शरभेश्वराष्टोत्तरशतनामस्तोत्रम्

शरभेश्वराष्टोत्तरशतनामस्तोत्रम्

वीरशैवस्तोत्राणि द्वितीयो भागः ॥ अध्यायः १७। ९४-१११ नृसिंह उवाच । ॐ नमो रुद्राय रौद्राय महाग्रासाय जिष्णवे । नम उग्राय भीमाय नमः क्रुद्धाय मन्यवे ॥ १॥ नमो भवाय शर्वाय शङ्कराय शिवाय ते । कालाय कालकालाय महाकालाय मृत्यवे ॥ २॥ वीराय वीरभद्राय क्षयद्वीराय शूलिने । महादेवाय महते पशूनां पतये नमः ॥ ३॥ एकाय नीलकण्ठाय श्रीकण्ठाय पिनाकिने । नमोऽनन्ताय सूक्ष्माय नमस्ते मृत्युमृत्यवे ॥ ४॥ पराय परमेशाय परात्परतराय ते । परापराय विश्वाय नमस्ते विश्वमूर्तये ॥ ५॥ नमो विष्णुकलत्राय विष्णुक्षेत्राय भानवे । भैरवाय शरण्याय महाभैरवरूपिणे ॥ ६॥ नमो नृसिंहसंहर्त्रे कालकालपुरारये । नमः पाशौघसंहर्त्रे विष्णुमायान्तकारिणे ॥ ७॥ त्र्यम्बकाय त्रियक्षाय शिपिविष्टाय मीढुषे । मृत्युञ्जयाय शर्वाय सर्वज्ञाय मखारये ॥ ८॥ खखोल्काय वरेण्याय नमस्ते वह्नि रेतसे । महाप्राणाय जीवाय प्राणापानप्रवर्तिने ॥ ९॥ त्रिगुणाय त्रिशूलाय गुणातीताय योगिने । संसारयन्त्रवाहाय महायन्त्रप्रवर्तिने ॥ १०॥ नमश्चिद्व्योमसूर्याय मूर्तिवैचित्र्यहेतवे । वरदाय विकाराय सर्वकारणहेतवे ॥ ११॥ कपालिने करालाय पतये पुण्यमूर्तये । अघोरायाग्निनेत्राय अकुलीशाय शम्भवे ॥ १२॥ भिषक्तमाय चण्डाय दण्डिने घोररूपिणे । मेघवाहाय देवाय पार्वतीपतये नमः ॥ १३॥ अव्यक्ताय विशोकाय स्थिराय स्थिरधन्विने । स्थाणवे कृत्तिवासाय नमः पञ्चार्थहेतवे ॥ १४॥ विरजायैकपादाय नमश्चन्द्रार्धमौलये । नमस्तेऽध्वरराजाय वचसां पतये नमः ॥ १५॥ योगीश्वराय सत्याय नित्याय परमात्मने । सर्वात्मने नमस्तुभ्यं नमः सर्वेश्वराय ते ॥ १६॥ एकद्वित्रिचतुश्पञ्चकृत्वस्ते च नमो नमः । दशकृत्वः शतकृत्वः आसहस्रं नमो नमः ॥ १७॥ नमो परिमितं कृत्वोऽनन्तकृत्वो नमो नमः । नमो नमो नमो भूयः पुनर्भूयो नमो नमः ॥ १८॥ सूत उवाच । नामाष्टकशतेनैवं स्तुत्वाऽमृतमयेने तु ॥ १९॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे नृसिंहप्रोक्तं शरभेश्वराष्टोत्तरशतनामस्तोत्रं सम्पूर्णम् । सार्थ मराठी - (१) नृसिंह म्हणाला- तूं रुद्र आहेस. तुझां स्वभाव फार रागीट आहे, तुझा अधिकार फार मोठा आहे, तूं सर्वांस अजिंक्य आहेस, तुला नमस्कार असो. तुला उग्र, भीम, क्रुद्ध, मन्यु अशीं अनेक नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (२) तुला भव, शर्व, शंकर, शिव, काल, कालकाल, महाकाल आणि मृत्यु अशी अनेक नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (३) तुला वीर, वीरभद्र, क्षयद्वीर, शूली, महादेव, महान् पशूंचा अधिपति, अशी अनेक नांवें आहेत. त्या तुला नमस्कार असो. (४) तूं एक आहेस. तुला नीलकंठ म्हणतात, श्रीकंठ म्हणतात, अनंत म्हणतात, सूक्ष्म म्हणतात, मृत्युमृत्यु असें म्हणतात, त्या तुला नमस्कार असो. (५) तूं पर आहेस, परमेश्वर आहेस, पराहूनही फारच श्रेष्ठ आहेस, तूं परापर आहेस, तूं विश्व असून विश्वमूर्ति आहेस, त्या तुला नमस्कार असो. (६) विष्णु हा तुझी स्त्री आहे, विष्णु हा तुझें क्षेत्र आहे, तुला भानु, भैरव आणि शरण्य अशी अनेक नांवें आहेत, तूं महाभैरवस्वरूप आहेस, त्या तुला नमस्कार असो. (७) तूं नृसिंहाचा संहार करणारा आहेस, तूं कालाचा काल असून त्रिपुरांचा शत्रु आहेस. तूं यमाचा नाश केलास, व तूं विष्णूच्या मायेचा नाश करणारा आहेस. (८) तुला त्रियंबक, त्रियक्ष, शिपिविष्ट, मीढुष, मृत्युंजय, शर्व, सर्वज्ञ, मखारि (दक्ष यज्ञाचा विध्वंस करणारा), अशा अनेक नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (९) तूं आकाशांतील एक तेजस्वी ग्रह आहेस, तूं वरेण्य आहेस, अग्नि हा तुझें रेत आहे, तूं महाप्राण आहेस, तुला जीव म्हणतात, तूंच प्राण आणि अपानवायूस चालण्याची शक्ति देतोस, तूं त्या तुला नमस्कार असो. (१०) तू सत्त्वरजस्तमोगुणस्वरूप आहेस, तुझ्या हातांत त्रिशूल