शतयागांचें पुण्य । सहस्र घडलीं गोदानें ।
हा संशय न धरावा मनें । पुराणीं पाहा ॥ ४५॥
तुळसीकाष्ठ उजळोनी । तो दीप लावी श्रीहरीलागुनी ।
तरी सहस्रदीप उजळिले ऐसें मनीं । श्रीहरी मानिता होय ॥ ४६॥
नैवेद्यावरी प्रोक्षिजे तुळसीतीर्थं । तुळसीपत्र घालिजे नैवेद्यांत ।
तरी त्याच्या पुण्यासी नाहीं मित । तो नैवेद्य देवासीं बहुप्रिय ॥ ४७॥
ऐसा नैवेद्य समर्पी भगवंता । त्याच्या पुण्यास नाहीं साम्यता ।
ऐसें जाण तत्वतां । निश्चयेंसीं ॥ ४८॥
तुळसीतळींची मृत्तिका घेऊन । सप्त वर्षे करी अंगासीं लेपन ।
त्या पुण्याचें फळ न सांगवे जाण । तें अगाध पैं ॥ ४९॥
तुळसी काष्ठ उगाळून । त्याणें करीतसे तर्पण ।
तरी पितृगण संपूर्ण । संतुष्ट होती ॥ ५०॥
गरुडावरी बैसोन । वैकुंठासी जाती आपण ।
ऐसें घ्राणाचें महिमान । असे देखा ॥ ५१॥
तुळसीकाष्ठ उगाळून । पितृगणासीं लावी आपण ।
तरी अष्टश्राद्धे केलीं जाण । येके श्राद्धें ॥ ५२॥
श्राद्धकाळी तुळसीकाष्ठाचा होम करी । तरी पितृगण तृप्त स्वर्गीतरीं ।
ऐसी काष्ठगंधाची थोरी । असे जाण ॥ ५३॥
तुळसीकाष्ठ उगाळून । शाळिग्रामासीं चर्चून ।
त्याच गंधे आमंत्रण । ब्राह्मणांसी करावें ॥ ५४॥
ऐसे अवघे ब्राह्मण । श्राद्धी सांगे आपण ।
तरीच त्याचे पितृगण । तृप्त होती ॥ ५५॥
त्यासीं घडे अश्वमेधाचें पुण्य । याविषयीं संशय न धरावा जाण ।
हें तुळसीचें महिमान । अगाध असे ॥ ५६॥
जयाच्या द्वारीं तुळसीवृंदावन । तयासीं लक्ष्मीचें काय उणें ।
स्वयें नारायण आपण । वसे तेथे ॥ ५७॥
तुळसीविरहित नारायण नसे । ऐसें पुराणीं बोलिलें असे ।
म्हणोनी धन्य धन्य ते पुरुष । जे नित्य तुळसी पूजिती ॥ ५८॥
भाव धरोनियां मनी । हा ग्रंथ पडे जैं श्रवणीं ।
तैं पापा होय धुणी । मद्मपुराणी हे ख्याती ॥ ५९॥
दुःस्वप्न देखिलिया वरी । कारागृहीं पडे त्या अवसरी ।
व्याधी प्राप्त झालिया शरीरीं । या अध्यायाचा जप करावा ॥ ६०॥
ऐसें नित्यनेमी चैव । ग्रहण पंचपर्व ।
जप करावा धरोनि भाव । निश्चयेंसीं ॥ ६१॥
अपस्मारादि प्राणसंकट । प्राण होतां जप करावा एकनिष्ठ ।
अवघें वारील संकट । ऐसें महिमान तुळसीचें ॥ ६२॥
हा अध्याय श्रवण करील अंतकाळीं । त्यासी नाहीं जन्मावळी ।
जन्म मृत्युसी टाळी । तुळसादेवी ॥ ६३॥
ऐसा धरून विश्वास । श्रवण करावें तुळसी माहात्म्यास ।
तरी हरती महादोष । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ६४॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्ये प्रथमोऽध्यायः ॥ १॥
२. द्वितीयोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
कित्येकांचा भाव ऐसा मनीं । कीं महाराष्ट्र नायकावें कानीं ।
एका संस्कृतावांचूनी । ऐकूनये ॥ १॥
तरी बीजावीण वृक्ष वाढेल कैसा । पायावीण भिंती चढेना सहसा ।
ग्राम नसतां सिंवेस कैसा । ठाव असे जी ॥ २॥
संस्कृताची टीका महाराष्ट्र । ऐसा असे हा विचार ।
स्पष्ट विकल्प टाकोनि दूर । नष्ट श्रवण कीजे ॥ ३॥
मत मतांतरें उदंड असती । परी एकात्मता धरावी चित्तीं ।
भावें तुळसीमाहात्म्य श्रवण करिती । तरी इच्छिलें पावती नरनारी ॥ ४॥
आतां असो हे आडकथा । कथेचे अनुसंधान चालवीं आतां ।
म्हणोनी झाला बोलता । श्रोता वक्तयासी ॥ ५॥
होजी म्हणोनी वक्ता म्हणे । आतां कथेसीं अवधान देणें ।
एकचित्तें श्रवण करणें । हें तुळसीमाहात्म्य ॥ ६॥
प्रह्लाद आणि इंद्रासीं । बृहस्पती सांगे उभयतांसी ।
कथा ऐकावी ऐसी । सांगतों तुम्हाप्रती ॥ ७॥
इंद्रासीं देवगुरु म्हणे । हरिहर एकचि प्रतिमा जाण ।
भिन्नता धरावी आपण । हृदयामाजी ॥ ८॥
जो हरी तोचि हर । ऐसा मानावा निर्धार ।
शंकराची ही पूजा निरंतर । करीतजावी ॥ ९॥
आषाढीपासून कार्तिकीद्वादशी । सहस्र बेलपत्रे वाहावीं शिवासीं ।
तरी त्याची फळश्रुती ऐसी । ऐका तुम्ही ॥ १०॥
दरिद्राचा तात्काळ नाश । ज्ञानाचा होय प्रकाश ।
विद्या प्राप्त होय अनायासें । सत्य जाणा ॥ ११॥
भाद्रपदशुक्लचतुर्दशीस । ऐसें आचरण करावें पुरुषे ।
तें सांगतों तुम्हांस । सावधान ऐकावें ॥ १२॥
सहस्र बेलपत्रे सहस्र दूर्वा । त्यादिवसीं वाहाव्या केशवा ।
समर्पाव्या देवाधिदेवा । विष्णुनामें ॥ १३॥
त्यासीं आत्मप्राप्ती होय । उत्तम नक्षत्र होऊनि राहे ।
पुण्य सरलिया जन्मास ये । भाग्यवंताचे पोटीं ॥ १४॥
रामनवमी विजयादशमी । पौर्णिमा वैशाखी ज्येष्ठशुद्ध पंचमी ।
आश्विनशुद्ध नवमी । ऐसिया तिथी जाण पां ॥ १५॥
कार्तिकीपौर्णिमा मार्गशीषीं । मकरसंक्रांत रविवारासीं ।
पूजन करावें तें परियेसीं । सांगतों तुम्हा ॥ १६॥
शतदूर्वा संपूर्ण । तोडून घ्याव्या आपण ।
सहस्र तुळसी मंजिऱ्या निवडून । घ्याव्या देखा ॥ १७॥
मंजिऱ्या घ्यावयाची युक्ती । ते सांगतों तुम्हाप्रती ।
तें सावधान चित्तीं । ऐका तुम्हीं ॥ १८॥
दोन पानें खालीं वरी मंजिरी । ऐशा तोडाव्या ते अवसरीं ।
मग दूर्वा आणि मंजिरी । विष्णूस समर्पाव्या ॥ १९॥
तरी सदा सर्वकाळ । यश पावे प्रबळ ।
तयासी संतृष्ट गोपाळ । सर्वकाळ होतसे ॥ २०॥
एकादशीस करावें जागरण । तुळसीवृंदावनीं हरिकीर्तन ।
तरी कोड जाय जाण । कर्त्या पुरुषाचें ॥ २१॥
तुळसीचें भावें पूजन । पार्वतीनें केलें आपण ।
मग शंकरप्राप्ती शाली जाण । तुळसीकृपेनें ॥ २२॥
सावित्रीने केलें तुळसी पूजन । ब्रह्मदेवा पावली आपण ।
ऐसें तुळसादेवीचें महिमान । आहे देखा ॥ २३॥
अरुंधती स्त्री वसिष्ठाची । सेवा करिती झाली तुळसीची ।
प्राप्ती झाली वसिष्ठाची । तये लागीं ॥ २४॥
रुक्मिणीसी पाहिजे कृष्णप्राप्ती । म्हणोनी तुळसी सेवा झाली करिती ।
तिचे कृपेनें झाली प्राप्ती । श्रीकृष्णाची ॥ २५॥
तुळसीचें अनुष्ठान । देव गुरूने केलें आपण ।
संजीवनी विद्या संपूर्ण । प्राप्तझाली ॥ २६॥
समुद्र उल्लंघावयातें । वायुपुत्रे केलें अनुष्ठानातें ।
मग चळ पावला पूर्णतें । पैलतीरा जावया ॥ २७॥
शेषानें तुळसीचें अनुष्ठान । बहुत केलें आपण ।
मग उर्वी मस्तकीं धरून । उचलिली ॥ २८॥
राज्य पावला नागलोकींचें । ऐसें महिमान तुळसीचें ।
गुरु सांगे आपुले वाचे । इंद्रादिप्रह्लादांसीं ॥ २९॥
श्रीरामें केलें अनुष्ठान । तुळसीप्रसन्न झाली आपण ।
वर दिला संपूर्ण । श्रीरामासीं ॥ ३०॥
रावण कुंभकर्णांचें निर्दाळण । रामा तूं करिसील जाण ।
जय पावसील संपूर्ण । युद्धसमयीं ॥ ३१॥
गणेशाने केली सेवा । प्राप्त झाला चतुर्दशविद्येचा ठेवा ।
गजा सुराचा प्राण घ्यावा । ऐसा वर दीधला ॥ ३२॥
कार्तिकस्वामी आपण । करिता झाला तुळसीचें आराधन ।
वर पावोनियां तेणें । तारकासुर वधियेला ॥ ३३॥
नंदिकेश्वर आपण । करिता झाला आराधन ।
तात्काळ झाला वहन । श्रीशंकराचें ॥ ३४॥
तुळसीचे कृपेंकरून । क्षीरसागर केला प्राशन ।
शुभ्रवर्ण झाला तेणें । वरदें देखा ॥ ३५॥
वीरभद्रे तुळसीचें अनुष्ठान । करून केली सुप्रसन्न ।
वर मागोनियां आपण । दक्षाचे शिर तोडिलें ॥ ३६॥
तुळसीचें आराधन । शंकरें केलें आपण ।
मग वर पावोन जाण । त्रिपुर मारिला ॥ ३७॥
गरुडें केलें अनुष्ठान । वर पावला परिपूर्ण ।
मग उल्लंघिता झाला जाण । सप्तसमुद्र ॥ ३८॥
वरदानें नागकुळ मारिता झाला । अमृतासी घेऊनि आला ।
स्वयें विष्णूचा होऊनि ठेला । वहन देखा ॥ ३९॥
अष्टलोकपाळ निर्मळ । अनुष्ठान करिते झाले तात्काळ ।
मग अष्टदिशाधिपती सकळ । होऊनि ठेले ॥ ४०॥
सरस्वती आपण । करिती झाली आराधन ।
वर पावोनियां जाण । त्रिभुवन व्यापिलें ॥ ४१॥
तुळसीचें अनुष्ठान । दुर्गादेवीने केलें आपण ।
वर पावोनि वधिले कोण । ऐका नामें तयांचीं ॥ ४२॥
चंड मुंड महिषासुर । मारिती झाली सत्वर ।
निर्दाळूनियां असुर । विजयी झाली ॥ ४३॥
मार्कंडेय ऋषीनें केलें अनुष्ठान । चतुर्दश कल्पें आयुष्य पावला जाण ।
ऐसें महिमान । तुळसादेवीचें ॥ ४४॥
रंभेनें केलें पूजन । देवांगना झाली वरें करून ।
देवसभेसीं असे जाण । अद्यापि वरी ॥ ४५॥
ऐसें जेणें केलें अनुष्ठान । त्याचे मनोरथ झाले पूर्ण ।
आतां पत्रे न तोडावीं जाण । ते तिथिवार ऐकावे ॥ ४६॥
संक्रांति द्वादशी शुक्रवार । रवि भौम व्यतिपात साचार ।
या दिवसीं तुळसीपत्र । सहसाही तोडूंनये ॥ ४७॥
जे पत्रे तोडिती तये दिवसीं । ब्रह्महत्या घडे त्यांसी ।
संशय न धरावा मानसीं । पुराणीं पाहा ॥ ४८॥
माघद्वादशीस पूजा घडे । तरीं अश्वमेधाचें पुण्य जोडे ।
चुके संसारसांकडें । ऐसें पुराण बोलतसे ॥ ४९॥
अर्धोदयीं रविवारीं । माघमासीं स्नानकरी ।
तुळसी मृत्तिका लाऊन जरी । सर्वांगासीं ॥ ५०॥
तरी त्याचीं तीन कुळें उद्धरती । हें यथार्थ जाणावें समर्थी ।
विकल्प न धरावा चित्तीं । हें पुराणीं बोलिलें ॥ ५१॥
फाल्गुनीपौर्णिमा दशमी अमा । द्वादशीस घेतलें नेमा ।
पूजा करोनी पुरुषोत्तमा । संतुष्ट कीजे ॥ ५२॥
दीप लाऊनि रात्रीसीं । नैवेद्य समर्पावा तुळसीसीं ।
ऐसें केलिया नेमेसीं । जन्म मृत्यु तया नाहीं ॥ ५३॥
चैत्रमासीं पूर्णिमेसीं । पायसान्न भोजन ब्राह्मणासीं ।
संतुष्ट करावें वृंदावनापासीं । तरी सिद्धि प्राप्त होती ॥ ५४॥
अक्षय्य तृतीयेचें दिवसीं । तुळसीवृंदावनीं बाह्यणांसीं ।
दध्यन्नभोजन घालावे त्यांसीं । तरी तो वासव लोकासीं जाय ॥ ५५॥
ज्येष्ठदशमी पासून द्वादशी पर्यंत । ब्राह्मणभोजन जे घालित ।
तेणें परमेश्वर तृप्त । होय देखा ॥ ५६॥
आषाढीपासोनि कार्तिकीपर्यंत । पूजा करावी नेमस्त ।
चळों न द्यावें व्रत । निश्चयेंसीं ॥ ५७॥
धनधान्य पावती नर नारी । स्वपुरुषेसीं राज्य करी ।
अंतकाळीं मोक्ष पावती निर्धारी । नारी नर ॥ ५८॥
जयंतीस अर्धरात्रीं । पूजा करिती नर नारी ।
पुत्र होती आणि संसारीं । तरोनि जाती ॥ ५९॥
गजछाया पडेल जे दिवसीं । ब्राह्मणभोजन घाली वृंदावनापासीं ।
नैवेद्य समर्पूनि तुळसीसीं । पूजा करी ॥ ६०॥
तुळसी वृंदावना सेजारीं । हिरण्यश्राद्ध करी तेच अवसरी ।
पितृगण तृप्त होती तरी । सहस्र संवत्सर ॥ ६१॥
माघनवमीचे दिवसीं । भोजन घालावें अष्ट सुवासिनीसी ।
तुळसी वृंदावनीं त्यांसी । तृप्त करावें ॥ ६२॥
तरी वंध्या होय पुत्रवंती । ये विषयीं संशय न धरावाचित्तीं ।
प्रह्लादाप्रति बृहस्पती । सांगताहे ॥ ६३॥
चातुर्मासी संध्याकाळीं । दीप लावी तुळसी जवळी ।
नेम टळों नेदी कदाकाळीं । तरी याची फळश्रुती ऐकावी ॥ ६४॥
दीप लाऊन समर्पावा नैवेद्य । तेणें तृप्त होयपरमानंद ।
नैवेद्य दीपाचें फळ प्रसिद्ध । ऐसें असे ॥ ६५॥
अष्ट महासिद्धी प्राप्त होती । चिंता जाईल दिगंतीं ।
संशय न धरावा चित्तीं । हें बोलती पुराणें ॥ ६६॥
मकरसंक्रांति पौषमासी । गाईची पूजा करील ते दिवसीं ।
तो जाय स्वर्गलोकासी । सत्य जाणा ॥ ६७॥
हरिवासरी जागरण । तुळसीजवळी करावें आपण ।
धूप दीप नैवेद्य समर्पण । पूजा करावी ॥ ६८॥
तेणें पावे सायुज्यता मुक्ती । होईल केल्या शीघ्र प्राप्ती ।
ऐसें बोलिला ग्रंथीं । देवगुरु ॥ ६९॥
सूत सांगती ऋषीश्वरांस । गुरु सांगती इंद्रप्रह्लादांस ।
तेचि कथा सांगीतली तुम्हांस । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ७०॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्ये द्वितीयोऽध्यायः ॥ २॥
३. तृतीयोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
हा अध्याय करितां श्रवण । तरी आयुष्य होय संपूर्ण ।
सर्वरोग हरे जाण । निश्वयेंसी ॥ १॥
ऐश्वर्य पावे आपण । अंतकाळीं विष्णुपद प्राप्त जाण ।
ऐसें बोलिलें आपण । वगुरु ॥ २॥
इंद्र प्रह्लाद अमरावती । उभयतां बैसले असती ।
देवगुरु तयांप्रती । तुळसीहामात्म्य सांगताहे ॥ ३॥
सूर्यवंशी राजा दशरथ जाण । तो निपुत्रिक असे बहुत दिन ।
बहुत कष्टी होतसे जाण । पुत्राकारणें उभयतां ॥ ४॥
जळो जळो हें सुख । निपुत्रिकाचें पाहों नये मुख ।
पुत्राविण मज होतसे दुःख । तें काय सांगूं कौसल्ये ॥ ५॥
निपुत्रिकाचें अन्न । नवेती भले सज्जन ।
निपुत्रिकाचें वदन । अवलोकन करूं नये ॥ ६॥
म्हणोनीयां मज निंदिती जगीं । यालागी हळहळ होतसे आंगीं ।
ऐसें बोलोनि ते प्रसंगीं । दुःखित जाहला ॥ ७॥
बहुत शोक केला रायें । तयासी कौसल्या बोलत आहे ।
म्हणे कांहीं करावा उपाय । पुत्रप्राप्तीचा ॥ ८॥
शोक केलियानें सार्थक काय । ऐसा कहीं करावा उपाय ।
जेणें कार्यसिद्धि होय । तो विचार करावा ॥ ९॥
तुम्ही तो राया सर्वज्ञ । मी काय बोलूं अज्ञान ।
ऐसें ऐकोनियां वचन । राव बोलता जाहला ॥ १०॥
म्हणे मी पुत्र न देखें निभ्रांत । तुज कांहीं उपाय असेल सुचत ।
तरी मज करावा श्रुत । येसमयीं ॥ ११॥
परिसोन रायाचें वचन । कौसल्या बोले जाण ।
म्हणे राया चित्त देऊन । परिसा तुझी ॥ १२॥
श्रीभगवंतासी जावें शरण । सेवा करावी आपण ।
तो झालिया सुप्रसन्न । सर्वमनोरथ पुरतील ॥ १३॥
जगदीशा वेगळा कोण दाता । हें सत्य निज तत्वतां ।
म्हणोनीयां आतां । हरिसेवा करावी ॥ १४॥
परिसोनि कौसल्येचें वचन । रायास मानलें प्रमाण ।
म्हणे धन्य धन्य तुझें ज्ञान । उत्तम उपाय सांगीतला ॥ १५॥
मग रायें एकनिष्ठा धरूनी । बैसता झाला एकासनीं ।
हरिस्मरण करी मनी । राजा दशरथ ॥ १६॥
तंव अकस्मात भगवंत । देखिला से मूर्तिमंत ।
शंखचक्र गदापद्यसंयुक्त । देखिलें श्रीहरीसी ॥ १७॥
पीतांबर परिधान केला । कर्णी कुंडलांचा झळाळा ।
चतुर्भुज घनसांवळा । भेटता झाला वेगेंसीं ॥ १८॥
हरि म्हणे दशरथासी । इच्छा काय आहे मानसीं ।
राजा म्हणे पुत्र माझा होसी । तरी माझी इच्छा पुरेल ॥ १९॥
बहुत बरवें हरि म्हणे । तुझा पुत्र मी स्वयें होईन ।
परी सांगतों तें करणें । राया दशरथा ॥ २०॥
म्हणे दशरथा परियेसीं । अनुष्ठान करीं तुळसीपासीं ।
एक संवत्सर अनुष्ठानासीं । करीं राया ॥ २१॥
संतुष्ट होऊन तुळस । पुत्र देईल तुम्हांस ।
ऐसें सांगून हृषीकेश । मागुती गुप्त जाहले ॥ २२॥
राये सांगीतलें कौसल्येसीं । दोघे अनुष्ठान करती तुळसीपाशी ।
राहिले नित्यनेमेंसीं । एक संवत्सर ॥ २३॥
मग तुळसादेवी होऊन सुप्रसन्न । रायासीं दिधलें वरदान ।
चारपुत्र होतील जाण । राया दशरथा ॥ २४॥
ऐकोनि तुळसीचें वरदान । रायाचें संतोषलें मन ।
सांग करूनी पूजार्चन । व्रत समाप्त केलें तें ॥ २५॥
पुढें दशरथासी झाले चारपुत्र । राजाधिराज श्रीरामचंद्र ।
जो नरांमध्यें नरेन्द्र । देवाधिदेव ॥ २६॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न । ऐसे चवधे झाले निर्माण ।
देखोनी हरला शीण । राया दशरथाचा ॥ २७॥
ऐसें अनुष्ठान करितां । प्रचीत आली दशरथा ।
सद्भावें तुम्ही आचरतां । अनुभव त्वरित येईल ॥ २८॥
ऐसें तुळसीचें महिमान । गुरु सांगे आपण ।
इंद्रप्रह्लाह परिसती जाण । आनंदें करूनी ॥ २९॥
स्कंदपुराणींचें बोलणें । तुळसीमाहात्म्य परिसणें ।
हा अध्याय करितां श्रवण पठण । आरोग्य करी सर्वदा ॥ ३०॥
क्षत्रिय युद्धी पावे जय पूर्ण । वैश्य पठण करितां जाण ।
तुळसीमाहात्म्येंकरून । धनधान्य प्राप्त होय ॥ ३१॥
ब्राह्मणासीं प्रसन्न जालिया होय ज्ञान । शूद्रासी मुक्तिमुक्ति पावन ।
स्त्रियांसीं सौभाग्यवर्द्धन । श्रवणमात्रें होय देखा ॥ ३२॥
आयुरारोग्य होय अवघियांस । आयुष्यवर्धमान तयांस ।
ऐसें फळ असे विशेष । तृतीयाध्यायाचें ॥ ३३॥
लक्ष्मी होय परिपूर्ण । अंतीं विष्णुपद प्राप्त जाण ।
म्हणोनी हा अध्याय पठण । सर्वत्रांहीं करावा ॥ ३४॥
देवगुरूनें सांगितलें ऐसें । तेंचि श्रोतियांसीं सांगतसें ।
उदास न करावी मानसें । विठ्ठलदासरुद्र म्हणे ॥ ३५॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्ये तृतीयोऽध्यायः ॥ ३॥
४. चतुर्थोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
स्रत सांगे ऋषीश्वरांप्रती । इंद्र प्रह्लादां सांगे बृहस्पती ।
तेचि कथा सकळश्रोतीं । प्रीतिकरूनी ऐकावी ॥ १॥
जयाचे द्वारीं नाहीं तुळसी वृंदावन । त्याचें गृह स्मशान जाण ।
त्यागृहीं न जावें आपण । बैसावयासीं ॥ २॥
द्वारीं असावें तुळसीवृंदावन । प्रातःकाळीं नमस्कार करावा आपण ।
सव्य घालोनियां जाण । कार्यासी जावें ॥ ३॥
जपमाळा घेऊन करीं । सोळा नावें निरंतरी ।
अनुष्ठान निर्धारी । जो करील कोणी ॥ ४॥
त्यासीं होय वैकुंठप्राप्ती । चिरकाळ राहे वैकुंठाप्रती ।
