शरभप्रार्थना

शरभप्रार्थना

नृसिंहप्रोक्ता पुनस्तं पार्थयामास नृसिंहः शरभेश्वरम् ॥ ११२॥ नृसिंह उवाच यदा यदा ममाज्ञानमत्यहङ्कारदूषितम् । तदा तदा पनोत्तव्यं त्वयैव परमेश्वर ॥ ११३॥ एवं विज्ञाप्य सव्रीडः शङ्करं नरकेसरी । ततः सन्त्यक्तवान् विष्णुर्जीवितं स्वापराधतः ॥ ११४॥ तद्वक्त्रशेषं तद्गात्रं हृत्वा शरभविग्रहः । अतीन्द्वियत्वमगमद्वीरभद्रःक्षणात्ततः ॥ ११५॥ देवा ऊचुः । अद्य ब्रह्मादयः सर्वे वीरभद्र त्वदौजसः । जीविताःस्मो वयं देव पर्जन्येनैव पादपाः ॥ ११६॥ यस्माद्भीषा दहत्यग्निरुदेति च रविः शशी । वातो वाति तु सोऽसि त्वं मृत्युर्धावति पञ्चमः ॥ ११७॥ यदव्यक्तं परं व्योम कालातीतं सदाशिवम् । भवन्तमेव भगवन् वदन्ति ब्रह्मवादिनः ॥ ११८॥ के वयं तव माहात्म्यवेदने परमेश्वर । नाधिक्रियेरन् जात्यन्धा रूपलावण्यवर्णने ॥ ११९॥ उपसर्गेषु सर्वेषु त्रातुमस्मान्गणाधिप । एकादशात्मा भगवन् वर्तसे कृपया हर ॥ १२०॥ ईदृशान्यवताराणि दृष्ट्वाऽपि बहुशस्तव । कदाचित्त्वां न जानीमो वञ्चितास्तव मायया ॥ १२१॥ गुञ्जाभिरिव रत्नानि तव रूपाणि सर्वदा । अस्माभिः सह गण्यन्ते तत्क्षन्तव्यं परात्पर ॥ १२२॥ द्वे तनू तव रूपस्य वेदज्ञा ब्राह्मणा विदुः । घोराप्यन्या शिवाप्यन्या ते प्रत्येकमनेकधा ॥ १२३॥ घोरा तनूस्तव ब्रह्मा सूर्यो विष्णुर्हुताशनः । तथेतरा तनुः शम्भो आपो धर्मश्च चन्द्रमाः ॥ १२४॥ उभाभ्यां पाहि भगवन् भीतिभ्योऽस्मान्महाबल । भवता हि जगत्सर्वं व्याप्तं स्वेनैव तेजसा ॥ १२५॥ ब्रह्मविष्ण्वर्कशक्राग्निजलधर्मपुरोगमाः । सुरासुराः सम्प्रसूतास्त्वत्तः सर्वे महेश्वर ॥ १२६॥ ब्रह्माणमिन्द्रं विष्णुं च यममन्यान्सुरासुरान् । यतो निगृह्य हरसि हर इत्युच्यसे ततः ॥ १२७॥ यतो विभर्षि सकलं विभज्य तनुमष्टधा । अतोऽस्मान्पाहि भगवन् प्रसीद च पुनःपुनः ॥ १२८॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे शरभप्रार्थना समाप्ता । आणि पुनः तो नृसिंह शरभाची प्रार्थना करूं लागला. (११३) नृसिंह म्हणाला- हे परमेश्वरा, जेव्हां जेव्हां माझ्या बुद्धीला भ्रम पाडणारें अज्ञान माझ्या अंगात येत जाईल, तेव्हां तेव्हां परमेश्वरा तूंच तें दूर केलें पाहिजेस. (११४) अशी शंकराची विनंति करून आणि आपल्या अपराधामुळे फारच लाजून त्या नृसिंहाचें स्वरूप घेतलेल्या श्रीविष्णूनें आपला प्राण सोडिला. (११५) मग शरभरूप घेणारा वीरभद्रही त्या नृसिंहाच्या डोकीचा भाग आणि त्याचे अंगावरील कातडें घेऊन तत्काळ सौम्य स्वरूपाचा झाला. (११६) तेव्हां देव म्हणाले- हे पराक्रमी वीरभद्रा, तुझ्या सामर्थ्यामुळे आम्ही ब्रह्मदेव वगैरे सर्व देव, पावसामुळे जशीं झाडें सुरक्षित रहावी, तसे सुरक्षित (जिवंत) राहिलों. (११७) ज्या परमेश्वराच्या सामर्थ्यानें अग्नीच्या अंगी जाळण्याची शक्ति आहे, ज्याच्या सामर्थ्यानें सूर्य व चंद्र उगवतात, ज्याच्या आज्ञेनें वारा वाहतो, व ज्याचे आज्ञेत मृत्यु