दारुवनमुनिजनकृतशिवस्तुतिः

दारुवनमुनिजनकृतशिवस्तुतिः

मुनय ऊचुः । नमः शिवाय स्वरसानुभूतये वाचामतीताय मनोतिगाय ते । आनन्दविज्ञानघनाय शम्भवे नमः परस्तात्परतः परात्मने ॥ १०७॥ परात्परस्वरूपाय ततो नादात्मने नमः । ततो बिन्दुस्वरूपाय कोट्यंशाय नमो नमः ॥ १०८॥ नमः शिवाय शुद्धाय ब्रह्मणे बृहदात्मने । ज्ञानानन्दस्वरूपाय सत्यायाखण्डहेतवे ॥ १०९॥ शान्तिविद्यानिवृत्याख्य प्रतिष्ठाशक्तये नमः । ततः शक्तिस्वरूपाय शान्त्यतीताय ते नमः ॥ ११०॥ नमः सदाशिवाख्याय पञ्चवक्त्राय ते नमः । नमो निष्कलरूपाय तस्मै सकलरूपिणे ॥ १११॥ ईश्वराय नमस्तुभ्यं विग्रहाविष्कृताय ते । सर्वज्ञाय स्वतन्त्राय तृप्तायानन्दशक्तये ॥ ११२॥ अनादिबोधरूपायालुप्तायानन्दमूर्तये । अष्टैश्वर्योपपन्नाय तत्प्रदायाश्रिताय ते ॥ ११३॥ रुद्राय सर्वसंहर्त्रे त्रिमूर्तिभ्यः पराय ते । नीललोहितरूपाय स्वेच्छाविग्रहधारिणे ॥ ११४॥ रक्षोन्मुखाय सर्वेषां विष्णवे सर्वजिष्णवे । ब्रह्मणे सृष्टि शीलाय शान्तपद्मासनाय ते ॥ ११५॥ नमः पुरुषरूपाय समष्टिव्यष्टिरूपिणे । नमः प्रकृतिरूपाय गुणत्रयमयाय ते ॥ ११६॥ विद्याकालकलारागनियत्युत्पन्नभोगिने । क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यं संसारवशवर्तिने ॥ ११७॥ आकाशाय सशब्दाय नमः श्रोत्रेन्द्रियाय च । वायवे स्पर्शयुक्ताय त्वगिन्द्रययुताय ते ॥ ११८॥ अग्नये सहरूपाय नमस्तुभ्यं च चक्षुषे । वारिणे रसयुक्ताय रसज्ञायै च ते नमः । पृथिव्यै गन्धयुक्ताय नमो घ्राणेन्द्रियाय ते ॥ ११९॥ वाक्पाण्युपस्थपाय्वङ्घ्रिकर्मेन्द्रियमयाय ते । नमोऽवयवहीनाय मनसे सञ्चलात्मने ॥ १२०॥ बुद्धयेऽध्यवसायिन्यै महत्तत्त्वात्मने नमः । अहङ्कारात्मने तुभ्यमहङ्करणधर्मिणे ॥ १२१॥ चित्ताय स्मृतिमात्राय नमस्ते विश्वरूपिणे । देहभेदाद्भवानेको ब्रह्माद्यं सचराचरम् ॥ १२२॥ तत्तद्रूपविभागेन विश्वरूपाय ते नमः । त्वया विना जगत्सर्वं न किञ्चिद्विद्यते क्वचित् ॥ १२३॥ भूतं भव्यं भविष्यच्च सर्वं त्वन्मयमेव हि । भेदाभेदस्वरूपेण संस्थिताय नमोऽस्तु ते ॥ १२४॥ इत्येवमखिलाकारैर्मुनिभिः संस्तुतः शिवः । चत्वारिंशत्सहस्रैस्तु सहस्त्रैः सार्द्धमष्टभिः । प्रसन्नस्तानुवाचेदं मेघगम्भीरया गिरा ॥ १२५॥ श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे दारुवनमुनिजनकृतशिवस्तुतिः समाप्ता । (१०७) मुनि म्हणाले- श्री शिवाला नमस्कार असो, तूं आत्मानुभवाचा उपभोग घेतोस, तुझें महत्व वाचेनें वर्णंन करितां येणें फारच प्रयासाचे आहे, तुझें यथार्थज्ञान मनास होत नाहीं, तूं मोठा आनंदी आहेस, व मोठा ज्ञानी आहेस, तूं पुढें आहेस आणि मागेही आहेस, तूं परमेश्वर आहेस, तुला नमस्कार असो. (१०८) तुझें स्वरूप श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे, तुला नमस्कार असो, तूं नादस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो, तूं बिंदुस्वरूप आहेस, तुझीं कोट्यावधि स्वरूपें आहेत, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. (१०९) तुला शिव म्हणतात, तूं शुद्ध आहेस, तूं ब्रह्मस्वरूप आहेस, तूं स्थूलात्मा आहेस, तूं ज्ञानस्वरूप आणि आनंदस्वरूप आहेस, तूं सत्यस्वरूप आहेस, तूं सर्व प्रकारच्या कार्याचें मूल कारण आहेस, तुला नमस्कार असो. (११०) तूं शांति, विद्या, निवृत्ति, आणि प्रतिष्ठा ह्यांस शक्तिस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो. तूं शक्तिस्वरूप आहेस, तूं शांत्यतीतस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो. (१११) तुला सदाशिव असें नांव आहे, तुला नमस्कार असो, तुला पांच तोंडें आहेत, तुला नमस्कार असो. तूं निष्कलस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो, तूं सकलस्वरूप आहेस त्या तुला नमस्कार असो. (११२) तूं ईश्वर आहेस, तुला नमस्कार असो, तूं साकाररूपानें दृष्टीस पडतोस तुला नमस्कार असो, तूं सर्वज्ञ असून स्वतंत्र आहेस, तूं नेहमीं तृप्त आहेस, तुला कशाचीही आशा