ऐसी ऐकून गुरूची वदंती । प्रह्लाद बोलता जाहला ॥ ५॥
प्रह्लाद म्हणे गुरुप्रती । सोळानावें कोणकोण असती ।
तीं सांगावीं मजप्रती । कृपामूर्ती कृपाळुवा ॥ ६॥
ऐकोनि प्रह्लादाचा प्रश्न । देवगुरु बोलता झाला आपण ।
सोळानामें संपूर्ण । ऐक आतां ॥ ७॥
तुळसीनाम एक । श्रीनाम दुसरें देख ।
तिसरें बोलिलें अवश्यक । म्हणा ऐसें ॥ ८॥
लक्ष्मीनाम चवथें । विद्या पांचवें नेमस्तें ।
यशश्री साहावें गणितें । केलें आहे ॥ ९॥
धर्माधर्मा माना । सातवें नाम जाणा ।
देवी आठवें म्हणा । नामें देवीचीं ॥ १०॥
देवदेवि ममप्रिये । नववें नाम जाणती स्वयें ।
लक्ष्मी नाम दशम होय । निश्वयेंसी ॥ ११॥
सखीनाम एकादश । शुभनामद्द्वादश ।
भूमिनाम त्रयोदश । जाणावें पै ॥ १२॥
अचळनाम चतुर्दश । अमिला नाम पंचदश ।
अमळानाम षोडश । ऐसीं नामें सांगीतलीं ॥ १३॥
याउपरी प्रह्लाद म्हणे स्वामी । हीं नामें सांगीतलीं तुम्ही ।
तीं परिसोनियां आम्ही । समाधान पावलों ॥ १४॥
आतां कृपा करून गोसावी । पुढें कथा चालवावी ।
हे विज्ञप्ति ऐकावी । गुरुवर्या ॥ १५॥
परिसोन प्रह्लादाचें विज्ञापन । गुरु सांगताझाला आपण ।
म्हणे चित्त देऊनि यां श्रवण । करावें पुढील कथेसीं ॥ १६॥
रुद्राक्षतुळसीचे मणी । माळा कीजे एकत्र मेळौनी ।
एके माळेंत मणी ओउनी । अष्टाक्षरी जप कीजे ॥ १७॥
सर्वपाप निरसन होय । ऐसा महिमा तयाचा आहे ।
जप केलिया पाहे । मनोरथ पूर्ण होती ॥ १८॥
तुळसीचा वारा प्रेतावरुनी जाय । तरी तो मुक्त होऊनि राहे ।
अंतीं फळ पावताहे । विष्णुलोक सायुज्यता ॥ १९॥
ऐसें सांगतां गुरूसीं । प्रह्लाद पुसताझाला तयासी ।
स्वामीनें कथा सांगीतली ऐसी । तरी उद्धार कोणाचा जाहला ॥ २०॥
तेंचि सांगावें मज रंका । श्रवण केलिया पुरे आशंका ।
ऐसें म्हणूनियां देखा । गुरुविनविला ॥ २१॥
गुरु म्हणे प्रह्लादासीं । तुवां प्रश्न केला ऐसियासीं ।
तेचि कथा सांगतों तुम्हांसी । सावध ऐका ॥ २२॥
पौंड्रक नामा लुब्धक देखा । तो महापापी ऐका ।
संख्या नाहीं पातका । तयाचिया ॥ २३॥
उपजल्या दिवसापासूनी । पोट भरी नानाहिंसा करूनी ।
अखंड हिंडे जाय वनीं । श्वापदें मारावयासीं ॥ २४॥
प्रत्यहीं शतमृग मारी । परी त्याची नव्हे पोटभरी ।
मग दुसरा उपाय करी । तोही ऐकावा ॥ २५॥
वाटपाडी मार्गस्थांचा शिरच्छेद करी । त्यांची मात्रा घेऊन जाय घरीं ।
तयानें उदरपूर्ति करी । पौंड्रक कोळी तो ॥ २६॥
ऐसें करितां कोणे एके दिवसीं । कांहींच न मिळेसें झालें तयासीं ।
उपवास पडले त्यासीं । पांच देखा ॥ २७॥
अरण्याप्रती जंव जाय । तंव वनीं न मिळे तोय ।
यास्तव श्वापदें गेलीं पाहे । त्या अरण्यांतूनी ॥ २८॥
पक्षी मात्र गेले तेथूनी । मग कोळी आला परतोनी ।
पिता वधूनि त्याचें मांस वदनीं । घालिता झाला ॥ २९॥
पिता क्रमलिया ऐशापरी । मग माता वधूनि पोट भरी ।
तेहि क्रमलियावरी । स्त्री भक्षिली ॥ ३०॥
मग पुत्र भक्षिला तेणें । तीं समग्र भक्षून आपण ।
हिंडता झाला वनोवन । पूर्वस्थळें ॥ ३१॥
तंव तेथें व्याघ्र होता दरींत । निर्माण झाला अकस्मात ।
तेणें कंठी धरिला निमिषांत । तयासीं देखा ॥ ३२॥
मग प्राण गेला ते ठाई । तुळसीवरून वायु आला लवलाहीं ।
तो स्पर्शला पाहीं । महापापियासीं ॥ ३३॥
तुळसीचें पक्कपर्ण । वायुवेगें उडा लें जाण ।
त्या प्रेताच्या हृदयावरी जाऊन । पडिलें देखा ॥ ३४॥
मग यमदूत आले ते अवसरीं । त्यासीं नेलें यमपुरीं ।
उभा केला पुढारीं । यमधर्मापासीं ॥ ३५॥
यमें पाहूनि त्यासीं । मग पुसिलें चित्रगुप्तासीं ।
याची वर्तणूक आहे कैसी । किती पुण्य पाप ॥ ३६॥
चित्रगुप्त म्हणे स्वामी । हा जन्मापासून अधर्मी ।
पुण्याचे क्रियाकर्मी । प्रवर्त्तलाचि नाहीं ॥ ३७॥
याचें पाप बहुतचि असे । पुण्य तिळभरी नसे ।
सांगतां यम धर्मास ऐसें । क्रोध बहुतचि आला ॥ ३८॥
मग म्हणे दूतांसीं । आपला पराक्रम दाखवावयासीं ।
ताडण करा महापापियासीं । यमदूतहो ॥ ३९॥
ताडण करूनि यासीं । कुंभपाकी टाका त्वरेंसीं ।
तेथें कित्येक दिवस कासाविसी । होऊंदेणें ॥ ४०॥
मग सूकरयोनीसीं । जन्म घालावा यासीं ।
तो भोगिल्यावरी यासीं । पक्षियोनींत घालारे ॥ ४१॥
पक्षियांत कुश्चळ असती । तेथें घालावा याजप्रती ।
ऐसी आज्ञा करिती । यमरावो ॥ ४२॥
ऐसी आज्ञा होत पुरे । तों दूत विक्राळ झाले त्वरें ।
महाभयानक धरून शरीरें । ताडण करिते जाहले ॥ ४३॥
पाश अंकुश मुसळें । एकत्र करूनि मारिती बळें ।
ताडण करून तयेवेळे । कुंभपाकाजवळी नेला ॥ ४४॥
जो टाकावा कुंभपाकाभीतरीं । तंव ऐसी झाली नवलपरी ।
ते प्रह्लादा अवधारीं । चित्त देऊनी ॥ ४५॥
अंतरव्यापक श्रीहरी । त्यासीं कळलें अंतरीं ।
पौंड्रीक कुंभपाकाभी-तरीं । टाकावया पैं नेला ॥ ४६॥
मग महाराज होऊन कृपावंत । स्वयें दूतांसी आज्ञा करित ।
तुम्ही धांवा धांवा त्वरित । पौंड्रीक येथे आणावा ॥ ४७॥
यमदूतांपासुनी । बळेच घ्यावा आसडनी ।
युद्धासी आले तरी युद्ध करूनी । आणावा येथें ॥ ४८॥
ऐसी आज्ञा दूतांसीं । सांगता झाला हृषीकेशी ।
आज्ञा वंदूनि मस्तकासीं । दूत तेव्हां निघाले ॥ ४९॥
दूत येऊनी यमपुरीसीं । बोलते झाले यमदूतांसीं ।
आज्ञा आहे ऐसी । आमुचे स्वामीची ॥ ५०॥
हा पौंड्रीक आमुच्या हातीं द्यावा । आम्ही नेऊन भेटऊं देवा ।
तुम्ही अनमान न करावा । यमदूत हो ॥ ५१॥
यमदूत म्हणती त्यांसीं । जाऊनि पुसा यमापासीं ।
त्याची आज्ञा होईल आम्हासीं । तरी हा तुमच्या हातीं देऊं ॥ ५२॥
विष्णुदास म्हणती आम्हासीं । काय कारण पुसावयासीं ।
आम्ही बळेच नेऊं यासीं । हें सत्य जाणा ॥ ५३॥
यासीं आमुच्या हातीं देणें । तुम्ही आपुलें महत्त्व राखणें ।
नाहीं तरी युद्धकरणें । आम्हासीं तुम्ही ॥ ५४॥
ऐसें बोलोनि निकरीं । शस्त्र धरिते झाले करीं ।
मग यमदूत तये अवसरीं । युद्धासी प्रवर्त्तले ॥ ५५॥
परस्परें युद्ध झालें घोरांदर । भूमि कापिन्नली थोर ।
मग यमदूतांसी करोनिजर्जर । पौंड्रीक नेला तेवेळीं ॥ ५६॥
नेऊनियां वैकुंठासीं । भेटविला श्रीहरीसीं ।
आलिंगूनियां तयासीं । हरीनें सन्निध बैसविला ॥ ५७॥
तों यमदूत जाऊनि यमापासीं । दंड समर्पिले त्यासीं ।
म्हणती स्वामी आम्हासीं । परम पीडा जाहली ॥ ५८॥
विष्णुदूत येऊनि आपण । आम्हासीं युद्ध केलें दारुण ।
पौंड्रीक पापी नेला तेणें । वैकुंठासी ॥ ५९॥
परिसोन दूतांचें वचन । क्रोधायमान शाला सूर्यनंदन ।
मग चित्रगुप्ताकडे अवलोकून । क्रूरदृष्टीने पाहिलें ॥ ६०॥
म्हणे पुण्यावांचून वैकुंठासीं । नेणार नाहीं हृषीकेसीं ।
म्यां तुज पुसिलें ऐसियासी । त्वां सांगीतलें पुण्य नाहीं ॥ ६१॥
तरी सूक्ष्मदृष्टीने पाहणें । आणि याचा वृत्तांत मज सांगणे ।
सांगावया उशीर न करणें । अर्धपळ ॥ ६२॥
यमाची आज्ञा प्रमाण । चित्रगुप्त पाहे शोधून ।
तंव तिळाचा शतां शभाग जाण । पुण्यनिघालें ॥ ६३॥
चित्रगुप्त म्हणे यमासीं । तिळाचा शतांशभाग आहे यासीं ।
ऐसें ऐकतां चित्रगुप्तासीं । यम बोलता जाहला ॥ ६४॥
पहिलें कां नाहीं बोलिलासीं । आतां ऐसें सांगसीं ।
तरी पुण्य कोणते प्रकारचें तें आम्हासीं । सविस्तर श्रुत करीं ॥ ६५॥
चित्रगुप्त म्हणे यमासीं । तुळसबन होतें अरण्यासीं ।
ते स्थळीं देहत्याग घडला यासीं । सत्य जाणा ॥ ६६॥
वायु गेला तुळसीवरूनी । त्याचा स्पर्श झाला यालागुनी ।
गलित पत्र एक उडोनी । याचे हृदयीं पडियेलें ॥ ६७॥
इतुके पुण्य यासीं घडलें । म्हणोनी विष्णुदूतीं नेलें ।
ऐसें परिसतांच भरलें । कोषाचें भरतें मानसीं ॥ ६८॥
म्हणे याचें पुण्य तें किती । यासी वैकुंठीं जावया कैंची शक्ती ।
आतां जाऊनि विष्णुप्रती । त्याचा अधिकार नीरऊं ॥ ६९॥
मग होऊनी क्रोधायमान । यम चालिला आपण ।
विष्णुभुवनीं सूर्यनंदन । येता जाहला ॥ ७०॥
जंव आला विष्णूचे दारी । तंव वर्जिती वेत्रधारी ।
आज्ञे विरहित भीतरीं । नव जावें तुम्ही ॥ ७१॥
प्रविष्ट करूं समाचार । आज्ञेप्रमाणें जावें भीतर ।
ऐसें म्हणोनीयां स्थिर । यमासीं केलें ॥ ७२॥
यम बाहेर बैसविला । द्वारपाळीं समाचार श्रुत केला ।
मग दूतांसी आज्ञा करिता झाला । देवाधिदेव ॥ ७३॥
म्हणे यमासीं येऊ देणें । म्हणोनी आज्ञा केली नारायणें ।
मग द्वारपाळ सांगती येऊन । यमरायासी ॥ ७४॥
आज्ञा झाली तुम्हासीं । भीतरी जावें भेटीसीं ।
आलेति ज्या कार्यासीं । तें करोनि घेणे ॥ ७५॥
मग यम गेला भीतरीं । साष्टांग नमस्कार करी ।
तंव देखता झाला सामोरी । पौंड्रिकासी ॥ ७६॥
हरिसन्निध बैसलासे । यम दृष्टीनें देखतसे ।
मग कोषें बोलतसे । यम हरीसीं ॥ ७७॥
म्हणे हा परमचांडाळ पातकी । पासीं तुम्हीं आणिलें विष्णुलोकीं ।
आणुनियां सेखीं । आपुले सन्निध बैसविला ॥ ७८॥
हा तो परम चांडाळ । यासी आम्ही दंड करावा केवळ ।
तें नसतां येवेळें । यासीं पाठीसी घातलें ॥ ७९॥
पुरे तुमच्या अधिकारासीं । हा कार्यभाग सांगा आणिकासीं ।
ऐसें बोलोनि हातींच्या दंडासीं । पुढें ठेविलें ॥ ८०॥
म्हणे देवाधिदेवा पुरुषोत्तमा । ब्रह्मादिकां न कळे महिमा ।
सर्वसाक्ष आत्मारामा । पूर्णकामा सर्वेशा ॥ ८१॥
हें त्रिभुवन तुझ्या उदरीं । तूं खेळविसी सूत्रधारी ।
ऐसा तूं परमात्मा श्रीहरी । अनंत व्यापक ॥ ८२॥
तूं देवांचाही देव । या ब्रह्मांडाचा जीव ।
परी तुझे करणीचा नवलाव । अपूर्व देखा ॥ ८३॥
या चांडाळाचें पुण्य । तिळाचा शतांश भाग जाण ।
यासी तुवां वैकुंठासी आणून । आपुले सन्निध बैसविलें ॥ ८४॥
तुळसीवरून आला वारा । तो लागला याच्या शरीरा ।
तेणें याच्या पातकाचा मोडला थारा । हें मज अपूर्व वाटतें ॥ ८५॥
आतां तुळसोवरून वारा । येऊन लागेल पामरा ।
मग सर्व आणाल वैकुंठपुरा । मग दंड करावा कोणासी ॥ ८६॥
तुमची आज्ञा ऐसी । कीं दंड करावा पापियासीं ।
तरी या चांडाळासी । पाठीसी कैसें घातलें ॥ ८७॥
ऐसा बोलिला यम । त्यासीं उत्तर दे पुरुषोत्तम ।
म्हणे हा परम उत्तम । परमपुण्यात्मा ॥ ८८॥
जैं तुळसीवरून आला वारा । स्पर्श केला पाचिया शरीरा ।
तैं पवित्र झाला सारा । देह याचा ॥ ८९॥
हा परम झाला पुनीत । याच्या पुण्यासी नाहीं मित ।
हें तुम्ही जाणा नेमस्त । यमराया ॥ ९०॥
आणिक सांगतों एक । याचे पूर्वपुण्य असे देख ।
यास्तव पावला विष्णुलोक । पौंड्रिक हा ॥ ९१॥
हा मज परमप्रिय । मदनाहून अधिक होय ।
त्या पुत्रापरीस यावरी स्नेह । माझा याचे ठाई ॥ ९२॥
ऐसें देवाचें बोलणें । परिसोन चकित झाला मनें ।
मागुती त्यासी नारायण । काय बोलता जाहला ॥ ९३॥
आतां तुझीं आपुल्या स्थळासीं जावें । आपुलें कार्य करून सुखी रहावें ।
तुळसीची सेवा करिती तिकडे न जावें । यमदूतीं ॥ ९४॥
ऐसें बोलोनि ते अवसरीं । यमासीं हृदयीं आलिंगी श्रीहरी ।
मग विडा देऊनियां करीं । परम समाधान केलें ॥ ९५॥
आज्ञा दिधली तयासीं । यम जाता झाला निजस्थळासीं ।
गुरु सांगे इंद्रप्रह्लादांसीं । कथा पौंड्रिकाची ॥ ९६॥
ऐसें तुळसीचें महिमान । वायूने महापापी उद्धरिला जाण ।
इंद्रप्रह्लाद ऐकती आपण । देवगुरु बोलतसे ॥ ९७॥
हें तुळसी माहात्म्य । ऐकती पढती धरूनि नेम ।
तयांसीं श्रीपुरुषोत्तम । आपणाजवळी रक्षित ॥ ९८॥
क्षत्रिय हा अध्याय करितां पठण । तरी युद्धीं जय पावती आपण ।
वैश्य पठण करितां जाण । धनप्राप्ती होय त्या ॥ ९९॥
ब्राह्मणा प्राप्त होय ज्ञान । शूद्रासी भुक्ति मुक्ति जाण ।
स्त्रियांसी सौभाग्य संपूर्ण । होय देखा ॥ १००॥
आरोग्य होय सकळांस । आयुष्य होय बहुवस ।
ऐसें फळ हें असे । या अध्यायाचें ॥ १॥
लक्ष्मी होय संपूर्ण । अंतीं विष्णुपद प्राप्त जाण ।
म्हणोनी हा अध्याय पठण । करावा देखा ॥ २॥
सूत सांगे ऋषीश्वरां प्रती । त्याचीं उच्छीष्टौतरें तुम्हाप्रती ।
सांगितलीं अल्पमती । श्रवण भावें करावीं ॥ ३॥
जो श्रवण करी तुळसीमाहात्म्यास । तरी गणना नाहीं त्याचे पुण्यास ।
विश्वास धरावा मानस । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ४॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्ये चतुर्थोऽध्यायः ॥ ४॥
५. पञ्चमोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
मुख प्रक्षाळूनि प्रातःकाळीं । तुळसीवृंदावनीं ।
जावें तयेवेळीं । जोडूनियां बद्धांजुळी ॥ १॥
ऐसें म्हणावें श्लोक ।
यन्मूले सर्वतीर्थानि यन्मध्ये सर्वदेवताः ।
यदग्रे सर्ववेदाश्व तुलसि त्वां नमाम्यहं ॥ २॥
या मंत्रेकरूनियां जाण । प्रार्थावें तुळसीस आपण ।
अनन्य होऊनि शरण । पाणी घालावें ॥ ३॥
यावरी प्रह्लाद म्हणे गुरुनाथा । तुझीं सांगीतली पौंड्रिकाची कथा ।
ते परिसोनियां चित्ता । परमसमाधान जाहलें ॥ ४॥
तुळसी रोप लाऊनियां द्वारीं । भावें त्याची पूजा करी ।
ऐसें करितां कोणीतरी । उचरला आहे ॥ ५॥
ऐसें पुसता झाला गुरूसी । गुरु म्हणती तयासीं ।
येच विषयीं ऐका कथेसीं । सांगतो तुज ॥ ६॥
कैलासभुवन परम सुंदर । अतिलावण्य मनोहर ।
जेथें वास्तव्य करी श्रीशंकर । सदाशिव जो ॥ ७॥
तेथें नाना वनस्पती । सर्वांस फळें पुष्पें येती ।
पक्षी क्रीडा करिती । आपुले आनंदानें ॥ ८॥
कल्प तरु असती तेठाई । वसंत तेथें वसे पाहीं ।
नाना श्वापदें तींही । निरंतर राहती ॥ ९॥
बहुत तटाक सरोवर । उदकीं परिपूर्ण निरंतर ।
भीतरीं पद्मकमळें सुंदर । विकासली असती ॥ १०॥
ऐसें तें कैलास । तेथे श्रीशंभु करी वास ।
आसन वाळूनि बैसलासे । देवाधिदेव ॥ ११॥
परमहर्षयुक्ते । सदाशिव बैसला तेथें ।
तव अकस्माते । पार्वती तेव्हां पातली ॥ १२॥
नमस्कार करूनी शिवासीं । पुसती झाली वामांगासीं ।
वामहस्तें कवळूनि नीळकंठासी । विनोद करिती जाहली ॥ १३॥
म्हणे सदाशिवा समर्था । धर्माचा लोप झाला तत्वतां ।
सत्कर्मै बुडाली आतां । अधर्मे फार प्रवर्तला ॥ १४॥
आपला स्वधर्म टाकूनि । लोक अधर्मकर्मै करिती देख ।
यांचा संहार अवश्यक । करावा स्वामी ॥ १५॥
तरी तुझीं उघडोनि तृतीयनयन । भस्म करावे अवघे जन ।
ऐसें ऐकतां पंचानन । सदाशिव कोपला ॥ १६॥
म्हणे या सकळ जनाचा घात । तुवां केला कीं नेमस्त ।
पाप घडलें बहुत । तुजलागीं ॥ १७॥
वाचेंतून जें निघालें । तें कर्म त्यासी तत्काळ घडलें ।
म्हणोनी न पाहिजे बोलिलें । विरुद्ध बोलासीं ॥ १८॥
माझा उघडतांच तृतीयनयन । त्रैलोक्य भस्म करीन ।
त्यासीं तूं उघडोन । भस्म करा म्हणतेसी ॥ १९॥
या शब्दे तुज घडलें महापातक । प्रायश्चित्तषेणें लागे देख ।
आतांचि तूं अवश्यक । प्रायश्चित्त घेई ॥ २०॥
जोवरी त्वां प्रायश्चित घेतलें नाहीं । तोंवरी तूं अशुद्ध आहेस पाहीं ।
ऐसें बोलतां ते समयीं । परम भयभीत जाहली ॥ २१॥
परम होऊनिम्लान मुख । अति चिंतातुर झाली देख ।
बहुतां रीतीं करी शोक । मनामाजी ॥ २२॥
म्हणे व्यर्थ या अवसरीं । विनोद केला त्रिपुरारी ।
नसते पातक पदरीं । बांधोनियां घेतलें ॥ २३॥
आतां प्रायश्चित्तावांचुनी । मज शुद्धता कैंची याजनीं ।
ऐसें अंतर्यामीं कल्पुनी । नमन साष्टांग पैं केलें ॥ २४॥
म्हणे कृपाळुवा सदाशिवा । मज तरणोपाय सांगावा ।
ऐसें विनवोनि देवाधिदेवा । मस्तक चरणीं ठेविला ॥ २५॥
मग शिव कृपा करून । सांगता झाला आपण ।
तुळसीची सेवा करी जाण । येणें प्रकारें ॥ २६॥
तुळसी रोपें लावोनि अपार । सेवा करावी निरंतर ।
तेणें पाप जाईल समग्र । सत्य जाण पार्वती ॥ २७॥
ऐसें शिवें सांगतां जाण । मग पार्वती पुसे आपण ।
तुळसीची सेवा करून । कोण निष्पाप जाहले ॥ २८॥
हें सांगावें तत्वतां । कृपा करोनी कृपावंता ।
म्हणोनी चरणीं ठेविला माथा । पार्वतीनें ॥ २९॥
शिव म्हणे भली भली । बरवी प्रश्नोक्ती ।
हे केली । वहिली श्रवण करीं कां ॥ ३०॥
उज्जनी नाम नगरी । तेथें कौंतीय तेचि कथा ब्राह्मण राज्य करी ।
तो पुण्यवंत झाला कवणिये परी । तें आईकें ॥ ३१॥
ग्रामापासोनि समीप अरण्य । तेथें राहे ब्राह्मण ।
तेणें तुळसी रोप परिपूर्ण । लाविलें देखा ॥ ३२॥
त्या तुळसी वनामध्यें देख । अच्युतवृक्ष असे एक ।
सदा फळ देखोनि लोक । समाधान पावती ॥ ३३॥
त्या वृक्षाचे तळीं । वाळूचें लिंग असे ते स्थळीं ।
अपूज्य लिंग ते वेळीं । तो पूजिता होय ॥ ३४॥
आधीं करूनि तुळसीचें पूजन । धूप दीप नैवेद्य समपन ।
मग प्रार्थना करून । पत्र मंजुरी तोडित ॥ ३५॥
