विष्णुकृतशिवस्तुतिः

विष्णुकृतशिवस्तुतिः

विष्णुरुवाच । प्रसीद भगवन्मह्यमहङ्काररतात्मने । त्वयि विस्मृतचित्ताय निर्वीर्यायाल्पचक्षुषे ॥ ३०॥ प्रसीद जन्ममरणजराशोकोर्मिसङ्कुले । अगाधे भवसिन्धौ मे पतितस्य महेश्वर ॥ ३१॥ रागद्वेषमदक्रोधलोभमोहमहाग्रहैः । प्रसीद मे गृहीतस्य सर्वसर्वेश्वरामल ॥ ३२॥ प्रसीद क्षान्तविक्षेपाक्षिप्तांवाचित्त शङ्कर । त्र्यक्षाद्य चाक्षिजाताशुशुक्षणिक्षपिताङ्गज ॥ ३३॥ प्रसीद सितसंसिक्तभसितालिप्तविग्रह । ससिताङ्गासितग्रीव सुसितोक्षगतिप्रिय ॥ ३४॥ प्रसीदाम्बालतालिङ्गिताभीष्टसुरभूरुह । अम्बाकररुहाग्रात्त लेखाभूषणभूषित ॥ ३५॥ प्रसीद मे महाकाल कालकोमलकन्धर । आलीजनप्रियालील मायालम्बितविग्रह ॥ ३६॥ प्रसीदापिङ्गदीर्घान्तजटाविवृतपश्चिम । पिङ्गाक्षाक्षर यक्षेष्ट माङ्गल्यालय माधव ॥ ३७॥ प्रसीदाम्बालोचनाब्जप्रबोधकरभास्कर । गङ्गाभूषण चन्द्रार्धखण्डमण्डितमस्तक ॥ ३८॥ प्रसीद योगिध्येयाद्यज्ञानरूपमहेश्वर । महामहिम मायाविन् महादेव महेश्वर ॥ ३९॥ नमस्ते कोटिसूर्याभतेजसे भुवनेश्वर । ब्रह्मादिदेवसङ्गीतपुण्यकीर्ते प्रजार्चित ॥ ४०॥ तरुणादित्यसङ्काश करुणाकर शङ्कर । शरणं भव मे भो त्वं मरणार्ति विनाशन ॥ ४१॥ परमेश्वर पद्माक्ष पुरशासन पूरुष । नमस्ते नाकनाथार्चिताङ्घ्रिपङ्कज केशव ॥ ४२॥ नमो हिरण्यकेशाय शोचिष्केशाय धीमते । नमस्ते शिपिविष्टाय पृश्निगर्भाय मन्यवे ॥ ४३॥ उमाकुचाग्रसम्मर्दकुङ्कुमारुणवक्षसे । सुवर्णायादिदेवाय देवगर्भाय वेधसे ॥ ४४॥ सुद्युम्नायादिकवये ब्रह्मगर्भाय मन्यवे । सुशुचे भ्राजसे देव नमस्ते तिग्म रोचिषे ॥ ४५॥ भूतनाथाय कालाय सृष्टिसंहारकारिणे । सुवर्त्मने विशुद्धाय कृष्णायामिततेजसे ॥ ४६॥ नमः शिवाय रुद्राय नीलकण्ठाय भूयसे । दिगम्बराय साम्बाय त्र्यम्बकायादिचक्रिणे ॥ ४७॥ नमो वामाय घोराय सद्याय पुरुषाय च । ईशानाय च शान्ताय शाश्वतायान्तकारिणे ॥ ४८॥ भक्तार्तिभेदिने भुक्तिमुक्तिदायादिवेदिने । वेदवेद्याद्यविद्याय धरामायाविनोदिने ॥ ४९॥ माङ्गल्यदायिने नित्यं माङ्गल्याय त्रिशूलिने । निराशिषे नमस्तुभ्यमाशिषां पतये नमः ॥ ५०॥ धर्माय भक्तवर्माय सर्वकर्मैकसाक्षिणे । नमस्ते नरसिंहारे नरकारे नरेश्वर ॥ ५१॥ पञ्चपञ्च कनिष्पञ्च सचराचरपञ्चक । खेचराचाररहित दुराचारापहारिणे ॥ ५२॥ सर्वज्ञाय विशिष्टाय सर्वाभिष्टुतकर्मणे । सर्वसार नमस्तेऽस्तु सर्वेश्वर सदाशिव ॥ ५३॥ सर्वाधार महायोगिन् योगगम्य पुरुष्टुत । योगाधार निराधार धराधर नमोऽस्तु ते ॥ ५४॥ अनाथाय विनाथाय नाथनाथाय शूलिने । नमोऽस्त्वनाथनाथाय सोमनाथाय शम्भवे ॥ ५५॥ नमस्ते ब्रह्मकेशाय विष्णुनेत्राय शोचिषे । सूर्योदराय रुद्राय रुक्मिणे सोमचेतसे ॥ ५६॥ सूक्ष्मज्ञानकुठाराय वरेण्यायादिमूर्तये । नमस्ते भूतचापाय शान्ताय विषयेषवे ॥ ५७॥ नमस्ते लोकमालाय ग्रहाकल्पाय मुण्डिने । नमस्ते दण्ड्यदण्डाय शक्तिशूलकपालिने ॥ ५८॥ नमः शेषकलापाय मायाशिष्टाय मायिने । महेश्वराय महते विश्वनाथाय विष्णवे ॥ ५९॥ सर्वार्चिताय शर्वाय सर्वायामृतमूर्तये । नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सदाशिव ॥ ६०॥ यदज्ञानात्कृतं सर्वं क्षमस्व मम शङ्कर । मा भूदेवमितः पश्चादहङ्कारावृतं मनः ॥ ६१॥ त्वत्प्रसादान्महेशान सर्वावस्थासु सर्वदा । चरणाम्बुजयोस्तेऽस्तु मनो मे जन्मजन्मनि ॥ ६२॥ करुणाकर कारुण्यं कुरु मे शरणार्थिनः । अणु वानणु वा देव ज्ञानतोऽज्ञानतोऽपि वा ॥ ६३॥ यत्कृतं मनसा वाचा कर्मणा च मया शिव । भक्तोऽयमिति मामीक्ष्य सुप्रसन्नेन चक्षुषा । तत्सर्वं मम विश्वेश क्षमस्वोमाहृताहृत ॥ ६४॥ इति स्तुतः स भगवान् विष्णुना प्रभविष्णुना । आह गम्भीरया वाचा भक्त्या तुष्टो महेश्वरः ॥ ६५॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे विष्णुकृतशिवस्तुतिः समाप्ता । (३०) विष्णु म्हणाला- हे परमेश्वरा, तूं मजवर कृपा कर. मी गर्वानें अतिशय फुगलों त्यामुळे मला तुझी आठवण देखील राहिली नाहीं; माझ्या अंगात कांहीच सामर्थ्य नाहीं. मी फार क्षुल्लक दृष्टीचा आहें. (३१) मी संसारसमुद्रांत पडलों आहें ह्या समुद्रांत जन्म, मरण, म्हातारपण दुःख वगैरे लाटा उसळत असून ह्या समुद्राचा अंत लागत नाहीं. ह्या समुद्रांत मी बुडत आहें तर ह्यांतून तूं कृपा करून मला वर काढ. (३२) विषयसुख, वैर, अहंकार, राग, आशा आणि अज्ञान ह्या सुसरींनीं मला गिळून टाकिलें आहे, ह्यांपासून माझी मुक्तता कर. तूं सर्व प्राणिमात्रांचा अधिपति आहेस, तुला शर्व म्हणतात, तुझ्या अंगी कोणताही दोष नाहीं. (३३) तूं भक्तजनांचे अपराध क्षमा करितोस, परमेश्वरा, तुजवर पार्वतीचें मन फार आसक्त आहे, तुला शंकर म्हणतात, तुला तीन नेत्र आहेत, त्यांपैकी तिसरा कपाळावरील नेत्र सर्वांत श्रेष्ठ आहे. त्या नेत्रांतील अग्नीनें तूं मदनास जाळून टाकिलेंस, तूं मजवर कृपा कर. (३४) परमेश्वरा, तूं आपले अंगास पांढरें शुभ्र भस्म लाविले आहेस त्यामुळे तुझे अंग पहिल्यापेक्षा फारच पांढरें दिसतें. तुझें स्वरूप गोरें असून तुझा गळा नीलरंगाचा आहे, तुला शुभ्र वृषभावर प्रयाण करण्याची फार आवड आहे, तूं मजवर कृपा कर. (३५) तुझ्या शरीराला पार्वती देवीनें प्रेमानें दोन्ही हातानें आलिंगन दिलें आहे, तूं भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहेस. पार्वतीच्या हाताच्या नखांचे वण तुझ्या अंगावर उमटले असल्यामुळे ते अलंकार घातल्यासारखे दिसतात, तूं मज्वर