वागतो, तो तूं आहेस. (११८) हे परमेश्वरा, तुलाच ब्रह्मवेत्तेलोक अव्यक्त (प्रकट न दिसणारा), पराकाश, कालातीत (काळाची शक्ति ज्यावर चालत नाहीं असा), आणि सदाशिव असे म्हणतात. (११९) हे परमेश्वरा, तुझें माहात्म्य यथार्थरीतीनें वर्णन करावयाची आमची काय शक्ति आहे? जे लोक जन्मापासून आंधळे आहेत, त्यांच्या हातून सौंदर्याचें यथार्थ वर्णन कसें होईल? (१२०) हे वीरभद्र गणेश्वरा, श्रीशिवा, आम्हावर हरएक प्रकारची संकटे आलीं असतां, त्या सर्व संकटांतून आम्हास सोडविण्यासाठीं अकरा रुद्रांची रूपें घेऊन तूं नेहमीं सिद्ध असतोस. (१२१) अशा प्रकारचे तुझे अवतार आजपर्यंत आम्ही अनेक वेळ पाहिले आहेत, तरी पण तुझ्या मायेमुळें आम्ही अज्ञान झालों असल्यामुळे तुझें स्वरूप एक वेळ देखील आम्हांस यथार्थ रीतीनें ओळखतां येत नाहीं. (१२२) हे परमेश्वरा, तूं श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस; जसा एखादा जवाहि-या एका ताजव्यांत गुंजा आणि एका ताजव्यांत रत्ने घालून त्यांचे वजन करितो, तसें अज्ञानपणानें इतर लोक तुला आणि आम्हांला सारखेच समजतात; त्या अपराधाची क्षमा कर. गुंजांची आणि रत्नांची योग्यता जशी सारखी नाहीं तशीच तुझी आमची योग्यता सारखी नाहीं. (१२३) हे परमेश्वरा, तुझीं दोन प्रकारचीं शरीरें आहेत, तीं शरीरें वेद जाणणारे ब्राह्मण जाणतात; त्यांपैकी एका शरीरास ``घोरा'' असें म्हणतात; आणि दुसऱ्या शरीरास ``शिवा` असें म्हणतात; त्या प्रत्येकाचे पुष्कळ भेद होतात. (१२४) हे परमेश्वरा, तुझी घोरा तनु म्हटली तर ब्रह्मदेव, विष्णु, सूर्य आणि अग्नि हे होत, आणि शिवा तनु झटली तर जल, धर्म आणि चंद्र हे होत. (१२५) हे परमेश्वरा, तूं मोठा पराक्रमी आहेस, तूं ह्या दोन प्रकारच्या शरीरांनी आमचें सर्व संकटांपासून रक्षण कर. तूं आपल्या स्वतःच्या तेजानें सर्व जग व्यापून टाकिलें आहेस. (१२६) ब्रह्मदेव, विष्णु, सूर्य, इंद्र, अग्नि, जल आणि धर्म वगैरे मुख्य मुख्य देव, आणि बाकीचे सर्व देव दैत्य, तुझ्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. तूं सर्व देवांचा मुख्य देव आहेस. (१२७) तूं ब्रह्मदेव, इंद्र, विष्णु, यम आणि दुसरे सर्व देव दैत्य ह्यांस शिक्षा करून त्यांस आपल्या ताब्यांत ठेवितोस; म्हणून तुला हर म्हणतात. (१२८) तूं आपलें शरीर आठ प्रकारांनीं विभागून सर्व जग धारण करितोस, त्यामुळे तुला अष्टमूर्ति असें म्हणतात. तूं आमचें रक्षण कर, अशी परमेश्वरा, आम्ही वरचेवर तुला विनंती करितो. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Sharabha Prarthana
% File name             : sharabhaprArthanA.itx
% itxtitle              : sharabhaprArthanA (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : sharabhaprArthanA
% Category              : shiva, vIrashaiva
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org