मग लिंगासी करूनि अभिषेक । तुळसीपत्र मंजुरी समर्पी देख ।
नैवेद्य समर्पितां सुख । मुख वस्त्रे झांकी ॥ ३६॥
ऐसी पूजा ते वेळीं । एकसंवत्सर तेणें केली ।
संतोष पावोनि चंद्रमौळी । प्रसन्न जाहला ॥ ३७॥
मी जावोनि विप्रापासीं । बोलता झालों तयासीं ।
धन्य धन्य तू होसी । पुण्यवंता ॥ ३८॥
तूं झालासी निःपाप । तिळभरी नसे तुज पाप ।
आतां तुझा सर्व संकल्प । सिद्धी पावेल ॥ ३९॥
आतां तुज मी झालों प्रसन्न । आपणासारिखा पुत्र दीधला जाण ।
तूं सुख भोगी संपूर्ण । याचदेहीं ॥ ४०॥
ऐसियासि तूं या अवसरीं । जावोनि त्या स्थळाभीतरी ।
त्याचिये समसरीं । सेवा कीजे तुळसीची ॥ ४१॥
तेथें तुझें जाईल पाप । तूं होसील निःपाप ।
पूजावें तुळसी रोप । सद्भावेंकरूनी ॥ ४२॥
ऐसें ऐकोनि ते अवसरीं । उमा उठली झडकरी ।
मस्तक ठेऊनि शिवचरणावरी । नभन केलें ॥ ४३॥
मग येऊनि उज्जनीसीं । पाहिलें क्षिप्रा नदीतीरासीं ।
वास्तव्य केलें तया स्थळासी । नदीतीरीं जाणपां ॥ ४४॥
तुळसी रोप लावोनि सांग । मग एक केलें वाळूचें लिंग ।
पूजाकरीतसे प्रसंगें । तुळसी आणि लिंगाची ॥ ४५॥
आधीं करी तुळसीपूजन । प्रदक्षिणा करूनि आपण ।
मग प्रार्थना करूनि जाण । तुळसी आणि मंजुरी तोडी ॥ ४६॥
तीं तुळसीपत्रे समर्पुनी । मग पूजा करी भवानी ।
श्रीशिवासी नैवेद्य दाखवोनी । नमस्कार घालीतसे ॥ ४७॥
पायसान्नाचा नैवेद्य नित्यानीं । शिवासी समप भवानी ।
तेणें शिव संतुष्ट होउनी । नांव ठेविलें अन्नपूर्णा ॥ ४८॥
त्या दिवसापासुनी देख । अन्नपूर्णा म्हणती लोक ।
आणीक ही आइक । प्रह्लादा तूं ॥ ४९॥
सहस्रपत्रे तुळसीचीं । मोजून पूजा करी शिवाची ।
सहस्रनामें करूनी पत्रीची । पूजा समर्पी ॥ ५०॥
शिवसस्रहनामें समर्पिलें पर्णा । म्हणोनी नांव ठेविलें अपर्णा ।
ऐसें एक संवत्सर जाणा । अनुष्ठान केलें तुळसीचें ॥ ५१॥
तुळसी होऊनि प्रसन्न । पार्वतीस दिलें आलिंगन ।
शिवासारिखा पुत्र होईल जाण । उमादेवी ॥ ५२॥
तूं पुत्रफळ पावसी । आणीक वचन परियेसीं ।
तूं निःपाप झालीस निश्चयेंसीं । सत्य जाण ॥ ५३॥
तूं शिवाची वल्लभा होसी । मी प्रिय होय विष्णूसीं ।
तुज मज भिन्नता कोणेविशीं । नाहीं देखा ॥ ५४॥
तै सेंचि शिवविष्णूस तत्वता । भिन्नता नसे सर्वथा ।
भिन्नता धरिती ते कोणे पंथा । जातील तें आइका ॥ ५५॥
भिन्नता धरिती मानसीं । तेजाती कुंभपाकासीं ।
रखरख भोगणें लागे त्यांसी । यावत् चंद्र सूर्य ॥ ५६॥
शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्व हृदयं शिवः । ऐसा ज्याचा पूर्णभाव ।
एकचि मानी उभय देव । त्यासीं मुक्तीचा उपाव । करणेंच नलगे ॥ ५७॥
तो सहजचि जीवन्मुक्त । एक विध परम भक्त ।
आनंदरूप सदोदित । असे सर्वकाळ ॥ ५८॥
ऐसें सांगूनि पार्वतीसी । अदृश्य झाली श्रीतुळसी ।
उमा परम उल्हासेसीं । गमन करिती जाहली ॥ ५९॥
उमेनें केलिया गमन । कैलासासीं गेली जाण ।
ऐकोनि पावेतीचें आगमन । श्रीशिव संतोषला ॥ ६०॥
म्हणे निःपाप झाली पार्वती । सामोरें जावें तियेप्रती ।
ऐसें बोडूनि उमापती । वृषभारूढ पैं झाले ॥ ६१॥
सवें घेऊनि गणांचा मेळा । कार्तिकस्वामी गणेश वीरभद्र सकळां ।
बोलाऊनि तये वेळां । सामोरे चालिले ॥ ६२॥
सन्मुख देखतांचि उमेसीं । संतोष झाला सदाशिवासीं ।
मग उमेनें त्यासमयासीं । मस्तक चरणीं ठेविला ॥ ६३॥
शिवें उचलोनि ते अवसरीं । अर्धांगीं बैसविली सुंदरी ।
संतोष पावले त्रिपुरारी । तये समयीं ॥ ६४॥
ऐसें तुळसीचें महिमान । इंद्रप्रह्लादासी गुरु सांगे आपण ।
तेंच केलें निरोपण । श्रोतयांलागीं ॥ ६५॥
श्रवण करितां तुळसी माहात्म्यास । तुटती भवरोगपाश ।
आणि प्राप्त होती चतुर्दश प्रकाश । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ६६॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्ये पञ्चमोऽध्यायः ॥ ५॥
६. षष्ठोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
बृहस्पति इंद्रप्रह्लादासीं । सांगतां कथा ऐसी ।
श्रवण केलें पार्वतीच्या कथेसीं । स्वामीचेनि मुखे ॥ १॥
तुळसीची सेवा करूनी । निःपाप झाली भवानी ।
पुढें आणीक कोणी । अनुष्ठान पैं केलें ॥ २॥
हें आतां आम्हांप्रती । सांगावें गा कृपामूर्ती ।
ऐसी केली विज्ञप्ती । गुरुवर्यां ॥ ३॥
परिसोनि उभयतांची प्रभोक्ती । बोलता झाला बृहस्पती ।
पुढील कथा तुम्हांप्रती । सांगतों ती ऐका ॥ ४॥
भूमिदेवीचें अनुष्ठान । दुर्वासदेव करी आपण ।
करूनि पूजा अर्चन । पुष्पांजुळी समप ॥ ५॥
ऐसी सेवा करितां ऋषी । तंव समस्त ऋषि आले त्यास्थळासीं ।
मग विनंती करिते झाले । ऐसी आइका ॥ ६॥
आम्हासीं गमन नाहीं सत्यलोकासीं । आपण जावें ब्रह्मभुवनासी ।
बह्मदेवाची स्थिति आहे कैसी । ते दृष्टीसी पहावी ॥ ७॥
आमुची हेचि विज्ञप्ती । पुरवावी जी कृपामूर्ती ।
ऐसें बोलोनियां पुढतीं । नमस्कार केला ॥ ८॥
जाणोनि ऋषीश्वरांचा भावो । तात्काळ उठिला दुर्वासदेवो ।
क्षणांत पातला ठावो । सत्यलोकींचा ॥ ९॥
तंव ब्रह्मा ते अवसरीं । सावित्रीसमवेत क्रीडा करी ।
सारीपाट मांडूनि करीं । ढाळीत फांसे ॥ १०॥
जों हातीं घरी फांसा । तों फांसाच पडे अपैसा ।
ब्रह्मदेव ऐसा । देहावरी नाहीं ॥ ११॥
संमुख उभे असती ऋषी । ब्रह्मा न पाहे त्यांसी ।
मन शाला द्यूतकर्मासीं । तये अवसरीं ॥ १२॥
ऐसें देखोनि त्यासमयासीं । कोपायमान झाले ऋषी ।
कमंडलूंतून उदकासीं । टाकिते झाले ॥ १३॥
उदक शिंपिलें ब्रह्मयावरी । आपण चालिले झडकरी ।
मग चतुरानन धांवोन द्वारीं । येता जाहला ॥ १४॥
दृष्टीं देखिलें ब्रह्मयासीं । प्रगट शाप बोलिले ऋषी ।
त्वां गर्व धरिला मानसीं । सृष्टि कर्ता म्हणोनी ॥ १५॥
तरी तुझें समूळ जाईल ज्ञान । तूं होसील परम अज्ञान ।
सत्य मानीं आमुचें वचन । मिथ्या नव्हे सर्वथा ॥ १६॥
मग भयभीत होऊनि ब्रह्मा । म्हणे मज दीनावरी करीं क्षमा ।
तरणोपाय सांगावा आम्हां । कृपावंता ॥ १७॥
नानाप्रकारी भाकी कींव । मग बोलिले दुर्वासदेव ।
सेवा करूनियां केशव । संतुष्ट करावा ॥ १८॥
तो तुज होईल सुप्रसन्न । जें जें मागसील वरदान ।
तेंतें पावोनि अज्ञान । निरसेल तुझें ॥ १९॥
आतां तूं जाई नैमिषारण्यांत । अनुष्ठान करावें शीघ्रगत ।
ऐसें सांगोनियां त्वरित । ऋषि गेला पूर्वस्थळा ॥ २०॥
मग ब्रह्मा जावोनि नैमिषारण्यांत । अनुष्ठान करी विष्णुप्रीत्यर्थ ।
ऐसें करितां दिवस बहुत । क्रमिले देखा ॥ २१॥
देखोनि चतुराननाचे कष्ट । श्रीभगवंत झाले प्रगट ।
रूप दाखविलें स्पष्ट । तयेवेळीं ॥ २२॥
चतुर्भुज पीतांबरधारी । रत्नजडित मुगुट शिरीं ।
शंखचक्रगदापद्म शोभे करी । नारायणाच्या ॥ २३॥
संमुख देखिला श्रीहरी । आनंद झाला हृदयांतरीं ।
स्तुति करिता झाला ते अवसरीं । नारायणाची ॥ २४॥
जयजयाजी परम पुरुषा । अव्यक्ता परम परेशा ।
सर्वव्यापक जगदीशा । तुज नमस्कार माझा ॥ २५॥
तूंचि ज्ञानद चिन्मय चिह्नन । तूं या ब्रह्मांडाचें जीवन ।
तूं परमात्मा परिपूर्ण । तुज नमस्कार माझा ॥ २६॥
तूं स्थूळ नासूक्ष्म । तूं परमात्मा परब्रह्म ।
सकळ सुखाचा विश्राम । तुज नमस्कार माझा ॥ २७॥
तूं सदा आनंदभरित । तूं सर्वाठाई सदोदित ।
भूतमात्री प्रकाशवंत । तुज नमस्कार माझा ॥ २८॥
तूं सगुण निर्गुण निराकार । ब्रह्मादिकांसीं नकळे तुझा पार ।
तूं परमात्मा सर्वेश्वर । तुज नमस्कार माझा ॥ २९॥
तूं परमेश्वर पद्मनाभ । तूं सगुणरूपें रमावल्लभ ।
तूं भक्तांलागीं सुलभ । तुज नमस्कार माझा ॥ ३०॥
मी जन्मलों तुझे नाभिकमळीं । परी तुझा पार नकळे वनमाळी ।
ऐसें बोलोनि बद्धांजुळी । जोडूनि उभा राहिला ॥ ३१॥
मग श्रीहरी झाला प्रसन्न । म्हणे माग माग रे वरदान ।
जें अपेक्षित असेल मन । तें देईन येकाळी ॥ ३२॥
ब्रह्मा म्हणे नारायणा । दुर्वासदेवें शापिलें जाणा ।
त्यापासोनि मज दीना । ये रक्षिले पाहिजे ॥ ३३॥
ऐकोनि ब्रह्मयाचे उत्तर । बोलता झाला शार्ङ्गधर ।
चतुरानना ऐक सादर । चित्त देऊनियां ॥ ३४॥
मी समर्थ या चराचरीं । मीं सकळसृष्टी करी ।
ऐसी गर्वता मनांतरीं । धरली तुवां ॥ ३५॥
उत्पत्ति करिता मी एक । निर्माणकरिता मी सकळिक ।
माझें कर्त्तव्य त्रैलोक्य । निर्माण झालें ॥ ३६॥
धन्य धन्य मी समर्थ थोर । माझिया भाग्यासि नाहीं पार ।
ऐसा अभिमान परमदुर्धर । त्वां हृदयीं धरियेला ॥ ३७॥
यास्तव हैं रचिलें निमित्त । तुज शाप झाला प्राप्त ।
तेणें कष्टी झालासि बहुत । ब्रह्मदेवा ॥ ३८॥
जेथें अभिमान वसे । तेथें ज्ञान सर्वथा नसे ।
ज्ञात्यास लाविलें पिसें । ज्ञानाचे अभिमानें ॥ ३९॥
अभिमान ज्ञानाचा करि क्षय । अभिमानें देव दुरी होय ।
अभिमानें न जोडती पाय । भगवंताचे ॥ ४०॥
मुख्य अहंकार ऐसा वैरी । बैसला असतां उरावरी ।
तो ज्ञानाचा नाश करी । क्षण मात्र न लागतां ॥ ४१॥
जोवरी निरसला नाहीं अभिमान । तोंवरी सर्व कमैं निर्फळ जाण ।
अभिमानें घर बुडवण । तात्काळ होय ॥ ४२॥
अभिमान असतां अंतरी । उदंड ज्ञानचर्चा करी ।
तें पोकळ ज्ञान निर्धारी । ब्रह्मदेवा ॥ ४३॥
तुझा निरसला नाहीं अभिमान । म्हणोनी प्राप्त जालें जाण ।
आतां सोडून अभिमान । निरभिमान तूं होय ॥ ४४॥
अरे माझी वैष्णवी माया जाण । तिचा पार नेणें शंकरादि आपण ।
तेथे तूं जाणावया कवण । अभिमान सांडी आतां ॥ ४५॥
या अभिमानें करून । ठकला विश्वामित्र आपण ।
मदन अंग जाळून । भस्म झाला ॥ ४६॥
रावण निमाला सहकुळें । दुर्योधन गेला बंधुसबळें ।
इंद्र चंद्र भ्रमबळें । भुलोनि गेले ॥ ४७॥
तुवां माझें केलें अनुष्ठान । म्हणूनी मी झालों सुप्रसन्न ।
तुज सांगतों मी प्रमाण । तें करीं आतां ॥ ४८॥
तुळसी रोप लाऊन । सुंदर बांधीं वृंदावन ।
त्याचें करूनि पूजन । प्रदक्षिणा करीं कां ॥ ४९॥
धूप दीप समर्पूनी नैवेद्य । वृंदावनीं करावा ब्रह्मानंद ।
तेणें करोनि गोविंद । संतुष्ट होईल ॥ ५०॥
तुळसी होऊनि सुप्रसन्न । करील तुझें शापमोचन ।
ऐसें ब्रह्मदेवासीं नारायण । स्वयें सांगे ॥ ५१॥
मज वैष्णवी माया व्हावया प्राप्त । तुळसीचें अनुष्ठान केलें दिवस बहुत ।
मग मी पावलों त्वरित । वरदान ॥ ५२॥
म्हणोनी सांगितल्या प्रमाणें । तुळसीचें अर्चन करणें ।
ऐसें सांगोनि नारायणें । अदृश्य जाहला ॥ ५३॥
आज्ञेप्रमाणें विधाता । अनुष्ठान झाला करिता ।
तुळसी प्रसन्न होऊनि तत्वतां । शापविमोचन केलें ॥ ५४॥
बहुत दिवस पर्यंत । स्वाहा स्वधाकार राहिले होते ।
यज्ञकमैं समस्तें । मागुती चालों लागलीं ॥ ५५॥
ऐसी कथा इंद्रप्रह्लादांसी । गुरूनें सांगीतली रायासीं ।
आणीक सांगतों तुम्हापासीं । तें आईका ॥ ५६॥
वामदेवाची कन्या सुमालिनी । तिची ऐका करणी ।
निरंतर हृदयीं चक्रपाणी । हरिस्मरण करीतसे ॥ ५७॥
श्रीकृष्णावांचूनि आणीक देव । तेथे कधींच नधरी भाव ।
निरंतर केशव । हेंचि स्मरणजियेचें ॥ ५८॥
पूजार्चन ध्यान धारणा । धरुनी हृदयीं नारायणा ।
तेणें करोनि पुण्यपरायणा । परम जाहली ॥ ५९॥
ऐसें असतां एके दिवशीं । पुसती झाली पितयासीं ।
माझी गती होईल कैसी । तें सांगिजे मज आतां ॥ ६०॥
परिसोनि बोले वामदेव । याचा तुज सांगतों उपाव ।
त्यासीं धरूनी एकभाव । सांगीतलें तूं करीं ॥ ६१॥
तुळसीरोप लाऊन । त्यासीं बांधी वृंदावन ।
नित्य करूनियां पूजार्चन । प्रदक्षिणा कराव्या ॥ ६२॥
द्वादश करितां प्रदक्षिणा । तेणें पुरती मनकामना ।
चतुर्विंशती जाणा । शत्रुपराजय ॥ ६३॥
करितां अष्टोत्तरशत । धनधान्य प्राप्त होत ।
सहस्र करितां अगणित । पुत्र कन्या प्राप्त होती ॥ ६४॥
लक्षाचें करितां प्रमाण । मुक्तिमुक्ति सदा कल्याण ।
द्वितीयल जाण । यश कीर्ति होय तेणें ॥ ६५॥
पंचलक्ष प्रदक्षिणा करितां । त्रिभुवनींचें ज्ञान होय त्वरिता ।
दशलक्ष प्रदक्षिणें तत्वतां । सर्व सिद्धी पावेतो ॥ ६६॥
द्वादशें होय शापमोचन । त्रयोदशें मोक्ष प्राप्त जाण ।
चतुर्दशें कळाप्रवीण । होय देखा ॥ ६७॥
प्रत्यहीं धूप दीप नैवेद्य । समपनि करीं ब्रह्मानंद ।
तेणें संतुष्ट होईल गोविंद । तुळसीद्वारें ॥ ६८॥
येणें तुळसी होईल प्रसन्न । तुझी गती सांगेल आपण ।
ऐसें सांगीतलें तेचक्षणी जाण । पित्यानें कन्येसी ॥ ६९॥
पित्याच्या आज्ञेप्रमाणें । सुमालिनी करी आचरण ।
बहुत दिवस पूजार्चन । करिती झाली ॥ ७०॥
करितां अनुष्ठानासीं । सोळा पुत्र झाले तियेसीं ।
परंतु तुळसीच्या पुजेसीं । सोडिलेंचि नाहीं ॥ ७१॥
तंव सोळाहि पुत्र अरण्यासीं । गेले समिधा आणावयासी ।
तंव देखिलें आश्रमासीं । ऋषी गौतमाच्या ॥ ७२॥
उत्तम देखिलें सरोवर । भीतरी कमळें मनोहर ।
त्यांत प्रवेशले कुमर । सुमालिनीचे ॥ ७३॥
स्नानें करोनि डहुळिलें उदक । कमळिणी दुखविल्या निष्टंक ।
तों तेथें गौतम आले देख । स्नानालागीं ॥ ७४॥
विच्छिन्नदेखिलें जलासीं । शाप देता झाला ऋषी ।
अंध व्हाल रे निश्चयेंसीं । येचक्षणीं ॥ ७५॥
शाप होतांचि तात्काळ । अंध जाहले सकळ ।
मार्ग नदिसे केवळ । चालतां ठोकर लागती ॥ ७६॥
माता पुत्रांची वाट पाहे । तंव त्यांसीं वेळ लागला आहे ।
मग हळू हळू लवलाहें । आश्रमासीं पातले ॥ ७७॥
पुत्राची दशा ते अवसरीं । देखोनि आक्रंदों लागली भारी ।
ताता धांवधांव ये झडकरी । म्हणोनी बोभाइली ॥ ७८॥
वामदेव बैसले होते ध्यानीं । तंव शब्द ऐकिला श्रवणीं ।
मग उठोनियां तेचक्षणीं । कन्ये जवळीं पातला ॥ ७९॥
म्हणे नवल झालें जी ताता । पुत्र अंध झाले करूं काय आतां ।
तंव ज्ञानी झाला पाहता । वामदेव ॥ ८०॥
शाप घडला गौतमाचा । यासीं उपाव न चले कोणाचा ।
मग बोलता झाला वाचा । कन्येप्रती ॥ ८१॥
मी परतोनि येतों तोंवरी । तुवां धीर धरावा मनांतरी ।
तुळसीची सेवा करीं । दुश्चित्त न व्हावें ॥ ८२॥
तुळसीची सेवा करितां जाण । अवघेंचि होईल कल्याण ।
भाव असों द्यावा संपूर्ण । तुळसीचे ठायीं ॥ ८३॥
ऐसें सांगोन कन्येसीं । वामदेव चालिले गौतमाश्रमासीं ।
तंव ध्यानस्थ होते गौतमऋषी । त्यांस अंतरी जाणवलें ॥ ८४॥
कष्टी न करावें वामदेवासीं । श्रम पावोन येती आश्रमासीं ।
तरी आपण त्यांचिये भेटीसीं । जावें बरें ॥ ८५॥
ऐसें कल्पूनियां मनीं । वामदेवाजवळी आले तेचक्षणीं ।
मग वामदेवें मस्तक चरणीं । गौतमाच्या ठेविला ॥ ८६॥
पुढती उठोनि सत्वर । साष्टांग केला नमस्कार ।
धन्य आजिचा दिवस थोर । तुमचे चरण देखिले ॥ ८७॥
पुण्याचा प्रवाह जोडे । तरी तुमचें दर्शन घडे ।
तुटे संसारसांकडें । ऋषिवर्या ॥ ८८॥
ऐसें बोलोनि ते अवसरीं । गौतमाचे पाय अर्ची करीं ।
चरणोदक वंदोनि मस्तकावरी । षोडशोपचार पूजा केली ॥ ८९॥
परम संतोषला ऋषी । म्हणे वामदेवा परियेसीं ।
तूं ईश्वरी पुरुष होसी । परम ज्ञानी ॥ ९०॥
तुज देखोनि झालें समाधान । धन्य धन्य तुझें ज्ञान ।
भूत भविष्य वर्तमान । सर्व जाणसी ॥ ९१॥
वामदेव म्हणती स्वामी । तुमचे आज्ञाधारक आम्ही ।
जे आज्ञा कराल स्वामी । ते आम्हास वंद्य असे ॥ ९२॥
तेव्हां गौतमऋषी झुणती । वामदेवा काय इच्छिलें चित्तीं ।
तें सांगावें मजप्रती । प्रीतिपूर्वक ॥ ९३॥
परिसोनि ऋषीची प्रश्नोक्ती । वामदेव प्रत्युत्तर देती ।
एक मागणें तुम्हाप्रती । आहे तितुकें द्यावें जी ॥ ९४॥
आमचे नातू स्वामीचे विद्यार्थी । त्यांसीं तुम्ही शापिलें कृपामूर्ती ।
यास्तव ते अंध असती । सोळाहि जण ॥ ९५॥
दया करूनि त्यांवरी । अंधकार दवडावा दिगंतरीं ।
ऐसी अनाथासीं कृपा करीं । कृपावंता ॥ ९६॥
ऐकोनि वामदेवाचें बोलणें । गौतम म्हणती मी बोललों याचकारणें ।
सुमालिनीचा भाव पाहणें । सेवा करिते कीं नाहीं ॥ ९७॥
आपुले आराध्य दैवत । विपत्तिकाळीं सोडोन देत ।
तैसा नव्हे पूर्ण भावार्थ । सत्य जाणा ॥ ९८॥
देह जावो अथवा राहो । परंतु एकनिष्ठा एकभावो ।
तरीं तयासी देवाधिदेवो । सर्वथाही नुपेक्षी ॥ ९९॥
तरी धन्य सुमालिनीची भक्ती । पुत्रांचें अंधत्व नाठवे चित्तीं ।
तुळसीची सेवा सर्वांर्थी । सोडिलीच नाहीं ॥ १००॥
येणें मी झालों हर्षायमाण । त्यांचे शापमोचन झालें जाण ।
पूर्वी नेत्र होते तैसेचि पूर्ण । तात्काळ झाले ॥ १॥
ऐसें ऋषि बोलिला आपण । तंव पाहते झाले सोळाजण ।
पूर्वी नेत्र होते तैसेचि पूर्ण । तात्काळ झाले ॥ २॥
ऐसें ऋषीचें सामर्थ्य । क्षणें अंघ क्षणें देखत ।