कृपा कर. (३६) परमेश्वरा, तूं मजवर कृपा कर. तुला महाकाल म्हणतात, तुझा गळा निळ्या रंगाचा असून तो फार नाजूक आहे. परमेश्वरा, पार्वतीच्या मैत्रिणी तिच्याजवळ असतां त्यांच्यासमक्ष तूं पार्वतीबरोबर क्रीडा करितोस; तुझ्या शरीराला मायादेवी (पार्वती) नेहमीं चिकटलेली आहे. (३७) परमेश्वरा, तूं मजवर कृपा कर. तुझ्या मस्तकावरील जटा पिंगट रंगाच्या असून त्या फार लांब आहेत, व त्या जटांचे टोंक पश्चिम दिशेकडे वळलेले आहे. तुझे डोळे पिंगट रंगाचे असून तूं अविनाशी आहेस; तुला यक्षलोक फार आवडतात, तूं मंगलकारक वस्तूंची खाण आहेस. तूं लक्ष्मीचा पति आहेस. (३८) परमेश्वरा, तूं मजवर कृपा कर. परमेश्वरा, पार्वतीच्या नेत्ररूप कमलांस तूं सूर्यासारखा आनंद देतोस, तूं आपले मस्तकावर अलंकारासारखी गंगा धारण केली आहेस, तुझ्या मस्तकावर अर्धचंद्र आहे. (३९) परमेश्वरा तूं मजवर कृपा कर, योगीश्वर लोक तुझें नेहमीं ध्यान करितात, तूं सर्वं त्रैलोक्याचा मूलपुरुष आहेस, तूं ज्ञानस्वरूप आहेस, तुला महेश्वर असें म्हणतात, तुझी कीर्ति फार मोठी आहे, तुझ्याबरोबर माया असते म्हणून तुला मायी म्हणतात, मायेचें खरें स्वरूप तुला कळून चुकलें आहे, तूं महादेव आहेस, तूं महेश्वर आहेस (४०) एक कोटि सूर्यांच्या तेजासारखें तुझें रूप तेजस्वी आहे, तूं त्रैलोक्याचा अधिपति आहेस, ब्रह्मादिक देव तुझी कीर्ति मोठ्या आवडीनें गातात. तुझी कीर्ति फार पवित्र आहे, सर्व प्रजा तुझी पूजा करितात. तुला नमस्कार असो. (४१) दोन प्रहरच्या वेळच्या सूर्यासारखें तुझें स्वरूप तेजस्वी आहे, तूं मोठा दयाळु आहेस, तूं कल्याण करणारा आहेस. परमेश्वरा, तूं माझें रक्षण कर. तूं मरणाचें दुःख नाहींसें करणारा आहेस. (४२) तुला परमेश्वर म्हणतात, तुझे डोळे कमळांसारखे आहेत, तूं त्रिपुरांस शिक्षा केलीस तूं सर्वांचा मूलपुरुष आहेस, तुझ्या पदकमलांची देवेंद्र देखील पूजा करितो, तुला केशव असेंही म्हणतात, तुला नमस्कार असो. (४३) तुला हिरण्यकेश (सोन्यासारखे लाल रंगाचे केस असणारा), शोचिष्केश, धीमान्ं, शिपिविष्ट, पृश्निगर्भ अशीं नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (४४) पार्वतीचे स्तनावरील कुंकु लागून तुझा ऊर लाल झाला आहे तुझा वर्ण फार चांगला आहे, तूंच मूलदेव आहेस, तूं सर्व देवाचें मूलस्थान आहेस, तूंच ब्रह्मदेव आहेस तुला नमस्कार असो. (४५) तुला सुद्युम्न, आदिकवि, ब्रह्मगर्भ, मन्यु, सुशुचा, भ्राजा, देव, तिग्मरोचि अशीं नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (४६) तूं प्राणिमात्रांचा अधिपति आहेस, तुला काल म्हणतात, तूंच जग उत्पन्न करितोस. आणि तूंच जगाचा संहार करितोस. तुला