चतुर्मुखकृतेश्वरस्तुतिः

चतुर्मुखकृतेश्वरस्तुतिः

ब्रह्मोवाच । प्रसीद देवदेवेश प्रसीद परमेश्वर । प्रसीद जगतां नाथ प्रसीदानन्ददाव्यय ॥ १२१॥ सहस्रशिरसे तुभ्यं सहस्राक्षाय ते नमः । नमः सहस्रपादाय शर्वाय परमेष्ठिने ॥ १२२॥ सदाशिवाय शान्ताय महेशाय पिनाकिने । सर्वज्ञाय शरण्याय सद्योजाताय ते नमः ॥ १२३॥ अघोराय नमस्तुभ्यं वामदेवाय ते नमः । तत्पुरुषाय नमस्तुभ्यमीशानाय च ते नमः ॥ १२४॥ अनन्तेशाय सूक्ष्माय चोत्तमाय नमो नमः । एकाक्षाय नमस्तुभ्यमेकरुद्राय ते नमः ॥ १२५॥ नमस्त्रिमूर्तये तुभ्यं श्रीकण्ठाय शिखण्डिने । अनन्तासनसंस्थाय ह्यनन्तायान्तकारिणे ॥ १२६॥ विमलाय विशालाय वीतरागाय ते नमः । योगपीठान्तरस्थाय योगिने योगदायिने ॥ १२७॥ योगिनां हृदि संस्थाय योगगम्याय ते नमः । पराय परमेशाय निर्गुणाय नमोऽस्तु ते ॥ १२८॥ आत्मत्रयगरिष्ठाय त्रिगुणाय कपर्दिने । मध्ये देहस्य मध्ये च मूले नाभौ स्थिताय च ॥ १२९॥ शिवाय शिवतत्त्वाय विद्यातत्त्वाय ते नमः । आत्मतत्त्वाय निर्बीजबीजिने बीजयोनये ॥ १३०॥ इति स्तवेन दिव्येन स्तुत्वा देवं पिनाकिनम् । कृताञ्जलिपुटो भूत्वा ब्रह्मा प्रोवाच शङ्करम् ॥ १३१॥ प्रादुर्भूतं विषं घोरं युगान्ताग्निसमप्रभम् । ग्रसते भगवान् लोकान्सर्वतः सचराचरान् ॥ १३२॥ सर्वे सेन्द्रास्तथा देवा दैत्याः सिद्धाश्च चारणाः । दन्दह्यमानास्तेनैव विषेण शरणं गताः ॥ १३३॥ इत्युक्त्वा देवदेवेशं ब्रह्मा विश्वेश्वरं हरम् । अतिष्ठत्पुरतस्तस्य कृताञ्जलिपुटो मुने ॥ १३४॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे चतुर्मुखकृतेश्वरस्तुतिः समाप्ता । ब्रह्मकृत ईश्वरस्तुतिः (१२१) ब्रह्मदेव म्हणाला हे देवाधिदेवा, आह्मांवर कृपा कर. परमेश्वरा, तूं आह्मांस प्रसन्न हो. तूं त्रैलोक्याचा अधिपति आहेस, तूं आमच्यावर कृपा कर. तूं आनंदस्वरूप आहेस, तूं अविनाशी आहेस, तूं आह्मांवर कृपा कर. (१२२) हे परमेश्वरा, तुला हजार मस्तकें आहेत, तुला नमस्कार असो, तुला हजार डोळे आहेत, तुला नमस्कार असो, तुला हजार पाय आहेत, तुला नमस्कार असो, तुला शर्व, परमेष्ठी अशीं अनेक नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (१२३) तुला सदाशिव म्हणतात, तूं शांत आहेस, तूं महेश्वर आहेस, तुझ्या हातांत अजगव धनुष्य आहे, तूं सर्वज्ञ आहेस, तूं शरणागतांचे रक्षण करणारा आहेस, तुला सद्योजात म्हणतात, तुला नमस्कार असो. (१२४) तुला अघोर म्हणतात, तुला नमस्कार असो, तूं वामदेव आहेस, तुला नमस्कार असो, तुला तत्पुरुष म्हणतात, तुला नमस्कार असो, तुला ईशान असें म्हणतात, तुला नमस्कार असो. (१२५) तूं अनंत नागाचा ईश्वर असून तूं सूक्ष्म आहेस, तूं उत्तम आहेस, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. तुला एकाक्ष म्हणतात, तूंच एकरुद्र आहेस, तुला नमस्कार असो. (१२६) तूं सत्त्व, रजस्तमोगुणरूप आहेस, तुला श्रीकंठ म्हणतात, तुला शिखंडी म्हणतात. तूं शेषसर्पाचें आसन करून त्यावर बसतोस, तुझा अंत लागत नाहीं, तूं अंतकाचा अंतक आहेस, तुला नमस्कार असो. (१२७) तूं विमल (निष्पाप) आहेस, तुला विशाल म्हणतात तूं फार निस्पृह आहेस, तुला नमस्कार असो. तूं योगपीठावर बसतोस, तूं योगी आहेस, तूं योगांचा दाता आहेस. (१२८) तूं योगीश्वरांच्या हृदयांत (मनांत) राहतोस, तूं योगांचे साधनानें समजून येण्यासारखा आहेस. तूं श्रेष्ठ आहेस, तूं परमेश्वर आहेस, तूं निर्गुण आहेस, त्या तुला नमस्कार असो. (१२९) तूं जीवात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा ह्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस, तूं त्रिगुणात्मक (सत्त्वरजस्तमोगुणात्मक) आहेस; तुझ्या मस्तकावर जटाजूट आहे. तूं देहांत राहतोस, तूं मूलस्थानी राहतोस, तूं नाभिस्थानांत राहतोस, तुला नमस्कार असो. (१३०) तुला शिव म्हणतात, तूं शिवतत्त्व आहेस, तूं विद्यातत्त्व आहेस तुला नमस्कार असो, तूं आत्मतत्त्व आहेस, तूं निर्बीजाचा बीज आहेस, तूं बीजाचा मूलपुरुष आहेस, तुला नमस्कार असो. (१३१) अशी ब्रह्मदेवानें दोन्ही हात जोडून उत्तम प्रकारच्या स्तोत्रांनीं मधुर शब्दानें अजगव धनुष्य धारण करणाऱ्या श्रीशिवाची स्तुति केली; आणि मग शंकरास म्हटलें (१३२) परमेश्वरा, समुद्रमंथन करितांना त्यांतून जालीम विष बाहेर निघालें तें फार तीव्र असून प्रळयकाळच्या अग्नीसारखें प्रखर आहे. हे परमेश्वरा, तें विष आतां ह्या सर्व स्थावरजंगम विश्वाचा संहार करीत आहे. (१३३) हे सर्व इंद्रादिक देव, हे सर्व दैत्य, हे सर्व सिद्ध, हे सर्व चारण त्या विषाच्या उष्णतेनें अगदीं होरपळून गेले आहेत; आणि त्या विषापासून आपला प्राण वांचवावा म्हणून तुला शरण आले आहेत. (१३४) सनत्कुमारा, इतकें सांगून तो ब्रह्मदेव परमेश्वर देवाधिदेव श्रीशिवाच्या पुढें तसाच दोन्ही हात जोडून उभा राहिला. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Chaturmukhakriteshvara Stuti
% File name             : chaturmukhakRRiteshvarastutiH.itx
% itxtitle              : shivastutiH chaturmukhakRitA (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : chaturmukhakRiteshvarastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org