आहे, तूं त्रिगुणांहूनही पलीकडे आहेस. तूं योगी आहेस, तूं संसाररूप चक्राचा चालक असून महायंत्राचा प्रवर्तक आहेस. (११) तूं चैतन्यरूप आकाशांतील सूर्य आहेस, तूं अनेक तऱ्हेचे स्वभाव (मूर्ति) करण्यास मूलकारण आहेस, तूं वर देणारा आहेस, तूं विकारी (देहधारण करणारा) आहेस, तूं सर्व कारणाला मूलकारण आहेस, त्या तुला नमस्कार असो. (१२) तुला कपाली म्हणतात, तुला कराल म्हणतात, तुला पति म्हणतात, तूं पुण्यमूर्ति आहेस, तूं शांत स्वरूपाचा आहेस, तुझ्या तिसऱ्या डोळ्यांत अग्नि आहे, ज्यांस कुल नाहीं अशा योगीजनांचा तूं ईश्वर आहेस, तुला शंभु म्हणतात, त्या तुला नमस्कार असो. (१३) तूं उत्तम वैद्य आहेस, तुला चंड (अतिशय रागीट) म्हणतात, तुझ्या हातांत दंड आहे, तुझें स्वरूप भयंकर आहे, मेघ हा तुझें वाहंन आहे, तूं परमेश्वर आहेस, आणि पार्वतीचा पति आहेस. (१४) तुं अव्यक्त (गुप्त) आहेस तूं शोकरहित आहेस, तूं स्थिर आहेस, तुला स्थिरघन्वा म्हणतात (तुझ्या धनुष्यांस सर्वत्र विजय मिळत असल्याने त्याची धांदल कधी होत नाही), तुला स्थाणु म्हणतात, तुझे अंगावर हत्तीचें कातडे आहे, तूं सृष्टि, स्थितिलय (संहार), तिरोधान, आणि अनुग्रह ह्या पांच अर्थांचा मूल कारण आहेस. (१५) तूं निर्दोष आहेस, तुला एकपाद म्हणतात, तुझ्या मस्तकावर अर्धचंद्र आहे, त्या तुला नमस्कार असो. तूं यज्ञाचा अधिपति आहेस, तूं वाणींचा अधिपति आहेस त्या तुला नमस्कार असो. (१६) तूं योगीलोकांचा ईश्वर आहेस, तुला सत्य म्हणतात, नित्य म्हणतात, परमात्मा म्हणतात, तूं सर्वात्मा आहेस, तूं सर्वांचा ईश्वर आहेस, त्या तुला नमस्कार असो. (१७) एक वेळ, दोन वेळ, तीन वेळ, चार वेळ, पांच वेळ तुला नमस्कार असो, शंभर वेळापासून एक हजार वेळांपर्यंत तुला वरचेवर नमस्कार असो. (१८) तुला संख्या मोजून नमस्कार असोत, आणि असंख्य नमस्कार असोत, तुला वरचेंवर नमस्कार असोत, आणखी पुनः नमस्कार असोत. (१९) सूत म्हणतात- ऋषीश्वरहो, ह्याप्रमाणें कोळम आणि अमृताप्रमाणें मधुर शब्दांनीं एकशें आठ नांवांनीं नृसिंहानें शरभेश्वराची स्तुति केली; An alternative text compiled from लिङपुराणम्, आकाशभैरवकल्पम्,वीरमाहेश्वराचारसङ्ग्रः is given below ॥ इति नृसिंहकृतं शरभसहस्रनामस्तोत्रम् ॥ - ॥ लिङपुराणम् । पूर्वभागः । अध्यायः ९६। ७६-९४ ॥ - ॥ आकाशभैरवकल्पम् । अध्यायः ७९॥ - ॥ वीरमाहेश्वराचारसङ्ग्रः । द्वितीयभागः । अध्यायः १७। ९४-१११ ॥ Notes: sharabheshvaraShTottarashatanAmastotram appears as nR^isimha uvAcha in li~NgapurANam (vedavyAsa) and texts including AkAshabhairavakalpam, vIramAheshvarAchArasaMgrahaH etc. See sharabhastotram for an alternative version with studied variations. The shlokas have been re-numbered adapting to the core stotram flow. The phalashruti amongst these texts differs in length (and hence in description). Readers may visit the respective texts for referring to the required preceding (viniyoga, dhyanam etc) and concluding (phalashruti etc.) parts. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Sharabheshvar Ashtottarashata Nama Stotram
% File name             : sharabheshvarAShTottarashatanAmastotram.itx
% itxtitle              : sharabheshvarAShTottarashatanAmastotram (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : sharabheshvarAShTottarashatanAmastotram
% Category              : shiva, vIrashaiva, aShTottarashatanAma
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning.  See corresponding nAmAvalI
% Indexextra            : (Scans 1*, 2, 3, 4, nAmAvaliH, alternative)
% Latest update         : March 11, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org