सुवर्त्मा, विशुद्ध, कृष्ण आणि अमिततेजा अशीं नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (४७) तुला शिव, रुद्र, नीलकंठ; भूयस्, दिगंबर, सांब, त्र्यंबक, आणि आदिचक्री, अशी नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (४८) तुला वाम, घोर, सद्य, पुरूष, ईशान, शांत, शाश्वत, अनंतकारि अशी अनेक नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (४९) तूं भक्तलोकांची दुःखे दूर करितोस, आणि भक्तांस ह्या लोकीची आणि परलोकीची सुखें (मुक्ति) मिळवून देतोस, तूं मूलज्ञानी आहेस, तू वेदांच्या द्वाराने जाणावयासारखा आहेस, तूंच मूलविद्या आहेस, तूं धरा आणि माया ह्यांची करमणूक करणारा आहेस, तुला नमस्कार असो. (५०) तूं आपल्या भक्तांचे कल्याण करितोस, तूं नेहमीं कल्याणस्वरूप आहेस, तुझ्या हातांत त्रिशूल आहे, तूं निरिच्छ आहेस, तूं सर्व आशीर्वादांचा अधिपति आहेस तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. (५१) तूं धर्मस्वरूप आहेस, तूं भक्तांच्या अंगातील चिलखत आहेस, प्रत्येक प्राणिमात्र जीं जीं बरीं वाईट कामें करितात तीं तीं सर्व तुला माहीत आहेत; तूं नरसिंहाचा शत्रु आहेस, तूं दुर्गतीचा शत्रु आहेस, आणि तूं सर्व मनुष्यांचा राजा आहेस, तुला नमस्कार असो. (५२) तूं पंचवीस तत्त्वस्वरूप आहेस, तुला पंचमहाभूतांचा संबंध नाहीं, तूं स्थावर जंगम प्राण्यांचा विस्तार करणारा आहेस, आकाशांत फिरणाऱ्या प्राण्यांचे गुणधर्म तुझ्यांत नाहीत, तूं दुराचाराचा नाश करितोस, त्या तुला नमस्कार असो. (५३) तूं सर्वज्ञ आहेस, तूं सर्वांहून श्रेष्ठ आहेस, सर्व लोक तुझ्या कृत्याची फार प्रशंसा करितात इतकीं तुझीं कृत्यें चांगली आहेत, तू सर्व वस्तूंत सारभूत (महत्वाची) वस्तु आहेस, तूं सर्वांचा अधिपति आहेस, तुला सदाशिव असें म्हणतात, अशा तुला नमस्कार असो. (५४) तू सर्व प्राणिमात्रांस आधार आहेस, तूं मोठा योगीश्वर आहेस, तुझें स्वरूप योगांच्या साधनानें समजतें, तुला पुरुष्रुत म्हणतात, तूं योगास आधार देणारा आहेस, तुला आधार देणारा दुसरा कोणी नाहीं, तूं पृथ्वीला आधारभूत आहेस, त्या तुला नमस्कार असो. (५५) तुझा कोणी धनी नाहीं, तुला विनाथ (धनी नसणारा) असें म्हणतात, त्रैलोक्यांत जे मुख्य मुख्य अधिकारी आहेत त्यांचा तूं मुख्य अधिकारी आहेस, तुझ्या हातांत शूल आहे, तूं अनाथ (दीन) लोकांचा अधिपति (रक्षण करणारा) आहेस, तुला सोमनाथ म्हणतात, तुला शंभु म्हणतात त्या तुला नमस्कार असो. (५६) तुला ब्रह्मकेश, विष्णुनेत्र, शोचिष्, सूर्योदर, रुद्र, रुक्मी, सोमचेताः अशीं नांवें आहेत, त्या तुला नमस्कार असो. (५७) तुझी ज्ञानरूप कुन्हाड फार तीक्ष्ण आहे (तूं