विधिकृतशिवस्तुतिः

विधिकृतशिवस्तुतिः

अध्याय १३ ब्रह्मोवाच । नमो देवाय महते महादेव्यै नमो नमः । नमः शिवाय शान्ताय शिवायै शान्तये नमः ॥ ४९॥ ॐ नमो ब्रह्मणे तुभ्यं विद्यायै च नमो नमः । नमो नमस्ते कालाय मायायै च नमो नमः ॥ ५०॥ नियन्त्रे सर्वकार्याणां क्षोभितायै नमोऽस्तु ते । नमो मूलप्रकृतये महेशाय नमो नमः ॥ ५१॥ नमो विज्ञानदेहाय स्मृतये च नमो नमः । नमो नमोऽस्तु रुद्राय रुद्राण्यै च नमो नमः ॥ ५२॥ नमोऽस्तु ते प्रकृतये नमो नारायणाय च । योगदायै नमस्तुभ्यं योगिनां गुरवे नमः ॥ ५३॥ भूतये सर्वभूतानां नमो योगार्तये नमः । नमः संसारनाशाय संसारोत्पत्तये नमः ॥ ५४॥ नित्यानन्दाय विभवे नमोऽस्त्वानन्दमूर्तये । नमः कार्यविहीनाय विश्वप्रकृतये नमः ॥ ५५॥ ओङ्कारमूर्तये तुभ्यं तदन्तःसंस्थिताय च । नमस्ते व्योमसंस्थाय व्योमशक्त्यै नमो नमः ॥ ५६॥ इति सोमाष्टकेनेशं संस्तुत्य स पितामहः । पपात दण्डवद्भूमौ गृणन् वै शतरुद्रियम् ॥ ५७॥ अथ देवो महादेवः प्रणतार्तिहरो हरः । प्रोवाचोत्थाप्य हस्ताभ्यां प्रीतोऽस्मि तव साम्प्रतम् ॥ ५८॥ दत्वाऽस्मै परमं योगमैश्वर्यमतुलं महत् । प्रोवाचाग्रेस्थितं रुद्रं नीललोहितमीश्वरम् ॥ ५९॥ एष ब्रह्मा तु जगतां सम्पूज्यः प्रथमः सुतः । सर्वदा रक्षणीयोऽयं भवताऽऽपि दयालुना ॥ ६०॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे विधिकृतशिवस्तुतिः समाप्ता । ब्रह्मदेवाने शिवाची स्तुति केली. (४९) ब्रह्मदेव बोलला - मोठ्या ह्या शंभूला व देवीला पुनः पुनः नमस्कार करतों. शांत अशा शिवाला व त्याच्या पत्नीला नमस्कार करितो, व शांतीला नमस्कार करतों. (५०) हे ब्रह्मन् तुला माझा नमस्कार असो तसेच विद्या देवीला नमस्कार असो. हे काला, तुला वारंवार नमस्कार करतों, व तुझ्या मायेला नमस्कार करतों. (५१) सर्व कार्ये चालविणाऱ्या त्या ईश्वराला व त्याच्या पत्नीला (क्षोभितेला) नमस्कार असो. मूलप्रकृतीला व महेशाला पुनः पुनः नमस्कार करतों. (५२) विज्ञान देहाला व स्मृतीला (त्याच्या पत्नीला) नमस्कार असो. रुद्राला व रुद्राणीला पुनः नमस्कार असो. (५३) नारायणाला व त्याच्या प्रकृतीला नमस्कार असो. योग्यांच्या गुरूला योगदेला नमस्कार असो. (५४) सर्व भूतांचे कल्याण करणाऱ्या त्या शिवेला व योगार्तीला नमस्कार असो. संसार नाश करणाऱ्या त्या शिवाला व संसार उत्पन्न करणाऱ्या त्या देवीला नमन असो. (५५) नित्यानंद स्वरूपाला, विभूला, आनंदमूर्तीला, कार्य हीनाला नमस्कार असो व विश्वप्रकृतीला (त्याच्या पत्नीला) नमस्कार असो. (५६) ओंकार मूर्तीला, ओंकाराच्या आंत राहिलेल्या शिवाला नमन असो. आकाशांत राहणाऱ्या देवाला व आकाशशक्तीला नमन असो. (५७) याप्रमाणे सोमाष्टकानें ईशाची स्तुति करून त्या ब्रह्मदेवानें शतरुद्रिय (तें एकस्तोत्र) तोंडानें म्हणत त्या देवाला साष्टांग नमस्कार केला. (५८) नंतर तो शरणागताची पीडा दूर करणारा महादेव हातांनी त्याला (ब्रह्मदेवाला) उठवून म्हणाला कीं, हे पितामहा, तुला मी प्रसन्न झाला आहे. (५९) नंतर त्याला महादेवानें योग देऊन व अतुल मोठें ऐश्वर्य देऊन आपल्यापुढे असलेल्या नीललोहित अशा रुद्राला म्हटलें कीं, (६०) हा ब्रह्मा जगांत पूज्य असून पहिला मुलगा आहे. याकरिता दयालु तूं यांचे रक्षण सर्वदा कर Proofread by Manish Gavkar
% Text title            : Vidhikrita Shiva Stuti
% File name             : vidhikRRitashivastutiH.itx
% itxtitle              : shivastutiH vidhikRitA (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : vidhikRitashivastutiH
% Category              : shiva, vIrashaiva, stuti
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org