यमकृतशिवमहिमावर्णनम्

यमकृतशिवमहिमावर्णनम्

यम उवाच । नमः सकललोकानां सर्गस्थित्यन्तहेतवे । सर्वज्ञाय वरेण्याय भक्तिगम्याय शम्भवे ॥ ५०॥ यत्पादं सकृदभ्यर्च्य पापिनोऽपि गतैनसः । शिवलोकं प्रपद्यन्ते तन्नमामि सदाशिवम् ॥ ५१॥ यत्पादपङ्कजं नत्वा पापिष्ठा अपि मानवाः । तीर्त्वा ते नरकं घोरं प्रयान्ति शिवमन्दिरम् ॥ ५२॥ यन्नाम सकृदुच्चार्य महापातकिनो नराः । निष्कल्मषा भविष्यन्ति तं प्रपद्ये महेश्वरम् ॥ ५३॥ यस्य मूर्तिं सकृत् ध्यात्वा ध्वस्तपापा नरोत्तमाः । शिवरूपा भविष्यन्ति तमहं नौमि शङ्करम् ॥ ५४॥ वेदानामागमानां च पुराणानां तथैव च । फलभूतो य एवैकः प्रपद्ये तं महेश्वरम् ॥ ५५॥ मणिलिङ्गे यमभ्यर्च्य रोहिण्यां विद्यया सह । ब्रह्मत्वं गतवान्ब्रह्मा तं नमामि महेश्वरम् ॥ ५६॥ इन्द्रनीले यमभ्यर्च्य ध्रुवेण श्रुतितारके । विष्णुत्वं प्राप्तवान् विष्णुस्तं नमामि महेश्वरम् ॥ ५७॥ पद्मरागे यमभ्यर्च्य कृत्तिकायां तु भद्रया । अग्नित्वं प्राप्तवानग्निस्तं नमामि सदाशिवम् ॥ ५८॥ नीललिङ्गे यमभ्यर्च्य ज्येष्ठायां वज्र विद्यया । शक्रत्वं प्राप्तवांश्च्छक्रस्तं नमामि सदाशिवम् ॥ ५९॥ मणिलिङ्गे यमभ्यर्च्य मघायां वसुविद्यया । अहं यमत्वमापन्नस्तं नमामि सदाशिवम् ॥ ६०॥ यस्य प्रसादलेशेन सर्वेषां प्राणिनामहम् । शास्ता प्रख्यापितो लोके तं नमामि महेश्वरम् ॥ ६१॥ अयोलिङ्गे यमभ्यर्च्य दैत्यदानवराक्षसाः । असह्यवलमापन्नास्तं नमामि सदाशिवम् ॥ ६२॥ कायेन मनसा बुध्या येऽर्चयन्ति महेश्वरम् । धर्मार्थकाममोक्षाख्यान् पुरुषार्थान् लभन्ति ते ॥ ६३॥ यस्मिन् स्थितमिदं विश्वं वीचिमाला यथाम्भसि । सर्वदेवमयं शम्भुं प्रणमामि महेश्वरम् ॥ ६४॥ एकोऽस्ति सर्वभूतेषु तरङ्गेषु यथा पयः । सर्वात्मकं महादेवं तं सदा प्रणमाम्यहम् ॥ ६५॥ एक एव हि यो देवः सर्वभूतहृदि स्थितः । आकाशवदमेयात्मा तं नमामि महेश्वरम् ॥ ६६॥ एकोऽपि बहुधा देवो दृश्यते जलचन्द्रवत् । अज्ञानावृतचित्तानां तं नमामि महेश्वरम् ॥ ६७॥ विज्ञानवादिनः प्राहुर्विज्ञानमिति यं प्रभुम् । तं नमामि महादेवं सदैवालङ्घ्यशासनम् ॥ ६८॥ यमाहुः पुरुषं साङ्ख्याः सदा तत्त्वार्थचिन्तकाः । तं नमामि महेशानं सर्वलोकैककारणम् ॥ ६९॥ यमाहुर्ब्रह्मशब्देन सर्वे वेदान्तवादिनः । वेदान्तवेद्यमीशानं तं नमामि महेश्वरम् ॥ ७०॥ विष्णुं सर्वशमुत्पत्तिस्थितिसंहारकारिणम् । तं नमामि महेशानं सर्वलोकैक कारणम् ॥ ७१॥ पुष्कलागमतत्त्वज्ञा यमाहुश्चतुराननम् । जगत्स्रष्टारमीशानं तं नमामि सदाशिवम् ॥ ७२॥ यमेकमग्निरित्याहुः सूर्य इत्यपरे जनाः । अन्ये वायुरिति प्राहुस्तं नमामि महेश्वरम् ॥ ७३॥ शैवाः शिव इति प्राहुरन्ये प्राहुर्महेश्वरम् । अन्ये पशुपतिं प्राहुस्तमीशं प्रणमाम्यहम् ॥ ७४॥ नानाविधघटेष्वन्तरेकं लीनं यथा नभः । भूतेष्वन्तस्तथैवैकस्तं प्रपद्ये सदाशिवम् ॥ ७५॥ स्रष्टा त्वमेव जगतां रक्षकस्त्वं महेश्वर । संहर्ता जगतां देवस्त्वमेवैको महेश्वर ॥ ७६॥ शासनार्थं तु पापानां त्वयैवाहं नियोजितः । ततः प्रभृति देवेश सर्वे पापसमन्विताः ॥ ७७॥ पापानुरूपदण्डेन नरके शिक्षिता मया । त्वदाज्ञयाऽहं देवेश सर्वत्रालङ्घ्यशासनः ॥ ७८॥ इदानीं भञ्जिताज्ञोऽहं सुकुमारकृते प्रभो । किमेतदिति सञ्चिन्त्य त्वां द्रष्टुमहमागतः ॥ ७९॥ इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे यमकृतशिवमहिमावर्णनं सम्पूर्णम् । (५०) यमं बोलला सर्व लोकांची उत्पत्ति, स्थिति, नाश यांला कारण अशा हे ईश्वरा, तुला नमस्कार असो. हे सर्वज्ञा, वरेण्या, भक्तिगम्या, शंभो, तुला नमस्कार असो. (५१) ज्याच्या पायाची पूजा एकवार करून पापी लोक देखील निष्कल्मष होऊन शिवलोकाला येतात, त्या सदाशिवाला नमस्कार असो. (५२) ज्याच्या पादकमलाला नमस्कार करून पापी मानव देखील घोर नरक तरून शिवमंदिराला जातात. (५३) ज्याचें नांव एकवार घेतलें असतां महापातकी लोक निष्कल्मष होऊन महेश्वराला शरण येतात त्या ईश्वराला नमस्कार करतों. (५४) ज्याच्या मूर्तीचें एकवार ध्यान करून लोक निष्पाप होतात, व शिवरूप होतात, त्या शंकराला मी नमस्कार करतों. (५५) वेद आगम, पुराण यां सर्वांना जो एकच फल आहे, त्या महेश्वराला मी नमस्कार करतों. (५६) मणिमय लिंगामध्ये ईश्वराची व रोहिणीच्या ठिकाणीं विद्येसह पूजा करून ब्रह्मदेवानें ब्रह्मत्व मिळविलें, त्या महेश्वराला नमन करतों. (५७) इंद्रनील मण्याच्या लिंगांत ज्याची पूजा करून ध्रुवानें श्रुतितारकांत, पूजा करून विष्णूनें विष्णुत्व मिळविलें त्या महेश्वराला नमस्कार असो. (५८) पद्मरागमण्याच्या लिंगांत ईश्वराची व कृत्तिकेच्या ठिकाणीं भद्रेची पूजा करून अग्नीनें अग्नित्व मिळविलें, त्या ईश्वराला नस्कार करतों. (५९) नीळाच्या लिंगांत ज्याची व ज्येष्टेच्या ठिकाणीं वज्र विद्येसहित पूजा करून इंद्रानें इंद्रत्व मिळविलें, त्या सदाशिवाला नमस्कार असो. (६०) मणिमय लिंगांत ज्याची पूजा मघा नक्षत्राच्या दिवशी वसुविद्येसहित करुन मीं यमत्व मिळविलें, त्या सदाशिवाला नमस्कार असो. (६१) ज्या परमेश्वराच्या अनुग्रहाच्या किंचित भागानें सर्व प्राण्यांना मी शासन करतो, व शास्ता म्हणून प्रसिद्ध झालों, त्या महेश्वराला मी नमस्कार करतों (६२) लोखंडाच्या लिंगांत दैत्य, दानव, राक्षस यांनी पूजा करून असह्य सामर्थ्य मिळविले, त्या सदाशिवाला नमस्कार करतों. (६३) काया, वाचा, मनानें (शरीरानें, वाणीनें मनानें) बुद्धीनें महेश्वराची पूजा करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे पुरुषार्थ मिळवितात, त्या देवाला नमन करतों. (६४) समुद्रावर लाटा जशा असाव्यात, त्या प्रमाणें ज्याच्यामध्यें हे जग आहे, त्या सर्व देवमय महेश्वर शंभूला नमन करतों. (६५) लाटांमध्यें जसें पाणी आहे, त्या प्रमाणे सर्व प्राण्यांच्या ठिकाण जो ईश्वर एकच आहे, त्या सर्वात्मक महादेवाला नमस्कार करतों. (६६) जो एकटाच देव सर्व प्राण्यांच्या हृदयामध्यें