मोठा ज्ञानी आहेस), तूं सर्वोपेक्षां श्रेष्ठ आहेस, तूं मूलपुरुष आहेस, पंचमहाभूत हे तुझें धनुष्य असून इंद्रियगोचर विषय हे तुझे बाण आहेत; तुझा स्वभाव फार शांत आहे त्या तुला नमस्कार असो. (५८) हे सात लोक तुझ्या माला आहेत, नऊ ग्रह हे तुझे अलंकार आहेत, तूं आपल्या गळ्यांत मनुष्याच्या मस्तकाच्या माला घालितोस. तूं अपराधी लोकांस शिक्षा करितोस, शक्ति, शूल आणि कपाल हे तिन्हीही पदार्थ तूं आपल्या हातांत घेतोस, त्या तुला नमस्कार असो. (५९) तूं आपल्या अंगावर शेषनाग अलंकारा सारखा घेतोस, तूं मायेपेक्षां फार श्रेष्ठ आहेस, तुला मायी म्हणतात, तुला महेश्वर म्हणतात, तूं श्रेष्ठ (मोठा) आहेस, तूं त्रैलोक्याचा अधिपति आहेस, तुला विष्णु म्हणतात, त्या तुला नमस्कार असो. (६०) सर्व प्राणिमात्र तुझी पूजा करितात, तुला शर्व म्हणतात तर्सेच सर्व असेंही म्हणतात तूं अमृतस्वरूप आहेस; हे सदाशिवा, त्या तुला नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. (६१) श्रीशंकरा, माझ्या हातून अज्ञानपणामुळे आजपर्यंत जे कांहीं अपराध झाले असतील, त्या सर्वांची तूं मला क्षमा कर. आणि आतापासून पुढें केव्हांही माझें मन पुनः गर्विष्ठ होऊं नये, असा वर दे. (६२) हे महेश्वरा, मी कोणत्याही स्थितींत असो, जन्मोजन्मीं माझें मन तुझ्या कृपादृष्टीनें नेहमीं तुझ्या पदकमलांचीच भक्ति करो, दुसरें कांहीं नको. (६३) तू मोठा दयाळू मनाचा आहेस, मी तुला शरण आलो आहें, तूं मजवर कृपा हे परमेश्वरा, माझे हातून लहान असो किंवा मोठें असो, समजून असो किंवा नसमजून असो. (६४) जे कांहीं मनानें वाचेनें आणि कृतीनें बरें वाईट कृत्य झाले असेल त्या सर्वांची हा माझा भक्त आहे अशी कल्पना करून तूं कृपादृष्टीनें मला क्षमा कर. तूं विश्वाचा अधिपति आहेस, परमेश्वरा, तुला पार्वतीनें वश केलें आहे, आणि वश केलें नाहीं, अशी स्थिति आहे. (६५) ह्या प्रमाणें जयशील श्री विष्णूनें भगवान् श्री शिवाची स्तुति केल्यावर त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन श्री शंकर त्यास गंभीर शब्दानें म्हणाले (६६) श्रीशिव म्हणाले- विष्णो, तुझ्या हातून हजारो हजार अपराध झाले असले तरी तुझ्या भक्तीमुळें आणि तूं केलेल्या माझ्या स्तोत्रामुळे मी आतां तुला ते सर्व क्षमा केले आहेत. Proofread by Manish Gavkar
% Text title            : Vishnukrita Shiva Stuti
% File name             : viShNukRRitashivastutiH.itx
% itxtitle              : shivastutiH viShNukRitA (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : viShNukRitashivastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org