श्रीनृसिंहार्तिः २
अथ श्रीनृसिंहार्तिप्रारम्भः ॥
देवं ब्रह्मशिवाद्यैर्वन्द्यं वन्देऽहम् ।
केसरिमुखनरदेहं हापितसन्देहम् । जयदेव जयदेव । ध्रु. ।
(ब्रह्म, शिव इत्यादि देवान्नी ज्याला वन्दन केले आहे; सिंहाचे
मुख व मनुष्याचा देह ज्याने धारण केला आहे व जो संशय
नाहीसा करतो त्याला (नरसिंहाला) मी वन्दन करतो. त्याचा जय
असो.)
स्वर्णकशिपुपादहतस्तम्भाविर्भूतम् ।
वामाङ्कस्थितचन्द्राननजलनिधिभूतम् ।
स्वाविर्भावविभूषितमाधवसितभूतम् ॥ देवं ब्रह्म. । १।
(हिरण्यकशिपु राक्षसाने खाम्बावर लाथ मारल्यावर त्या खाम्बातून
जो प्रकट झाला; चन्द्रासारखे मुख असलेली व समुद्रान्तून उत्पन्न
झालेली लक्ष्मी ज्याच्या डाव्या माण्डीवर बसली आहें; आपल्या
मायाविलासाने ज्याने सर्व स्थावरजङ्गम सृष्टि उत्पन्न केली व ज्याचा
अवतार विष्णु व शिव या दोघान्नाहि भूपणभूत झाला.) (१)
घोरध्वानध्वानितजगदण्डाभोगम् ।
स्तब्धजटाजालजरितमिहिरादिनभोगम् ।
दीर्घभुजाधरितधराधरपन्नगभोगम् ।
भक्तश्रेणीविश्राणितवाञ्छितभोगम् । देवं ब्रह्म । २।
(आपल्या घोर गर्जनेने सर्व जग दुमदुमवून सोडणारा; आपल्या
उभारलेल्या जटाजालाने ज्याने नभाङ्गणान्तील सूर्यादिकान्नाहि झाकळून
टाकले; ज्याने आपल्या लाम्ब हातान्नी पर्वत व शेष यान्ना आधार
दिला व जो आपल्या भक्तगणान्ना त्याञ्चे ईप्सित देतो.) (२)
खरतरनखरप्रखरविदारितरिपुहृदयम् ।
वह्निविषाम्बुत्रातप्रह्लादं, सदयम् ॥
रोपविलोहितलोचनधिक्कृतरव्युदयम् ।
कनककशिपुनिर्मथनाद्वर्धितदिविषदयम् ॥ देवं ब्रह्म. । ३।
(ज्याने आपला शत्रु (हिरण्यकशिपु) त्याचे हृदय आपल्या तीक्ष्ण
नखान्नी जोराने फाडले, ज्याने (भक्त) प्रह्लादाला अग्नि, विष व
पाणी याम्पासून वाचवले, जो दयाळू आहे, उदयोन्मुख सूर्याच्या लालीपेक्षांहि
रागाने लाल झालेल्या ज्याच्या डोळ्याञ्ची लाली अधिक आहे आणि
हिरण्यकशिपूला ठार करून ज्यानें देवाञ्चे समाधान, सुख (भाग्य)
वाढवले आहे.) (३)
क्षीराकूपारान्तर्द्धपि कृतवासम् ।
चक्रपिनाकाभयवरधरकरमतिभासम् ॥
प्रतिपक्षक्षोभक्षमचण्डाट्टहासम् ।
पालितपदनतदाजिज्योतिर्विद्वांसम् ॥ देवं ब्रह्म । ४।
(क्षीरसागराच्या आन्त असलेल्या बेटावर वास करणारा, चक्र,
पिनाक (धनुष्य) , अभय व वरद इत्यादीन्नी युक्त असे ज्याचे हात
आहेत; जो अतिशय तेजस्वी आहे; आपल्या विकट व भयङ्कर
हास्याने शत्रुहृदयान्त जो थरकाप उत्पन्न करतो, तो देव आपल्या
पदी लीन झालेल्या या दाजी ज्योतिष्याचे रक्षण करतो.) (४)
इति श्रीलक्ष्मीनृसिंहार्तिः सम्पूर्णा ।
Proofread by M K Barman