नारायणकृत महेशस्तवनम्

नारायणकृत महेशस्तवनम्

विष्णुरुवाच । महेश्वराय देवाय नमस्ते परमात्मने । नारायणाय शर्वाय ब्रह्मणे ब्रह्मरूपिणे ॥ ३३॥ एवं स्तुत्वा महादेवं दण्डवत्प्रणिपत्य च । जजाप रुद्रं भगवान् कोटिवारं जले स्थितः । देवाश्च सर्वे देवेशं तुष्टुवुः परमेश्वरम् ॥ ३४॥ देवा ऊचुः ॥ नमस्सर्वात्मने तुभ्यं शङ्करायार्तिहारिणे । रुद्राय नीलरुद्राय कद्रुदाय प्रचेतसे ॥ ३५॥ गतिर्नः सर्वदास्माभिर्वन्द्यो देवारिमर्दनः । त्वमनादिस्त्वमादिस्त्वमनन्तश्चाक्षयः प्रभुः ॥ ३६॥ प्रकृतिः पुरुषः साक्षात्स्स्रष्टा हर्ता जगद्गुरो । वरदो वाङ्ममयो वाच्यो वाच्यवाचकवर्जितः ॥ ३७॥ वाच्यो मुक्त्यर्थमीशानो योगिभिर्योगवित्तमैः । हृत्पुण्डरीकसुषिरे योगिनां संस्थितः सदा ॥ ३८॥ वदन्ति सूरयः सन्तं परब्रह्मस्वरूपिणम् । भवन्तं तत्त्वमित्याद्यं तेजोराशिं परात्परम् ॥ ३९॥ परमात्मानमित्याहुरस्मिन्जगति यत्प्रभो । दृष्टं श्रुतं स्थितं सर्वं जायमानं जगद्गुरो । अणोरल्पतरं प्राहुर्महतोऽपि महत्तरम् ॥॥ ४०॥ सर्वतः पाणिपादं त्वां सर्वतोऽक्षिशिरोमुखम् । महादेवमनिर्देश्यं सर्वज्ञं त्वामनामयम् ॥ ४१॥ विश्वरूपं विरूपाक्षं सदाशिवमनुत्तमम् । कोटिभास्करसङ्काशं कोटिशीतांशुसन्निभम् ॥ ४२॥ कोटिकालाग्निसङ्काशं षड्र्विंशकमनीश्वरम् । प्रवर्तकं जगत्यस्मिन्प्रकृतेः प्रपितामहम् ॥ ४३॥ वदन्ति वरदं देवं सर्वा वाचः स्वयम्भुवः । श्रुतयः श्रुतिसारं त्वां श्रुतिसारविदश्च ये ॥ ४४॥ वृत्तम् । अदृष्टमस्माभिरनेकमूर्तं विनिर्मितं यद्भवता त्रिलोके । त्वमेव दैत्यासुरभूसुराश्च देवा नराः स्थावरजङ्गमाश्च ॥ ४५॥ पाहि नान्या गतिः शम्भो विनिहत्यासुरान् क्षणात् । मायया मोहिताः सर्वे भवतः परमेश्वर ॥ ४६॥ वृत्तम् । यथा तरङ्गाः शफरीसमूहाद्युध्यन्ति चान्योन्यमपान्निधौ तु । जडास्त्वया देव जडीकृताश्च सुरासुरास्त्वय्यजेश शर्व ॥ ४७॥ स्तुतस्त्वेवं सुरेन्द्राद्यैर्विष्णोर्जप्येन चेश्वरः । सोमश्चोमामथालिङ्ग्य नन्दिदत्तकरः स्मयन् । प्राह गम्भीरया वाचा देवानालोक्य शङ्करः ॥ ४८॥ शिव उवाच ॥ ज्ञातं मयेदमधुना देवकार्यं सुरेश्वराः । पुरत्रयविनाशाय करिष्येऽहमिहोद्यमम् ॥ ४९॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे नारायणकृत महेशस्तवनं सम्पूर्णम् । (३३) विष्णु म्हणाले- हे परमेश्वरा, तूं सर्व देवांचा देव आहेस. तूं परमात्मा आहेस, तुला नारायण म्हणतात, शर्व म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात, तूं ब्रह्मस्वरूप आहेस. (३४) विष्णूंनीं अशी महादेवाची स्तुति करून महादेवापुढें साष्टांग नमस्कार घातला, व पाण्यांत उभे राहून एक कोटि वेळ त्यांनीं रुद्रमंत्राचा जप केला. सर्व देवही श्रीविष्णूप्रमाणेंच शिवाची स्तुति करूं लागले. (३५) देव म्हणाले- हे परमेश्वरा, तूं सर्वांतर्यामी आहेस, तूं लोकांचे कल्याण करणारा आहे. तूं लोकांची दुःखें दूर करितोस. तुला रुद्र म्हणतात, नीलरुद्र म्हणतात, कद्रुद्र म्हणतात, आणि प्रचेता म्हणतात. त्या तुला नमस्कार असो. (३६) हे परमेश्वरा, तूंच सर्वथैव आमचा रक्षक आहेस, तूं आह्मांस वंद्य (नमस्कार करण्यास योग्य) आहेस, तूं देवांशीं द्वेषभावानें वागणाऱ्या दैत्यांचा नाश करितोस, तुला जन्म नाहीं, तूं सर्व त्रैलोक्याच्या आधींपासून आहेस, तुला मरण नाहीं, तुला क्षय नाहीं, तूं समर्थ आहेस, तुला नमस्कार असो. (३७) हे त्रैलोक्याधिपते, प्रकृतिही तूंच आहेस, पुरुषही तूंच आहेस, तूं प्रत्यक्ष ब्रह्मदेव आहेस, तूंच जगाचा संहार करितोस. तूं वर देणारा