ऐसें झालें त्वरित । तेचि समयीं ॥ ३॥
मग गौतमदेव गेले निजस्थाना । पुत्रासहित सुमालिनी वृंदावना ।
सेवा करूनियां जाणा । निष्ठा धरोनी राहिली ॥ ४॥
तुळसीची सेवा पुनरावृत्ती । सद्भावें करोनि परम प्रीती ।
हे कथा सांगती बृहस्पती । इंद्रप्रह्लादासीं ॥ ५॥
तींच उच्छिष्टे श्रोतयांसीं । वक्तयानें सांगीतली परियेसीं ।
दुजा भाव मानसीं । न धरावा ॥ ६॥
भावें तुळसीमाहात्म्यास । श्रवण करितां हरती क्लेश ।
संतोष पावे जगदीश । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ७॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्मये षष्ठोऽध्यायः ॥ ६॥
७. सप्तमोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
प्रह्लाद आणि इंद्र । गुरूसीं करिती नमस्कार ।
जोडोनियां दोन्ही कर । विनविते झाले ॥ १॥
सुमालिनीची कथा श्रवण । झाली जी गुरुनाथा ।
पुढें कोर्णे चालविलें त्रता । तें समर्थ सांगणे ॥ २॥
गुरु म्हणती सावधान । स्वस्थचित्तें करा श्रवण ।
जेणें हरेल भवरोग दारुण । तें सांगतों तुम्हांसी ॥ ३॥
उरगाक्षी नाम नगरीं । सुशीळराजा राज्य करी ।
पवित्र आणि परोपकारी । पुण्यवंत ॥ ४॥
सुशीला नायें त्याची स्त्री । परमपवित्रता सुंदरी ।
एक कन्या उभयतां उदरीं । असे देखा ॥ ५॥
तिचें नाम देवसेना । हरिभक्तीसीं तत्पर जाणा ।
तुळसीची सेवा करूनि प्रदक्षिणा । नित्यानित्य करीतसे ॥ ६॥
तिच्या सौंदर्याची स्थिती । इंद्र प्रह्लादाप्रती ।
सांगता झाला बृहस्पती । तें ऐका आतां ॥ ७॥
जितुकें सुलक्षण । तितुकें देहीं असे जाण ।
मुख चंद्राकार पूर्ण । नेत्र कमळा सारिखे ॥ ८॥
तेज सूर्याच्या तेजासारिखें । नखें आरक्त सुरेख ।
अधर कुंकुमासारिखे । दंत दाडिमीबीजोपम ॥ ९॥
माज सिंहाचे माजासारिखा । जानु कर्दळीचा गाभा देखा ।
अंगोळिया समान सारिख्या । हस्तपादादिकांच्या ॥ १०॥
ऐसी सुंदर ते सकुमारी । द्वादश वर्षांची झाली ते अवसरीं ।
पिता वरविच्यार करी । कोणासीं द्यावी ॥ ११॥
इच्या योग्य कैसा मिळेल वर । म्हणोनी पिता चिंतातुर ।
मग करिता झाला स्वयंवर । राजा सुशीळ तो ॥ १२॥
पृथ्वीचे समग्र भूपती । ते आणिले स्वयंवराप्रती ।
ऋषीश्वरांसहित भूपती । येते झाले ॥ १३॥
राजे आणि ऋषेश्वर । स्वयंवरास मिळाले समग्र ।
मग बोलता झाला नृपवर । कन्येप्रती ॥ १४॥
यांजमध्यें तुज मानेल जो वर । त्याचा करीं तूं अंगीकार ।
ऐसी आज्ञा सत्वर । करिता जाहला ॥ १५॥
परिसोन पित्याचें वचन । देवसेना बोले आपण ।
श्वेतदीप देखिलें असेल जेणें । तेणें मज वरावें ॥ १६॥
परिसोन तिचें वचन । तटस्थ झाले अवघेजण ।
मग धरोनियां मौन । अधोमुख राहिले ॥ १७॥
एक गेले आपुलिया देशा । एक धरोनि राहिले आशा ।
कित्येक पहावया तमाशा । विचार करोनी राहिले ॥ १८॥
एकासीं आला शीतज्वर । एक झाले चिंतातुर ।
एक म्हणे इची प्राप्ति होणें दुर्धर । कोणा सही दिसेना ॥ १९॥
ऐसें होतां ते समयीं । तंव जमदग्नि आले पाहीं ।
यांसी देखोनि लवलाहीं । देवसेना बोलत ॥ २०॥
तुम्ही श्वेतद्वीप देखिलें आहे । ऋषी म्हणे होय ।
मग खुणा पुसताहे । तये स्थानींच्या ॥ २१॥
तये स्थानीं वस्ती कोणासी । तेथील रचना आहे कैसी ।
ते सांगा मजपासीं । ऋषिवर्या ॥ २२॥
ऋषि म्हणे आम्हासीं तेथें नसे गमन । आम्ही येऊन पाहिलें तुझें मन ।
तुज कैसें आहे ज्ञान । तेंच आह्नीं पाहिलें ॥ २३॥
आम्ही वसतों बद्रिकावना । आतां जातों तया स्थाना ।
ऐसें बोलोनि त्याच क्षणा । ऋषि गेले ॥ २४॥
तंव देवदत्तनामें ब्राह्मण । तो तेथे आला तेच क्षण ।
देवसेना म्हणे तयालागुन । कोठोन येणें जाहलें ॥ २५॥
तो म्हणे श्वेतद्वीपाहून । येथें झालें आगमन ।
मग हाकस्यवदन करून । पुसती जाहली ॥ २६॥
झुणे कैसी तेथील रचना । तेथें वास्तव्य कोण कोणा ।
हें मज सांगावें ब्राह्मणा । कृपा करोनी ॥ २७॥
ऐकोनि प्रयोक्तीचा आदर । सांगता झाला द्विजवर ।
म्हणे चित्त देऊनियां सादर । परिसें आतां ॥ २८॥
तेथें वास्तव्य श्रीनारायणा । रहावयाचें मंदिर शतयोजन जाणा ।
गोमेदरत्नें पाचु खणोखणा । रत्नकलश शोभती ॥ २९॥
मध्ये अष्टकोणी मंडप थोर । त्यासीं अष्ट द्वारे रत्नखचित परिकर ।
अष्टदिग्पाळ तिष्ठती निरंतर । अष्टदिशा धरोनि उभे ॥ ३०॥
प्रवाळस्तंभाची मांडणी । भूमी काचवंद आंगणीं ।
देवांगना चौघीजणी । नृत्य करिती नित्यानी ॥ ३१॥
गंधर्व करिती गायन । नारद वीणा वाजवी आपण ।
सरस्वती आलाप करी जाण । समयासारिखी ॥ ३२॥
विष्णुभक्त वैष्णव समस्त । जयजयकारें कीर्तन करित ।
गरुड दारी उभा तिष्ठत । सन्मुख असे ॥ ३३॥
शयन करावया नारायणासीं । शेष राहिला तया स्थळासीं ।
तुळसीची सेवा अहर्निशीं । नरनारी करिती तेथें ॥ ३४॥
क्षीरसमुद्राचे पैलतीरा समीप । उचरभागी असे श्वेतदीप ।
ऐसें ऐकतां विकल्प । सांडिला चित्तें ॥ ३५॥
म्हणे सत्य बोलिला बाम्हण । यथार्थ सांगितली खूण ।
ऐसें असतां तेचिक्षण । चित्रमुनी तेथें आला ॥ ३६॥
तो म्हणे तुझा भाव धन्यधन्य । तुळसीची सेवा करिसी नित्याने ।
तुज तुळसी आहे सुप्रसन्न । सदा सर्वकाळ ॥ ३७॥
जेजे तुझे मनोरथ । ते तुळसी पुरवील यथार्थ ।
परी मी सांगतों त्यास चित्त । देऊनियां ऐकावें ॥ ३८॥
दैवत असे मंत्राधीन । शास्त्र बोले प्रमाण ।
तरी तूं मंत्र जपोन । पूजा करणें ॥ ३९॥
ऐकोन देवसेना बोले ऋषिदेवा । मंत्र कोणाजवळीं पुसावा ।
येरु म्हणे प्रश्न केलासी बरवा । त्याचें प्रत्युतर ऐकावें ॥ ४०॥
आम्ही होऊन कृपावंत । तुजला मंत्र सांगतों नेमस्त ।
जप करावा एकचिचें । सप्तकोटी ॥ ४१॥
ऐसें बोलोनि तियेसीं । मंत्र सांगता झाला ऋषी ।
जप करी अहर्निशीं । बत्तीस अक्षरांचा ॥ ४२॥
मंत्र । तुलसि श्रीसखिशुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनः प्रिये ॥
हा मंत्र जप करीं अहर्निशीं । तुज प्रसन्न होईल तुळसी ।
मनोरथ सिद्धी पावसी । अंतीं जासील विष्णुपदा ॥ ४३॥
ऐसें सांगूनि तियेसीं । आपण सर्प झाला त्याक्षणासीं ।
देखोनि भयभीत झाले राजे ऋषी । चळचळां कांपों लागले ॥ ४४॥
जिव्हा लवथवीत विक्राळ । भासे गिळील हा भूमंडळ ।
धार्के पळाले सकळ । राजे आणि ऋषि ॥ ४५॥
राजे ऋषी समस्त । स्वयंवरासी आले होते ।
धाकें पळोनियां त्वरित । समस्त गेले ॥ ४६॥
ऐसें झालियावरी । सर्प अवलोकन करी ।
संमुख वृक्ष देखिला ते अवसरीं । महाप्रचंड ॥ ४७॥
त्याचे ढोलीत आपण । निघोन फुंपारला जाण ।
तंव गरुडाचें आगमन । अकस्मात जाहलें ॥ ४८॥
गरुड विचारी अंतःकरणें । म्हणे हा भक्ष दीघला नारायणें ।
आतां याचक्षणें । भक्षूं यासीं ॥ ४९॥
ऐसें म्हणोनी सरसावला । तंव सर्प सहस्रफणी झाला ।
धुंदकारूनि युद्धासी निघाला । मग लोटला बाहेरी ॥ ५०॥
गरुडासीं तत्काळ दंश केला । मागुती ढोलीत निघाला ।
मग गरुडासीं कोष आला । ते समयीं ॥ ५१॥
क्रोधें धरिला चंचुपुटी । अगदीच सामावला पोटीं ।
उपजा नव्हता सृष्टीं । ऐसें केलें ॥ ५२॥
ऐसा तो सर्प भक्षिला । मग गरुड बोलता झाला ।
येणें त्रास फार दीधला । होता लोकांसीं ॥ ५३॥
हा पापी भ्यां मारिला जाण । आतां तुझी असा क्षेम कल्याण ।
ऐसें बोलोनियां आपण । जाता जाहला ॥ ५४॥
गरुडें केलिया गमन । देवदच निघता झाला आपण ।
मग देवसेनेप्रति वचन । बोलता जाहला ॥ ५५॥
देवदत्त म्हणे देवसेनेसीं । तूं जरी माझे समागमें येसी ।
तरी तुज नेईन श्वेतद्वीपासीं । सत्य जाण ॥ ५६॥
ऐकोनि देवदचाचें वचन । देवसेना निघाली जाण ।
तीस समागमें घेऊन । श्वेतद्वीपासीं गेला ॥ ५७॥
उभयतां श्वेतद्वीपा पावली आपण । देवसेनेनें देखिला नारायण ।
चतुर्भुज पीतांबरधारी सांवळा वर्ण । देवाधिदेव ॥ ५८॥
विस्तीर्ण द्वारीं तुळसी वृंदावन । तेथें बैसला लक्ष्मीनारायण ।
सन्निध रखुमा देवी आपण । विडिया देव ॥ ५९॥
सत्यभामा चवरें ढाळी । नारद वीणा वाजवी जवळी ।
ब्रह्मानंदाचे कल्होळीं । हरिदास गर्जती ॥ ६०॥
रंभा उर्वशी मेनका । चौथी तिलोत्तमा देखा ।
नृत्य करिती अनेका । प्रकार प्रकारींचें ॥ ६१॥
सरस्वती आलाप करी । गरुड सन्मुख उभा द्वारीं ।
ब्रह्मानंदाचे कडोळ गजरीं । भक्त वैष्णव गर्जती ॥ ६२॥
रत्नजडित मुगुट शिरीं । शंखचक्रगदा शोभे करी ।
वैजयंती हृदयावरी । शोभतसे ॥ ६३॥
कर्णी कुंडलांचा झळाळ । समे विराजमान गोपाळ ।
ज्याचें ध्यान करिती सकळ । सुरवर स्वर्गीचे ॥ ६४॥
ऐसा देखिला शारंगधर । देवसेनेने केला नमस्कार ।
सद्गदीत होऊन परमपूर । प्रेमाचा लोटला ॥ ६५॥
देखोनि तन्मय झाली आपण । मग प्राणें केलें प्रयाण ।
धन्य धन्य तुळसीचें महिमान । याचदेहीं नारायण दाखविला ॥ ६६॥
देवदत्ते देखिला हरी । मग साष्टांग नमस्कार करी ।
त्याच क्षणामाझारी । त्याचिया प्राणें प्रयाण केलें ॥ ६७॥
तोहि झाला दिव्यदेही । हे भगवंताची कृपा पाहीं ।
धन्य धन्य पुरुष तेही । जे तत्पदीं ! मिळाले ॥ ६८॥
श्वेतदोपकथा झाली ऐसी । नारद वदे बद्रिकाश्रमासीं ।
जमदग्नीनें देखोनि त्यासी । नमस्कार केला ॥ ६९॥
बहुत तारतम्य केलें त्याचें । पूजार्चन केलें मुनीचें ।
म्हणे धन्य धन्य भाग्य आमुचें । तुमचे चरण देखिले ॥ ७०॥
कोठोनि आलेत स्वामी । तुमचे शब्दाचे आतंभूत आम्ही ।
सांगितलें पाहिजे तुम्ही । कृपा करूनियां ॥ ७१॥
देखोनि जमदग्नीचा आदर । सांगताझाला मुनीश्वर ।
श्वेतद्वीपा होनि सत्वर । आलों आतां ॥ ७२॥
उभयतांचें होतां ऐसें भाषण । तंव देवसेना आली आपण ।
नारदासीं नमस्कार करून । मस्तक चरणीं ठेविला ॥ ७३॥
नारद उठवी जंव तियेसीं । तव देवदत्त आले त्यासमयासीं ।
नमस्कार करूनि नारदासीं । सन्निध बैसला ॥ ७४॥
उभयतांसीं देखोनि नयनीं । बोलता झाला नारदमुनी ।
म्हणे ऐका हो जमदग्नी । उभयतांचे लग्न लावावें ॥ ७५॥
जमदग्नी म्हणे मुनि समर्था । जें मानलें तुमचिया चिता ।
तेंचि करणे आतां । उशीर न करावा ॥ ७६॥
मग देवदत्त आणि देवसेनेचें । मंत्रोक्त लग्न लाविलें दोघांचें ।
मनोरथ पूर्ण केले त्यांचे । नारदमुनीनें ॥ ७७॥
देवसेनेचें मनोगत । भ्रतार व्हावा देवदत्त ।
तिचाही पुरविला हेत । तुळसी देवीनें ॥ ७८॥
आतां भावपूर्वक नारी । एकनिष्ठ सेवा करी जरी ।
तरी मनकामना होईल पुरी । सत्य जाणा ॥ ७९॥
तुळसीनारायणासीं कांहीं । भिन्नता नसे पाहीं ।
भाव धरूनियां हृदयीं । सेवा करावी ॥ ८०॥
जे वस्तु भगवंतासीं प्रिय । तेथें भगवंत सर्वदा राहे ।
त्यावस्तूची सेवा केलिया पाहें । अवश्य मनोरथ पुरती ॥ ८१॥
नित्यानित्य तुळसीचें भजन । करिती पूजन अर्चन ।
नारी अथवा पुरुष जाण । त्याची ऐका फळश्रुती ॥ ८२॥
नारी सद्भावें पूजन करितां । सौभाग्य वर्धन होय तत्वतां ।
पुरुष जरी आचरतां । आयुष्य वर्द्धमान पावे ॥ ८३॥
ऐसें बद्रिकावनीं जालियावरी । नारद आला उरगाक्षी नगरीं ।
सुशील रायासीं ते अवसरीं । भेटता जाहला ॥ ८४॥
नारदासी देखोनि ते क्षणीं । राजा सुशील लागला चरणीं ।
मग पाद प्रक्षाळुनी । चरणतीर्थ घेतलें ॥ ८५॥
म्हणे धन्य धन्य भाग्य माझें । आजि चरण देखिले तुझे ।
निरसले संसारओझें । मुनिराया ॥ ८६॥
मग षोडशोपचारें केली पूजा । नारदासीं पुसताझाला राजा ।
कोठोनियां ब्रह्मात्मजा । येणें जाहलें ॥ ८७॥
बद्रिकावनींहून । प्रस्तुत आलों तेथून ।
तेथील काय वर्तमान । तें सांगें स्वामी ॥ ८८॥
परिसोन रायाचा आदर । बोलता झाला मुनेश्वर ।
म्हणे होऊनि सादर । ऐके राया ॥ ८९॥
देवदत्तासीं समर्पिली तुमची कन्या । उभयतांचें लग्न लाविलें जाणा ।
ऐसें करूनियां बद्रिकावना । आम्ही येथें पावलों ॥ ९०॥
ऐसें सांगत नारदऋषी । तंव देवदत्त आला तया समयासीं ।
समागमें घेवोनि देवसेनेसीं । भयतां आलीं ॥ ९१॥
देवसेना भेटली मातापितयांसीं । समागमें देखोनि उभयतांसीं ।
परम हर्ष झाला रायासीं । मग बोलता जाहला ॥ ९२॥
म्हणे धन्य धन्य नारदमुनी । काय सांगावी तुमची करणी ।
देवसेना येचक्षणीं । आम्हालागोनी भेटविली ॥ ९३॥
जामात आणि कन्या । आम्हासीं तुम्ही दिली जाणा ।
ऐसें म्हणोनिया चरणा । लागला नारदाच्या ॥ ९४॥
नारद म्हणे तुझे कन्येचें बहुत पुण्य । यास्तव तुमचा उद्धार झाला जाण ।
आतां वास्तव्य वैकुंठभुवन । तुझा लागी होईल ॥ ९५॥
आपुलिया वंशाभीतरीं । पुत्र अथवा पुत्री ।
तुळसीची सेवा करी जरी । तरी माता पिता उद्धरती ॥ ९६॥
तुळसीची सेवा संपूर्ण । तुझे कन्येनें केली जाण ।
अगाधपुण्याचे आचरण । घडलें तियेसीं ॥ ९७॥
ऐसें सांगूनियां नारदमुनी । गमन करिताझाला तेक्षणीं ।
प्रवेशला स्वर्गभुवनीं । निमिषामध्यें ॥ ९८॥
नारद गेलियावरी । देवदत्त रायासी विज्ञप्ती करी ।
म्हणे वैकुंठभुवनाभीतरीं । जाऊं चला ॥ ९९॥
राजा राणी देवसेना । चवथा देवदत्त जाणा ।
चवर्षे गेलीं विष्णुभुवना । दवेसेनेचे प्रसादें ॥ १००॥
संताची संगती घडे । तरी महा पातकियासीं पुण्य जोडे ।
देवसेनेचे पुण्यास्तव रोकडें । रायासीं प्राप्त झालें वैकुंठ ॥ १०१॥
ऐसी कथा इंद्रप्रह्लादासीं । देवगुरूनें सांगितली ऐसी ।
तेचि कथा तुम्हांसीं । वक्तयानें सांगितली ॥ १०२॥
येथें नाहीं जोडाजोडी शब्दाची । शुद्ध टीका संस्कृताची ।
कृपा झाली ज्ञानेश्वराची । त्यांहीं मज हें बोलिलें ॥ १०३॥
जरी धराल मानसीं । सद्भावें श्रवण कराल ग्रंथासीं ।
तरी चुकाल भवरोगासीं । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ १०४॥
इति श्रीस्कन्दपुराणे गुरुइन्द्रप्रह्लादसंवादे तुळसीमाहात्म्ये सप्तमोऽध्यायः ॥ ७॥
८. अष्टमोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
प्रह्लाद इंद्र म्हणती । गुरुदेवा ऐक विज्ञप्ती ।
देवसेनेची कथा आम्हांप्रती । सांगीतली तुम्ही ॥ १॥
ऐकोनि पावलों समाधान । परी पुढें कैसें कथानुसंधान ।
आणखी कोण उद्धरला करितां अनुष्ठान । तुळसीदेवीचें ॥ २॥
तें सांगावें स्वामी । श्रवणें पुनीत होऊं आम्ही ।
कृपा करावी तुम्ही । उभयतांवरी ॥ ३॥
ऐकोनि त्यांची प्रभोक्ती । बोलता झाला बृहस्पती ।
म्हणे सावधान असा चितीं । पुढिले अनुसंधानासीं ॥ ४॥
उदयन राजा उज्जनींत । राज्य करी परम पुण्यवंत ।
प्रजा पाळण यथायुक्त । धर्मन्यायें करीतसे ॥ ५॥
हरिभक्तीस तत्पर । विष्णूची सेवा करी निरंतर ।
ब्राह्मणाची शुश्रूषा अग्निहोत्र । चालवी सर्वकाळ ॥ ६॥
संपत्तीसीं नाहीं मिती । दया असे सर्वां भूतीं ।
आनंदमय प्रजा नांदती । दुःख कोणाप्रती असेना ॥ ७॥
त्याची भार्या सुशीळा । धर्मासीं नटळे कोणेवेळा ।
समदृष्टी नें सकळां । सर्वदां पाहे ॥ ८॥
ऐसें असतां कित्येकदिवस । वार्धक्य प्राप्त झालें उभयतांस ।
परी वाढला नाहीं वंश । निपुत्रिक असे देखा ॥ ९॥
राजा निघाला पारधीमिसे । समागमें मंत्रीसमुदाय असे ।
लोकपालासमवेत जातसे । व्यहाळी खेळावयासीं ॥ १०॥
आपण बैसला रथावरी । ध्वजपताका हारोहारी ।
सप्त तुरंगम रथास तरी । जुंपले असती ॥ ११॥
ऐसा खेळ खेळत वनासी । रवि आला भरमध्यान्हासीं ।
तव उद्देग उठिला मानसीं । तो ऐका ॥ १२॥
हाणे जळो जळो हे संपत्ती । मजला नाहीं पुत्रप्राती ।
ऐसा उद्वेग करितां चित्तीं । यमुनातीरासी पावला ॥ १३॥
तंव तेथें अठ्यायशीं सहस्र ऋषेश्वर । अनुष्ठान करिती समग्र ।
मध्यें वसिष्ठमुनेश्वर । बैसला असे ॥ १४॥
दैदीप्य तेजोमय । जयाचे तेजें अंधकार जाय ।
ज्याचे स्मरणें लोकत्रय । पुण्यवंत होती ॥ १५॥
जवळीं बैसली अरुंधती कांता । जे परमपावन पतित्रता ।
दृष्टीसीं देखोनि उभयतां । राजा रथाखाली उतरला ॥ १६॥
साष्टांग घातलें दंडवत । हात जोडोनि उभा तिष्ठत ।
तव वसिष्ठमुनी अकस्मात । वचन काय बोलिले ॥ १७॥
म्हणे तुझी काय इच्छा आहे मानसीं । ते सांग आम्हापासीं ।
ते सिद्धी पावसी निश्चयेंसीं । चिंता न करावी ॥ १८॥
परिसोन ऋषीचें वचन । राजा बोलता झाला आपण ।
मी आहें पुत्रकृपण । अनाथ दीन तुमचा ॥ १९॥
तुमच्या आशीर्वादाची प्राप्ती । मज आहे सर्व संपती ।
परी पुत्रावीण चित्तीं । दुःखित आहें ॥ २०॥
जेणें होय पुत्रप्राप्ती । तें करीं कृपामूर्ती ।
ऐसें बोलोनि ऋषी प्रती । पुन्हा साष्टांग नमस्कार केला ॥ २१॥
जाणोनि रायाचा अभिप्रावो । बोलता झाला ऋषिरावो ।
तुज सांगतों उपावो । तो तूं करीं राया ॥ २२॥
उत्तम करीं तुळसीवृंदावन । दशशत रोपें लावीं संपूर्ण ।
