कृष्णकृतशिवस्तुतिः

कृष्णकृतशिवस्तुतिः

कृष्ण उवाच । जयाष्टमूर्ते शिव कालकेतो जयाम्बिकाकान्त जयान्धकारे । अनन्यभक्तस्य च चारुचन्द्रचूडामणे शङ्कर मे प्रसीद ॥ ४१॥ नमोऽस्तु ते शाश्वत पुण्यराशे भूतेन्द्रियान्तःकरणैकयोने । भक्तप्रियेशाज सुरेश हंस जगत्पते नाथ विशुद्धकीर्ते ॥ ४२॥ न कारणं वेद्मि तवेश सृष्टौ संहारकार्ये च तथा न वेद्मि । आदिं न मध्य च तथैव नान्तं त्वामेकमीशं वरदं वरेण्यम् ॥ ४३॥ ब्रह्मर्षिसत्यर्षितपर्षिभिश्च श्रुतर्षिराजर्षिमहर्षिभिश्च । देवर्षिभिश्चाप्यमलस्वभावैस्संस्तूयसे त्वं च सुरेश शम्भो ॥ ४४॥ पञ्चेन्द्रियार्थश्च मनश्च कृत्स्नं ये वायवः सप्तः तथैव वह्निः । ये वा दिविष्ठाः पितरश्च देवास्तेषां परं त्वां मुनयो गृणन्ति ॥ ४५॥ श‍ृणोष्यकर्णः परिपश्यसि त्वमचक्षुरेको बहुरूपरूपः । अपादहस्तो जवनो गृहीता त्वं वेत्सि सर्वं न च सर्ववेद्यः ॥ ४६॥ यथाग्निरेको बहुधा समिध्यते विकारभेदैरविकाररूपः । तथा भवान् सर्वगतैकरूपी रूपाण्यनेकान्युपयुञ्जसीश ॥ ४७॥ यस्त्वां ध्रुवं वेत्ति विभुं गुहाशयं कविं पुराणं पुरुषं महान्तम् । हिरण्मयं वेदविदां परां गतिं स बुद्धिमान् बुद्धिमतोऽत्यतिष्ठति ॥ ४८॥ एको रुद्रस्त्वं करोषीह विश्वं त्वं पालयस्यखिलं विश्वरूप । त्वामेवान्ते विलयं विदतीदं नमामि त्वामादिदेव पुराणम् ॥ ४९॥ एको वेदो बहुशाखो ह्यनन्तस्त्वामेवैकं बोधयत्यात्मरूपम् । वेद्यं ये त्वां शरणं सम्प्रपन्नास्तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम् ॥ ५०॥ स्तुवन्ति त्वां सततं सर्वदेवा नमन्ति त्वां ऋषयः क्षीणदोषाः । शान्तात्मानः सत्यसन्धा वरिष्ठा विशन्ति त्वामेव ते ध्याननिष्ठाः ॥ ५१॥ नमो भवायास्तु भवोद्भवाय कालाय शर्वाय हराय तुभ्यम् । नमोऽस्तु रुद्राय कपर्दिने ते नमोऽग्नये देव नमः शिवाय ॥ ५२॥ चिन्मात्रमत्यन्तमनन्तशक्तिं सनातनं त्वां परमं परेभ्यः । नमाम्यतस्त्वं शरणार्थमीश प्रसीद भूताधिपते नमस्ते ॥ ५३॥ न ते गुणानां परिमाणमस्ति न तेजसो नापि बलस्य ऋद्धेः । पितेव लोकस्य चराचरस्य त्वमेव देवेश गुरुर्गरीयान् ॥ ५४॥ नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमो नमः सर्वत एव शर्व । नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमोनमस्ते ॥ ५५॥ स्त्युत्याऽनया स्तुतश्चैवं प्रोवाचेदं सुरारिहा । समालिङ्ग्य मुदा देवो देवकीकुलनन्दनम् ॥ ५६॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे कृष्णकृतशिवस्तुतिः समाप्ता । (४१) कृष्ण म्हणाला- हे शंकरा, तुझ्या आठ मूर्ति आहेत तुझा जय असो तुं यमधर्मास शिक्षा केलीस, तुझा जय असो, तूं पार्वतीचा पति आहेस तुला नमस्कार असो, तूं अंधकासुराचा शत्रु आहेस तुला नमस्कार असो, उत्तम रीतीनें शोभणारा चंद्र तुझे मस्तकावर आहे, तुला शंकर म्हणतात; मी तुझा एकनिष्ठ भक्त आहें, तूं मजवर कृपा कर. (४२) तूं चिरकाल राहणारा असून पुण्यवान आहेस तुला नमस्कार असो, परमेश्वरा, ही पंचमहाभूते, पाच कर्मेंद्रिये आणि पांच ज्ञानेंद्रियें, आणि अंतःकरण ह्या सर्वोचें तूंच मूल आहेस, परमेश्वर आहेस, तुला जन्म नाही, तू देवांचा देव आहेस, तुला हंस म्हणतात, तुझी निष्पाप कीर्ति आहे. (४३) हे करणारा परमेश्वरा तुला सृष्टि उत्पन्न करण्याचें आणि सृष्टीचा संहार करण्याचें कांहीं कारण आहे असे मला तर वाटत नाहीं, तुला जन्म नाहीं, तुला तरुणपण नाहीं, तुला मरण नाहीं, तूं एकटा आहेस, तूं ईश्वर आहेस, तूं वर देणारा आहेस, तूं श्रेष्ठ आहेस. (४४) ब्रह्मर्षि, सत्यर्षि, तपर्षि, श्रुतर्षि, राजर्षि, महर्षि आणि देवर्षि वगैरे जे निष्पाप स्वभावाचे लोक आहेत, ते सर्व लोक तुझी स्तुति करितात. शंभो तूं सर्व देवांचा मुख्य देव आहेस. (४५) हीं पांच इंद्रियें, आणि त्या त्या इंद्रियांच्या विषयाच्या वस्तु, हें