श्रीलक्ष्मीनृसिंहार्तिः

श्रीलक्ष्मीनृसिंहार्तिः

जयदेव जयदेव जय लक्ष्मीनृहरे ॥ आरार्तिकमङ्गीकुरु भगवन्दनुजारे ॥ जयदेव जयदेव । ध्रु.। (हे राक्षसांच्या वैऱ्या भगवान् लक्ष्मीनरसिंहा, (मी केलेल्या) या आरतीचा तू स्वीकार कर. तुझा जय असो.) गारुत्मतहीरकमुखरत्नावलिखचिते । काञ्चननिर्मितपात्रे कान्त्या समुपचिते ॥ निहितं पूर्णं घृतवर्तिकया मुखतस्ते । परितः कुर्वे यस्मादघनिचयं हरते ॥ जयदेव जयदेव । १। (पाचू, हिरे इत्यादीन्नी दींनी मढवलेल्या, कान्तिमान अशा सोन्याचे बनवलेल्या पात्रान्त ठेवलेल्या व तूप, वात घातलेल्या निराञ्जनानें मी तुला ओवाळतों कीं ज्या योगें माझ्या सर्व पापाञ्चे हरण होईल (माझी सर्व पापे नाहीशी होतील.) (१) चटचटशब्दत्रस्ते, दिक्करटिव्राते । खेटे कष्टं तिष्ठति, खेऽशेपे चलिते ॥ स्तम्भप्रकटितविकटोद्धतसटहरिमूर्ते । दृष्टिज्वालाज्वालितविष्टप्रनुतकीर्ते ॥ जयदेव जयदेव । २। (जेव्हा, हे हरी, तूं भयङ्कर व वर उभारलेली आयाळयुक्त असलेला असा स्तम्भातून प्रकट होतोस त्या वेळी ``चटचट'' अशा आवाजानी दिग्गजाञ्चे समुदाय घाबरतात, तारागण हलूं लागतात, व अखिल भूमण्डळ डळमळू लागते, तुझ्या दृष्टीच्या ज्वाळान्नी अखिल भुवन प्रकाशित होते व ते तुझी कीर्ती गाऊ लागते.) (२) प्रह्लादाह्लादार्थं निर्गुणमपि सगुणम् । रूपं धृतवत उपयोताऽहं ते शरणम् ॥ हत्वा काञ्चनकशिपुं नखरैर्निष्करुणम् ॥ जयदेव जयदेव । ३। (प्रह्लादाच्या समाधानाकरतां निर्गुण असूनसुद्धां तूं सगुणरूप धारण केलेंस. तुला मी शरण आलो आहे. हे स्वामिन्, हिरण्यकशिपूची कठोरपणे आपल्या नखान्नी हत्या करून तूं पृथ्वीचा भार हलका केलास.) (३) इदरया संसेवि, चन्दिरधवलात्मन् । मुनिजनमानसहंस, श्रीमन्, परमात्मन् ॥ शेपच्छत्रक्षीराम्बुधिवसते, भूमन् । ज्योतिर्विच्चिन्तामणिदर्शितनिजधामन् ॥ जयदेव जयदेव । ४। (लक्ष्मीनें ज्याची सेवा केली आहे अशा चन्द्रासारखा शुभ्रधवल देहधारी देवा, मुनिजनाञ्च्या मानससरोवरातील राजहंसा, भगवान् परमेश्वरा, समुद्रामध्यें शेपाच्या छत्राखाली शयन करणाऱ्या परमश्रेष्ठ परमेश्वरा, चिन्तामणि नावाच्या या ज्योतिष्याला तूं आपले निवासस्थान दाखवले आहेस.) (४) इति श्रीलक्ष्मीनृसिंहार्तिः सम्पूर्णा । Proofread by M K Barman
% Text title            : Shri Lakshminrisimhartih
% File name             : lakShmInRRisiMhArtiH.itx
% itxtitle              : lakShmInRisiMhArtiH (marAThI sArthA)
% engtitle              : lakShmInRisiMhArtiH with Marathi meaning
% Category              : vishhnu, dashAvatAra, lakShmI, AratI
% Location              : doc_vishhnu
% Sublocation           : vishhnu
% SubDeity              : dashAvatAra lakShmI
% Language              : Sanskrit, Marathi
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : M K Barman
% Description/comments  : nRRisiMhakosha 2 upAsanA khaNDa
% Indexextra            : (Scans 1, 2)
% Latest update         : August 4, 2025
% Send corrections to   : sanskrit at cheerful dot c om
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org