तेथें शत शाळिग्रामाचें पूजन । एकसंवत्सर करावें ॥ २३॥
तुळसीचें पूजन करावयाची युक्ती । जे सांगतों ती धरावी चित्तीं ।
सद्भावें तूं निश्चिती । जप करीं ॥ २४॥
मंत्र । तुळसि श्रीसखिशुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते । नारायणमनःप्रिये ॥
हा मंत्र बत्तीसाक्षरो । एकनिष्ठ जप करीं ।
कामना होय पुरी । सत्य जाणा ॥ २५॥
शाळिग्रामासीं करीं तुळसी अभिषेक । ऐसें करूनी घालीं उदक ।
विष्णुसहस्रनामें देख । पक्कपानें समर्पी ॥ २६॥
ज्याज्या ऋतूचे ठायीं पुष्पें येती । तींच पुष्पें शाळिग्रामाप्रती ।
समर्पी यथा निगुती । सांगीतल्या प्रमाणें ॥ २७॥
धूपदीप दाखवूनि नैवेद्य । समर्पोनि दक्षिणा भावशुद्ध ।
ऐसें करी एकविध । भाव धरोनी ॥ २८॥
स्त्रीसहवर्त्तमान । तुळसीचें करीं पूजन ।
प्रदक्षिणा करोनि नित्यान । एकसंवत्सर ॥ २९॥
नित्यानित्य जाण । ब्राह्मणासीं उत्तम भोजन ।
तुळसीवृंदावनीं तृप्त करीं पूर्ण । दिजवरांसीं ॥ ३०॥
येणें मनोरथ होती पूर्ण । पुत्रफळ पावसी जाण ।
एकपुत्र होईल सुलक्षण । तुजलागीं ॥ ३१॥
पुत्र होईल त्याचें नाव ठेवीं भरत । तो परमपुरुषार्थी होईल विख्यात ।
त्याचेनि तूं सुख पावसी बहुत । चिंता न करीं ॥ ३२॥
तुम्ही दोघें स्त्री पुरुष । तुम्हांस वार्धक्यदशा प्राप्त जालीसे ।
तुळसी सेवेनें होईल ऐसें । तें आइका ॥ ३३॥
तारुण्य येईल उभयतांसीं । वार्धक्य जाई निश्चयेसीं ।
ऐसें बोले ऋषी । रायाप्रती ॥ ३४॥
राजा म्हणे स्वामी प्रमाण । मी करीन आचरण ।
मग वंदोन ऋषीचरण । नमन साष्टांग पैं केलें ॥ ३५॥
तेथेंचि राहिला यमुनेतीरीं । स्त्री पाचारोनि आणिली झडकरी ।
सुमुहूर्त पाहूनि ते अवसरीं । आरंभ केला ॥ ३६॥
उत्तम बांधलें वृंदावन । तुळसीरोपें सहस्र लाविलीं जाण ।
मग शतशाळिग्राम आणून । पूजार्चन करिता झाला ॥ ३७॥
ऋषीनें जैसी आज्ञा केली होती । त्याप्रमाणें करी नृपती ।
राजा राणी सेवा करिती । सांगीतल्या प्रमार्णे ॥ ३८॥
उभयतांचें गेलें वार्धक्य । दोघे तरुण झालीं देख ।
नवल करिती सकळ लोक । मंत्री आणि महाजन ॥ ३९॥
उभयतां झालीं द्वादश वर्षीचीं । चिंता हारली मनाची ।
सेवा करितां तुळसीची । ऐसें जाहलें ॥ ४०॥
राजा पावला तारुण्य । हर्षायमाण झाले प्रधान ।
नगरींचे सर्वही जन । आनंदमय जाहले ॥ ४१॥
तंव गर्भ राहिला राणीस । प्रसूत झाली नववे मासीं ।
पुत्र झाला तियेसीं । महा सुलक्षण ॥ ४२॥
राजा पुत्रावण करी । दान धर्म केला ते अवसरी ।
ढोल दमामे त्रहाटिल्या भेरी । निशाणीं घाव दीवला ॥ ४३॥
धन्य धन्य ऋषिदत्त । निपुत्रिक झाला पुत्रवंत ।
वार्धक्य जाऊन तारुण्य प्राप्त । ऋषिवाक्यें जाहलें ॥ ४४॥
ऐसी संतांची संगती । आशीर्वादें मनोरथ पूर्ण होती ।
म्हणोनी ईश्वराप्रती । संतसमागम मागावा ॥ ४५॥
पुत्राचें नामकरण करी नृपनाथ । नाम ठेविलें राजा भरत ।
जातक वर्णिलें नेमस्त । तथैवेळीं ॥ ४६॥
मग तेथूनि आला नगरासीं । उत्साह झाला सकळजनासी ।
उदंड द्रव्य दिधलें पाचकांसीं । रायें उदारपणें ॥ ४७॥
जरी पावला पुत्रप्रातीसीं । सोडिलें नाहीं हरिभक्तीसीं ।
नित्य पूजी शाळिग्रामासीं । पूर्वस्थितीसी टळेना ॥ ४८॥
ऐसें तुळसीचें महिमान । गुरु सांगे आपण ।
परिसतां इंद्रप्रह्लाद दोघेजण । परम सुख पावले ॥ ४९॥
तें मी सांगितले श्रोतेजनां । तुळसीमाहात्म्य परम सुरस ।
श्रवण करितां हरतील केश । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ५०॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्ये अष्टमोऽध्यायः ॥ ८॥
९. नवमोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
कृतयुगीं नैमिषारण्याप्रती । अठ्यायशीसहस्र ऋषि बैसले असती ।
त्यांप्रती सूत सांगती । तुळसीमाहात्म्य ॥ १॥
स्वर्गी इंद्रप्रह्लादांप्रती । सांगताहे बृहस्पती ।
तेचि कथा श्रोतयांप्रती । वक्ता सांगताहे ॥ २॥
प्रह्लाद म्हणे गुरुनाथा । उदयनरायाची श्रवण केली कथा ।
तुळसीकवच आतां । सांगणें स्वामी ॥ ३॥
तुळसी कवच श्रवण करावयासीं । इच्छा आहे आमुचे मानसीं ।
तरी सांगावें आम्हापासीं । कृपा करोनियां ॥ ४॥
ऐसें प्रह्लाद बोलला । गुरु म्हणे भला भला ।
बरवा प्रश्न तुवां केला । तरी तुळसीकवच सांगतों ॥ ५॥
तारकासुर पापमूर्ती । पीडा करी ब्राह्मणांप्रती ।
उपद्रव देत नानारीती । ब्राह्मणांसीं देखा ॥ ६॥
ब्राह्मण परम झाले कष्टी । कैलासीं गेलें उठाउठी ।
जाऊनि घेते झाले भेटी । श्रीशंकराची ॥ ७॥
स्कंदासीं विनविलें ते अवसरीं । म्हणे स्वामी विनंती अवधारीं ।
आम्हांसीं पीडिलें भारी । तारकासुरानें ॥ ८॥
म्हणोनी आलों कैलासासीं । परंतु आमुचेनि न बोलवे शंकरासीं ।
तुम्ही कृपाळु होऊनि आम्हासीं । श्रीशिवासीं श्रुत करावें ॥ ९॥
तयांची ऐकोनि दीनवाणी । स्कंद कळवळिला मनीं ।
मग शिवाप्रती तेच क्षणीं । सांगता झाला ॥ १०॥
म्हणे ताता अवधारीं । ब्राह्मणासी पीडा झाली भारी ।
तारकासुरें ये अवसरीं । परम त्रास दीघला ॥ ११॥
ब्राह्मण होऊनि भयभीत । तुम्हांसी आले शरणागत ।
सांगावयासीं वृतांत । येथे आले ॥ १२॥
तुम्हासन्मुख न बोलवे त्यांसीं । हावृतांत सांगितला मजपासीं ।
म्यां निवेदन केला तुम्हांसीं । स्वामीनाथा ॥ १३॥
तरी हा मरे तारकासुर ब्राह्मण । सुखी राहती निरंतर ।
तोचि मज विचार । सांगा स्वामी ॥ १४॥
माझेनि तंव न मरे तारकासुर । तो तपोनिधी अपार ।
शस्त्रविद्या जाणे फार । नानाप्रकारच्या संपूर्ण ॥ १५॥
माइकविद्या समस्ता । तो जाणेजी तत्वतां ।
त्यासीं युद्ध करितां । पुरा कोणी न पडेचि ॥ १६॥
सर्व जिणोनि भूमंडळ । भाग्यें करूनि अतिप्रबळ ।
त्रासें पळाले सकळ । देव आणि राजे पृथ्वीचे ॥ १७॥
त्याच्या तपाच्या सामर्थ्य । कोणी पराभवूं न शके त्यातें ।
माझें तों सामर्थ्य न चले तेथें । ऐसियासीं काय युक्ती करावी ॥ १८॥
परिसोन स्कंदाचें वचन । श्रीशिव बोलता झाला आपण ।
तुझा अपराध तेणें । काय केलासे ॥ १९॥
तो माझा परम भक्त । माझी विद्या त्यासीं दत्त ।
त्यावरी माझी कृपा बहुत । त्याचा द्वेष तूं कां करतोसी ॥ २०॥
हें ऐकोनि शिवाचें वचन । स्कंदें धरिले दोनी चरण ।
म्हणे परमपीडा दारुण । गोब्राह्मणासीं केली पैं ॥ २१॥
तूं तंव गोब्राह्मणपाळक । दुष्टांचा संहार करिसी देख ।
भूपाल अलोकिक तूं एक । ऐसें श्रुति बोलती ॥ २२॥
तरी हे विज्ञप्ती करावी मान्य । त्याच्या वधाचा सांगावा यत्न ।
ऐसें बोलोनियां आपण । साष्टांग नमस्कार केला ॥ २३॥
परिसोनि स्कंदाचें वचन । कृपाळू झाला त्रिनयन ।
म्हणे ऐक सावधान । ममात्मजा ॥ २४॥
माझें परमगुद्ध गुज । तें मी सांगतों तुज ।
तेणें सिद्धि पावेल काज । सर्व तुझें ॥ २५॥
पूर्वी त्रिपुर मारावया कारणें । हेंच म्यां केलें अनुष्ठान ।
तोचि गुह्यार्थ तुजकारणें । सांगतसे ॥ २६॥
तुज मंत्र सांगतों आपण । त्या मंत्रे करीं अनुष्ठान ।
सर्व मनोरथ होईल पूर्ण । सत्य जाण पुत्रोत्तमा ॥ २७॥
ऐसें बोलतां स्कंदासीं । मंत्र उपदेशिला ।
श्रीशिवें स्वमुखेसीं । हा मंत्र सांगितला ॥ २८॥
मंत्र । तुळसि श्रीसखिशुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥
ऐसें बत्तीसाक्षरी मंत्रासीं । शिवें सांगितलें स्कंदासीं ।
याची फळश्रुती आहे ऐसी । ते ऐका ॥ २९॥
कोणकोणा कार्यांसीं । उपावें या मंत्रासीं ।
तेंहि सांगतों तुजपासीं । सावधान ऐकावें ॥ ३०॥
परम प्रताप होईल संकट । तेव्हां हा जप करावा एकनिष्ठ ।
तेणें हरेल अवघे दुर्घट । हा जप केलियानें ॥ ३१॥
विषमकाळ जैं येई । तेव्हां हा जप करावा पाहीं ।
विषमकाळ तो शुभ होई । ऐसें पुण्य लाहें जपें करूनी ॥ ३२॥
दुर्गम प्राप्त होय जेव्हां । हा जप करावा तेव्हां ।
येणें हरेल अवघा । दुर्गमप्रकार ॥ ३३॥
भय प्राप्त जालियावरी । हा जप करावा निर्द्धारीं ।
भय निवारेल तेचि अवसरीं । हें सामर्थ्य मंत्राचें ॥ ३४॥
वाद प्राप्त होय जेव्हां । या मंत्र जप करावा तेव्हां ।
वाद तुटेल जाणावा । निश्वयेसीं ॥ ३५॥
महाहव्य व्हावें मानसीं । तरी जप करावा अहर्निशीं ।
हव्य होईल निश्वयेसीं । जप करितां ॥ ३६॥
मोक्ष पाहिजे जयासी । तरी पठण करावे या मंत्रासीं ।
सत्वर मोक्ष होईल तयासी । संशय नाहीं ॥ ३७॥
लक्ष्मी प्राप्त व्हावया लागुनी । जो इच्छित असेल मनीं ।
तेणें जप करावा नित्यानी । लक्ष्मी प्राप्त होईल ॥ ३८॥
जयासीं उत्तम प्रिया पाहिजे । तेणें हा जप कीजे ।
उत्तम प्रिया पाविजे । हें सामर्थ्य मंत्राचें ॥ ३९॥
यशस्वी सदा व्हावें । ऐसी इच्छा असेल भावें ।
तेणें अहर्निशीं जपावें । सिद्धि होय ॥ ४०॥
शत्रु पराभवोनि विजय । सर्वदा व्हावा जय ।
ज्याची ऐसी वासना होय । तेणें हा जप करावा ॥ ४१॥
व्याधि नसावी आपणासीं । ऐसी मनकामना ज्यासीं ।
तेणें या मंत्रासीं । जपावें जाणा ॥ ४२॥
शिरोरोग असेल ज्यासीं । त्यानें जप करावा निश्वयेसीं ।
रोग हरेल क्षणमात्रेंसीं । मुक्त होईल जाणपां ॥ ४३॥
वशीकरण जरी करणें । तरी हा मंत्र जपावा नित्यानें ।
सिद्धी पावेल जाण । मनकामना ॥ ४४॥
विद्या पाहिजे मजलागुनी । ऐसें असेल जयाचे मनीं ।
तेणें जप करावा सद्भाव धरूनी । मूर्खासीं विद्या प्राप्त होय ॥ ४५॥
दरिद्र नसावें जन्मवरी । ऐसें असेल जयाचे अंतरीं ।
तेणें हा जप करावा निर्धारीं । दरिद्र विच्छिन्न होय ॥ ४६॥
माझें पाप जावें सकळ । म्यां पुनीत व्हावें तात्काळ ।
ऐसा ज्याचा भाव असेल सबळ । त्यासीं जपाचेनि सिद्धि होय ॥ ४७॥
याच देहीं म्यां जावें स्वर्गासीं । ऐसी कल्पना असेल मानसीं ।
तेणें जपावें या मंत्रासीं । जाय स्वर्गासी संशय नाहीं ॥ ४८॥
मज पशूंची व्हावी प्राप्ती । ऐसें असेल ज्याचे चित्तीं ।
तेणें जप करावा एकाग्रचित्तीं । पशु अपार प्राप्त होती ॥ ४९॥
पुत्रप्राप्तीकारणें । जप करावा एकाग्रमनें ।
पुत्रप्राप्ती होय जाण । जपकर्त्यांसीं ॥ ५०॥
राज्यभ्रष्ट झाला नर । तेणें जप करावा धरूनी निर्धार ।
राज्य पावेल सत्वर । पुनरावृत्ति नाहीं अंतीं ॥ ५१॥
अशक्त असेल शरीरीं । तो जरी निष्ठा धरूनि जप करी ।
बलाढ्य होईल ते अवसरीं । शक्तिवंत ॥ ५२॥
विष्णुभक्तीचे ठायीं भाव असावा । हेंच देई मज देवाधिदेवा ।
ऐसी कल्पना धरूनी जपावा । हाचि मंत्र ॥ ५३॥
ज्याचा भाव बैसे भक्तीचे ठायीं । श्रीहरी कृपा करील पाहीं ।
तो विष्णूस प्रिय होईल याच देहीं । या मंत्राच्या जपानें ॥ ५४॥
ज्यांची जैसी वासना । त्यांच्या पुरतील मनकामना ।
सद्भाव धरोनियां जाणा । प्रचीत याची पाहावी ॥ ५५॥
तुळसीवन असेल अपार । तेथें उभा राहोनि जप करी नर ।
त्यासी वैकुंठ प्राप्त होईल सत्वर । कर्त्या पुरुषासीं ॥ ५६॥
जे स्त्रीचीं बाळकें मरती । तिनें जप करावा एक चित्तीं ।
तिचीं बाळकें वांचती । निश्चयेंसीं ॥ ५७॥
जे वंध्या असेल नारी । ब्राह्मणें दर्भ घेऊनि करीं ।
या मंत्रे तिच्या मस्तकावरी । उदक टाकावें ॥ ५८॥
तेणें वंध्या होय पुत्रवंती । आंति न धरावी चित्तीं ।
ऐसें स्कंदाप्रती । शिवें सांगितलें ॥ ५९॥
पालाशमूळावरी । बैसोनियां जप करी ।
तरी कोड जाय निर्धारी । नर आणि नारीचें ॥ ६०॥
एकसंवत्सर आदितवारीं । पिंपळासन्निध जप करी ।
तरी पूर्ण विद्यावंत होय सत्वरीं । कर्ता देखा ॥ ६१॥
कन्येची इच्छा असेल मानसीं । तेणें हा जप करावा निश्चयेसीं ।
सुलक्षण कन्या होईल तिसीं । येणें मंत्रे ॥ ६२॥
स्रोसीं भ्रतार असेल वश्य करणें । तरी या मंत्राचा जप करावा तिणें ।
तरीं निश्चयें करून । भ्रतार वश्य होईल ॥ ६३॥
जारण मारण आणि स्तंभन । उच्चाटण आणि संहारण ।
याच मंत्रे होतसे जाण । जप करणें म्हणोनी हा ॥ ६४॥
रायाची कृपा व्हावी आपणावरी । म्हणोनी या मंत्राचा जप करी ।
तरी रायाची कृपा निरंतरी । कर्त्यावरी होतसे ॥ ६५॥
ऐसें श्रीशिवें स्वमुखेंसीं । सांगितलें कार्ति कस्वामीसीं ।
यामंत्रे तूं जयासीं । पावसी जाणा ॥ ६६॥
श्रीशिवें स्कंदासीं । निज गुज सांगितलें परियेसीं ।
हें करावें निश्चयेसीं । तारकाचे वधालागीं ॥ ६७॥
आतां तूं करीं अनुष्ठान । यामंत्र जप करीं पूर्ण ।
ऐसें शिवे आपण । सांगीतलें ॥ ६८॥
तंव स्कंदानें दुरात्म्यास । अनुष्ठान करूनि रात्रंदिवस ।
संहारिलें तारकासुरास । गोब्राह्मणासीं रक्षिलें ॥ ६९॥
सूत सांगती ऋषीश्वराप्रती । इंद्रप्रह्लादांप्रती सांगे बृहस्पती ।
गुरु म्हणे कवचसमाप्ती । सांगीतली तुज ॥ ७०॥
पुराणींचा इतिहास । वक्त्यानें सांगितला श्रोतियांस ।
तुळसीमाहात्म्य अगाध विशेष । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ७१॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्ये नवमोऽध्यायः ॥ ९॥
१०. दशमोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
महाराष्ट्र म्हणोनी न करावा अव्हेर । अवघ्यांस संस्कृताचा आधार ।
बीजावीण विस्तार । मीकाय बोलूं जाणें ॥ १॥
तुझी तो जाणते श्रोतेजन । मो तव बोलू न जाणें तुमचा दीन ।
मजवरी कृपा करोनि आपण । श्रवण केलें पाहिजे ॥ २॥
इंद्रप्रह्लाद पृच्छा करिती । गुरु सांगे तयांप्रती ।
तेंचि बोलिलों या ग्रंथीं । तुळसीमाहात्म्य ॥ ३॥
पद्मपुराणींची कथा । सावधान परिसावी श्रोतां ।
दुश्चित न व्हावें सर्वथा । ऐसी विज्ञप्ती तुम्हासीं ॥ ४॥
सद्भावें कराल पठण । तरी अगाध घडेल पुण्य ।
महादोष होती दहन । तुळसीमाहात्म्य ऐकिल्या ॥ ५॥
नैमिषारण्यीं ऋषीश्वर । बैसले असती समग्र ।
तयांसीं सूत सांगे सविस्तर । तुळसीमाहात्म्य हैं ॥ ६॥
गुरु सांगे इंद्रप्रह्लादांसीं । तुळसीकवचाची कथा झाली ऐसी ।
पुढिले अनुसंधानासीं । चित्त देणें ॥ ७॥
कृष्णा नामें ब्राह्मण । ब्राह्मणयोनीत जन्मला आपण ।
परी महामूर्ख अज्ञान । लेश नाहीं ज्ञानाचा ॥ ८॥
नाहीं वेदाध्ययन । नव्हे शास्त्रपठण ।
निरर्थक जन्म गेला म्हणून । जनतयासीं हांसती ॥ ९॥
ब्राह्मण कुळीं जरीं जन्मला । ज्ञान नसतां वायां गेला ।
जैसा अजागळींचा गलोला । निरर्थक ॥ १०॥
ऐसा तो ब्राह्मण । महामूर्ख ज्ञानहीन ।
कित्येक काळ व्यर्थ गेला जाण । आयुष्याची हानि झाली ॥ ११॥
ऐसें असतां एकेदिवसीं । काष्ठे आणावया गेला वनासीं ।
भ्रमण करितां तयासीं । क्षुधेनें फार पीडिलें ॥ १२॥
तंव दृष्टीं देखिलें तुळसीवन । सहस्रावधी रोपें जाण ।
मग तयां मध्ये आपण । प्रवेशता जाहला ॥ १३॥
आतां भक्षीन ही तुळसीपणें । तेणें माझी क्षुधा हरेल जाण ।
ऐसें बोलूनियां आपण । पर्णे तोडिता जाहला ॥ १४॥
जंव पर्णांस घाली हात । तंव कृष्णसर्प निघाला अकस्मात ।
तेणें दंश केला त्वरित । तयालागीं ॥ १५॥
विषं प्राण झाला व्याकुळ । भूमीवरी पडिला तात्काळ ।
मूर्च्छना आली सबळ । तयालागीं ॥ १६॥
तंव त्यामार्गी अकस्मात । जात होते यमदूत ।
ते एकमेकासीं बोलत । तेसमयीं ॥ १७॥
हा परम पातकी असे मेला । यासीं घेऊनि जाऊं चला ।
सांडूनियां आपुले कुळा । जाऊं नये ॥ १८॥
ऐसें बोलून आले तयाजवळी । तो कृष्णसर्प धुःकारला तये वेळीं ।
बोलता जाहला मुखकमळीं । तयांप्रती ॥ १९॥
अरे हा तुळसी वनांत पडिला । तुळसीचा वायू यासीं स्पर्शला ।
हा परमपुण्यवंत झाला । तुम्हासीं संबंध नाहीं ॥ २०॥
म्यां यासीं केला देश । तैंच हा जाला पुण्य पुरुष ।
ऐसें बोलूनियां अदृश्य । सर्प जाहला ॥ २१॥
तंव तेच वेळीं अकस्मात । विष्णुचक्र आलें त्वरित ।
तें ब्राह्मणाचे हातांत । सांपडलें देखा ॥ २२॥
चक्र हातीं सांपडलें पाहीं । यमदूतांचें नचले कांहीं ।
मग एकमेकासीं तेसमयीं । बोलते जाहले ॥ २३॥
आतां याचा पाहों प्रांत । हा मरेल कीं पुन्हा होईल जिवंत ।
याचा पुरऊं अंत । मग आम्ही जाऊं ॥ २४॥
तुळसीच्या कृपेकरून । तात्काळ उठिला ब्राह्मण ।
हातीं चक्र असे दारुण । स्पर्श न करवे दूतांसीं ॥ २५॥
ब्राह्मण उठतां लवलाही । परमज्ञाता जाला ते समयीं ।
तुळसी महिमा न वर्णवे पाही । मूर्ख तो ज्ञाता जाहला ॥ २६॥
तुळसीवनाचा वायु स्पर्शतां । पातक संहारूनि झाला ज्ञाता ।
तुळसीप्रसादें तत्वतां । यमदूतांची वार्चा चालेना ॥ २७॥
म्हणोनी धन्य तो संसारी । जो तुळसीची सेवा करी ।
त्यापुरुषासीं श्रीहरी । कोणे काळीं नुपेक्षी ॥ २८॥