आहेस, तूं वाङ्मय (वाक्स्वरूप) आहेस. तूं वाच्य (वर्णन करितां येण्यासारखा) आहेस, तूं वाच्यवाचकाव्यतिरिक्त आहेस. (तूं वाच्य नाहींस व वाचकही नाहींस) (३८) योगशास्त्र जाणणारे योगीश्वर लोक तुला मोक्षसाधनाचें मूळ असें मानतात. तूं ईशान आहेस, तूं नेहमी योगीश्वराच्या हृदयकमलाच्या मध्यभागीं राहतोस. (३९) तूं परब्रह्म. स्वरूप आहेस, विद्वान् लोक तूं आद्यतत्त्व (मुख्यतत्त्व) आहेस असें मानतात, तूं सज्जन आहेस. तूं अतिशय तेजस्वी आहेस, आणि तूं श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. (४०) प्रभो, तुला ह्या जगांत सर्व लोक परमात्मा असें म्हणतात. हें त्रैलोक्यपते ईश्वरा, आम्ही जें जें ऐकिलें, व जे जे पाहिलें, व पृथ्वीमध्यें जे जे कांहीं होत आहे, तें तें सर्वं तुझेंच स्वरूप आहे. तूं अतिशय लहान पदार्थाहूनही लहान आहेस. आणि अतिशय मोठ्या पदार्थाहून मोठा आहेस. (४१) तुला चोहोंकडे पाय व हात आहेत. तुला चोहोंकडे डोळे मस्तकें आणि तोंडे आहेत. तुला महादेव म्हणतात. तुझें स्वरूप अमुक प्रकारचें आहे असे सांगतां येत नाहीं. तू सर्वज्ञ आहेस, तुला कोणत्याही प्रकारचा रोग नाहीं. (४२) तूं विश्वस्वरूप आहेस, तुला विरूपाक्ष म्हणतात, तुला सदाशिव म्हणतात, तूं सर्वांपेक्षां श्रेष्ठ आहेस. कोटि सूर्यासारखें तुझें तेज आहे. तसाच तूं कोटि चंद्रांसारखा शांत आहेस. (४३) तूं कोटि प्रलयाग्नीसारखा प्रखर आहेस. तूं सव्वीस तत्त्वस्वरूप आहेस. तुला कोणी ईश्वर नाहीं, तूंच सर्वांचा ईश्वर आहेस. जगामध्ये ज्या कांहीं गोष्टी घडत आहेत त्या सर्वांचा तूंच प्रवर्तक आहेस. तूं प्रकृतीचा आजा आहेस. (४४) ब्रह्मदेवाच्या सर्व वाणी, तूं वर देणारा परमेश्वर आहेस, असे म्हणतात, वेदाचा तात्पर्यार्थ जाणणारे ज्ञाते लोक, तूं वेदाचा तात्पर्यार्थ आहेस, असें म्हणतात. (४५) हे परमेश्वरा, तुझीं अनेक स्वरूपें आहेत. तीं त्रैलोक्यांत कोठें कोठें आणि कशीं कशीं आहेत हें आम्ही पाहिलेंही नाहीं. दैत्य, देव, ब्राह्मण हे सर्व तूंच आहेस, देव मनुष्य, व स्थावर जंगम जितके प्राणी आहेत तितके सर्व, तुझीच स्वरूप आहेत. (४६) हे परमेश्वरा, तूं आमचें रक्षण कर. तुजखेरीज आमचे रक्षण करणारा दुसरा कोणी नाहीं. तूं अगोदर ह्या दैत्यांस मारून आमचें रक्षण कर. हे परमेश्वरा, आह्मी सर्वजण तुझ्या मायेनें भुलून गेलो आहों (अज्ञान झालों आहों). (४७) ज्याप्रमाणे समुद्रांत उसळणाऱ्या लाटांबरोबरच सुसरी टकरा मारितात, त्याप्रमाणें ईश्वरा, तुझ्या मायेमुळें अज्ञान दशा पावलेले हे देव दैत्य आपापसांत भांडत आहेत. तूं पार्वतीचा पति असून तुला शर्व म्हणतात. तुं आमचें सर्व दुःखांपासून रक्षण कर. (४८) अशी सर्व देवांची स्तुति ऐकून शंकर प्रकट झाले, आणि पार्वतीस बरोबर घेऊन व नंदिकेश्वराच्या खांद्यावर हात ठेवून हंसत हसत सर्व देवांकडे पाहून त्यांस गंभीरस्वरानें म्हणाले, (४९) शिव म्हणाले, हे देवश्रेष्ठहो, तुमचे कार्य काय आहे, हे मला समजून चुकले. आता तुम्ही चिंता करू नका. मी आता त्रिपुरांचा नाश करण्याचा यत्न करितो Proofread by Manish Gavkar
% Text title            : Narayanakrita Maheshastavanam
% File name             : nArAyaNakRRitamaheshastavanam.itx
% itxtitle              : maheshastavanam  nArAyaNakRitam (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : nArAyaNakRitamaheshastavanam
% Category              : shiva, vIrashaiva
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org