राहतो, जो आकाशा प्रमाणें व्यापक व अपरिमित शरीराचा आहे, त्या देवाला नमस्कार करतों. (६७) जो परमेश्वर एकटाच असून पाण्यांतल्या चंद्राप्रमाणें अनेक तऱ्हेनें अज्ञानी लोकांना दिसतो, त्या महेश्वराला नमस्कार करतों. (६८) विज्ञानवादी लोक ज्या प्रभूला विज्ञानेश्वर असें म्हणतात, ज्याची आज्ञा मोडतांच येत नाहीं, त्या महादेवाला नमस्कार करतों. (६९) तत्त्वार्थचिंतन करणारे सांख्यमतानुयायी लोक ज्याला पुरुष असें म्हणतात, जो सर्व लोकांला मुख्य कारण आहे, अशा महेशानाला नमस्कार करतों. (७०) सर्व वेदांतवादी लोक ब्रह्म या शब्दानें ज्याला हांक मारतात जो वेदांत शास्त्राच्या ज्ञानानें गम्य होतो, त्या महेश्वर ईशानाला नमस्कार करतो. (७१) जो सर्वज्ञ असून उत्पत्ति, स्थिति, लय यांला कारण झाला आहे, जो सर्व लोकांला मुख्य कारण झाला आहे, जो विष्णु या नांवानें प्रसिद्ध झाला आहे, त्या महेशानाला नमन करतों. (७२) पुष्कळ आगमांचे तत्त्व जाणणारे लोक ज्याला चतुर्मुख म्हणतात, जो जगाची सृष्टि करतो, त्या सदाशिवाला नमन करतों. (७३) ज्याला कांहीं लोक अग्नि म्हणत असून सूर्य म्हणतात, काही लोक त्यालाच वायु म्हणतात, त्या महेश्वराला मी नमस्कार करतो. (७४) शैव लोक ज्याला शिव म्हणत असून इतर लोक महेश्वर असें म्हणतात. आणखी कांहीं लोक पशुपति असें म्हणतात. त्या ईशाला मी नमस्कार करतों. (७५) अनेक घागरींमध्यें एकच आकाश जसें आहे, तसें सर्व प्राण्यांच्या हृदयांत परमात्मा तो एकच राहतो. अशा सदाशिवाला नमस्कार करतों. (७६) हे महेश्वरा; जगाची सृष्टि करणारा तूं असून संरक्षण करणारा तूच आहेस. जगाचा संहार करणारा तूंच एकटा आहेस. (७७) हे महश्वरा, पापी लोकांना शासन करावयास आपणच मला आज्ञा केली आहे. हे देवेशा, त्या दिवसापासून सर्व पापी लोकांना (७८) त्यांच्या त्यांच्या पापाला अनुसरून नरकवासाची शिक्षा मीं दिली. तुझ्या आज्ञे प्रमाणें माझी आज्ञा सर्व ठिकाणीं निर्धास्त चालते. (७९) हे प्रभो, प्रस्तुत या सुकुमार ब्राह्मणासाठीं मात्र माझी आज्ञा व्यर्थ झाली. हे काय आहे ? तें पाहण्याकरितां मी आपल्या पायांजवळ आलों आहें. इति श्रीमन्नीलकण्ठनागनाथाचार्यवर्यविरचिते श्रीमद्वीरमाहेश्वराचारसङ्ग्रहे यमकृतशिवमहिमावर्णनं सम्पूर्णम् । Proofread by Manish Gavkar
% Text title            : Yamakrita Shivamahima Varnanam
% File name             : yamakRRitashivamahimAvarNanam.itx
% itxtitle              : shivamahimAvarNanam yamakRitam (vIramAheshvarAchArasa.ngrahe, sArtha marAThI)
% engtitle              : yamakRitashivamahimAvarNanam
% Category              : shiva, vIrashaiva
% Location              : doc_shiva
% Sublocation           : shiva
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : January 20, 2023
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org