जो प्रातःकाळी उठोन । आधीं करी तुळसीचें दर्शनं ।
तरी फलश्रुती ऐसी जाण । सांगतों तुम्हासीं ॥ २९॥
त्यासीं जालें नर्मदेचं स्नान । गंगा गौतमीचें जालें दर्शन ।
आणि अगाध घडे पुण्य । प्रातःकाळच्या दर्शनें ॥ ३०॥
सायं प्रातर्मध्यान्ह । पूजा करी तो धन्यधन्य ।
त्यासी लक्ष्मीचें नाहीं न्यून । ऐसें पुराणीं बोलिलें ॥ ३१॥
पूर्वीचिया अनुसंधानीं । चित्त द्यावे श्रोतेजनी ।
स्वस्थ चित्त करूनी । करावें श्रवण ॥ ३२॥
ब्राह्मणासीं झाली ज्ञानप्राप्ती । उठोनि चालिला गृहाप्रती ।
यमदूत परस्परें ह्यणती । समागमें जाऊं याच्या ॥ ३३॥
चक्र असे ब्राह्मणाचे हातांत । म्हणोनी यमदूत अंतरें चालत ।
त्रिवर्ग पावले त्वरित । गृहा ब्राह्मणाच्या ॥ ३४॥
दारी बैसला ब्राह्मण । मग त्यासीं यमदूत करिती प्रश्न ।
आम्ही यमदूत तुज न्यावयालागुन । आलों होतीं ॥ ३५॥
परी भगवंत कृपाळु जाला । चक्र पाठविलें तुजला ।
जामुचा यत्न खुंटला । नचले कांहीं ॥ ३६॥
तरी तुज पुसतों एक । तें सांगावें प्रीतिपूर्वक ।
पूर्वील पुण्य कितीक । आहे तुझें ॥ ३७॥
त्वां पूर्वी काय केलें आचरण । तुज प्रसन्न झाला नारायण ।
हें कृपा करून । आम्हासीं सांग ॥ ३८॥
ऐकोनि प्रश्नाचा आदर । बोलता झाला द्विजवर ।
हा सकळ समाचार । तुम्हांस श्रुत आहे ॥ ३९॥
तुझांसी असे पूर्ण ज्ञान । भूत भविष्य वर्त्तमान ।
मी काय सांगों अज्ञान । तुम्ही सज्ञान जाणतसां ॥ ४०॥
ऐकोनि त्याचें प्रतिवचन । यमदूत जाले हर्षायमाण ।
मग मागतेजाले वचन । तयाप्रती ॥ ४१॥
तुझ्या पुण्याचा लक्षांश । आम्हास देणे यासमयास ।
ऐसें बोलोनि ब्राह्मणास । नमस्कार केला ॥ ४२॥
ऐसें बोलतां तयांस । कृपा उपजली ब्राह्मणास ।
लक्षांशपुण्य दिधलें त्यांस । तेसमयीं ॥ ४३॥
मग आज्ञा मागोनी ब्राह्मणासीं । यमदूत गेले आपुले स्थळासीं ।
ब्राह्मण करिताजाला सेवेसीं । पुनर्रपि तुळसीच्या ॥ ४४॥
उत्तम केलें वृंदावन । सहस्ररोप लाविलें जाण ।
कर्दळी स्तंभ लाऊन । मंडप केला ॥ ४५॥
भोंवत्या लाविल्या पुष्पयाती । ज्या मनोहर सुगंध असती ।
रम्यस्थल करोनि मध्यें मूर्ती । शाळिग्रामाच्या स्थापिल्या ॥ ४६॥
तुळसीशाळिग्रामाचें पूजन । विष्णुसहस्रनामें करून ।
तुळसीपत्रे वाहून । नमस्कार करी ॥ ४७॥
येणें करून परमजाला ज्ञाता । लक्ष्मीवंत जाला तत्वता ।
हरली संसारचिंता । भगवत्कृपा जाहली ॥ ४८॥
कृष्णंभदृ ब्राम्हण । जाला वेदशास्त्री प्रवीण ।
अठरापुराणें मुखोद्गत जाण । जालीं तुळसी प्रसादें ॥ ४९॥
ब्राह्मणासीं जाली हे फलश्रुती । ऋषीश्वरांप्रती सूत सांगती ।
नैमिषारण्यीं बैसले असती । एकांतस्थानीं ॥ ५०॥
हेचि कथा स्वर्गी बृहस्पती । सांगतसे इंद्रप्रह्लादांप्रती ।
ऐकोनियां चित्तीं । इंद्रप्रह्लाद संतोषले ॥ ५१॥
त्याच संस्कृताची टीका । श्रोतयांसी सांगीतली देखा ।
ऐकतांची परमसुखा । पात्र जाहले ॥ ५२॥
तुळसी माहात्म्य परमदुर्लभ असे । श्रवण करितां दिवसों दिवसें ।
लक्ष्मीवृद्धी होतसे । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ५३॥
इति श्रीस्कन्दपुराणे ऋषिसुतसंवादे तुळसीमाहात्म्ये दशमोऽध्यायः ॥ १०॥
११. एकादशोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
ब्राह्मण जाला पुण्यपावन । करिताजाला तुळसी अनुष्ठान ।
तंव तेथें नारदाचें आगमन । अकस्मात जाहलें ॥ १॥
पुनीत देखोनियां त्यासीं । आश्रयवाटलें नारदासीं ।
म्हणे हा होता महादोषी । तुळसी सेवेनें पावन जाला ॥ २॥
तरीं धन्यधन्य तुळसीचें महिमान । ऐसें म्हणोनी केलें गमन ।
मग विष्णुलोकास जाऊन । विष्णूस भेटता जाहला ॥ ३॥
ब्राह्मणाचा सांगीतला वृतांत । महामूर्ख जाला पंडित ।
ऐसें तुळसीचें दत्त । तयासी जाहलें ॥ ४॥
परिसोनि बोले नारायण । तुळसीचें ऐसेंचि महिमान ।
मज आणि तुळसींत भिन्नपण । नाहीं जाण सर्वथा ॥ ५॥
तुळसीवेगळा मी नाहीं । मज वेगळी तुळस नराहे कदाही ।
द्वेष तुळसीचा करिती पाहीं । त्यांसीं निर्दाळीं मी स्वयें ॥ ६॥
ऐसें बोलिला भगवान । नारद विनवी आपण ।
मज सांगावें तुळसीचें अनुष्ठान । आज्ञेप्रमाणें करीन मी ॥ ७॥
तुळसीचे ठायीं नारदाची प्रीती । जडली देखोनि सांगे श्रीपती ।
पूजन सांगतों येणें रीती । तें तूं करीं आतां ॥ ८॥
उभयपक्षीं शुभवारीं । शुभौदय शुभ नक्षत्रीं ।
क्लेश निवारणार्थ ऐसें करी । तें सांगतों तुज ॥ ९॥
गृहाचे द्वारी अथवा एकांतवनीं । उभयभूमिका पाहोनी ।
उत्तम वृंदावन करूनी । सहस्रावधी रोपे लावीं ॥ १०॥
आपुली स्नान संध्या करी । नित्य नेम सारी ।
गायत्रीचा जप करी । मग आरंभ करी पूजना ॥ ११॥
सायं प्रातर्मध्याह्न । तुळसीचें ध्यान करून ।
पूजा करी एकाग्र मन । निश्चयेंसीं ॥ १२॥
आधीं करी तुळसीची प्रार्थना । करद्वय जोडोनियां जाणा ।
उभा राहोनि वृंदावना । प्रार्थना ऐसी करावी ॥ १३॥
प्रार्थना ।
नमो नमो जगद्धात्रि जगद्देवि नमोस्तुते ।
नमो नमो जगद्भूते नमस्ते परमेश्वरि ॥ १॥
ऐसी प्रार्थना करी । मग तुळसीचें ध्यान धरी ।
ध्यान सांगतों मनांतरीं । बरवें धरीं कां ॥ १४॥
ध्यानम् ।
ध्यायेच्च तुलसीं देवीं श्यामां कमललोचनाम् ।
प्रसन्नपद्मकल्हारवरदां सुचतुर्भुजाम् ॥ २॥
किरीटहारकेयूरकुंडलादिविभूषिताम् ।
धवलां सुखसंयुक्तां पद्मासनविराजिताम् ॥ ३॥
ऐसें करूनियां ध्यान । मग करी आवाहन ।
आवाहन तुज लागोन । सांगतों ऐक ॥ १५॥
आवाहनम् ।
देवि त्रैलोक्यजननि सर्वलोकैकपावनि ।
आगच्छ भगवद्देविप्रसीद तुलसि प्रिये ॥ ४॥
या मंत्र करून आवाहन । आतां तुज सांगतों आसन ।
एकाग्रचितें करून । सावधान ऐक ॥ १६॥
आसनम् ।
सर्वदेवमये देवि सवेदाविष्णुवल्लभे ।
देवि स्वर्णमयं दिव्यं गृहाणासनमव्ययम् ॥ ५॥
ऐसें जालिया आसन । मग करी पादार्चन ।
पादार्चन करावयाचा मंत्र जाण । सांगतों तुज ॥ १७॥
पाद्यम् ।
सर्वदेवमयाकारे सर्वदेवि मनोस्तुते ।
दत्तं पाद्यं गृहाण त्वं तुलसि त्वं प्रसीद मे ॥ ६॥
यामंत्र जालिया पादार्चन । मग अर्ध्य समर्पावें जाण ।
आतां अर्ध्याचा मंत्र आपण । सांगतों तुज ॥ १८॥
अर्घ्यम् ।
सर्वतीर्थमये देवि सर्वागमनिषेविते ।
इदमयै गृहाण त्वं देवि दैत्यांतकप्रिये ॥ ७॥
ऐसें अर्घ्यं जालियावरी । आचमन सांगतों तें अवधारीं ।
नारदाप्रती स्वयें श्रीहरी । सांगताहे ॥ १९॥
आचमनम् ।
सर्वलोकस्य रक्षार्थं सदा सन्निधिकारिणी ।
गृहाणाचमनं देवि प्रीत्यर्थं परमेश्वरि ॥ ८॥
ऐसें आचमन जालियावरी । स्नानाचा मंत्र अवधावरीं ।
सांगतों तो मनांतरी । दृढ घरीं ॥ २०॥
स्नानम् ।
गंगादिभ्यो नदीम्पश्च समानीतमिदं जलम् ।
स्नानार्थं तुलसि स्वच्छं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् ॥ ९॥
मंदाकिनी गौतमी च यमुना च सरस्वती ।
गोमती नर्मदा तापी ताभ्यः स्नानार्थमाहृतम् ॥ १०॥
नदीनदसमुद्भूतं पवित्रं निर्मलं जलम् ।
स्नानार्थं तुलसी मातः प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् ॥ ११॥
स्रानाचा मंत्र सांगीतला । वस्त्रे वाहावया सांगतों तुला ।
या मंत्रे वस्त्रे समर्प वहिला । तुळसी देवीसीं ॥ २१॥
वस्त्रम् ।
क्षीरोदमथनोत चंद्रलक्ष्मीसहोदरम् ।
गृह्यतां परिधानार्थमिदं क्षौमांबरं शुभम् ॥ १२॥
ऐसें वाहिल्यावरी वस्त्र । आतां गंधाचा ऐक मंत्र ।
सांगतों तुज सविस्तर । तो अवधारीं ॥ २२॥
गंध ।
श्रीखंड कुंकुमं दिव्यं कर्पूरागरुसंयुतम् ।
कल्पितं च महादेवि प्रीत्यर्थे प्रतिगृह्यताम् ॥ १३॥
ऐसें गंध समर्पिल्यावरी । अक्षतेचा मंत्र अवधारी ।
सांगतों तुज निर्धारीं । तो ऐकपां ॥ २३॥
अक्षताः ।
अक्षताश्च सुरश्रेष्ठाः कुंकुमाक्ताः सुशोभिताः ।
मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरी ॥ १४॥
अक्षतेचा मंत्र सांगीतला । सौभाग्य द्रव्य अर्पील्यावरी ।
त्याचा मंत्र तुजला । सांगतों ऐक ॥ २४॥
सोभाग्यद्रव्यम् ।
हरिद्रा कुंकुमं चैव कज्जलं सिंदुरं तथा ।
सौभाग्यद्रव्यं प्रीत्यर्थं गृहाण परमेश्वरि ॥ १५॥
कंठसूत्रं ताडपत्रं तथैव पादभूषणम् ।
नासामोक्तं चांजनं च अर्पितं ते सुरेश्वरि ॥ १६॥
सौभाग्यद्रव्य अर्पिल्यावरी । पुष्पें समर्पा ते अवसरीं ।
त्याचा मंत्र निर्धारीं । सांगतों तुज ॥ २५॥
पुष्पम् ।
नीलोतल सुकल्हारमालत्यादीनि शोभने ।
गधवंति च पद्मानि पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ॥ १७॥
आतां धूपाचा मंत्र तुजप्रती । सांगतों तो धरून चित्तीं ।
धूप समर्पी ऐसिया रीती । तुळसी देवीसीं ॥ २६॥
धूपम् ।
देवि गृहाण देवेशि मनोहारि सुगुग्गुलम् ।
आज्यमिश्रं तु तुलसि प्रीत्याऽभीष्टप्रदायिनि ॥ १८॥
ऐसा धूप समर्पिल्यावरी । दीप दाखवीं ते अवसरीं ।
तो मंत्र अवधारीं । एकचित्तें ॥ २७॥
दीपम् ।
अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानदीपप्रदायिनि ।
तथैव तुलसि प्रीत्या दीपोयं प्रतिगृह्यताम् ॥ १९॥
दीप समर्पिल्यावरी । नैवेद्याचा मंत्र अवचारीं ।
सांगतों या अवसरी । तुजकारणें ॥ २८॥
नैवेद्यम् ।
नमस्ते जगतां नाथे प्राणिनां प्रियदर्शने ।
यथाशक्ति मया दत्तं नैवेद्यं प्रतिभृत्यताम् ॥ २०॥
ऐसा नैवेद्य समर्पण करीं । मग उदक सोडावें भूमी वरी ।
तयाचा मंत्र याप्रकारीं । म्हणावा ॥ २९॥
उदकम् ।
नमो भगवति श्रेष्ठे नारायणि जगन्मये ।
शीतल विमलं नीरं तुलसि प्रतिगृह्यताम् ॥ २१॥
यापरी उदक समर्पोनि । तांबूल समर्प तुळसीलागुनी ।
त्याचा मंत्र श्रवणीं । ऐक आतां ॥ ३०॥
तांबूलम् ।
अमृता मृतसंभूतं तुलस्यमृतरूपिणि ।
कर्पूरादिसमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम् ॥ २२॥
या नंतरें समर्पी दक्षिणा । याचा मंत्र सांगतों जाणा ।
सावधान करोनि अंतःकरणा । ऐक आतां ॥ ३१॥
दक्षिणा ।
दक्षिणां दक्षिणकरे भक्तानां प्रियकारिणि ।
ददामिते सदा भक्तया तुलसि प्रतिगृह्यताम् ॥ २३॥
ऐसी दक्षिणा समर्पिल्यावरी । उत्तरनीराजन करीं ।
त्याचा मंत्र अवधारीं । सांगतों तुज ॥ ३२॥
नीराजनम् ।
करोद्दर्ति सदीपं च तिमिरस्य निवारणम् ।
सौवर्णं च मया दत्तमार्तिक्यं प्रतिगृह्यताम् ॥ २४॥
ऐसें नीराजन समर्पी । मग पुष्पांजली अर्पी ।
तो मंत्र साक्षेपीं । ऐक आतां ॥ ३३॥
मन्त्रपुष्पम् ।
नानाविधानि पुष्पाणि सुगंधीनि सुरेश्वरि ।
भतस्त्वां पूजयिष्यामि गृत्यतां सुमनोंजलिः ॥ २५॥
मंत्रपुष्पांजली जाहल्यावरी । मग प्रदक्षिणा करीं ।
त्याचा मंत्र अवधारीं । सांगतों तुज ॥ ३४॥
प्रदक्षिणा ।
नमो नमो जगद्धात्रि जगद्देवि नमो नमः ।
नमो नमो जगद्भूतिर्नमस्ते परमेश्वरि ॥ २६॥
प्रदक्षिणा जाहलियावरी । मग साष्टांग नमस्कारकरी ।
नम स्काराचा मंत्र ये अवसरीं । सागतों तुज ॥ ३५॥
नमस्कारः ।
प्रसीद मम देवि त्वं कृपया परया सदा ।
अभीष्टफलसिद्धिं च कुरुमे माधवप्रिये ॥ २७॥
ऐसा नमस्कार केलियावरी । प्रार्थना करी जोडल्या करीं ।
मग प्रसन्न होईल सत्वरी । तुळसी तुजकारणें ॥ ३६॥
प्रार्थनेचा मंत्र श्रीपती । सांगता झाला नारदात्रती ।
म्हणे एकाग्रचित्तीं । ऐक आतां ॥ ३७॥
प्रार्थना ।
भद्रे त्वामर्चयेन्नित्यं प्रातरेव शुचिर्नरः ।
मध्यान्हे त्वां च सायान्हे मुक्तिमुक्तिप्रदां सदा ॥ २८॥
सर्वोपचारैरथवा चातुर्मास्ये विशेषतः ।
पूजयेत्तुलसीं देवीं मद्रूपफल सिद्धये ॥ २९॥
ऐसें नारदमुनीसीं । स्वमुखें सांगीतले हृषीकेशीं ।
तेचि कथा ऋषीश्वरांसीं । सूत सांगताहे ॥ ३८॥
स्वर्गी इंद्रप्रह्लादासीं । गुरु सांगे आदरेसीं ।
परिसतां उभयतां मानसीं । परमसंतोष जाहला ॥ ३९॥
त्याचपरी श्रोतयांस । विज्ञप्ती करूनि सांगतसे सुरस ।
उदास न धरावें मानस । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ४०॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुलसीमाहात्म्ये एकादशोऽध्यायः ॥ ११॥
तुलसी पूजा
प्रार्थना ।
नमो नमो जगद्धात्रि जगद्देवि नमोस्तुते ।
नमो नमो जगद्भूते नमस्ते परमेश्वरि ॥ १॥
ध्यानम् ।
ध्यायेच्च तुलसीं देवीं श्यामां कमललोचनाम् ।
प्रसन्नपद्मकल्हारवरदां सुचतुर्भुजाम् ॥ २॥
किरीटहारकेयूरकुंडलादिविभूषिताम् ।
धवलां सुखसंयुक्तां पद्मासनविराजिताम् ॥ ३॥
आवाहनम् ।
देवि त्रैलोक्यजननि सर्वलोकैकपावनि ।
आगच्छ भगवद्देविप्रसीद तुलसि प्रिये ॥ ४॥
आसनम् ।
सर्वदेवमये देवि सवेदाविष्णुवल्लभे ।
देवि स्वर्णमयं दिव्यं गृहाणासनमव्ययम् ॥ ५॥
पाद्यम् ।
सर्वदेवमयाकारे सर्वदेवि मनोस्तुते ।
दत्तं पाद्यं गृहाण त्वं तुलसि त्वं प्रसीद मे ॥ ६॥
अर्घ्यम् ।
सर्वतीर्थमये देवि सर्वागमनिषेविते ।
इदमयै गृहाण त्वं देवि दैत्यांतकप्रिये ॥ ७॥
आचमनम् ।
सर्वलोकस्य रक्षार्थं सदा सन्निधिकारिणी ।
गृहाणाचमनं देवि प्रीत्यर्थं परमेश्वरि ॥ ८॥
स्नानम् ।
गंगादिभ्यो नदीम्पश्च समानीतमिदं जलम् ।
स्नानार्थं तुलसि स्वच्छं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् ॥ ९॥
मंदाकिनी गौतमी च यमुना च सरस्वती ।
गोमती नर्मदा तापी ताभ्यः स्नानार्थमाहृतम् ॥ १०॥
नदीनदसमुद्भूतं पवित्रं निर्मलं जलम् ।
स्नानार्थं तुलसी मातः प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् ॥ ११॥
वस्त्रम् ।
क्षीरोदमथनोत चंद्रलक्ष्मीसहोदरम् ।
गृह्यतां परिधानार्थमिदं क्षौमांबरं शुभम् ॥ १२॥
गंध ।
श्रीखंड कुंकुमं दिव्यं कर्पूरागरुसंयुतम् ।
कल्पितं च महादेवि प्रीत्यर्थे प्रतिगृह्यताम् ॥ १३॥
अक्षताः ।
अक्षताश्च सुरश्रेष्ठाः कुंकुमाक्ताः सुशोभिताः ।
मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरी ॥ १४॥
सोभाग्यद्रव्यम् ।
हरिद्रा कुंकुमं चैव कज्जलं सिंदुरं तथा ।
सौभाग्यद्रव्यं प्रीत्यर्थं गृहाण परमेश्वरि ॥ १५॥
कंठसूत्रं ताडपत्रं तथैव पादभूषणम् ।
नासामोक्तं चांजनं च अर्पितं ते सुरेश्वरि ॥ १६॥
पुष्पम् ।
नीलोतल सुकल्हारमालत्यादीनि शोभने ।
गधवंति च पद्मानि पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ॥ १७॥
धूपम् ।
देवि गृहाण देवेशि मनोहारि सुगुग्गुलम् ।
आज्यमिश्रं तु तुलसि प्रीत्याऽभीष्टप्रदायिनि ॥ १८॥
दीपम् ।
अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानदीपप्रदायिनि ।
तथैव तुलसि प्रीत्या दीपोयं प्रतिगृह्यताम् ॥ १९॥
नैवेद्यम् ।
नमस्ते जगतां नाथे प्राणिनां प्रियदर्शने ।
यथाशक्ति मया दत्तं नैवेद्यं प्रतिभृत्यताम् ॥ २०॥
उदकम् ।
नमो भगवति श्रेष्ठे नारायणि जगन्मये ।
शीतल विमलं नीरं तुलसि प्रतिगृह्यताम् ॥ २१॥
तांबूलम् ।
अमृता मृतसंभूतं तुलस्यमृतरूपिणि ।
कर्पूरादिसमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम् ॥ २२॥
दक्षिणा ।
दक्षिणां दक्षिणकरे भक्तानां प्रियकारिणि ।
ददामिते सदा भक्तया तुलसि प्रतिगृह्यताम् ॥ २३॥
नीराजनम् ।
करोद्दर्ति सदीपं च तिमिरस्य निवारणम् ।
सौवर्णं च मया दत्तमार्तिक्यं प्रतिगृह्यताम् ॥ २४॥
मन्त्रपुष्पम् ।
नानाविधानि पुष्पाणि सुगंधीनि सुरेश्वरि ।
भतस्त्वां पूजयिष्यामि गृत्यतां सुमनोंजलिः ॥ २५॥
प्रदक्षिणा ।
नमो नमो जगद्धात्रि जगद्देवि नमो नमः ।
नमो नमो जगद्भूतिर्नमस्ते परमेश्वरि ॥ २६॥
नमस्कारः ।
प्रसीद मम देवि त्वं कृपया परया सदा ।
अभीष्टफलसिद्धिं च कुरुमे माधवप्रिये ॥ २७॥
प्रार्थना ।
भद्रे त्वामर्चयेन्नित्यं प्रातरेव शुचिर्नरः ।
मध्यान्हे त्वां च सायान्हे मुक्तिमुक्तिप्रदां सदा ॥ २८॥
सर्वोपचारैरथवा चातुर्मास्ये विशेषतः ।
पूजयेत्तुलसीं देवीं मद्रूपफल सिद्धये ॥ २९॥
१२. द्वादशोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
नैमिषारण्यीं ऋषीश्वर । बैसले असती समग्र ।
ते पुमते झाले सर्वत्र । सूतालागीं ॥ १॥
स्वामी तुळसी उप्तन्न । जाहली कोठून याचे कैसें आहे आख्यान ।
तें सांगावें निरोपण । कृपानिधि ॥ २॥
आणिक इचें महिमान । तेंही सांगावें आपण ।
श्रवणें तृप्त आमुचे कर्ण । करा ऐसें बोलिले ॥ ३॥
तेसमयीं सन्निध होता शतानंद । सूताचा शिष्य वेदविद ।
बोलता झाला गुणानुवाद । तुळसीदे वीचे ॥ ४॥
प्रातःकाळी घडे तुळसीचे दर्शन । तरी सहस्र गोदानाचें पुण्य ।
लक्ष्मी राहे संपूर्ण । तया पुरुषाचे घरीं ॥ ५॥
जो प्रातःकाळीं नित्य करी दर्शन । त्यासीं आणीक हो प्राप्ती आहे जाण ।