नाहीं, तूं आनंदस्वरूप व शक्तिस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो. (११३) तूं अनादिकालापासून आहेस, तूं ज्ञानस्वरूप आहेस, तुझी शक्ति कधीही नाश पावत नाहीं, तूं प्रत्यक्ष आनंदस्वरूप आहेस. तुला अणिमा, महिमा वगैरे अष्टमहासिद्धि अनुकूल आहेत; आणि जे लोक एकनिष्ठपणानें तुझी भक्ति करितात त्यांस तूं त्या प्राप्त करून देतोस. त्या तुला नमस्कार असो. (११४) तुला रुद्र म्हणतात, तूं सर्वांचा संहार करतो तू त्रिमूर्तींपेक्षां श्रेष्ठ आहेस, तूं नीललोहितस्वरूप आहेस, तूं आपलें इच्छेप्रमाणे शरीर धारण करितोस. तुला नमस्कार असो. (११५) तूं सर्वांचे रक्षण करण्यास नेहमी तयार असतोस, तुला विष्णु म्हणतात, तूं सर्व प्राणिमात्रांस अजिंक्य आहेस. तूं ब्रह्मदेव आहेस, सृष्टि उत्पन्न करण्याचा तुझा स्वभाव आहे. तुझा स्वभाव शांत असून तूं कमलाच्या आसनावर बसतोस, तुला नमस्कार असो. (११६) तूं पुरुषस्वरूप आहेस तुझें एकरूप असून तुझीं अनेक रूपें आहेत. तूं प्रकृतिस्वरूप आहेस, तूं सत्त्वरजस्तमोगुणात्मक आहेस, तुला नमस्कार असो. (११७) तूं विद्या, काल, कला, राग, नियति(प्रारब्ध) आणि उत्पन्न ह्यांचा उपभोग घेणारा आहेस, तुला क्षेत्रज्ञ म्हणतात, तूं संसारचक्रांतही भ्रमण करितोस, तुला नमस्कार असो. (११८) तूं आकाशस्वरूप आहेस तूं शब्दस्वरूप आहेस तूं श्रोत्रस्वरूप आहेस, तूं वायुस्वरूप आहेस, तूं स्पर्शस्वरूप आणि त्वगिंद्रिय (अंगावरील त्वचा) रूप आहेस, तुला नमस्कार असो. (११९) तूं अग्निस्वरूप आहेस, रूप हें तुझा गुण आहे, तूं नेत्रस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो, तूं जलस्वरूप आहेस, रस हा तुझा गुण आहे, तूं जिव्हास्वरूप आहेस, तुला नमस्कार असो. तूं पृथ्वीस्वरूप आहेस, गंध हा तुझा गुण आहे, तूं घ्राणेंद्रियस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो. (१२०) तुं वाचा, हात, लिंग गुद, पाय वगैरे पंचकर्मेंद्रियस्वरूप आहेस, तुला अवयव नाहींत, तूं निरवयव (निराकार) आहेस. तूं मनोरूप आहेस तुझा स्वभाव फार चंचळ आहे, तुला नमस्कार असो. (१२१) तूं बुद्धिस्वरूप आहेस, तूं निश्चल करण्यासारखा आहेस, तूं महत्तत्त्वस्वरूप आहेस, तुला नमस्कार असो. तूं अहंकारस्वरूप आहेस, अहंकार हा तुझा धर्म आहे, त्या तुला नमस्कार असो. (१२२) तूं चित्तस्वरूप आहेस, तूं स्मरणस्वरूप आहेस, तूं विश्वरूप आहेस, तुला. नमस्कार असो. तूं स्वतः एकटा आहेस, तरी ब्रह्मदेवापासून तो तहत गवताच्या काडीपर्यंत तूं वेगवेगळीं रूपें घेतोस. सर्व स्थावरजंगमविश्व तुझेंच स्वरूप आहे. तुला नमस्कार असो. (१२३) त्या त्या प्रकारचें निरनिराळें रूप घेऊन तूं त्रैलोक्यास व्यापून राहिला आहेस. तुझें स्वरूप ज्यांत नाहीं अशी एकही वस्तु ह्या जगांत नाहीं. (१२४) मागें झालेलें, आतां होत असलेलें आणि पुढे होणारें सर्व कांही तुझेंच रूप आहे, तूं निराळाही आहेस, आणि एकही आहेस, अशा तऱ्हेनें राहणाऱ्या तुला नमस्कार असो. (१२५) अशा रीतीनें अनेक प्रकारचे वेष असणाऱ्या ऋषीश्वरांनी शिवाची स्तुति केली. तेव्हां अठ्ठेचाळीस हजार वर्षेपर्यंत सतत तपश्चर्या करणाऱ्या त्या मुनीश्वरांवर श्रीशिव प्रसन्न झाले, व दयाळूपणानें मेघगर्जनेसारख्या गंभीर शब्दानें त्यांस म्हणाले. (१२६) श्री शिव म्हणाले- हे तपस्वीलोकहो, तुम्ही पूर्वी अज्ञानपणाने माझे जे अपराध केलेत, ते सर्व मी सहन केले आहेत. त्यांबद्दल आता माझे मनांत काही राग राहीला नाही. तुम्ही माझ्या या आश्चर्यकारक नाचण्याची नेहमी आठवण करीत जा. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Daruvanamunijanakrita Shiva Stuti
% File name             : dAruvanamunijanakRRitashivastutiH.itx
% itxtitle              : shivastutiH dAruvanamunijanakRitA (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : dAruvanamunijanakRitashivastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org