मन, हे सगळे सात वायु, तसाच अग्नि आकाशांत राहणारे लोक, पितर आणि देव ह्या सर्वोपेक्षां तूं श्रेष्ठ आहेस. तुला मुनीश्वर लोक एकनिष्ठपणानें भजतात. (४६) तूं कान नसतांना ऐकतोस, तूं डोळे नसतां पाहतोस, तूं एकरूप आहेस आणि अनेकरूपही आहेस; तुला पाय नाहींत तरी तूं पळतोस, तुला हात नाहींत तरी तूं घेतोस, तुला सर्व कांहीं समजत आहे, तुला सर्ववेत्ता असें म्हणतात. (४७) एक असून जरी अग्नि निर्विकार आहे तरी त्यावर लाकडे घातलीं म्हणजे त्याला निरनिराळे विकार होऊन तो अनेक प्रकारचा झालेला दिसतो; तसा तूं परमेश्वर सर्व ठिकाणीं व्यापलेला आहेस, तरी तूं कारणपरत्वें अनेक प्रकारची रूपें घेतोस. (४८) जो कोणी पुरुष तुला तूं ध्रुव आहेस तूं समर्थ आहेस, तूं भक्तलोकांचे हृदयरूप गुहेत राहतोस, तूं ज्ञाता आहेस, तूं अनादिकालापासून आहेस, तूं पुरुष आहेस, तूं मोठा आहेस, तूं सुवर्णरूप आहेस, तूं वेद जाणणाऱ्या लोकांचा मुख्य रक्षक आहेस असे जाणतो; तो बुद्धिमान् मनुष्य ह्या सर्व जगांत जितके कांही बुद्धिमान् लोक आहेत त्या सर्वोपेक्षां मुख्य समजला जातो. (४९) तूं एकटा रुद्र आहेस, दुसरा कोणी रुद्र नाहीं, तूं स्वतः हें सर्व विश्व उत्पन्न करितोस, तूं विश्वरूप घेऊन सर्व विश्वाचें संरक्षण करितोस, आणि तुझ्यांतच शेवटीं हें सर्व जग लय पावतें; तूं आदिदेव आहेस तूं अनादिकालापासून आहेस. (५०) वेद हा एकच आहे तरी त्याच्या शाखा पुष्कळ आहेत, त्याचा अंत लागत नाहीं, असें जरी आहे, तरी तो देखील असें म्हणतो कीं, तूंच (महादेवच) आत्मस्वरूप आहेस, तुझेच यथार्थ ज्ञान झालें पाहिजे, जाणून घेण्यासारखा तूंच आहेस. त्या तुला जे लोक शरण येतात, त्यांसच चिरकाल राहणारी शांति मिळते; इतरांस मिळत नाहीं. (५१) तुझी सर्व देव नेहमीं स्तुति करितात, निष्पाप स्वभावाचे ऋषीश्वर तुला नेहमीं नमस्कार करितात, ज्यांचे मन शांत आहे जे कोणी नेहमी खरेंच बोलतात, जे लोक श्रेष्ठ आहेत, जे लोक नेहमीं तुझेंच ध्यान करितात ते सर्व तुझ्याच रूपाला येऊन मिळतात. (५२) तुला भव म्हणतात, भवोद्भव म्हणतात, तशींच काल, शर्व, हर, रुद्र, कपर्दी, अग्नि, देव आणि शिव अशीं तुला अनेक नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (५३) तूं चित्स्वरूप आहेस (तूं चैतन्यस्वरूप आहेस), तुला अंत नाहीं, तुझी शक्ति अमर्याद आहे, तूं अनादिकालापासून आहेस, जगांत ज्या श्रेष्ठ वस्तु आहेत त्या सर्वोपेक्षां तूं श्रेष्ठ आहेस, मी तुला नमस्कार करितों, मी तुला शरण आलों आहे, परमेश्वरा, तूं मजवर कृपा कर. तूं प्राणिमात्रांचा अधिपति आहेस तुला नमस्कार असो. (५४) तुझ्या गुणांचा अंत लागत नाहीं, ते असंख्य आहेत, तुझ्या तेजाचा अंत लागत नाहीं, तुझ्या शक्तीचा अंत लागत नाहीं, तुझ्या ऐश्वर्याचा अंत लागत नाहीं. तूं ह्या सर्व स्थावर जंगमम विश्वाचा आईबापच आहेस; हे देवाधिदेवा, परमेश्वरा, तूं सर्व त्रैलोक्याचा मुख्य गुरु आहेस. (५५) तूं पुढें आहेस तुला नमस्कार असो, तूं मागें आहेस तुला नमस्कार असो, श्रीशिवा, तूं चोहोंकडे व्यापलेला आहेस. तुला नमस्कार असो, तुला हजारवेळां नमस्कार असो, पुनःही आणखी वारं वार तुला नमस्कार असो. (५६) अशा तऱ्हेनें श्रीकृष्णानें शिवाची मनोभावानें स्तुति केल्यावर दैत्यांचा नाश करणारे श्रीशिव संतोषानें देवकीच्या पोटी जन्मास येऊन सर्व वंशास आनंद देणाऱ्या श्रीकृष्णास कडकडून भेटून म्हणाले. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Krishnakrita Shiva Stuti
% File name             : kRRiShNakRRitashivastutiH.itx
% itxtitle              : shivastutiH kRiShNakRitA (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : kRiShNakRitashivastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org