स्वामी ऐका चित्त देऊन । बोलणें माझें ॥ ६॥
अशक्त होय बळिवंत । देहींचे रोग नासती समस्त ।
परम होय पुण्यवंत । निश्वयेसीं ॥ ७॥
शतानंदाचे इतके झालें बोलणें । मग सूत सांगते झाले आपण ।
म्हणती स्वस्थ करू नियां मन । तुळसी आख्यान ऐकावें ॥ ८॥
क्षीरसमुद्रीं होतीं चतुर्दश रत्नें । ती काढावयासी केला यत्न ।
तें सांगतों जाण । तुम्हांप्रती ॥ ९॥
बिरडी केली वासुकीचीं । रवी केली मेरूची ।
युक्ती केली घुसळणाची । ऐशा प्रकारें ॥ १०॥
एकीकडे धरिती सुरवर । एकीकडे लागले असुर ।
घुसळण करूनियां सत्वर । रत्नें चतुर्दश काढिलीं ॥ ११॥
लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक । सुरा धन्वंतरी चंद्रमा देख ।
ऐसी ही साहा झालीं ऐक । आणिक सांगतों ॥ १२॥
कामधेनु ऐरावत । रंभा देवांगना नेमस्त ।
अश्व सप्तमुखी शोभत । ऐसी दशक जाहलीं ॥ १३॥
विष धनुष्य आणि शंख । चवदावें अमृत देख ।
ऐसीं चतुर्दश रत्ने अमोलिक । काढिलीं देखा ॥ १४॥
ऐसीं काढिलीं चतुर्दश रत्नें । देव दैत्य विभाग करिते झाले जाण ।
कोणी घेतले कोण कोण । तें सांगतों तुझा ॥ १५॥
शंकरें घेतलें चंद्रमा विष । कौस्तुभ शंख लक्ष्मी विष्णूस ।
अमृत दोधलें देवांस । तयेवेळीं ॥ १६॥
पांच प्राप्त झालीं इंद्रासी । पारिजातक रंभा धनुष्यासीं ।
ऐरावत कामधेनूसीं । घेता झाला ॥ १७॥
सुरा दीघली दैत्यांसीं । उचैःश्रवा दीघला सूर्यासीं ।
धन्वंतरी स्वर्गासीं । राहिला देखा ॥ १८॥
ऐसा चतुर्दश रत्नांचा विभाग केला । विष्णु परमसंतोषी झाला ।
आनंदें करूनी डोलों लागला । तयेवेळीं ॥ १९॥
विष्णूची परमतृप्ती झाली । नेत्रांतून आसुवें बाहेर पडलीं ।
त्यांतून तुळसी निघाली । तात्काळ जाणा ॥ २०॥
शामवर्ण चतुर्भुज । कर्णी कुंडलें सतेज ।
नेत्र कमळाकार सहज । असती देखा ॥ २१॥
ऐसें देखोनि तियेसीं । विष्णूनें आलिंगिली हृदयासीं ।
परम होउनी संतोषो । तिजप्रती बोलता झाला ॥ २२॥
तुळसीसीं करितां भाषण । स्वर्गी सुरवर पाहती आपण ।
काय बोलतो नारायण । तें श्रवण करूं आम्ही ॥ २३॥
तंव बोले नारायण । तुजहून प्रिय आणीक नाहीं जाण ।
तूं माझी वडभा पूर्ण । हें सत्य वचन जाण पैं ॥ २४॥
आणीक ऐक तुळसी देवी । अखंड तूं मजपासीं असावी ।
प्रीति माझी असे आघवी । तुझे ठाई ॥ २५॥
तुजवीण मज दुर्लभ नसे । तुझे ठाई माझा परम संतोष ।
म्हणोनी धरून हृदयास । पुन्हां आलिंगिली ॥ २६॥
आणीक बोले लक्ष्मीकांत । तुळसी तूं ऐक निश्चित ।
तुज सांगतों यथार्थ । प्रीतिपूर्वक ॥ २७॥
नानापुष्पजाती असती । त्यांची पुष्पें मज समर्पिती ।
तेही माझे भक्त होती । यथार्थ जाणा ॥ २८॥
मुक्ताफळांनी पूजा करिती । सुवर्णपुष्पें मज वाहती ।
तेही भक्त मज प्रिय होती । यथार्थ जाणा ॥ २९॥
नानाप्रकारचीं रत्ने । पूजा करिती समर्पणें ।
रौप्यपुष्पें वाहती जाण । मजकारणें प्रीति करूनी ॥ ३०॥
परी संतुष्ट नसें तुझे पत्रावीण । ऐसा माझा भाव पूर्ण ।
तुज सांगतों जाण । निश्वयेसीं ॥ ३१॥
आणि सुवर्णाचे पर्वत । रत्नांच्या लाखोल्या वाहती नित्य ।
पुण्याचे पर्वत सदोदित । स्फटिकरत्नां मिती नाहीं ॥ ३२॥
इतुक्यांचें फळ सांगतों देख । सद्भावें वाहतां तुझें पत्र एक ।
तुझ्या तों पत्रावांचून आणीक । मज प्रिय नाहीं ॥ ३३॥
ऐसें तुझे ठाई माझें मन । बोलोनी तुळसीपत्रांची माळ घातली जाण ।
कंठापासोनि पादांगुष्ठ प्रमाण । तयेवेळीं ॥ ३४॥
मग होऊनि हर्षायमान । म्हणे तूं माग कांहीं वरदान ।
मागसील तें देईन । तुजलागीं येसमई ॥ ३५॥
ऐसें बोलिला सर्वेश्वर । मग तुळसी मागती झाली वर ।
तोही ऐका सादर । चित्त देऊनियां ॥ ३६॥
म्हणे शंकराची तुझी प्रीती माझे ठाई । अखंड असावी पाहीं ।
मजवीण आणीक कांहीं । तुम्हांसी दुर्लभ नसावें ॥ ३७॥
आणीक मागतें देवाधिदेवा । तें मज देई गा केशवा ।
ऐसें बोलोनि तेव्हां । विनविती जाहली ॥ ३८॥
माझें रोप लावोनि जो करी पाळण । त्याचें किल्मिष जाईल निर्दाळून ।
स्वर्गलोकाची प्राप्ती त्याकारणें । केली पाहिजे ॥ ३९॥--२
जो करील माझें वृंदावन । उदक घालील नित्यान ।
त्यासीं वैकुंठवास आपण । दीवला पाहिजे ॥ ४०॥
जो नित्य करील माझें पूजन । नैवेद्य दाखवी दीप लाऊन ।
त्यासीं आपुली समता पूर्ण । दोधली पाहिजे ॥ ४१॥
अखंड वंदी माझें तीर्थ । प्रदक्षिणा करील सात ।
त्यासीं आपुली स्वरूपता निभ्रांत । दीधली पाहिजे ॥ ४२॥
महापातकी असेल निभ्रांत । तो माझी सेवा करील एकचित्त ।
त्यासीं करावें पुण्यवंत । देवाधिदेवा ॥ ४३॥
पापाचे पर्वत जाहले असती । तुझें नाम स्मरण जे न करिती ।
अंतीं त्यांचे मुखीं घालिती । एकपर्ण माझें ॥ ४४॥
त्यांसीं द्यावी उत्तम गती । मुक्ती द्यावी निश्चिती ।
माझी सेवा जे करिती । तयांलागीं ॥ ४५॥
चतुर्मास मजपासीं लाविती दीप । माझी पूजा करिती साक्षेप ।
त्यांसी लक्ष्मी द्यावी अमूप । स्वामिनाथा ॥ ४६॥
जो अखंड करी माझें भजन । त्यावरी आपण कृपा करावी पूर्ण ।
ऐसें मागीतलें वरदान । तुळसीदेवीनें ॥ ४७॥
विष्णु म्हणे तथास्तु । तुझे पुरतील मनोरथु ।
ऐसें बोलोनि अकस्मातु । विष्णु अदृश्य जाहला ॥ ४८॥
स्वर्गी सकळ सुरवर । आश्चर्य करिती थोर ।
म्हणती तुळसी सवें अपार । भगवंत बोलिला ॥ ४९॥
धन्य धन्य भाग्य तुळसीचें । महिमान न वर्णवे इवें ।
ऐसें बोलोनियां वाचे । देव गेले निजधामा ॥ ५०॥
ऐसी कथानैमिषारण्यासीं । सूत सांगती ऋषीश्वरांसी ।
तुळसीची उत्पत्ति जाहली ऐसी । ते सांगीतली तुम्हांप्रती ॥ ५१॥
स्वर्गी इंद्र प्रह्लादासीं । गुरु सांगे उभयतांसीं ।
श्रवण करितां मानसीं । उभयतांसीं संतोष ॥ ५२॥
त्यांचीं उच्छिष्ट उत्तरें ऐसीं । प्राप्त जाहलीं वक्तयासीं ।
तींच श्रुत केलीं श्रोतयांसीं । श्रवणें दग्ध होती महादोष ॥ ५३॥
भाव धरोनि मानसीं । जो श्रवण करील तुळसी माहात्म्यासीं ।
त्यासीं कृपा करील हृषीकेशी । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ५४॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्ये द्वादशोऽध्यायः ॥ १२॥
१३. त्रयोदशोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
नैमिषारण्यों सकळ ऋषीश्वर । सूताप्रति बोलती समग्र ।
तुळसीचे कीर्त्तीचा विस्तार । आम्हांस सांगीतला पाहिजे ॥ १॥
परिसोनि ऋषीश्वरांची प्रश्नोक्ती । सूत सांगती तयांप्रती ।
सावधान होऊनि चित्तीं । श्रवण करावें ॥ २॥
सूत म्हणती तुळसीचीं दोन रूपें । तेजोमय दिव्य स्वरूपें ।
कैसीं जाणाल साक्षेपें । सांगतों तुम्हां ॥ ३॥
एक श्यामवर्ण । दुसरें शुभ्र संपूर्ण ।
परी दोहीं रूपांचे ठाई नारायण । सर्वदां असे ॥ ४॥
दोनी रूपें सांगीतलीं निर्धार । आतां सांगतों कीर्त्तीचा विस्तार ।
श्रवण करितां भवरोग दुस्तर । निरसे देखा ॥ ५॥
प्रत्यहीं आपादतळमस्तका । तुळसीचे खालील मृत्तिका ।
सर्वांगासीं लावितां देखा । सर्व पापें भस्म होती ॥ ६॥
जरी निरंतर भक्षी पर्ण । तरी त्यासीं घडे सहस्र गोदान ।
परमपुण्यात्मा होय आपण । भक्षितां नर ॥ ७॥
नित्य तीर्थ प्राशन करी । तो पुण्यपावन होय संसारीं ।
विष्णुलोकी निरंतरीं । करी वास्तव्य ॥ ८॥
शाळिग्रामासीं तुळसीपर्ण । समर्पिल्या वीण न घे अन्न ।
ऐसा ज्याचा नेम पूर्ण । त्याची फळश्रुती ऐका ॥ ९॥
लक्ष्मी निरंतर राहे घरीं । दिव्यदेही होय शरीरीं ।
अंतकाळीं वास्तव्य करी । विष्णुभुवनीं ॥ १०॥
सर्व पाकनिष्पत्ति जालियावरी । तुळसीपत्रे तीर्थ प्रोक्षी वरी ।
तो नैवेद्य शाळिग्रामासीं समर्पी जरी । तरी तृप्त होय भगवान ॥ ११॥
कर्त्यां पुरुषासीं नाहीं अभावना । पुत्र पौत्र संपूर्ण धन धान्या ।
पावोनियां जाणा । विष्णुपद प्राप्त होय ॥ १२॥
तुळसी वृंदावनीं करी श्राद्ध । तरी त्यासीं पुण्य घडे अगाध ।
एके श्राद्धी दश श्राद्धे । जालीं त्याचीं ॥ १३॥
पतित्रतेसीं नलगे आणिक उपाव करावा । तिसीं दुर्लभ पतिसेवा ।
पतिसेवेची देवाधिदेवा । आवडी मोठी ॥ १४॥
परी तिनें सेवा तुळसीची करितां । सद्भावें प्रदक्षिणा घालितां ।
हळदी कुंकुम सुवासिनीसीं समर्पितां । सौभाग्यवर्धन होय तिचें ॥ १५॥
पुत्रांसी भक्ति माता पित्यांची । गरज नाहीं इतर साधनांची ।
जे जे पदार्थों वासना त्यांची । पुरविता मी होय ॥ १६॥
दुर्लभ सेवा गोब्राह्मणांची । अखंड सेवा दोंठाई ज्याची ।
त्यासीं प्राप्ती होय सर्वसिद्धींची । येणेंची करूनी ॥ १७॥
परम दुर्लभ विष्णूची भक्ती । ऐसा भाव धरून चितीं ।
सेवा कर्त्यांसीं होय प्राप्ती । सायुज्यता ॥ १८॥
शिष्यासीं दुर्लभ गुरूची सेवा । गुरुसेवेनें पावे परतीरठेवा ।
सदा स्वरूपी होईल राहवा । गुरुसेवेनें ॥ १९॥
जैसी ही दुर्लभ आघवी । तैसीच तुळसीची सेवा जाणावी ।
सर्व मनकामना पुरवी । तुळसी देवी ॥ २०॥
यास्तव श्रीरामें सरयूतीरीं । सेवा केली बहुत दिवसवरी ।
ज्ञान व्हावें मज अंतरीं । सर्वकाळ ॥ २१॥
मग तुळसी होऊनि प्रसन्न । देती जाहली वरदान ।
अपार दीधलें ज्ञान । रामचंद्रासीं ॥ २२॥
दुसरें अनुष्ठान । श्रीरामें केलें आपण ।
सीताशुद्धी करोनि रावण कुंभकर्ण । निर्दाळावया ॥ २३॥
श्रीरामें करितां अनुष्ठान । पूर्णता जाहली परिपूर्ण ।
मग तुलसी होऊनि सुप्रसन्न । वर देती जाहली ॥ २४॥
श्रीरामा तुझे मनोरथ । सर्व पूर्ण होतील यथार्थ ।
ऐसा बोलोनि वाक्यार्थ । आशीर्वाद दीघला ॥ २५॥
हनुमंत म्हणे तुळसी देवी । मज सीताशुद्धी व्हावी ।
श्रीरामकृपा संपादावी । तात्काळ देखा ॥ २६॥
शुद्धी करोनि म्यां व्हावें विजयी । पुनरपि रामासीं सांगावया येई ।
हेंच मज देई । म्हणोनी अनुष्ठान केलें ॥ २७॥
मग तुळसी प्रसन्न झाली तेसमयीं । हाणे तुझी कार्यसिद्धी झाली पाहीं ।
चिंता न करीं कांहीं । विजयी होसी हनुमंता ॥ २८॥
श्रीरामशरें पडिला वाळी । तारा नमन करी तेवेळीं ।
म्हणे पुन्हा खंडावी जन्मावळी । प्राणनाथाची ॥ २९॥
मिळणी होय सायुज्यतेसीं । पुन्हा येणें नलगे गर्भवासी ।
ऐसिया अनुष्ठानासीं । करूं आतां ॥ ३०॥
मग तुळसीचें करूनि अनुष्ठान । वर मागीतला आपण ।
म्हणे पतीचें येणें जाणें । चुकवीं माते ॥ ३१॥
मग प्रसन्न झाली तुळसी । म्हणे पुनर्जन्म नाहीं वाळीसीं ।
ऐसें बोलोनि त्या समयासीं । तुळसी अदृश्य जाहली ॥ ३२॥
याचपरी तुळसीचें अनुष्ठान । केलें कृष्ण कामना धरून ।
तें मी सांगतों तुम्हां लागुन । ऐका आतां ॥ ३३॥
गोमतीचे तीरीं । उत्तम वृंदावन केलें झडकरी ।
सहस्र रोप लाविले ते अवसरीं । श्रीकृष्णनायें ॥ ३४॥
म्हणे दोन संकल्प माझे मानसीं । ते मी सांगतों तुजपासीं ।
चित्त देऊनि परीयेसीं । तुळसी देवी ॥ ३५॥
कंसाचें करावें निर्दाळण । गोकुळ रक्षावें आपण ।
हाचि मज वर देई जाण । म्हणोनी अनुष्ठान करिता झालों ॥ ३६॥
श्रीकृष्णें एकचित्तें । अनुष्ठान केलें दिवस बहुत ।
मग तुळसी मूर्तिमंत । भेटती जाहली ॥ ३७॥
उभयतांसीं झालें आलिंगन । आलिंगिली परम प्रीतीकरून ।
मग बोलती झाली वचन । श्रीहरीप्रती ॥ ३८॥
तुमचे पुरतील मनोरथ । कंसासीं माराल निभ्रांत ।
गोकुळ रक्षाल त्वरित । निश्चयेंसीं ॥ ३९॥
ऐसें दीधलें वरदान । संतोष पावला जगज्जीवन ।
मग बोलता जाहला आपण । तुळसीप्रती ॥ ४०॥
म्हणे जितुके ठायीं माझा वस्ती । तें मी सांगतों तुजप्रती ।
श्रवण करीं एकचित्तीं । दुश्चिंतन व्हावें ॥ ४१॥
क्षीरसागरीं माझें स्थान । वैकुंठ हें माझें भुवन ।
मध्यान्हीं रविमंडळी असें जाण । निश्चयेंसीं ॥ ४२॥
आणिक वास्तव्य स्थळ द्वारका । कीं हरिकीर्तनीं उभा देखा ।
ऐसे बोलतां यदुनायका । तुळसी देवी आनंदली ॥ ४३॥
इतुके स्थळीं माझी वस्ती । परी तेथें नाहीं सुखनिवृत्ती ।
अखंड तुझें ध्यान चित्तीं । असे देखा ॥ ४४॥
मी सर्वकाळ असें तुजजवळी । ऐसें बोले वनमाळी ।
परिसोनि गोपांगना सकळी । आश्चर्य करिती ॥ ४५॥
मग तुळसीसीं आलिंगुनी । रासक्रीडा खेळे वृंदावनीं ।
सकळ पाहती नयनीं । सर्वजन ॥ ४६॥
सकळ गोपिकां समवेत । क्रीडा करी भगवंत ।
मुरली वाजवी तेणें समस्त । आनंदमय जाहलें ॥ ४७॥
आतां याच समयासीं । यात्रेकरी जाती द्वारकेसीं ।
तेही वृंदावनासीं । नमस्कारासीं पैं जाती ॥ ४८॥
क्रीडा केली भगवंतें । म्हणोनी अवश्य जाती तेथें ।
पुण्यवंत ते दर्शनातें । करिती देखा ॥ ४९॥
अखंड करिती तुळसीचें पूजन । लेती तुळसीकाष्ठाचें भूषण ।
कर्णी कंठी दंडी मनगटी आपण । माळा घालिती देखा ॥ ५०॥
नर अथवा नारी । तीं पुण्यवंत होती शरीरीं ।
त्यांमागें श्रीहरी । अखंड धांवे ॥ ५१॥
जैसी वत्सा कारणें । धेनु धांवे सत्राणें ।
तैसा तुळसीभक्तांसीं नारायण । मागें पुढें सांभाळी ॥ ५२॥
जो असे तुळसीचा भक्त । तो मज प्रिय अत्यंत ।
त्यासीं मजसीं यथार्थ । दुजा अर्थ कांहीं नसे ॥ ५३॥
असो भगवंतासी तुळसी समर्पिल्यावीण । सर्वार्थी अन्न नाहीं भक्षण ।
ऐसा ज्याचा नेम संपूर्ण । त्याची फळश्रुती ऐका ॥ ५४॥
त्यासी विघ्न बाधूं न शके सर्वथा । जैसी बाळकासीं रक्षी माता ।
ऐसा होय रक्षिता । श्रीहरि त्यासीं ॥ ५५॥
भगवंतासीं तुळसी समर्पाविया कारण । पर्णे तोडावीं आपण ।
तोडावयाचा मंत्र पूर्ण । सांगतों तुम्हांसी ॥ ५६॥
मंत्र ।
मोक्षैकहेतोर्धरणिप्रसूते जगत्समस्तं तु गुरोः प्रियाय ते ।
आराधनार्थं द्विदलं भवत्यास्तदामि देवि मम तत्क्षमस्व ॥ ५७॥
यामंत्रे प्रार्थना करून । मग पण तोडावीं आपण ।
तीं समर्पावी हरिकारणें । भावपूर्वक ॥ ५८॥
नखें तोडिल्या पान । तो दीर्घद्वेषी होय आपण ।
बोटेंच करोनी जाण । तुळसीपत्रे तोडावीं ॥ ५९॥
द्वादशीस तोडील तुळसीपर्ण । तो असुरयोनींत जन्मेल जाण ।
म्हणोनी द्वादशीस सर्वथा पर्ण । तोडोंच नये ॥ ६०॥
शाळिग्रामास पर्ण समर्पिल्यावीण । सर्वथा अन्नचि नाहीं भक्षण ।
ऐसा नेम असेल तेणें । काय करावें ॥ ६१॥
ऐसी आशंका घराल चित्तीं । तरी त्याची सांगतों ऐसी युक्ती ।
तेही ऐका निश्चिती । चित्त स्थिर करूनियां ॥ ६२॥
निर्माल्यपत्रे उदकीं धुवोनी । तीं समपीवीं शाळिग्रामा लागुनी ।
परी द्वादशीस तोडों नये । ऐसें पुराणीं बोलिलें आहे ॥ ६३॥
विष्णुरूप शाळिग्राम । दोहीं मध्ये नाहीं मिथ्या भ्रम ।
याकारणें धरोनि प्रेम । तुळसी अर्पण कराव्या ॥ ६४॥
हे जन तारावयासी । तुळसीनें वास्तव्य केलें प्रयागासी ।
तेथें स्नान करील त्यासीं । मोक्ष होय ॥ ६५॥
बिंदुमाधवीं वास तुळसीसीं । तेथें दर्शन होय ज्या प्राणियासीं ।
तो जाईल मोक्षपदासीं । सत्य जाणा ॥ ६६॥
यमलोकींचे पितर । ते स्वर्गवास करिती निरंतर ।
यास्तव तुळसी स्थिर । गयेसीं झाली ॥ ६७॥
स्थिर जाहली असे तेथें । भक्तांचे आगमन इच्छित ।
जे जावोनि दर्शन करिती त्वरित । पूर्वज त्यांचे उद्धरती ॥ ६८॥
ऐसी कथा ऋषीश्वरांसी । सूतें सांगीतली स्वमुखेसीं ।
स्वर्गी इंद्रप्रह्लादांसीं । देवगुरु सांगतसे ॥ ६९॥
तोचि हा सारांश । वक्त्तयानें श्रुत केला श्रोतयांस ।
अगाध महिमा तुलसीचा विशेष । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ७०॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्ये त्रयोदशोऽध्यायः ॥ १३॥
१४. चतुर्दशोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
नैमिषारण्यीं सर्व ऋषीश्वर । बैसले असती समग्र ।
त्यांतून मरीचि ऋषीश्वर । सूताप्रती पुसतसे ॥ १॥
तुळसीचें महिमान । परिसाया कारण ।
उदित माझें मन । तरी सांगीतले पाहिजे ॥ २॥
तयाचा परिसोनि आदर । सूत सांगे सविस्तार ।
तंव बोलता झाला सत्वर । गरुड तेव्हां ॥ ३॥
सुतासीं करी विनंती । म्हणे श्रीहरी नारदाप्रती ।
तुळसोमहिमा आपुले मुखोद्गती । सांगता जाहला ॥ ४॥
तें म्यां केलें श्रवण । आज्ञा कराल तरी सांगेन ।
ऐसें परिसोनी जाण । सूतें आज्ञा दीघली ॥ ५॥
मग गरुड मरीचीप्रती । सांगता झाला यथामती ।
जें जें बोलिला होता श्रीपती । स्वमुखें नारदासीं ॥ ६॥
उत्तम करोनि वृंदावन । सहस्रावधी रोपें लाउन ।
उदक घालोनि पूजार्चन । नित्य करी ॥ ७॥
त्यासीं घडलें वेदाध्ययन । शास्त्रांचे श्रेय आलें जाण ।
यासीं संशय न धरावा कवणें । ऐसें गरुडें सांगीतलें ॥ ८॥
तुळसीमुळींची मृत्तिका । प्रत्यहीं लाऊनि स्नान करी देखा ।
त्याचीं सप्त कुळें उद्धरती ऐका । निश्वयेंसीं ॥ ९॥
