भागवताची आरती
जयदेव जयदेव श्रीमद्भागवता ।
श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ॥ धृ ॥
वेदाचें हें सार पाहे रसभरित ।
दशलक्षण हें आहे लक्षीत ॥ जय ॥ १॥
द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा ।
तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा ॥ जय ॥ २॥
अठरा सहस्र श्लोक गाती ऐकती ।
ज्यासी हरीभक्ती त्यासी तत्प्राप्ती ॥ जय ॥ ३॥
गायत्रीचें मंत्ररूप हें पाहें ।
परीक्षिति-शुकसंवाद आहे ॥ जय ॥ ४॥
भागवतरूपी देवा तूंचि अहेसी ।
करूं ही आरति एका-जनार्दनासी ॥ जय ॥ ५॥
इति