तुळसीच्या तीर्थे स्नान करून । ऐसा नेम जयाचा पूर्ण ।
त्यासीं सर्व तीर्थांचें स्नान । झालें जाणा ॥ १०॥
कर्णी खोवी तुळसीदळ । तो सदां असे निर्मळ ।
तयाचे अंगीं विटाळ । बाधक न होय ॥ ११॥
तुळसीचे एक पर्ण । जो नित्य करी भक्षण ।
त्याचें सर्व पाप जाय जाण । ऐसें नारायण बोलिले ॥ १२॥
शाळिग्रामासीं तुळसी समर्पिल्या वोण । प्राणांतीं नाहीं करणें भोजन ।
ऐसा नेम जयाचा असेल पूर्ण । त्याची फळश्रुती आइका ॥ १३॥
विमानी बैसवोनि त्यासीं । नेतील वैकुंठभुवनासीं ।
बैस बोले हृषीकेशी । आपुले स्वमुखें ॥ १४॥
अभिषेक करी तुळसीसीं । धूप दीप नैवेद्य समर्पी सद्भावेंसीं ।
मंगळ आरती करी गजरेंसीं । चतुर्मास ॥ १५॥
त्याचे पितर कुंभीपाकांतून निघती । त्यांसीं तात्काळ वैकुंठप्राप्ती ।
पुण्य सरल्या उत्तम योनी जन्मती । सत्य जाण ॥ १६॥
कार्तिक शुद्ध द्वादशीसीं । पूजा करी गजरेंसी ।
हरिकथा करूनी खिरापती सीं । वांटी देखा ॥ १७॥
त्याचें सहस्र जन्माचें जाय पाप । लक्ष्मा प्राप्त होय अमूप ।
अंतीं विमानी बैसोनि विष्णुसमीप । जाय देखा ॥ १८॥
अखंड दीप लावी तुळसी जवळी । खंड होऊं नेदी कोणे काळीं ।
तरी त्याचे गृहीं सर्वकाळीं । लक्ष्मी वसे ॥ १९॥
ये विषयीं एक ऐका कथा । श्रवण करावी श्रोता ।
सावधान करूनि चित्ता । पुढील वार्ता ऐकावी ॥ २०॥
लुब्धक नामें एक शुद्र होता । त्याची ऐकाजी कथा ।
तुम्हांप्रती सांगतों आतां । गरुड म्हणे ॥ २१॥
माता पिता असती तयासीं । स्त्रीपुत्र असे त्यासीं ।
बंधुसहित गृहासी । काळक्रमणा करीतसे ॥ २२॥
तो मार्गस्थांचा वधकरी । आणखी उदंड जीव मारी ।
ऐसें नित्य पाप करी । लुब्धक तो ॥ २३॥
ऐसे मारितां दिवस लोटले बहुत । पापाचे पर्वत झाले अपरिमित ।
म्हणोनीयां पाहोनि शास्त्रार्थ । सांगती तया ॥ २४॥
घरचीं अवधीं करिती उपदेश । या कमैं तुज घड ला बहुत दोष ।
आतां तूं पापकर्मास । प्रवर्त नको ॥ २५॥
ऐसें नित्यानित्य त्यास सांगती । नाइकतां धनुष बाण घेऊनि हातीं ।
नित्य जाय वनाप्रती । लुब्धक तो ॥ २६॥
ऐसें करितां एके दिवशीं । श्वापदे न देखे अरण्यासीं ।
मार्गस्थही न भेटती वाटेसीं । परम चिंतातुर जाहला ॥ २७॥
ऐसा हिंडतां वनांतरीं । क्षुधेनें पीडिला भारी ।
खरसी आली मुखाभीतरीं । प्राण जाऊं पाहतसे ॥ २८॥
तंव अकस्मात देखिलें हरण । अतिसुंदर मनोहर जाण ।
मग हातीं घेऊनि धनुष्य बाण । त्याचे पाठी लागला ॥ २९॥
तो चमकोन गेला तुळसीवनांत । हाही धांवोन गेला तेथ ।
तंव तो गुप्त झाला अकस्मात । तयेवेळीं ॥ ३०॥
तंव लुब्धक प्रवेशला तुळसी वनांत । क्षुधेनें मूर्छित पडिला तेथे ।
मागुती मृग त्वरित । निर्माण झाला ॥ ३१॥
इंद्र देवांसह वर्त्तमान । कौतुक पाहावया आले आपण ।
कनकाचा कैसा आहे हरिण । तो दृष्टां पाहूं ॥ ३२॥
ऐसें झालें त्यास्थळासीं । तव श्रुत झालें यमासीं ।
तेणें आपुलिया भृत्यांसीं । आज्ञा केली ॥ ३३॥
म्हणे तुझीं जावें त्यास्थळासीं । बांधोनि आणा लुब्धकासीं ।
ऐसी आज्ञा दीघली त्यांसीं । यमरायें ॥ ३४॥
ते आले महाभयानक । श्यामवर्ण विक्राळ देख ।
स्थूळपिंगटवर्ण मस्तक । हातीं पाश गोफणी ॥ ३५॥
एकाचे हातीं लोहाचीं मुसळें । एकाचे करीं टोणपे सगळे ।
एक गिळू म्हणती बळें । लुब्धकासीं ॥ ३६॥
ऐसे ते आले त्यास्थळा । परि स्पर्श न करवे त्याला ।
तुळसीवनांत असे पडिला । म्हणोनीयां ॥ ३७॥
परस्परें एकमेकांतें । विचार करूं लागले तेथें ।
आम्हांसीं न धरवे यातें । हा तुळसीवनांत पडिला असे ॥ ३८॥
ऐसा जंव विचार करिती । तंव अंतरी जाणवलें विष्णुप्रती ।
मग विष्णुदूतांसी लक्ष्मीपती । आज्ञा करिता जाहला ॥ ३९॥
लुब्धक पडिला तुळसी वनाप्रती । यमदूत न्यावया आले असती ।
त्यांसीं न धरूं द्यावें हातीं । लुब्धकासीं ॥ ४०॥
युद्धासी सरसावले तरी युद्ध करणें । शिक्षा लावोनि बाहेर घालवणें ।
लुब्धकासीं घेऊन येणें । मजपासीं ॥ ४१॥
जैं तुळसीस्पर्श तेणें केला । तेणेंचि तो माझा परम भक्त झाला ।
ऐसी आज्ञा भृत्यांला । श्रीहरीने केली ॥ ४२॥
मग ते आले विष्णुदूत । तेजोमय लखलखीत ।
अंगकांती झळकत । सूर्यासारिखी ॥ ४३॥
द्वादश टिळे रेखिले असती । तुळसीमाळा गळां शोभती ।
महापुण्यवंत दिसती । श्यामरूपें ॥ ४४॥
गदा चक्र करीं शोभती । दिव्यांबरें परिधान केली असती ।
रत्न मुगुट विराजती । शिरीं देखा ॥ ४५॥
कर्णी कुंडलें देदीप्यमान । ऐसे ते पावले तुळसीभुवन ।
मग यमदूतांप्रती वचन । बोलते झाले ॥ ४६॥
तुम्हांसीं काय कारण यावया येथें । ते म्हणती न्यावया आलों लुब्धकातें ।
परिसोनि त्यांचिया वचनातें । प्रत्युत्तर त्यांसीं देती ॥ ४७॥
विष्णूची आज्ञा आहे ऐसी । यासीं घेऊनि यावें विष्णुलोकासीं ।
तरी तुम्ही जावें आपुल्या स्थळासीं । आम्ही यासीं घेऊनि जाऊं ॥ ४८॥
ते म्हणती यमाची आज्ञा आम्हासीं । यासीं आणावें यमलोकासीं ।
तरी आम्ही नेऊ यासीं । तुम्ही जा आपुले स्थळा ॥ ४९॥
तेथें नेलिया यासीं । निवाडा होय पाप पुण्यासीं ।
मग जें सांगती तें निश्चयेंसीं । भोगणें लागे ॥ ५०॥
विष्णुदूत म्हणती हें बोलतां वाउगें । तुझीं जावें आलिया मार्गे ।
युद्ध करणें असेल याप्रसंगें । तरी सुखें करावें ॥ ५१॥
ऐसें त्यांचें निष्ठुर बोलणें । ऐकोनि विचार करिती आपण ।
यांसीं युद्ध करितां संपूर्ण । पराभवती आम्हांसीं ॥ ५२॥
ऐसा विचार करोनि त्यांहीं । मग गंतव्य केलें पाही ।
यमाजवळी जाऊनि ते समयीं । सकळ वृत्तांत श्रुत केला ॥ ५३॥
यमदूत विष्णुदूतांचें भाषण । लुब्धकें केलें श्रवण ।
म्हणे धन्य भाग्य माझें पूर्ण । भगवंतें अंगिकारिलें ॥ ५४॥
म्यां कुटुंबाकारणें । नाना कर्मे केली जाण ।
शेवटीं लागलें भोगणें । माझें मज ॥ ५५॥
कोणाच्या रांडा कोणाची पोरें । पुण्यपाप भोगिलें शरीरें ।
बरोबर कोणी नये हें तों खरें । दिसताहे ॥ ५६॥
अंतीं कोणी कोणासीं । सर्वथा न येती कार्यासीं ।
धिग धिग म्यां जन्मासी । व्यर्थ गमाविलें ॥ ५७॥
म्यां आयुष्य व्यर्थ गमाविलें । सर्वथा नाहीं हरिभजन केलें ।
ऐसें अनुतापें ज्ञान झालें । तुळसीच्या प्रसादें ॥ ५८॥
मग स्मरता जाहला श्रीहरोसीं । तंव विष्णुदूतें नेलें त्यासीं ।
नेऊनि विष्णुभुवनासी । श्रीविष्णूस भेटविला ॥ ५९॥
त्यासीं ठेविलें आपणापासीं । कृपाळु झाला ऋषीकेशी ।
हे कथा मरीची ऋषीश्वरांसी । गरुडें सांगीतली ॥ ६०॥
स्वर्गी इंद्र प्रह्लादांसीं । बृहस्पती सांगे उभयतांसी ।
कथा सांगीतली ऐसी । तुळसीमाहात्म्याची ॥ ६१॥
तोचि संवाद श्रोतयांसीं हर्षे । वक्त्यानें सांगीतला उल्हासें ।
विकल्प न धरावा मानसें । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ६२॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्ये चतुर्दशोऽध्यायः ॥ १४॥
१५. पञ्चदशोऽध्यायः
श्रीगणेशाय नमः ।
मागुती मरीची ऋषीश्वरांसीं । गरुड सांगता झाला तुळसीमाहात्म्यासीं ।
म्हणे कथा सांगतों तुम्हापासीं । ते ऐका आतां ॥ १॥
मागें सांगीत दें । लुब्धकाच्या कथेसीं ।
तो परम पुण्यवंत जाहला परियेसीं । त्याचे झालिया दर्शनसीं । पापी पुनीत होती ॥ २॥
याउपरी एके समयासीं । दुर्वास देवें शापिलें इंद्रासीं ।
तो भयभीत होऊनि मानसीं । कांपों लागला ॥ ३॥
बहुत भाकोनि काकुळती । उःशाप मागे दुर्वासाप्रती ।
तेव्हां दुर्वास उःशाप त्याप्रती । देता जाहला ॥ ४॥
म्हणे समुद्राचे होईल मंथन । त्यांतून निघतील चतुर्दश रत्ने ।
त्यांतून तुज प्राप्त होईल तेणें निरसन । याशापाचे होईल ॥ ५॥
यास्तव केलें समुद्रमंथन । त्यांतून काढिलीं चतुर्दश रत्नें ।
त्यांचा विभाग संपूर्ण । द्वादशाध्यायीं कथियेला ॥ ६॥
पांच प्राप्त झाली इंद्रासीं । उःशाप घडला त्यासीं ।
विष्णु परम झाला संतोषी । लक्ष्मी प्राप्त जाहली ॥ ७॥
मग अति प्रेमें ते अवसरीं । आसवें आलीं नेत्राबाहेरी ।
त्यांतून निघाली झडकरी । तुळसी देवी ॥ ८॥
हे पूर्वी । सांगीतली कथा ।
मागिले अध्यायीं तत्त्वतां । समयानुसार आतां । किंचित सांगीतलें ॥ ९॥
मग तेच अवसरीं । विष्णूनें बैसविली मांडीवरी ।
समुद्रांतील अमृतकुंभभरी । विभागासीं ठेविलें होतें ॥ १०॥
त्यांतून बिंदुपडिला तुळसीवरी । म्हणोनी अमर झाली पुरो ।
ऐसें ग्रंथांतरीं । सांगीतलें आहे ॥ ११॥
नित्य विष्णूस अर्पी तुळसीपर्ण । तो पुरुष देवांसीं वंद्य जाण ।
सर्व देव त्याचे दर्शन करून । तृप्त होती ॥ १२॥
तुळसीकाष्ठ उगाळून । विष्णूसी समर्पी जाण ।
तरी त्याच्या हृदयीं नारायण । निरंतर राहे ॥ १३॥
श्राद्धीं करितां भोजन । तुळसीमाहात्म्य होय श्रवण ।
तरी त्याचे पितृगण । वैकुंठासी गेले ॥ १४॥
ऐका ब्राह्मणाची कथा । ते सांगतों आतां ।
श्रवण करा एकात्मता । एकचिचें करोनी ॥ १५॥
वरमेधा सुमेधा ब्राह्मण । हे उभयतां बंधु असती जाण ।
वरमेधा ज्येष्ठ आपण । कनिष्ठ तो सुमेधा पैं । ॥ १६॥
परम पवित्र उभयतां । वेदाध्ययनीं तत्त्वतां ।
शास्त्राची संपूर्णता । दोषांसीं असे ॥ १७॥
त्यांसीं द्रव्य असे अपार । मग करिते झाले उभयतां विचार ।
नाशिवंत हैं शरीर । सारासार साधावा ॥ १८॥
ऐसें विचारूनि मानसीं । मग निघते झाले तीर्थयात्रेसीं ।
प्रदक्षिणा करूनि तीर्थासीं । उत्तरदेशी पातले ॥ १९॥
जातां जातां उत्तरदिशेसीं । कांतारवन देखिलें दृष्टीसीं ।
मग प्रवेश केला तया समयासीं । वनामाजी ॥ २०॥
तेथें तुळसीवन असे सुंदर । देखोनि संतोषले द्विजवर ।
मग सांष्टांग केला नमस्कार । उभयतांनीं ॥ २१॥
तंव समीप असे वटवृक्ष एक । तो महाविस्तीर्ण सुंदर देख ।
त्यासीं देखून परम हरिख । दोघे विप्र पावले ॥ २२॥
तंव ज्येष्ठ म्हणे कनिष्ठासीं । आली श्रमन आलों यावनासीं ।
विश्रांती पावलों या स्थळासी । तुळसीवन देखनी ॥ २३॥
धन्य धन्य आमुचें पुण्य । दृष्टीं देखिलें तुळसीवन ।
ऐसें बोलोनियां अनुष्ठान । तुळसीचें करिते झाले ॥ २४॥
चातुमासपर्यंत । पूजन अर्चन केलें तेथें ।
जप तप सदोदित । करितसे तुळसीपासीं ॥ २५॥
अनुष्ठानाचें अगाध झालें पुण्य । मग विष्णूने पाठविलें विमान ।
दिव्यांबरें वस्त्रे भूषण । त्यांसीं पाठविलीं ॥ २६॥
तेजोमय कल्लोळी । विमान उतरलें भूमंडळीं ।
विष्णुदूत तये वेळीं । बोलते झाले ॥ २७॥
तुम्ही केलें तुळसीचें अनुष्ठान । म्हणोनि प्रसन्न झाले नारायण ।
दिव्यांबरे आणि विमान । तुम्हांकारणें पाठविलें ॥ २८॥
तरी हीं अळंकार भूषणें । दिव्यांबरे करा परिधान ।
ऐसें बोलूनियां आपण । पुढे ठेविते झाले ॥ २९॥
मग त्यांसीं करोनि नमस्कार । आपण लेइले अळंकार ।
वस्त्रे परिधान करूनी सत्वर । विमानीं बैसते झाले ॥ ३०॥
तात्काळ विमान गेलें विष्णुभुवनासीं । मग उतरोनि चरण चालीसीं ।
येते झाले हरीपासीं । तेसमयीं ॥ ३१॥
चतुर्भुज पीतांबरधारी । रत्नजडीत मुगुट शिरीं ।
वैजयंती शोभे हृदयावरी । भगवंताच्या ॥ ३२॥
सुनीळ नीळाचा गाभा । कोटिसूर्याच्या सारखी प्रभा ।
त्याप्रकाशें अतिशोभा । दश दिशा उजळल्या ॥ ३३॥
शंख चक्र गदा शोभती । ऐसा दुरी देखिला लक्ष्मीपती ।
राही रुक्मिणी समस्ती । उभ्या दोनी भागीं ॥ ३४॥
सत्यभामा चवरें ढाळी । नारद विणा वाजवी जवळीं ।
ऐसा देखिला वनमाळी । उभयतांनीं ॥ ३५॥
मग साष्टांग घातला नमस्कार । स्तुति करिती अपार ।
मग आपला समाचार । वरमेधा श्रुत करी ॥ ३६॥
म्हणे मज पूर्वी बह्महत्या घडली होती । यास्तव गेलों सर्पयोनीप्रती ।
इंद्रांचे आनंदवनांत वस्ती । म्यां धरली होती ॥ ३७॥
त्यावनीं देवांगना नृत्य करिती । त्यास लुब्ध होय मी चित्तीं ।
ऐसे कित्येक दिवस त्या स्थळाप्रती । म्यां कर्मिले जाण ॥ ३८॥
तंव एके दिवसीं अकस्मात । लोमहर्षण आला तेथें ।
त्यानें देखोनियां मातें । वन दग्ध केलें ॥ ३९॥
मग मी अग्निसंगें जळालों । सवेंचि ब्रह्मराक्षस झालों ।
एका वृक्षावरी असें बैसलों । रात्रंदिवस ॥ ४०॥
ऐसे क्रमिले दिवस बहुत । तंव तेथें लोमहर्ष आले अकस्मात ।
त्यांसीं देखोनियां त्वरित । मस्तक चरणीं ठेविला ॥ ४१॥
कींव भाकि ली बहुत । मग ते झाले कृपावंत ।
आतां ब्राह्मण जन्म पावसी नेमस्त । येथून सुटका झाली तुझी ॥ ४२॥
तुज सांग घडेल वेदाध्ययन । तूं होसी शास्त्रज्ञ संपूर्ण ।
द्रव्यवंत बहुत होसी जाण । चिंता न करीं ॥ ४३॥
प्रपंचीं भोगिसौ सुख । मग तीर्थयात्रा करिसी देख ।
मग तुळसीवन देखसी एक । अपूर्व नयनीं ॥ ४४॥
तेथे करसील तुळसीचें अनुष्ठान । तेणें प्रसन्न होईल नारायण ।
श्रीहरी दाखवील आपुले चरण । तैं तुझें गमन खुंटेल ॥ ४५॥
ऐसें बोलिला कृपामूर्ती । तेंचि जालें निभ्रांती ।
आणि तुझे चरण लक्ष्मीपती । म्यां देखिले ॥ ४६॥
ऐसें सांगोनि तेसमंई । साष्टांग नमस्कार केला पाही ।
हरी म्हणे आतां चिंता कांहीं । न करा तुझी ॥ ४७॥
तुळसीचें अनुष्ठान । तुम्हां अगाध जोडलें पुण्य ।
आतां मज सन्निध राहोन । आनंद करीं ॥ ४८॥
तुळसीप्रसादें करून । ब्राह्मण झाले परम पावन ।
श्रीहरीनें वैकुंठीं नेऊन । अक्षय पदीं स्थापिले ॥ ४९॥
ऐसी कथा मरीचीऋषीपासीं । गरुडें सांगीतली त्या समयासीं ।
ऐकोनियां सर्वांसी । समाधान जाहलें ॥ ५०॥
प्रथमाध्यायीं मंगलाचरण । तुळसीकाष्ठाचे गंध उगाळून ।
करावें श्रीविष्णुपूजन । ब्राह्मण संतर्पण सांगीतलें ॥ ५१॥
तुळसी खुडावयाची युक्ती । दूर्वा वाहावयाची प्रमाणोक्ती ।
सर्वदेवांच्या अनुष्ठानाची प्रचीती । सांगीतली द्वितीयाध्यायीं ॥ ५२॥
दशरथानें केलें अनुष्ठान । तुळसी झाली सुप्रसन्न ।
चौघे पुत्र तयातें देऊन । तृतीयाध्याय संपविला ॥ ५३॥
चौथे अध्यायाचे अंतीं चरित्र । सोळा नामें सांगीतलीं परिकर ।
पातकी पौंडरीकाचा करूनि उद्धार । वैकुंठपदीं स्थापिला ॥ ५४॥
दोष घडला पार्वतीस । कौंतेया ब्राह्मणाचे सांगोनि चरित्रास ।
तुळसीनें स्वस्थळाप्रति पाठविली तीस । हेचि कथा पांचव्यांत ॥ ५५॥
साहवे अध्यायाचे अंतीं कथा । बह्मयास झाली शापमुक्तता ।
सुमालिनी झाली पुत्रवंती तत्वता । तिच्या चरित्रा वर्णिलें ॥ ५६॥
सप्तमाध्यायीं कथा सुरस । राजे आणि ऋषि आले स्वयंवरास ।
देवसेनेसी दाखऊनि श्वेतद्वीपास । तिच्या मनोरथास पुरविलें ॥ ५७॥
आठवे अध्यायीं कथन । उदयनराजा राणी सुशीळा जाण ।
तयाचें वार्धक्य जाऊन । पुत्रवंती जाहली ॥ ५८॥
समस्त ऋषि स्कंदासीं शरण येत । शिववरदें अनुष्ठान करित ।
मंत्रसिद्धी सांगोनि तारका वधित । हेंचि वदत नवमाध्यायीं ॥ ५९॥
कृष्णजोशी ज्ञान कर्महीन । तुळसीप्रसादें झाला पडशास्त्री निपुण ।
यमदूत पुण्याचा लक्षांश गेले मागोन । दशमाध्यायी हेचि कथा ॥ ६०॥
एकादशाध्यायीं कथा विशेष । श्रीहरी सांगती नारदास ।
पूजाविधि मंत्रयुक्त सुरस । तुळसीची सांगीतली ॥ ६१॥
द्वादशाध्यायी कथा प्रसिद्ध । समुद्रमंथनीं चौदा रत्लें काढिलीं अभेद ।
प्रेमोदकें तुळसी उत्पत्ति सांगीतली सुबद्ध । वरदान युक्त तेधवां ॥ ६२॥
त्रयोदशाध्यायीं निरोपण कृष्णे केलें अनुष्ठान । द्वारकेंत रासक्रीडा खेळोन ।
तेथून प्रयागस्थळीं । राहिली ॥ ६३॥
चतुर्दशाध्यायीं कथन । मनोहर मृत्तिका आख्यान ।
पातकी लुब्धक तुळसीनें उद्धरोन । वैकुंठभुवनीं पाठविला ॥ ६४॥
इंद्रास घडतां शाप दारुण । चतुर्दश रत्नें विभागें झालें शापमोचन ।
वरमेधा सुमेधा वैकंठीं स्थापून । पंचदशाध्याय संपविला ॥ ६५॥
हे पंधरा अन्न ध्याय तुळसीमाहात्म्य । केवळ पंधरा खणांचे मंदिर परम ।
यांत तुळसीसहित पुरुषोत्तम । घवघवित विराजे ॥ ६६॥
सद्भावें करितां पूजन अर्चन । संतोषोनी जनार्दन ।
चिंतिलें फळ प्राप्त करून । शेवटीं अक्षय फळ प्राप्त करी ॥ ६७॥
वक्ता विनवी श्रोतयांस । तुळसी माहात्म्य ऐसें असे ।
श्रवणें महापातकांचा होय नाश । विठ्ठलदास रुद्र म्हणे ॥ ६८॥
येथूनि तुळसीमाहात्म्य झालें संपूर्ण । लिहून केलें कृष्णार्पण ।
भक्तांसी तारी श्रीनारायण । परमात्मा श्रीहरी ॥ ६९॥
इति श्रीस्कंदपुराणे । तुळसीमाहात्म्यकथने ।
ऋषिसंवादपरिसणें । पंचदशोऽध्याय गोड हा ॥ ७०॥
इति श्रीस्कन्दपुराणे तुळसीमाहात्म्यकथने ऋषिसंवादपरिसणें पञ्चदशोऽध्यायः ॥ १५॥
॥ समाप्तोज्यं ग्रंथः ॥
Encoded by Rushikesh Ghatole
Proofread by Rushikesh Ghatole, Mandar Puranik